1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

 
टोल फ्री क्रमांक : 1800-209-5959

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY)

Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) - Crop Insurance Scheme

प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा तपशील:

'एक राष्ट्र -एक योजना ' या उद्देशाने प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -२०१६ पासून सबंध देशात राबविण्यात आली. ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.हा विमा केवळ 'उत्पन्नातील घट' एवढ्यापुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे झालेले नुकसान, तसेच चक्रीवादळे, भूस्खलन, अवकाळी पाऊस इ. स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच्या संरक्षणासाठीही हा विमा उपलब्ध आहे.

अंतर्भूत जोखीम

प्रतिबंधित पेरणी

प्रतिबंधित पेरणी

अपूरा पाऊस किंवा प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पेरणी/लावणी करणे धोकादायक असू शकते असे कृषी विभागामार्फत घोषीत केले जाते. अश्या परिस्थिती मध्ये शेतकरी SI (विमा रक्कम) च्या २५% पर्यंत संरक्षण मिळविण्यास पात्र असतो. हे संरक्षण अशा परिस्थितींसाठी लागू आहे, जिथे शेतकरी पेरणी/लावणी करणार होते आणि त्यासाठी त्यांनी खर्च केला होता.

उभे पीक (पेरणीपासून काढणीपर्यंत )

उभे पीक (पेरणीपासून काढणीपर्यंत )

न टाळता येणाऱ्या जोखमींमुळे झालेल्या उत्पन्नाच्या नुकसान भरपाईसाठी व्यापक जोखीम विमा प्रदान केला जातो. उदा. नैसर्गिक आग आणि वीज कोसळणे, वादळ, तुफान, चक्रीवादळ, दुष्काळ/पावसातील खंड, कीड आणि रोग.

काढणीपश्चात हानी

काढणीपश्चात हानी

काढणीनंतर कमाल दोन आठवड्यापर्यंतच्या कालावधीसाठी आणि काढणीनंतर सुकवण्यासाठी शेतात पसरवून ठेवण्याची अनुमती असलेल्या पिकांसाठीच हे विमा संरक्षण उपलब्ध आहे. चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी हे विमा संरक्षण उपलब्ध आहे.

स्थानिक आपत्ती(स्थानिक बाबींमुळे निर्माण होणारी) जोखीम

स्थानिक आपत्ती(स्थानिक बाबींमुळे निर्माण होणारी) जोखीम

अधिसूचित क्षेत्रातील स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, भूस्खलन आणि जलप्रलय यासारख्या स्थानिक जोखमींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी हे विमा संरक्षण उपलब्ध आहे.

PMFBY अंतर्गत समाविष्ट पिके

 • अन्नधान्य (कडधान्य, बाजरी आणि डाळी)
 • तेलबिया
 • वार्षिक व्यवसायिक/वार्षिक बागायती पिके

महत्वाची वैशिष्टे

 • स्थानिक जोखीम आणि कापणीनंतरचे नुकसान यांचा समावेश आहे
 • वेगवान, त्रास-मुक्त दाव्यांसाठी प्रगत तंत्रज्ञान वापरा .
 • फार्ममित्र मोबाईल अ‍ॅप / टोल फ्री क्रमांकावर 1800-209-5959 वर दावा सूचना (क्लेम इंटिमेशन)देऊ शकता.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये (PMFBY)

 • ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे, मात्र कोणावरही बंधनकारक नाही.
 • खूप कमी विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियममध्ये शेतकऱ्यांचे योगदान लक्षणीयरित्या कमी करण्यात आले आहे, जसे खरीप पिकांसाठी एकुण प्रीमियमच्या २ टक्के , रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि वार्षिक आणि व्यवसायिक पिकांसाठी ५ टक्के शेतकऱ्यांचे योगदान प्रीमियममध्ये ठरविण्यात आले आहे.
 • या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व शेतकरी कोणत्याही पिकाच्या उत्पादनाच्या वेळी विमासंरक्षणामुळे धोकादायक पिके सुद्धा घेऊ शकतील.
 • या योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या पिकांचा समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून सर्व शेतकरी कोणत्याही पिकाच्या उत्पादनाच्या वेळी विमासंरक्षणामुळे धोकादायक पिके सुद्धा घेऊ शकतील.
 • स्थानिक आपत्ती: गारपीट,जलभराव आणि भूस्खलन या आपत्तींना स्थानिक आपत्ती मानले जाईल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक तोटा मानला जाईल व केवळ बाधित शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून त्यांना योग्य नुकसान भरपाई रक्कम दिली जाईल.
 • या योजनेच्या अंमलबजावणीमुळे शेतकर्‍यांमध्ये सकारात्मक उर्जा विकसित होण्यास मदत होईल.

या योजनेतून कोणत्या प्रकारचे नुकसान वगळण्यात आले आहे (PMFBY)

 • त्रुटीयुक्त नुकसान : दुर्भावनायुक्त नुकसान, चोरी, शत्रुत्वाची कृत्ये इत्यादी.
 • टाळता येण्यायोग्य जोखीम: गुरांनी चरणे किंवा वन्य प्राण्यांनी केलेले नुकसान इत्यादी.
 • युद्ध आणि अणूयुद्धाच्या धोक्यांपासून उद्भवणारी जोखीम,दंगली इत्यादी.

तसेच  इतर रोखण्यायोग्य धोके या जोखमींचा समावेश या योजनेमध्ये नाही. याबाबींमुळे नुकसान  झाल्यास त्यास कोणतेही विमा संरक्षण प्रदान केले जात नाही याची नोंद घ्यावी. 

PMFBY प्रीमियम दर आणि सबसिडी

PMFBY अंतर्गत वास्तवदर्शी प्रीमियम दर (APR) आकारला जातो. हा दर विमा रकमेवर लागू होतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी देय करायचा जास्तीत जास्त प्रीमियम दर खालील तक्त्याचा वापर करून निर्धारित केला आहे:

हंगाम पिके शेतकऱ्य़ाद्वारे जास्तीत जास्त देय विमा शुल्क
खरीप सर्व कडधान्ये आणि तेलबिया पिके विमा रकमेच्या 2%
रब्बी सर्व कडधान्ये आणि तेलबिया पिके विमा रकमेच्या 1.5%
खरीप आणि रब्बी वार्षिक व्यवसायिक/वार्षिक बागायती पिके/
बारमाही बागायती पिके (प्रायोगिक तत्त्वावर)
विमा रकमेवर 5%

 

उर्वरित प्रीमियम राज्य आणि केंद्र सरकारद्वारे समप्रमाणात देय केला जाईल.

PMFBY पीक विमा दावा प्रक्रिया

बजाज अलायन्झ जीआयसी मध्ये प्रधानमंत्री विमा योजनेची दावा गणना प्रक्रिया त्वरित आणि सुलभ आहे.

 

स्थानिकीकृत (स्थानिक बाबींमुळे होणाऱ्या) हानीसाठी

 • आपत्तीनंतर 72 तासांच्या आत शेतकरी आमच्याकडे किंवा संबंधित बँक किंवा स्थानिक शेती विभाग/जिल्हा अधिकारी यांच्याकडे हानीचे तपशील सांगू शकतात. शेतकरी 1800-209-5959 हा टोल फ्री क्रमांक वापरून आमच्याशी संपर्क साधू शकतात. आपण आमच्या फार्ममित्र मोबाईल अॅप चा वापर करुन आमच्यापर्यंत पोहोचू शकता किंवा 1800-209-5959 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.
 • तपशिलांमध्ये सर्व्हे क्रमांकानुसार विमाकृत पीक आणि प्रभावित झालेल्या पीकाचे क्षेत्र ; यासह बँक खाते क्रमांक (कर्जदार शेतकरी) आणि बँक बचत खाते क्रमांक (कर्जदार नसलेले शेतकरी) यांचा तपशील असणे आवश्यक आहे.
 • 48 तासांच्या आत सर्वेक्षणकर्त्याची नेमणूक केली जाईल आणि सर्वेक्षणाची नियुक्ती झाल्यापासून  10 दिवसांच्या आत हानीचे मूल्यांकन पूर्ण होईल.
 • शेतकऱ्याद्वारे केलेले प्रीमियम देयक हानी तपशिलानंतर 7 दिवसांच्या आत बँक किंवा शेतकरी पोर्टलवरून पडताळले जाईल.
 • विमा संरक्षणावर आधारित लागू देय रक्कम सर्वेक्षणानंतर 15 दिवसांच्या आत वितरित केले जाईल. तथापि, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की आम्ही केवळ प्रीमियम सबसिडीच्या 50% सरकारी हिस्सा मिळाल्यानंतर दावा पाठवू शकतो.

प्रतिबंधित पेरणीमुळे झालेल्या नुकसानीसाठी

विमाधारक शेतकऱ्याला पेरणी टळल्यामुळे झालेल्या नुकसानीची विमा कंपनीला माहिती देण्याची गरज नाही, कारण ही एक व्यापक आपत्ती असेल आणि मूल्यांकन क्षेत्रावर आधारित असेल. जेव्हा बहुतेक शेतकरी हवामानाच्या परिस्थितीमुळे त्यांच्या पिकांची पेरणी करण्यास असमर्थ असतात, तेव्हा हा लाभ दिला जातो. तपशील खालीलप्रमाणे आहेत:


 • दुष्काळ किंवा पुरासारख्या मोठ्या प्रमाणावरील आपत्तीमुळे अधिसूचित मुख्य पिकाची अधिसूचित विमा क्षेत्रातील (IU) पेरणी क्षेत्राच्या 75% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना पेरणी टळल्यामुळे झालेल्या नुकसानीचा दावा प्रदान केला जाईल.
 • नामांकन प्रक्रियेच्या 15 दिवसांच्या आत राज्य सरकारद्वारे या तरतुदीची अधिसूचना काढणे आवश्यक आहे.
 • विमा कंपनी राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुमानित लागवडीखालील माहितीच्या डाटावर आधारित टळलेल्या पेरणी संबंधित राज्य सरकारची अधिसूचना आणि राज्य सरकारकडून अग्रिम सबसिडी (पहिला हप्ता) जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देईल.
 • शेतकऱ्यांना अंतिम विम्याचा दावा म्हणून विमा रकमेच्या 25% रक्कम दिल्यानंतर सदर विमा संरक्षण संपुष्टात येईल.
 • एकदा पेरणी टळल्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा दावा प्रदान झाल्यानंतर प्रभावित विमा क्षेत्रासाठी (IU) आणि पिकांसाठी नव्याने विम्याची नोंदणी स्वीकारली जाणार नाही. हे अधिसूचित विमा क्षेत्रामधील सर्व शेतकऱ्यांना लागू आहे.

मोठ्या प्रमाणावरील आपत्ती

हे विमा संरक्षण क्षेत्रावर आधारित उंबरठा उत्पादनाच्या (TY) तुलनेत विमा उतरलेल्या पिकाच्या उत्पन्नात घट झाल्यामुळे देण्यात येते.


 • जर विमा पिकाचे विमा क्षेत्रातील वास्तविक उत्पन्न (AY) हे विमा पिकाच्या विमा क्षेत्रातील (IU) उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल, तर विमा क्षेत्रातील समान पीक उगवणाऱ्या सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान झाले असे गृहित धरण्यात येते. नुकसान भरपाईचा दावा अशाप्रकारे मोजला जातो: [(उंबरठा उत्पन्न – वास्तविक उत्पन्न) / उंबरठा उत्पन्न] x विमा रक्कम येथे AY हे विमा क्षेत्रात केलेल्या CCE च्या संख्येवरून मोजले जाते आणि TY हे मागील सात वर्षांतील सर्वोत्तम उत्पन्न झालेल्या 5 वर्षांची सरासरी असते.

मध्य-हंगाम आपत्ती

जर हंगामातील मोठ्या प्रमाणावरील आपत्तीमुळे किंवा प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नात सरासरी उत्पन्नाच्या 50 % पेक्षा जास्त घट झाल्यास शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हे विमा संरक्षण पुरवले जाते.

 • जर तीव्र दुष्काळ, पावसातील खंड आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांद्वारे जाहीर झालेला दुष्काळ, असामान्यपणे तापमानात झालेली घट, कीड, किटक आणि रोग यासारख्या प्रतिकूल हवामान स्थितीमुळे तसेच पूरासारख्या नैसर्गिक घटनांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास, जर अपेक्षित उत्पन्न हे सरासरी उत्पन्नाच्या 50% पेक्षाही कमी असेल, तर मध्य-हंगाम आपत्तीच्या नुकसान भरपाईचा दावा विमाधारक शेतकऱ्यांना प्रदान केला जातो.
 • या दाव्यानुसार विमाधारक शेतकऱ्याला एकूण विमा रकमेच्या 25% रक्कम ही थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते.
 • मध्य-हंगाम आपत्तीचा काळ हा पेरणीच्या एक महिन्यानंतर आणि कापणीच्या 15 दिवसांपूर्वीचा काळ असतो.
 • मध्य-हंगाम आपत्तीसंबंधीची सूचना राज्य सरकार 7 दिवसांच्या आत काढेल आणि प्रतिकूल हवामान घटनेपासून 15 दिवसांच्या आत नुकसानीचा अहवाल पूर्ण करेल.
 • जिल्हास्तरीय संयुक्त समिती दाव्याचे मूल्यांकन करेल आणि या अटी अंतर्गत दावा देय असेल का हे ठरवेल.
 • खात्यावरील देयक अशाप्रकारे मोजले जाते: [(उंबरठा उत्पन्न – अपेक्षित उत्पन्न) / उंबरठा उत्पन्न] x विमा रक्कम x 25%

काढणीपश्चात नुकसान

 • पीक कापणीनंतर 14 दिवसांपर्यंत पीक सुकविण्यासाठी "कापणी केलेल्या आणि पसरलेल्या" स्थितीत शेतात ठेवलेले असताना गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळ पाऊस आणि अनियमित पर्जन्यवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीचे वैयक्तिक प्लॉट/शेतावर मूल्यांकन केले जाते. अशा प्रकरणांमध्ये विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीद्वारे वैयक्तिक पातळीवर दावा दिला जाईल.
 • शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत नुकसानीविषयीची सूचना विमा कंपनी, संबंधित बॅंक, कृषि विभाग, जिल्हा कार्यालयाला द्यावी. हे विमा कंपनीद्वारे देण्यात आलेल्या टोल फ्री क्रमांकाद्वारे होऊ शकते.
 • विमा कंपनी तक्रार प्राप्त झाल्यापासून 48 तासांच्या आत पर्यवेक्षकाची नियुक्ती करेल. पर्यवेक्षकाच्या नियुक्तीनंतर 10 दिवसांच्या आत नुकसानीचे मूल्यांकन पूर्ण करण्यात यावे.
 • नुकसानीच्या मूल्यांकनापासून 15 दिवसांच्या आत दावा प्रदान केला जाईल. नुकसानीच्या मूल्यांकनाद्वारे नुकसान भरपाईच्या टक्केवारीचे मूल्यांकन केले जाईल.
 • जर प्रभावित क्षेत्र हे एकूण पीक क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त असेल, तर विमा क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झाले असे मानले जाईल आणि सर्व विमाधारक शेतकऱ्यांना नुकसानीचा दावा प्रदान केला जाईल.

चालू वर्षासाठी आम्ही छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र  आणि राजस्थान या राज्यांमध्ये PMFBY लागू करीत आहोत. आम्ही छत्तीसगड राज्यातील बागायती पिकांसाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना देखील कार्यान्वित करीत आहोत.

खरीप आणि रब्बी 2021 साठी आमच्याद्वारे दिल्या गेलेल्या राज्ये आणि जिल्ह्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा.

वर्ष 2016 2017 2018 2019 2020 एकूण
खरीप 1621058 2333669 1230911 3007223 2935494 11128355
रब्बी 491316 3579654 5198862 1786654 1114384 12170870
एकूण 2112374 5913323 6429773 4793877 4049878 23299225

30 जून 2021 पर्यंतचे क्लेम सेटलमेंटचे संक्षिप्त वर्णन

राज्य
दाव्यांची हक्क रक्कम ( कोटी मध्ये )
2016 2017 2018 2019 2020 एकूण
आंध्रप्रदेश 570.31 0.00 596.63 0.00 0.00 1166.94
असम 0.00 0.00 1.78 0.00 0.00 1.78
बिहार 164.25 0.00 0.00 0.00 0.00 164.25
छत्तीसगढ़ 17.49 48.56 235.30 29.00 59.49 389.85
गुजरात 0.00 0.00 2.18 0.01 0.00 2.19
हरियाणा 134.16 363.53 0.00 136.88 109.65 744.21
झारखंड 0.00 0.00 50.98 0.00 0.00 50.98
कर्नाटक 0.00 0.00 0.00 20.78 24.05 44.83
मध्य प्रदेश 0.00 0.00 0.00 707.26 0.00 707.26
महाराष्ट्र 174.99 32.70 885.82 483.05 56.88 1633.43
राजस्थान 0.00 743.03 168.12 241.68 149.18 1302.01
तेलंगाना 54.74 5.40 36.75 0.00 0.00 96.88
उत्तर प्रदेश 0.00 58.23 18.22 26.52 0.00 102.98
उत्तराखंड 0.00 0.00 0.08 0.00 0.00 0.08
कुल 1115.94 1251.45 1995.86 1645.18 399.24 6407.67

 

महाराष्ट्र खरीप 19-क्लेम:

महाराष्ट्र रब्बी 19-क्लेम:

येथे क्लिक करा.

तक्रार निवारण

 • पीएमएफबीवायशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, आपण आमच्या फार्ममित्र मोबाईल अ‍ॅपद्वारे आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा 1800-209-5959 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता किंवा वैकल्पिकरित्या खाली दिलेल्या आयडी वर आम्हाला लिहू शकता.

  श्री रवींद्र शर्मा, व्हर्टिकल हेड - अ‍ॅग्री टेक प्रोजेक्ट कस्टमर आणि एक्सपेरियन्स,

  Ravindra.Sharma@bajajallianz.co.in

  श्री अंजनी कुमार राय, , नॅशनल मॅनेजर - अ‍ॅग्री बिझिनेस

  Anjani.Rai@bajajallianz.co.in

  आमच्या जिल्हा आणि ब्लॉक अधिकार्यांच्या तपशीलांसाठी येथे क्लिक करा .

  आपल्या जवळच्या कृषी विमा कार्यालयासाठी तपशील मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

   

ग्राहकांचे अनुभव

Shravan Kumar Jhanghee

प्रेम सिंग जलोर, राजस्थान

मी बजाज अलियान्झ जनरल विमा कंपनीला फार्ममित्र एप्लिकेशन वरून जलप्रलय या स्थानिक आपत्तीची क्लेम /दावा सूचना दिली. कंपनीचा प्रतिसाद खूप वेगवान होता आणि ५ व्या दिवशी माझ्या नुकसानग्रस्त पिकाचे सर्वेक्षण केले गेले. त्यांच्या प्रतिसादामुळे मी खूप समाधानी व खूष आहे.

प्रशांत सुभाषराव देशमुख हिंगोली, महाराष्ट्र

माझ्यासारख्या शेतकऱ्यांना या विविध कृषी जोखीमांपासून खरोखरच संरक्षण हवे आहे म्हणून त्यांना मदत केल्याबद्दल बजाज अलिअंझ जीआयसीचे व प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे आभार !!! 

PMFBY यशोगाथा

विमा संदर्भातील वारंवार विचारले जाणारे प्रश्न

विमा म्हणजे काय?

विमा म्हणजे संभाव्य नुकसानीची शक्यता गृहीत धरून ती कमी करण्याचा, म्हणजेच अनपेक्षित नुकसानीतून  होणा-या जोखीम व्यवस्थापनाचा, उपाय होय. मूलतः लोकांना अशा प्रकारच्या जोखीमांमुळे उद्भभवलेल्या नुकसानीस, लहान योगदानांद्वारे साठवलेल्या निधीतून एकत्रित झालेल्या योगदानास हस्तांतरित करण्याचा आणि जोखीम सामायिक करण्याचा एक मार्ग / तरतूद करण्याचे तंत्र आहे.

पीक विमा म्हणजे काय?

पीक विमा योजना प्रामुख्याने कृषी क्षेत्रातील विविध उत्पादन जोखमींमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळविण्यास शेतकऱ्यांना सहाय्य करते. अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, उष्णता, नैसर्गिक आग, जलप्रलय,कीड व रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या उत्पादनात होणाऱ्या नुकसानीपासून या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत ठरते. तसेच नैसर्गिक आपत्ती झाली नसल्यास लाभ मिळत नाही हा  दृष्टिकोन ही पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांनी ठेवणे आवश्‍यक आहे.

पीएमएफबीवाय म्हणजे काय?

प्रधान मंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) चा उद्देश आहे विशिष्ट विमा युनिटसाठी पूर्वनिर्धारित पातळीवर त्यांच्या पीक उत्पादनास विमा सरंक्षण देणे आणि शेती क्षेत्रातील टिकाऊ उत्पादनास समर्थन देणे.

हवामान आधारित पीक विमा म्हणजे काय?

हवामान आधारित पीक विमा चे उदिष्ट विमाधारक शेतक-यांना हवामानाच्या प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच तापमान, पीक थंडीने करपुन जाणे, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, चक्रीवादळ, अतिवृष्टी, अतिथंडी, अवर्तन, इत्यादिसारख्या आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण देऊन नुकसान भरपाई मिळविण्यास मदत करणे हे आहे.

पीएमएफबीवाय अंतर्गत किती पिके आहेत?

यात विशिष्ट विमा एककच्या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

उदा:

a)     अन्न पिकांमध्ये : तृणधान्ये , कडधान्ये

b)    तेलबिया पिके

c)     वार्षिक व्यावसायिक / बागवानी पिके इ.

एका शेतकऱ्यासाठी विम्याची रक्कम (कव्हरेज) मर्यादा किती आहे?

a)     कर्जदार आणि बिगर कर्जदार दोन्ही शेतकऱ्यांसाठी साठी प्रति हेक्टर विमा राशी जिल्हा स्तरीय तांत्रिक समितीने ठरविल्याप्रमाणे वित्तमानाच्या प्रमाणात समान असते आणि राज्य समन्वय समिती  (एसएलसीसीसीआय)  कडून आधीच घोषित केली जाते. वित्तीय पट्टिच्या कोणतीही अन्य गणना लागू केली जाणार नाही. प्रत्येक शेतक-यासाठी विम्याची रक्कम ही जमीनीच्या वित्तीय पट्टि प्रति हेक्टर गुणीले त्या शेतक-यांनी विम्यासाठी प्रस्तावित अधिसूचित पिकाचे  क्षेत्र यांच्या  प्रमाणात असते. 'शेतीखालील क्षेत्र' नेहमी 'हेक्टर' मध्ये मोजले जाते.

b)    सिंचित आणि अ-सिंचित क्षेत्रासाठी विम्याची रक्कम वेगळी असू शकते.

खरीप हंगामासाठी पीक विम्या मध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख कोणती?

नोंदणीची अंतिम तारीख ही पीकाचे जीवन चक्र आणि संबंधित राज्य सरकारच्या अधिसूचनावर अवलंबून असते.

रब्बी हंगामासाठी पीक विमा मध्ये नोंदणी करण्याची अंतिम तारीख कोणती?

नोंदणीची अंतिम तारीख ही पीकाचे जीवन चक्र आणि संबंधित राज्य सरकारच्या अधिसूचनावर अवलंबून असते.

पीक विमा प्रदान करणाऱ्या अग्रगण्य विमा कंपन्या किती व कोणत्या आहेत?

भारतामध्ये सध्या पीक विमा प्रदान करणाऱ्या १२ अग्रगण्य कंपन्या आहेत

१.    ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.

२.    चोलामंडळम एमएस जनरल इंशुरन्स कंपनी लि.

३.    रिलायंस जनरल इंशुरन्स कंपनी लि.

४.    बजाज आलियान्झ जनरल इंशुरन्स कंपनी लि.

५.   फ्यूचर जनराली इंडिया इंशुरन्स कंपनी लि.

६.   एचडीएफसी अर्गो जनरल इंशुरन्स कंपनी लि.

७.   इफको टोकीओ जनरल इंशुरन्स कंपनी लि.

८.   युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स कंपनी

९.    आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कंपनी लि.

१०.  टाटा एआयजी जनरल इंशुरन्स कंपनी लि.

११.  एसबीआय जनरल इंशुरन्स कंपनी लि.

१२.  युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी.

पीक विम्यासाठी प्रीमियम दर आणि प्रीमियम सबसिडी किती असते?

कार्यान्वयन अंमलबजावणी करणारी एजन्सी (आयए) द्वारे पीएमएफबीवाय अंतर्गत ऍक्चुरिअल प्रीमियम दर (एपीआर) आकारण्यात येईल. शेतकऱ्यांना भरावा लागणाऱ्या विमा खर्चाचा दर खाली दिलेल्या तक्त्या नुसार असेल:

हंगाम पिके शेतक-यांद्वारे घेण्यात येणारे जास्तीत जास्त विमा शुल्क (विम्याची रक्कम %)
खरीफ अन्न धान्य आणि तेलबिया पिके (अन्नधान्य, डाळी आणि तेलबिया) एसआय किंवा ऍक्चुरिअल दर 2.0%, दोन्ही पैकी जे कमी असेल ते
रब्बी अन्न धान्य आणि तेलबिया पिके (अन्नधान्य, डाळी आणि तेलबिया) एसआय किंवा ऍक्चुरिअल दर 1.5%, दोन्ही पैकी जे कमी असेल ते
खरीफ आणि रब्बी वार्षिक व्यावसायिक / वार्षिक बागवानी पिके एसआय किंवा ऍक्चुरिअल दर 5%, दोन्ही पैकी जे कमी असेल ते

कुठले धोके सुरक्षित करता येतील आणि वगळता येतील?

जोखिम: पिकाचे नुकसान झाले असल्याने जोखीम ह्या पुढील योजने अंतर्गत सुरक्षित करता येतील: -

a. उत्पनाचे नुकसान (स्थायी क्षेत्राच्या आधारावर स्थायी पीक): व्यापक जोखिम विमा हा अ-प्रतिबंधनीय जोखीमांमुळे उदभवणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी प्रदान केला जातो, जसे की (i) नैसर्गिक आग आणि वीज पडून (ii) वादळ, गारपीट, चक्रीवादळ, प्रचंड चक्रीवादळ, प्रचंड वादळ, हरिकेन, टॉर्नॅडो इ. (iii) पूर, जलप्रलय आणि भूकंप (iv) अवर्षण, दुष्काळ(v) कीटक / रोग इ.

b. प्रतिबंधित पेरणी (अधिसूचित क्षेत्राच्या आधारावर): - ज्यामध्ये अधिसूचित क्षेत्रातील विमा उतरवलेल्या शेतक-यांचे बहुतेक क्षेत्र प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीमुळे पेरणी करण्यापासून रोखले जाते. विमाराशीच्या जास्तीत जास्त २५% पर्यंत नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र असेल.

c. कापणीनंतरचे नुकसान: कापणीनंतर जी पिके सुकविण्याची गरज असते अश्या पिकांना पसरवलेल्या परिस्थितीत  उदभवणाऱ्या धोक्यांपासून म्हणजे वादळ, गारपीट, नैसर्गिक आग ,जोराचा पाऊस यासाठी संरक्षण मिळण्यासाठी कापणीपासून कमाल १४ दिवसांसाठी  प्रदान केला जातो.

d. स्थानिक मर्यादित (वैयक्तिक शेती आधारे):  स्थानिक क्षेत्रातील जोखीमांच्या म्हणजे गारपीट,  भूस्खलन आणि पूरामुळे इ. मुळे अधिसूचित क्षेत्रातील झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण प्रदान केले जाते.

महत्वाचे : पुढील संकटांपासून उद्भभवणारे धोके आणि नुकसान वगळले जातील.

युद्ध आणि संबंधित संकट, आण्विक जोखीम, दंगली, दुर्भावनायुक्त नुकसान, चोरी, शत्रुत्वाची कृत्ये, गुरांनी चरणे  आणि / किंवा घरगुती आणि / किंवा वन्य प्राण्यांनी केलेले नुकसान  तसेच  इतर रोखण्यायोग्य धोके.

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go