आम्ही कशाला सुरक्षा द्यावी असे आपणाला वाटते?
चुनें
Please select valid optionयामध्ये आपल्यासाठी काय आहे?
सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्शुरन्स आऊटलुक ट्रॅव्हलर म्हणून पुरस्कृत
परदेशात प्रवास करताना तुमचा वैद्यकीय / हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर करते.
क्लेम्सचे वेगवान सेटलमेंट
सामान/ पासपोर्ट हरवल्यास कव्हर करते.
हे विश्व जादुई आहे असे म्हटले, तर येथील विविध ठिकाणे फिरून या जगातील अद्भुत गोष्टींचा शोध लावण्यातच खरी जादू आहे. नवीन, वेगळे अनुभव, विशाल दृष्टीकोन आणि आयुष्यभरासाठी राहणाऱ्या हृद्य आठवणी ‘पर्यटना’शिवाय दुसरे कोण देऊ शकेल!
आपण आपल्या आवडीच्या ठिकाणांना भेट देण्यासाठी वर्षभराचे आर्थिक गणित त्यानुसार बसवणारे अनुभवी प्रवासी असा; अगर मनस्वी पर्यटक. ट्रॅव्हल इन्शुरन्स ही एक अशी गोष्ट आहे, जी आपल्या पूर्वतयारीला खऱ्या अर्थाने पूर्णत्व देईल.
आपण ज्याला ‘आपलं गाव’ म्हणता, ते सोडून बाहेर पडणं जितकं रोमांचक असतं, तितकच मनात थोडी भीती निर्माण करणारंही असतं. हे बाहेर पडणं म्हणजे आपली चिरपरिचित जागा, तेथील सुरक्षितता सोडून अनिश्चिततेला कवटाळण्यासारखं आहे. आपला बाहेर पडण्याचा हेतू कोणताही असो- कुटुंबासह निवांत क्षण अनुभवायचे असो किंवा रोजच्या तणावातून काही काळ विश्रांती मिळवून स्वतःसोबत वेळ घालवण्यासाठी असो किंवा नवीन मित्र-मैत्रिणी बनवण्यासाठी असो. हा हेतू पूर्णतः साध्य करणं हे आमचं ध्येय आहे.
आपण कितीही काटेकोर नियोजन केले, तरीही अचानक उद्भवणाऱ्या बाह्य परिस्थितीमुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो. विमानाच्या उड्डाणास होणारा उशीर, आपले सामान हरवणे या त्यापैकीच काही अडचणी आहेत. या सर्व बाबी आपल्या नियंत्रणाबाहेरील असतात आणि त्यांच्यामुळे आपले पूर्वनियोजन पूर्णतः कोलमडू शकते. या सर्व घटना केवळ आपल्या पर्यटनाच्या मूळ उद्देशाला दूर लोटून देत नाहीत; तर यामुळे आपल्याला आर्थिक नुकसानदेखील होते.
मुळात आपण दैनंदिन धकाधकीतून विश्राम मिळवण्याच्या उद्देशानेच प्रवासाला बाहेर पडलो असताना या सगळ्या प्रतिकूल घटनांना एकट्यानेच समोरे जाण्याची आपली तयारी नसते. पर्यटनक्षेत्र म्हणून कायम नावाजलेले फ्रांस, ग्रीस यांसारख्या देशापासून ते काही पर्यटनाच्या परिघातील काही व्हिएतनाम,सर्बिया अशी अज्ञात ठिकाणांपर्यंत आपण कुठेही जाणार असाल, तरीही ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीच्या रूपाने आम्ही सदैव आपल्यासोबत आपल्या पाठीशी असू.
आपले वय, प्राधान्यक्रम आणि वेळापत्रक काहीही असले, तरी पर्यटन प्रत्येकाला काही ना काही अद्भुत ठेवा देऊन जाते. आम्हीदेखील बजाज अलियांझ तर्फे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन्स घेऊन आलो आहोत.
24/7 मिस कॉल सुविधेसह कोणत्याही वेळी जागतिक सहाय्य
सोलो ट्रॅव्हलिंग (एकल पर्यटन) सध्या सर्वात लोकप्रिय आहे. याचे कारण आपल्याला माहिती आहे. स्वतःच्या गोष्टी स्वतःच्या तंत्राने, स्वतःच्या गतीने करण्यात, साहसी प्रवास करण्यात एक वेगळेच समाधान आहे.
आता खरेदी कराआपल्याकडे असणारा वेळ आपण कुणासोबत घालवतो, यावरून तो किती सत्कारणी लागला, हे ठरते आणि आम्हाला माहित आहे, की अशा वेळी पारंपारिक कौटुंबिक सहलीला तोड नाही.
आता खरेदी करातुमच्या आयुष्यातील एक सोनेरी पर्व सुरु झाले आहे आणि ते भरभरून जगण्याची हीच ती वेळ आहे. आम्ही जाणतो की या वयात इतर गोष्टींबरोबरच वैद्यकीय अडचण ही एक मोठी समस्या असू शकते.
आता खरेदी कराआयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असलो, तरीही आपले उबदार घरटे सोडून भरारी घेणे अवघड असते. पण जेव्हा आपण फक्त आपले घर, गावच नाही; तर देशही सोडून वास्तविक जगात प्रवेश करू पाहता, तेव्हा ते अधिकच अवघड बनते.
आता खरेदी करा2020 पर्यंत भारत 50 परदेशी पर्यटकांच्या वाट्याला | तुम्हाला माहिती आहे काय?
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स
आपण जेव्हा व्यवसायासाठी प्रवास करत असता, तेव्हा आधीच आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचारांनी थैमान घातलेले असते. कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन हे एक असे सर्वसमावेशक पॅकेज आहे|
अधिक जाणून घ्याट्रॅव्हल एशिया पॉलिसी
आशियातील जवळपास सर्वच देशांना भारताप्रमाणे विविधता, सांस्कृतिक समृद्धी लाभलेली आहे. या देशांमधील खाद्य संस्कृती ही त्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे.
अधिक जाणून घ्याभारत भ्रमण पॉलिसी
अनेकवेळा आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्टी आपण विचार करतो त्यापेक्षा खूपच निकट असतात. भारत भ्रमण पॉलिसी ही एक अशी डोमेस्टिक ट्रॅव्हल पॉलिसी
अधिक जाणून घ्याटेलरने सर्व वयोगटातील योजना तयार केल्या.
विमानउड्डाणाचा विलंब आणि उड्डाण रद्द होणे
आम्ही जाणतो कि विमानांच्या उड्डाणास विलंब होणे, उड्डाणे रद्द होणे यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते. जेव्हा एखादी जोडणारी विमानसेवा रद्द होते किंवा त्यास विलंब होतो, तेव्हा त्याला जोडून असणारे दुसरे विमानही सुटण्याची शक्यता असते. यामुळे फक्त कार्यक्रमच विस्कळीत होत नाही, तर अतोनात आर्थिक नुकसानही होते. Read more
आम्ही जाणतो कि विमानांच्या उड्डाणास विलंब होणे, उड्डाणे रद्द होणे यामुळे मोठी गैरसोय निर्माण होते. जेव्हा एखादी जोडणारी विमानसेवा रद्द होते किंवा त्यास विलंब होतो, तेव्हा त्याला जोडून असणारे दुसरे विमानही सुटण्याची शक्यता असते. यामुळे फक्त कार्यक्रमच विस्कळीत होत नाही, तर अतोनात आर्थिक नुकसानही होते.ही गोष्ट किती अन्याय्य आहे!
आमचे ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन आपल्याला या परिस्थितीतही मदत करतात.
वैद्यकीय उपचार आणि रुग्णालयाचा खर्च
वैद्यकीय संकटे केवळ आपले प्रवासातील साहस दुःसाहसात परिवर्तित करत नाहीत; तर विदेशात असताना ती प्रचंड मोठी समस्या उभी करू शकतात. आमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन आपल्याला अशा प्रसंगी सर्वतोपरी उपयोगी पडेल, अशा पद्धतीने बनवण्यात आला आहे. Read more
वैद्यकीय संकटे केवळ आपले प्रवासातील साहस दुःसाहसात परिवर्तित करत नाहीत; तर विदेशात असताना ती प्रचंड मोठी समस्या उभी करू शकतात. आमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन आपल्याला अशा प्रसंगी सर्वतोपरी उपयोगी पडेल, अशा पद्धतीने बनवण्यात आला आहे.
आम्ही आपल्याला अनोळखी प्रदेशामध्ये हेल्थ इन्शुरन्स प्रदान करून अशा प्रसंगी तातडीचे वैद्यकीय उपचार, आउट पेशंट केअर, रूग्णालयात दाखल करणे, वैद्यकीय स्थलांतर आणि अपघाती मृत्यू इत्यादी कव्हर करतो व आपला आर्थिक भार आणि तणाव हलका करतो.
ट्रीप कॅन्सलेशन आणि कर्टेलमेंट
एखाद्या अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला आपली सहल रद्द करायला लागणे किंवा तिचा कालावधी कमी करायला लागणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यासाठी केलेला आगाऊ खर्च परत न मिळणे आणि आर्थिक नुकसान सहन करायला ही त्याहूनही वाईट गोष्ट आहे. Read more
एखाद्या अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे आपल्याला आपली सहल रद्द करायला लागणे किंवा तिचा कालावधी कमी करायला लागणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. त्यासाठी केलेला आगाऊ खर्च परत न मिळणे आणि आर्थिक नुकसान सहन करायला ही त्याहूनही वाईट गोष्ट आहे.
आम्ही आपल्यावर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला बदलू शकत नसलो, तरीही त्यामुळे कमी किंवा रद्द झालेल्या सहलीच्या खर्चाचा कव्हर देऊन आम्ही आपल्या आर्थिक नुकसानाची भरपाई नक्कीच देऊ शकतो.
सामान आणि पासपोर्ट गहाळ होणे
आपण जेव्हा सुट्टीवर जाता, तेव्हा तुम्ही दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन जाता. तेव्हा सामान गहाळ होणे ही एक कल्पनातीत आणि अत्यंत हतबल करणारी गोष्ट आहे. कारण त्यातून आपण आपल्या मौल्यवान वस्तूंसोबतच अनोळखी प्रदेशामध्ये गरजेच्या वस्तूंशिवाय अडकून पडता. Read more
आपण जेव्हा सुट्टीवर जाता, तेव्हा तुम्ही दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू सोबत घेऊन जाता. तेव्हा सामान गहाळ होणे ही एक कल्पनातीत आणि अत्यंत हतबल करणारी गोष्ट आहे. कारण त्यातून आपण आपल्या मौल्यवान वस्तूंसोबतच अनोळखी प्रदेशामध्ये गरजेच्या वस्तूंशिवाय अडकून पडता.
त्यातही आपल्या सामानासहित पासपोर्टसुद्धा हरवला असेल, तर ही परिस्थिती आणखी गंभीर बनून जाते. मात्र त्याचसाठी आम्ही आपल्याला मदत करायला आलो आहोत. आमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन आपल्या चेक इन केलेल्या सर्व सामानाचा व पासपोर्टचा कव्हर देऊ करतो.
होम बर्ग्लरी इन्शुरन्स
आपल्या सर्व मौल्यवान वस्तू घरी ठेऊन बाहेर पडणे, ही जोखमीची बाब आहे. तेही जेव्हा दरोडेखोर घरमालक बाहेर पडत असताना घरावर पाळत ठेऊन दरोडा घालतात अशा वेळी. Read more
आपल्या सर्व मौल्यवान वस्तू घरी ठेऊन बाहेर पडणे, ही जोखमीची बाब आहे. तेही जेव्हा दरोडेखोर घरमालक बाहेर पडत असताना घरावर पाळत ठेऊन दरोडा घालतात अशा वेळी. पण यामुळे आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या सुट्टीचा विचार थांबवू नका. आमचा इंटर नॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन आपल्याला घरफोडीसाठीही इन्शुरन्स देतो.
कोविड-19 कव्हर
ही पॉलिसी कोविड-19 मुळे 10,000 यूएसडी पर्यंत वयाच्या 70 वर्षांपर्यंत उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या मर्यादेत हॉस्पिटलायझेशनचा खर्च उचलते आणि 70 वर्षे वयावरील व्यक्तींसाठी 3000 यूएसडीपर्यंत खर्च उचलते (कोविड-19 च्या पॉझिटिव्ह रिपोर्टच्या सापेक्ष) Read more
कोविड-19 कव्हर
ही पॉलिसी कोविड-19 मुळे 10,000 यूएसडी पर्यंत वयाच्या 70 वर्षांपर्यंत उद्भवणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या मर्यादेत हॉस्पिटलायझेशनचा खर्च उचलते आणि 70 वर्षे वयावरील व्यक्तींसाठी 3000 यूएसडीपर्यंत खर्च उचलते (कोविड-19 च्या पॉझिटिव्ह रिपोर्टच्या सापेक्ष) कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या प्रकरणी 3000 यूएसडीपर्यंत होम क्वारंटाइनसाठी देय आहे.
कृपया नोंद घ्या की, या कव्हरसाठी प्रवासापूर्वी 72 तास आधी कोविड 19 निगेटिव्ह रिपोर्ट हा अत्यंत सक्तीचा क्लेम दस्तऐवज आहे. हा उपलब्ध नसल्याच्या प्रकरणी भारताबाहेर उतरल्याच्या तारखेपासून 7 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी COVID-19 चे कव्हरेज सुरू होण्यासाठी लागू असेल. तुम्ही आधीपासून परदेशात असल्यास आणि तुमच्या विद्यमान पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही पॉलिसी पुढे सुरू ठेवत असल्यास हा प्रतीक्षा कालावधी लागू नाही. एका ब्रेक-इन कालावधीसह तुमच्या पॉलिसीचा कालावधी वाढवण्यास आल्यास हाच 7 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी या कव्हरसाठी हा विस्तार स्वीकारण्यात आल्याच्या तारखेपासून लागू असेल.
प्रवासापूर्वी तुम्हाला कोणतीही लक्षणे असल्यास किंवा प्रवासाच्या तारखेपूर्वी मागील 14 दिवसांत तुम्ही कोणत्याही कोविड- 19 पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्यास तुम्ही कोविड- 19 च्या क्लेमसाठी पात्र ठरणार नाही.
ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन एक्सटेन्सिव्ह कव्हरेज देत असून खालील गोष्टी कव्हर करतोः
जगाच्या पाठीवर सर्वत्र दूरध्वनीद्वारे सपोर्ट
जेव्हा आपण देशाबाहेर गेलेले असताना कुणाच्या मदतीची गरज भासते, तेव्हा आजूबाजूला मदत मागण्यासाठी ओळखीचे कुणीही नसल्याने आपल्याला हताश आणि असहाय वाटू शकते. आम्ही आपल्याला दूरध्वनीवरून सपोर्ट करू व आपल्यावर असा प्रसंग येण्याची वेळ येऊ देणार नाही. आपल्याला फक्त एवढच करायचे आहे – आम्हाला +91-124-6174720 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्या, आम्ही आपल्याशी निश्चितच संपर्क साधू.
जलद क्लेम सेटलमेंट
आम्ही दिलेला शब्द आणि कृती यांच्यातील तारतम्य आपल्याला क्लेम सेटलमेंटच्या वेळी नक्कीच दिसून येईल. आमची प्रक्रिया आणि माणसे आपले क्लेम तत्काळ आणि सहज व विनासायास सेटल करण्यात तत्पर आहेत.
इमर्जन्सी कॅश अडव्हान्स
जगभरात कितीही वैविध्यपूर्ण संस्कृती आणि माणसे असली, तरीही रोख पैसा त्यांच्यावर राज्य करतो. आमचा इंटरनॅशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन फक्त कॅशलेस सेवाच नाही, तर इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्ससुद्धा पुरवतो.
वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी इनोव्हेशन पॅकेज
आम्ही आमचा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन बनवताना प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा पूर्ण होतील याची पुरेपूर खबरदारी घेतली आहे. आम्ही विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्याही विशिष्ट गरजा लक्षात घेऊन विशिष्ट कव्हर्स घेऊन आलो आहोत, कारण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी उत्तरे आवश्यक असतात.
ट्रीप डीले डिलाईटसह ऑटोमॅटीक क्लेम सेटलमेंट
आमच्या मोबाईल अप, इन्शुरन्स वॉलेट या सुविधांमुळे आपल्याला आपल्या प्रलंबित सहलीसाठी क्लेम रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही. आम्ही विलंबाच्या काळाचा माग ठेवून त्यानुसार संपूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेद्वारे पैसे देतो.
आपल्याला आपल्या कार विमा पॉलिसीबद्दल माहित असणे आवश्यक आहे.
अत्यंत सुलभ ऑनलाइन ट्रॅव्हल इन्शुरन्स क्वोट आणि किमती. पैसे भरणे आणि खरेदी करणे सोपे.
परदेशात प्रवास करताय? आमच्या जागतिक सहकार्य सुविधेसह आम्ही कायम तुमच्यासाठी उपलब्ध आहोत.
ट्रॅव्हल इन्शुरन्स हा एक प्रकारचा इन्शुरन्स असून तो आपण घरापासून दूर असताना प्रवासात नेहमी उद्भवणाऱ्या गैरसोयींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून आपला बचाव करतो. मग आपण स्वशोधार्थ एकल सहलीवर गेलेले असा किंवा व्यावसायिक फिरतीवर असा. आपल्याला आर्थिक नुकसानाची चिंता करायलाच नको!
ट्रॅव्हल इन्शुरन्स आपल्या प्रवासातील विविध पैलू कव्हर करतो - प्रवास रद्द होणे, प्रवासात अडथळे येणे, प्रवासास विलंब होणे, सामान गहाळ होते किंवा मिळण्यास विलंब होणे, वैद्यकीय विमा, मेडिकल इव्हॅक्युएशन, पासपोर्ट गहाळ होणे, वैयक्तिक जबाबदारी, इमर्जन्सी कॅश एडव्हान्स आणि बरेच काही.
आपल्यासाठी योग्य अशी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी निवडणे हे आपले पर्यटनाचे ठिकाण निश्चित करण्याइतकेच महत्त्वाचे आहे. आपला ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅन निवडताना लक्षात घ्यावे, असे काही मुद्दे:
आपल्याला आपल्या प्रवासाचा कालावधी वाढवायचा असेल, तर निश्चीतच वाढवू शकता. आपण आमच्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीची मुदत वाढवून घेऊ शकता. यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची मुदत वाढवून घेण्यासाठी दोन मार्ग आहेत- प्री पॉलिसी एक्सपायरेशन आणि पोस्ट पॉलिसी एक्सपायरेशन दोन्ही मार्गांची सविस्तर प्रक्रिया खाली नमूद केली आहे.
प्री-पॉलिसी एक्सपायरेशन
या परिस्थितीत आपण आम्हाला आपल्या ट्रॅव्हल इन्शुरन्सची मुदत वाढवून घेण्याबद्दल कल्पना द्यावी. आपली विनंती प्राप्त झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी आपल्याला एक गुड हेल्थ फॉर्म भरण्यास सांगतील. त्यानंतर त्या विनंतीवर अंडररायटर पडताळणी करून योग्य ती कार्यवाही करतील
पोस्ट-पॉलिसी एक्सपायरेशन
या परिस्थितीत आपण आम्हाला आपल्या पॉलिसीची मर्यादा वाढवून घेण्याबाबत माहिती द्यावी. आमची विनंती प्राप्त झाल्यानंतर आमचे अंडररायटर ती पडताळून, पुरवलेल्या माहितीच्या आधारे निर्णयाप्रत येतील.
ट्रॅव्हल इन्शुरन्स क्लेम मुख्यतः दोन प्रकारचे असतात – मेडिकल क्लेम आणि नॉन-मेडिकल क्लेम यासाठी आवश्यक असणारे दस्तावेज पुढीलप्रमाणे:
मेडिकल क्लेम:
नॉन मेडिकल क्लेम्स
पूर्ण भरलेला ओवरसीज ट्रॅव्हल इन्शुरन्स क्लेम फॉर्म
नॉन-मेडिकल क्लेम्सचे प्रारूप वेगवेगळ्या प्रकारचे असल्यामुळे प्रत्येक वेगळ्या प्रारुपात आवश्यक असणाऱ्या दस्तावेजांचे स्वरूप वेगळे आहे.
ही निविदा पूर्ण करण्यासाठी आपल्या पासपोर्टवरील सर्व माहिती विहित नमुन्यात भरणे आवश्यक आहे.
महत्त्वाची प्राथमिक माहिती – संपूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक, जन्मतारीख, पत्ता, भारतातील दूरध्वनी क्रमांक, असाइनी (प्रवाशाच्या मृत्युनंतर अथवा सदस्यत्व रद्द केल्यानंतर होणारा पॉलिसीचा लाभार्थी) आणि प्रवासाची योग्य दिनांक.
सर्वप्रथम, सर्वकाही सुस्थितीत आहे, अशी आम्ही आशा करतो.
जर तुम्ही पॉलिसी कालावधी संपण्यापूर्वीच परत आला, तर आम्ही खालील रेटनुसार आपला प्रीमियम देऊ. जर तुम्ही कोणताही क्लेम केला नसेल, तरच हे शक्य आहे.
कंपनीने ठेवावयाचा प्रीमियम
पॉलिसी कालावधीच्या 50% पेक्षा जास्त |
100 % |
पॉलिसी कालावधीच्या 40-50% च्या दरम्यान |
80 % |
पॉलिसी कालावधीच्या 30-40% च्या दरम्यान |
75% |
पॉलिसी कालावधीच्या 20-30% च्या दरम्यान |
60 % |
पॉलिसी इन्सेप्शन – पॉलिसी कालावधीच्या 20% |
50 % |
नाही, तुम्ही कोणत्याही रुग्णालयात अथवा डॉक्टरकडे जाऊ शकता.
हो. आपण आपल्याकडील आंतरदेशी डेबिट आणि क्रेडीट कार्ड वापरून आपल्या पालकांसाठी किंवा नातेवाईकांसाठी बजाज अलियांझ ट्रॅव्हल इन्शुरन्स काढू शकता. या पॉलिसीची इमेलद्वारे पाठवलेली प्रत हा कायदेशीर दस्तावेज तसेच इन्शुरन्स कव्हरचा अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य आहे.
आपल्या प्रियजनांना भेटणे ही अत्यंत आनंदाची बाब असते आणि यासाठी आम्ही आमच्याकडून सर्वतोपरी मदत करतो.
वय हा केवळ आकड्यांचा खेळ आहे आणि प्रत्येकाने प्रवासाचा आनंद लुटला पाहिजे असे आम्ही मानतो.
वय 17 असो की 70 असो, आमच्याकडे सर्व वयोगटातील लोकांसाठी इन्शुरन्स उपलब्ध आहे.6 महिन्यांची $50,000 रकमेचे कव्हरेज असणारी बजाज अलियांझ ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी 71-85 या वयातील ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील उपलब्ध आहे. अधिक माहितीकरिता बजाज अलियांझ सिनियर सिटीझन ट्रॅव्हल इन्शुरन्स सेक्शन पाहावा.
जेव्हा इन्शुरन्स-निविदा आणि देयक ऑनलाईन भरले जाते, तेव्हा लगेचच आपल्याला त्याचा कन्फर्मेशन इमेल इन्शुरन्स डिटेल्ससह पाठवला जातो. त्यानंतर आपल्याला आपले पॉलिसी डॉक्युमेंट इमेलद्वारे पाठवले जाते. त्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये आपले नाव, पॉलिसी क्रमांक, आमचा संपर्क क्रमांक जसे कि टोल फ्री क्रमांक आणि क्लेम सबमिट करण्याचा पत्ता यांचा समावेश असेल.
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स हे आमच्या सर्व ट्रॅव्हल इन्शुरन्स प्लॅनमधील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ही एक अशी असिस्टन्स सर्व्हिस आहे, ज्याद्वारे चोरी/सामानावरील किंवा पैशांवरील दरोडा/ भारतातील तुमच्या नातेवाईकांशी संपर्क होण्यास होणारा उशीर यासारख्या आणीबाणीच्या प्रसंगी आम्ही आपल्या पॉलिसी शेड्युल मध्ये स्पष्ट केलेल्या मर्यादेपर्यंतची आवश्यक ती रोकड तत्काळ मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर राहू.
आपण जगाच्या पाठीवर कुठेही असला, तरीही आम्ही आपल्यापासून फक्त एका दूरध्वनीच्या अंतरावर आहोत. विदेशातील कोणत्याही प्रकारच्या क्लेमसाठी किंवा सहकार्यासाठी आपण आम्हाला आमच्या वर नमूद केलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता.आपण आम्हाला +91-124-6174720 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर आम्ही आपल्याला आपल्या क्लेमसंदर्भातील मदतीसाठी त्वरित कॉल करू.
Thank You for Your Interest in Bajaj Allianz Insurance Policy, A Customer Support Excecutive will call you back shortly to assist you through the Process.
Request Call Back
Disclaimer
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
Please enter valid quote reference ID