तुमची टू व्हीलर तुम्ही अनेक वर्षे वापरता. तसेच तुमचे कव्हरही असले पाहिजे.
तुमची टू व्हीलर तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एकतर ती तुम्हाला वाहतुकीतून नीट प्रवास करायला मदत करते किंवा तुम्हाला प्रवासाचा आनंद घेऊ देते....काहीही कारण असले तरी तुमच्यासाठी जे मौल्यवान आहे ते आमच्यासाठीही मौल्यवान आहे. याबाबत काहीही शंका नाही.त्यामुळे, आम्ही आमची बाइक इन्शुरन्स रिन्यूअल प्रक्रिया इतकी सोपी बनवली आहे की तुम्हाला तुमची टू व्हीलर कव्हरशिवाय चालवायची गरज नाही.
टू व्हीलरचे अनेक फायदे आहेत- अॅड्रेनलाइन रशचा स्त्रोत, वेगवान मोबिलिटी, पार्किंगची जागा शोधणे सोपे आणि इतर अनेक गोष्टी- त्यात अनेक धोकेही आहेत.
एक चांगले हेल्मेट घेणे आणि साध्या रस्ता सुरक्षा सूचनांचे पालन करणे निश्चितच उपयोगी आहे. परंतु खरोखर महत्त्वाचे म्हणजे आवश्यक त्या संरक्षणाचा आनंद घेत राहण्यासाठी वेळोवेळी टू व्हीलर पॉलिसीचे रिन्यूअल होय.
अधिक वाचा
तुमची टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाइन रिन्यू करण्यासाठी 2 छोटी पावले.
तुमचे मूलभूत तपशील भरा, ज्यात पॉलिसी नंबरचा तपशील आणि तुमच्या विद्यमान पॉलिसीची अंतिम तारीख नमूद असेल.
रिन्यूअल क्वोट मिळवा आणि पैसे भरा. ऑनलाइन टू व्हीलर इन्शुरन्स रिन्यूअल देऊन आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतो.
टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करत असताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
टू व्हिलर इन्श्युरन्सचे प्रमुख फायदे.
आम्ही तुम्हाला आमच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवायला सांगतो, फक्त शब्दांवर नाही. उत्पादन नावीन्यपूर्णता आणि ग्राहक केंद्रीभूतता ही आमची दोन प्रमुख ध्येये आहेत, त्यामुळे आम्हाला इन्शुरन्स समिट अँड अॅवॉर्ड्स २०१८ मध्ये जनरल इन्श्युरन्स कंपनी ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आम्ही आमचे टू व्हिलर इन्श्युरन्स प्लॅन्स तुमच्या गरजा लक्षात ठेवून आणि आम्हाला त्या सर्वोत्तम पद्धतीने कशा पूर्ण करता येतील हे पाहून डिझाइन केले आहेत.
चांगले आयुष्य मिळवायला खूप वेळ लागतो आणि तुम्ही त्या दिशेने काम करत आहात याबाबत आम्हाला आदर वाटतो.आम्हाला अनावश्यकपणे तुमचा मौल्यवान वेळ घ्यायचा नाही. त्यामुळे तुमच्या टू व्हिलर इन्श्युरन्सची ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय आम्ही तुम्हाला देत आहोत.तुम्ही तुमचा टू व्हिलर इन्श्युरन्स अवघ्या 3 मिनिटांत खरेदी करून तुमची पॉलिसी फक्त 2 सोप्या पद्धतींनी रिन्यू करू शकता. हे फक्त काही क्लिक्सनी करायचे आहे.होय, हे वेगवान आणि सोयीचे आहे.
नो क्लेम बोनस (एनसीबी) हा एक चांगला आणि दक्ष चालक असल्याबद्दलचा विमा कंपनीकडून दिला जाणारा पुरस्कार आहे.तुम्हाला हा बोनस प्रत्येक क्लेम मुक्त वर्षात मिळतो आणि तो नंतरच्या कालावधीत जमा केला जातो.आम्हाला तुम्ही जे काही साध्य करणे शक्य केले आहे त्याची काळजी वाटते आणि तुम्ही कोणत्याही पुरवठादाराकडून मिळणारा 50% पर्यंतचा नो क्लेम बोनस हस्तांतरित करू शकता.तुम्ही बजाज अलियांझमध्ये याल तेव्हा तुम्हाला काहीही गमवावे लागणार नाही याची आम्ही काळजी घेऊ.
तुमच्या टू व्हीलरशी संबंधित कोणत्याही समस्या आम्ही तुमच्या एकट्यावर सोडणार नाही.आम्ही तुमच्यासाठी उपस्थित आहोत आणि मग रात्रीचे 12 असोत की 3 आम्ही तुम्हाला चोवीस तास क्लेमसाठी तात्काळ सहकार्य देऊ कोणतेही नाते टिकवण्यासाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आम्ही तुमच्या क्लेम स्टेटसबाबत तुम्हाला सतत एसएमएस पाठवून अद्ययावत माहिती देऊ.
आम्ही बोले तैसा चाले या उक्तीवर विश्वास ठेवतो आणि आमच्या भारतभरातील प्राधान्याच्या गॅरेजेसच्या नेटवर्कद्वारे तुम्हाला वेगवान, विनाअडथळा आणि कॅशलेस क्लेम सेटलमेंट देऊ.आमच्या प्रक्रिया तुम्हाला वेगवान क्लेम देण्यासाठी विशेषरित्या डिझाइन केलेल्या आहेत आणि कॅशलेस क्लेमसाठी आमचा सरासरी टर्नअराऊंड कालावधी फक्त 60 मिनिटे आहे.आमची उद्योगातील पहिली सुविधा असलेली मोटर ऑन दि स्पॉट (मोटर ओटीएस) तुम्हाला आमच्या मोबाइल अॅपद्वारे 20,000 रूपयांपर्यंतच्या तुमच्या टू व्हीलर क्लेमसाठी गाडीची तपासणी स्वतः करण्याची क्षमता मिळते.या सुविधेच्या मदतीने क्लेम अवघ्या 30 मिनिटांत सेटल होतात.
कालावधी संपुष्टात आलेली पॉलिसी लॅप्स झाली असेल तर नो क्लेम बोनससारखे तुमचे सर्व फायदे तुम्ही गमावू शकता.मात्र, टू व्हीलर पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आल्यावरही तिचे रिन्यूअल विनाअडथळा होऊ शकते.कोणत्याही तपासणीची गरज नाही आणि तिचे संरक्षण आणि फायदे यांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हे ऑनलाइन, फक्त काही क्लिक्सद्वारे साध्य करू शकता.तुमच्या पॉलिसीबाबत माहिती मिळवत राहण्यासाठी तुम्ही बाइक इन्शुरन्स रिन्यूअल रिमाइंडर ऑनलाइनचाही पर्याय निवडू शकता.
तुम्ही तुमची इन्शुरन्स पॉलिसी दोन प्रकारे रिन्यू करू शकता- ऑनलाइन किंवा ऑफलाइन.
ऑनलाइन रिन्यूअल प्रक्रिया अत्यंत वेगवान आहे आणि त्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात.
हो, तुमची बाइक किंवा टू व्हीलर इन्शुरन्स ऑनलाइन रिन्यू करणे शक्य आहे. ही प्रक्रिया अत्यंत सुलभ 2- टप्प्यांतील प्रक्रिया आहे.
तुम्हाला फक्त आमच्या वेबसाइटवर जाऊन तुमच्या आधीच्या पॉलिसीचे तपशील द्यायचे आहेत. तुम्हाला एक क्वोट मिळेल. त्यानंतर तुम्ही पैसे भरू शकता. संपूर्ण प्रक्रिया फक्त काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते.
आमचा गुंतागुंतीच्या प्रक्रियांवर विश्वास नाही आणि तुम्हाला तुमची पॉलिसी रिन्यू करण्यासाठी फक्त 2 कागदपत्रे लागतील.
आधीच्या इन्शुरन्स पॉलिसीची प्रत
नोंदणी प्रमाणपत्र
दीर्घकालीन कव्हरेज कालावधीः तुम्हाला पॉलिसी फक्त दोन किंवा तीन वर्षांतून एकदा, तुम्ही निवडलेल्या कव्हरेज कालावधीवर आधारित राहून रिन्यू करायची आहे.
अतिरिक्त संरक्षण: थर्ड पार्टी प्रीमियम रेट वाढ आणि सर्व्हिस टॅक्स जे जवळपास दरवर्षी घडते
अतिरिक्त एनसीबी फायदेः तुम्ही एका पॉलिसी वर्षात क्लेम दाखल केल्यास तुमचा नो क्लेम बोनस शून्यावर येणार नाही.तो कमी होईल परंतु तो वैध राहील.
प्रपोर्शनेट रिफंडः तुम्हाला पॉलिसी रद्द केल्याच्या स्थितीत तुम्ही पॉलिसी कालावधीत क्लेम दाखल केलेला असले तरी प्रमाणात परतावा मिळेल.
तुमच्या टू व्हीलर इन्शुरन्सची प्रत्यक्ष प्रत तुमच्या पत्त्यावर कुरियरने पाठवली जाईल. ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे 7-10 दिवस लागतील. परंतु, तुमचे पेमेंट निश्चित झाल्यावर आणि पॉलिसी जारी झाल्यावर इमेलद्वारे तुम्हाला एक सॉफ्ट प्रत दिली जाईल
तुमचा पॉलिसी जारी करण्याचा क्रमांक वापरून आमच्या वेबसाइटच्या ग्राहक पोर्टलवर पॉलिसीची कागदपत्रे मिळू शकतील. तसेच, आमचा मोबाइल अॅप, इन्शुरन्स वॉलेट वापरून तुम्ही तुमचे अकाऊंट पाहू शकता किंवा आमच्या ट्विटर पेजवरून #TweetInsurance service चा वापर करून अपडेट्स मिळवू शकता.
तुमचा टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसीचा कालावधी संपुष्टात आल्यावर आधी ज्या धोक्यांपासून तुम्हाला संरक्षित केले होते त्या धोक्यांचा तुम्हाला त्रास होऊ शकेल. त्याचे काही नकारात्मक परिणाम म्हणजेः
तुमच्या एनसीबीवर नकारात्मक परिणाम होईल.
तुम्हाला थर्ड पार्टी लायबिलिटी धोके पत्करावे लागतील.
तुमच्या टू व्हीलरच्या दुरूस्तीचा खर्च वाढेल कारण ते इन्शुरन्स पॉलिसीने कव्हर केलेले नसतील.
मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमची टू व्हीललर पॉलिसीचा कालावधी संपल्यावरही रिन्यू करू शकता आणि फायदे मिळवत राहू शकता. तुम्हाला हे फक्त 30 दिवसांत करायचे आहे.
आपल्या सर्वांनाच काहीतरी जास्त आवडते, नाही का? बजाज अलियांझ कार इन्श्युरन्स तुमच्या कार इन्शुरन्स पॉलिसीला सहाय्यभूत असलेली विविध अॅड-ऑन कव्हर्स देते. आमच्या अॅड-ऑन कव्हर्समध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
नैसर्गिक दुर्घटना या अत्यंत अनपेक्षितरित्या घडतात, हे वयात आलेल्या मुलांच्या वागण्यासारखेच असते नैसर्गिक दुर्घटना अनपेक्षितरित्या घडणे आणि त्यामुळे होणारे नुकसान ही अशी परिस्थिती आहे जिथे टू व्हीलर इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा ठरतो. तुमचे विमा उतरवलेले वाहन हे आग, स्फोट, स्वतःहून पेट घेणे किंवा वीज पडणे, भूकंप, हरिकेन, वादळ, टोळधाड, जलप्रलय, चक्रीवादळ, गारपीट, बर्फ पडणे, दरड कोसळणे आणि दगड पडणे इत्यादींपासून कव्हर केलेले आहे.
मनुष्यनिर्मित दुर्घटना या मानवतेची काळी बाजू दाखवणाऱ्या आहेत आणि नैसर्गिक दुर्घटनांइतक्यात अनपेक्षित आणि विध्वंसक आहेत. आपल्याला वाचवण्यासाठी आपल्याकडे सुपरहिरो तर नाहीत परंतु आमची सर्वांगीण टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी त्यानंतरच्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने हाताळते. आमची बाइक इन्शुरन्स पॉलिसी दरोडा, चोरी, दंगल, संप, विध्वंसक कृत्ये, बाह्य घटकांकडून अपघात किंवा इतर कोणत्याही दहशतवादी कृत्ये कव्हर करते. त्याचबरोबर रेल्वे, रस्ते, अंतर्गत जलमार्ग, उद्वाहन, एलिव्हेटर किंवा हवाईमार्गाने प्रवास करत असताना झालेले कोणतेही नुकसान इन्शुरन्स पॉलिसीकडून कव्हर केले जाते.
आम्ही तुमच्या वाहनाचे संरक्षण करत असताना तुमचे संरक्षण का करणार नाही? आमची टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी ही मालक किंवा चालकासाठी 15 लाख रूपयांच्या पर्सनल अॅक्सिडंट कव्हरसोबत येते. त्यात वाहन चालवत असताना किंवा त्यावर प्रवास करताना आणि त्यावर बसताना किंवा उतरताना होणारे अपघात कव्हर केले आहेत. तुम्ही तुमच्या प्रियजनांना तेच संरक्षण देण्यासाठी पिलियन रायडरसाठीचे पर्सनल अॅक्सिडेंट कव्हरही समाविष्ट करू शकता.
दुसऱ्या कुणाच्या चुकीमुळे तुम्हाला इजा होऊ नये आण त्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणालाही होणाऱ्या इजेचे कारण ठरू नये. त्यामुळे, भारतात थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर सक्तीचे आहे जेणेकरून प्रत्येकाला आपापल्या कृत्याची जबाबदारी घ्यावी लागेल. आम्ही तुमच्यासाठी या वैधानिक गरजेची काळजी घेणारी टू व्हीलर इन्शुरन्स पॉलिसी देतो आणि थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान किंवा नादुरूस्ती यांच्यासाठी देय असलेली लायबिलिटी कव्हर करतो. विमा उतरवलेल्या वाहनामुळे दुसरी व्यक्ती किंवा तिच्या मालमत्तेचे होणारे नुकसान, नादुरूस्ती, मृत्यू किंवा शारीरिक इजा यात कव्हर केलेली आहे.
आजच टू व्हिलर इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करा आणि 24x7 रोडसाइड मदत मिळवा. सुट्टीच्या दिवशीही क्लेम्स सपोर्टबाबत एसएमएस माहिती मिळवा.
रिन्यूतुमचा खासगी टू व्हीलर ओन्ली लायबिलिटी इन्शुरन्स रिन्यू करून थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण मिळवा. बजाज अलियांझसोबत वेगवान, सोयीचे आणि विनाअडथळा.
रिन्यूI hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
Please enter valid quote reference ID