मराठी
तुमच्या बिझनेससाठी योग्य इन्शुरन्स उपाययोजना निवडणे हे तुम्ही ज्या उद्योगात कार्यरत आहात त्याच्या प्रकारावर अवलंबून असते. तुमची पिझ्झा फ्रँचायझी असेल तर तुमच्या कमर्शियल इन्शुरन्सच्या गरजा या कमर्शियल ऑर्गॅनिक शेतीच्या व्यवसायापेक्षा खूप वेगळ्या असतात. तुम्हाला जाणवणाऱ्या धोक्यांचे नीट मूल्यमापन करा आणि त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स कव्हरेज सर्वोत्तम ठरेल हे ठरवा.
सामान्यतः प्रत्येक बिझनेसला आपल्या कार्यालय किंवा गोदामांसारख्या प्राथमिक मालमत्ता आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे रक्षण करण्याची गरज असते. त्याचे कारण पाहाः
बिझनेसचे स्थान
प्रत्येक बिझनेस, मग तो लहान असो, मोठा असो किंवा मध्यम, त्याला त्याचे नोंदणीकृत कार्यालय, गोदाम किंवा वितरण केंद्रे संरक्षित केल्याची खात्री करावी लागते. आपत्कालीन स्थितीत तुमचा बिझनेस कार्यान्वयन स्थितीत लवकरात लवकर येईल याची काळजी घेण्यासाठी त्याचा फायदा होतो.
असेंब्ली लाईन्स आणि कार्यालये यासारख्या स्थिर मालमत्तेत आपल्या गुंतवणूकीस पुरेसे संरक्षण आवश्यक आहे. कमर्शियल इन्शुरन्सची शिफारस हे साध्य करण्यासाठी केली गेली आहे.
ऑपरेशनल धोके
रोजच्या कामकाजादरम्यान आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते. कामगारांचा उठाव, वीजपुरवठा खंडित होणे आणि उत्पादनाच्या समस्या म्हणजे तुम्ही डिलिव्हरीचे वेळापत्रक पाळू शकणार नाही आणि तुमच्यासमोर कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारची आपत्कालीन स्थिती तुमचा बिझनेस अडचणीत आणणार नाही याची काळजी घेण्यासाठी कमर्शियल इन्शुरन्स लायबिलिटी प्रोटेक्शनची निवड करा.
कर्मचाऱ्यांना फायदे
कोणत्याही व्यवसायाच्या चक्रातील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे त्याचे कर्मचारी आहेत. उत्पादनांची रोजची निर्मिती किंवा मालाची असेंब्ली किंवा सेवांच्या डिलिव्हरीसारख्या रोजच्या कामात कर्मचाऱ्यांसमोर येणारे धोके विचारात घ्या. पुरेसा कर्मचारी इन्शुरन्स दिल्यामुळे तुम्हाला एखाद्या सहकाऱ्याच्या मृत्यू किंवा कायमच्या अपंगत्वाला कारण ठरणाऱ्या एखाद्या आपत्कालीन घटनेमुळे तुमच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होणार नाही याची खात्री होण्यास मदत होते.
Set Renewal Reminder
Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.
तुमचे कार्यालय संकुल हे तुमचे दुसरे घर आहे. तुम्ही तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी रात्रंदिवस एक करता आणि बरेच काही दाव्यावर लावलेले असते.
तुमची उत्पादने समुद्रामार्गे पाठवणे अत्यंत स्वस्त आणि विश्वासू आहे परंतु समुद्रात अनेक गोष्टी अनपेक्षित असतात. हे इतकेच नाही. तयार उत्पादने कारखान्यातून बंदरावर नेतानाही मोठ्या प्रमाणावर धोका असतो.
एक खटला तुम्हाला प्रचंड खर्चात पाडू शकतो आणि ताण निर्माण करू शकतो. तुमचा बिझनेस विविध ठिकाणी स्थित असेल तर हा धोका मोठा असतो.
कर्मचाऱ्यांकडून कंपन्यांवर खटले दाखल करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे आणि अशा घटनांमध्ये इतर खटल्यांबरोबरच तुमचा व्यवसाय मोठ्या आर्थिक आणि कायदेशीर धोक्यात आणण्याची क्षमता असते.
एखाद्या इंजिनीअरिंग प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या धोक्यांची आपल्याला पूर्ण कल्पना आहे. तुमच्या इंजिनीअरिंग प्रोजेक्टच्या अंमलबजावणीवर परिणाम झाल्यास त्यासाठी आलेला खर्च आणि जाणारा वेळ यांच्यामुळे तुमच्या बिझनेसवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
ऑइल अँड गॅस इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला 2010 मध्ये लुइझियाना किनाऱ्यावर झालेल्या “डीपवॉटर होरायझन” या स्फोटाची नक्कीच माहिती असेल. अशा काही दुर्घटना तुम्हाला आर्थिक समस्येत लोटू शकतात.
एक चांगली कंपनी म्हणून तुमचा कर्मचारी आजारी किंवा रूग्णालयात दाखल असताना तुम्हाला त्याच्या पाठीशी उभे राहावे लागते. हल्लीच्या प्रचंड मोठ्या आर्थिक खर्चाचा विचार करता कर्मचाऱ्यांना फायदे दिल्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो.
तुमचा बिझनेस मोठा करून तो विविध प्रदेशांमध्ये नेण्याचे स्वप्न पाहत आहात का? तुमची धोके घेण्यातील भीती हे साध्य करण्यापासून तुम्हाला मागे खेचते आहे का? बजाज अलियांझच्या इंटरनॅशनल इन्शुरन्स सोल्यूशन्ससोबत तुम्ही काळजी आमच्यावर सोडून द्या.
बिझनेसमध्ये धोक्यातून वाढ आणि विस्तारासाठी नवीन संधी प्रतिबिंबित होतात. कमर्शियल इन्शुरन्ससोबत तुम्ही योग्य पद्धतीने विचार करून धोके पत्करू शकता आणि यशस्वी होऊ शकता. तुम्हाला मनःशांती आणि समाधान यांची हमी देणारे कमर्शियल इन्शुरन्सचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.
कमर्शियल इन्शुरन्सचे फायदे खाली नमूद केलेले आहेत.
मालमत्तेचे रक्षण
तुमचे दुकान असो किंवा कार्यालय, तुमचे बिझनेस संकुल म्हणजे तुमच्या बिझनेसला महसूल आणि ओळख मिळवून देणाऱ्या उत्पादनांची किंवा सेवांची निर्मिती करणारे ठिकाण आहे. बजाज अलियांझ प्रॉपर्टी इन्शुरन्स तुमच्या बिझनेसच्या जागेचे संरक्षण विविध प्रकारच्या धोक्यांपासून करण्यास मदत करतो आणि तुमच्या उद्योगात नावीन्यपूर्ण राहून सर्वोत्तम कामगिरी करण्याचे स्वातंत्र्य देतो.
तुमच्या कर्मचाऱ्यांचे रक्षण
आम्हाला कल्पना आहे की, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमचे कर्मचारी ही तुमची खरी मालमत्ता आहेत. तुमच्या कर्मचाऱ्यांना पुरेसे कव्हर देऊन तुम्ही त्यांना कंपनीच्या यशात योगदान देण्यासाठी प्रेरित करू शकता.
एक ग्रुप मेडिक्लेम पॉलिसी किंवा ग्रुप पर्सनल अॅक्सिडंट पॉलिसी तुमच्या कर्मचाऱ्यांचे फक्त कल्याणच करत नाही तर त्यांच्यामध्ये मालकीहक्काची भावनाही जागृत करते. आमच्या एम्प्लॉली बेनिफिट प्लॅन्सचा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे दाखवून द्या.
लायबिलिटीपासून संरक्षण
बिझनेसशी संबंधित लायबिलिटी कोणत्याही क्षणी उद्भवू शकते आणि तुमचा बिझनेस अडचणीत आणू शकते. कामाच्या ठिकाणच्या दुखापतींपासून ग्राहकांच्या तक्रारींपर्यंत विविध गोष्टींसाठी तुम्हाला संभाव्य बिझनेस धोक्यांपासून पुरेशा संरक्षणाची गरज असते. लायबिलिटी इन्शुरन्स हे तुमचे कायदेशीर लायबिलिटीपासून कव्हर करणारा कमर्शियल इन्शुरन्सचा प्रकार आहे.
Set Renewal Reminder
Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.
Set Renewal Reminder
Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.
Set Renewal Reminder
Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
Please enter valid quote reference ID