Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

माय होम इन्श्युरन्स पोलिसी

तुमच्या आवडीचं आम्ही जतन करतो
My Home Insurance Policy Online in India

चला, तुमच्यासाठी अनुरुप प्लॅनची निर्मिती करुया.

कृपया नाव एन्टर करा
आम्हाला कॉल करा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

 आपल्या घराला आग, घरफोडी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाचे संरक्षण समाविष्ट

दागिने, मौल्यवान वस्तू आणि कलाकृतींचे संरक्षण

1 ते 5 वर्ष कालावधीच्या कव्हरेजचे पर्याय

बजाज आलियान्झ 'माय होम' इन्श्युरन्स पोलिसीच का?

आपले घर हे आपला जीव कि प्राण आहे.आपले घर हे आपल्या विश्वाचे केंद्रबिंदू , एक बहुमोल गुंतवणूक, सहस्त्र आठवणींचा ठेवा, असं सर्व एकत्रित आहे. ह्यामुळे घर ही एक अतुलनीय मालमत्ता ठरते. तथापि, असे काही प्रसंग घडू शकतात कि ज्यामुळे आपले निवासस्थान अनेक धोके व अपघातांना बळी पडू शकते.

बजाज आलियान्झ येथे, आम्ही आपल्या घराला सुरक्षित करण्याची गरज जाणतो आणि त्यानुसार आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत अनन्य अशी 'माय होम इन्श्युरन्स ऑल रिस्क' पॉलिसी जी खास आपल्या घराला, त्यातील सामग्रीला आणि इतर मौल्यवान वस्तूंना भक्कम कव्हरेज पुरविण्यासाठीच तयार केली गेली आहे.

घराच्या इन्श्युरन्ससंबंधित उपाय पुरविणारा आपला पसंतीचा पुरवठादार ह्या नात्याने, आपले घर संरक्षित करणे हा आमचा अग्रक्रम आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी आणले आहे एक सरल परंतु परिपूर्ण असे इन्श्युरन्स कव्हर जे आपल्याकरिता उचित आहे आणि त्याचसोबत परवडणारेही आहे.

रिन्यूअल बद्दल थोडंसं

होम इन्श्युरन्स पॉलिसीचे रिन्यूअल करणे आवश्यक आहे कारण आपली ही एक साधी कृती आपला ‘सम इन्शुअर्ड’ पुनर्संचयित करेल आणि सर्वसमावेशक कव्हरेज नव्याने सुरु करेल. तथापि, त्याबद्दलच्या बारीक सारीक बाबी जाणून घेणे योग्य ठरेल.

बजाज आलियान्झ येथे, रिन्यूअल प्रक्रिया ही अतिशय सोयीस्कर आहे. परंतु, नैतिक धोका, अनुचित प्रतिनिधित्व किंवा फसवणूक ह्या सबबींवर रिन्यूअल नाकारण्याचा हक्क आम्ही राखून ठेवतो.

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये आम्ही बरंच काही देऊ करितो

महत्त्वाची वैशिष्ट्ये

त्याच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांसह माय होम इन्श्युरन्स पॉलिसी ही सर्व घरमालक, जागामालक आणि भाड्याच्या घरातील भाडेकरूंसाठी लागू आहे:

 • सामग्रीचे कव्हर

  हि पॉलिसी आपले फर्निचर, फिक्स्चर्स, इलेक्ट्रॉनिक सामान, स्वयंपाकपाकघरात सामान, कपडे आणि वैयक्तिक सामान तसेच आपणन्शुअर केलेल्या अन्य वस्तूंचे हानी वा नुकसान कव्हर करते.

 • पोर्टेबल उपकरणांचे कव्हर

  हि पॉलिसी आपल्या पोर्टेबल उपकरणांना भारतात कुठेही झालेल्या अकस्मात हानी किंवा नुकसान कव्हर करते. हे कव्हर जादा प्रीमियम भरून जागतिक पातळीवर विस्तारित करता येते.

 • दागिने आणि मौल्यवान वस्तूचे कव्हर

  हि पॉलिसी दागिने आणि मौल्यवान वस्तूंना झालेल्या अकस्मात हानी वा नुकसान कव्हर करते..हे कव्हर जादा प्रीमियम भरून जागतिक पातळीवर विस्तारित करता येते.

 • दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि चित्र कव्हर

  हि पॉलिसी दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि चित्रांना अकस्मात होणाऱ्या हानी वा नुकसान ह्यांना कव्हर करते. ह्या वस्तूंचे मूल्यांकन शासनाच्या स्वीकृत वॅल्युअर द्वारे केले जाईल आणि आमच्याकडून स्वीकृत केले जाईल.

 • घरफोडी कव्हर

  हि पॉलिसी आपल्या घरातील घरफोडी व चोरीमुळे होणारे नुकसान कव्हर करते.

 • बिल्डिंग कव्हर

  Damages to your building (be it an apartment or a standalone building), contents, jewellery and valuables can be very unsettling. Besides, should you have a flair for art and painting, any loss in this regard can leave a bad taste in your mouth as well. As much as we would be sorry for your loss, we want to assure you that we have got your back so that you don’t have to bear the brunt alone.

  आमचे बिल्डिंग कव्हर आपल्याला रु.20,000/ किमतीच्या अन्न, कपडे, औषधे आणि दैनंदिन आवश्यकतेची वस्तू खरेदी करण्यासाठीचे कव्हर प्रदान करते-.

 • विश्वव्यापी कव्हर

  आम्ही आपणास भारतामध्ये विस्तृत कव्हरेज देऊ आणि आपले नुकसान कमीत कमी राहावे ह्यासाठी आमच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करू.नाममात्र अधिक प्रीमियम भरल्यास आम्ही पोर्टेबल उपकरणे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी देखील आपल्याला सहर्ष विश्वव्यापी कव्हरेज देऊ करू.

आमच्या माय होम इन्श्युरन्स पॉलिसी विषयी अधिक माहिती करिता हा व्हिडिओ पहा.

क्लेम नोंदविण्यासाठी

1)  सर्वेयर नियुक्त केला जातो जो नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी भेट देतो

2)  आमच्या सिस्टमवर क्लेम नोंदविला जातो आणि ग्राहकाला एक क्लेम क्रमांक जारी करण्यात येतो

3)  A survey is conducted within 48-72 hours (case to case basis) and a list of required documents is provided is to the customer. The customer then has 7-15 working days to arrange the same.

4)  कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर 'लॉस अॅडजस्टर' बजाज आलियान्झ कंपनीला रिपोर्ट प्रस्तुत करतो

5)  On the receipt of the report and documents, the claim is processed within 7-10 days(depending of type of loss) via NEFT

येथे क्लिक करा आपला क्लेम ऑन-लाईन नोंदविण्यासाठी.

होम इन्श्युरन्स सोपा करूया

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी कोण पात्र आहे?

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी खालील सर्वांसाठी लागू आहे:

A) Homeowners who own a property that is not more than 50 years old can purchase our My Home Insurance policy.

B) Tenants living in a rented accommodation, as well as others who do not have home ownership, can insure their contents of the property occupied by them.

माझ्या घराच्या रचनेचे आणि आतील सामग्रीचे मूल्यांकन कसे करावे?

तुम्ही अंडर-इंश्योअर्ड किंवा ओव्हर-इंश्योअर्ड तर नाही ना, हे निर्धारित करण्याकरिता, होम इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्या अगोदर आपल्या घराच्या रचनेचे आणि आतील सामग्रीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. अन्यथा, नुकसान झाल्यास, आपली क्लेम रकम प्रभावित होऊ शकते अथवा आपण गरजेपेक्षा अधिक प्रीमियम भराल. मूल्यांकन प्रक्रिया सरल करण्यासाठी आपल्या गरजेनुसार आम्ही आवश्यक घटकांचे घराच्या रचनेसाठी तीन प्रकारांमध्ये व आतील सामग्रीसाठी दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे:

संमत मूल्य आधार: आपण आपल्या मालमत्तेचे बाजारमूल्यापेक्षा अधिक अशा, आमच्याशी संमत करून ठरविलेल्या, मूल्यानुसार कव्हर करू शकतात.हे फक्त रचनेसाठी लागू आहे. सामग्रीसाठी नव्हे.

पूर्वस्थिती बेसिस: आपण जर पूर्वस्थिती मूल्य आधारे होम इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे ठरविले तर क्लेमच्या वेळी कोणताही घसारा लादण्यात येणार नाही आणि 'सम इन्शुअर्ड' रकमेनुसार आपल्याला बदलीसाठीची संपूर्ण रक्कम दिली जाईल. हे फक्त रचनेसाठी लागू आहे. सामग्रीसाठी नव्हे.

नुकसानभरपाई बेसिस: नुकसानभरपाई बेसिस, सर्वसाधारणपणे आपण ज्याला बाजारमूल्य बेसिस म्हणतो, ही रचना इन्शुअर करण्याची एक पद्धत आहे, ज्यामध्ये क्लेम निराकरण करताना बिल्डिंगच्या वयानुरूप घसाऱ्याचा विचार केला जातो. हि पद्धत सामग्री इन्शुअर करण्यासाठीसुद्धा लागू करू शकतो.

'जुन्या ऐवजी नवे' बेसिस/आधार: सामग्री इन्शुअर करण्यासाठी जेव्हा ही पद्धत निवडली जाते तेव्हा डागडुजीच्या आवाक्याबाहेर असलेल्या वस्तू ऐवजी नवी वस्तू दिली जाते अथवा आम्ही वस्तू बदली करण्यासाठीची पूर्ण रक्कम, तिचे वय लक्षात न घेता, भरपाई करतो. 

‘माय होम इन्श्युरन्स’ काय आहे?

आपल्या स्वप्नातील घराचे संरक्षण करायलाच हवे. आमची माय होम इन्श्युरन्स पॉलिसी एक परवडण्याजोगे आर्थिक साधन आहे जे नैसर्गिक आणि मानवी आपत्ती जशा की, भूकंप, पूर, आग, चोरी, घरफोडी आणि कोणत्याही इतर धोक्यांविरुद्ध आपल्या घराला आणि त्यातील सामग्रीला संरक्षण कव्हर प्रदान करते.

मालमत्ता इन्श्युरन्स काय आहे?

मालमत्ता इन्श्युरन्स ही अशा घरधारकांसाठीची पॉलिसी आहे जे आपल्या घराची रचना आणि त्यातील सामग्री कव्हर करू इच्छितात, ज्यामुळे त्यांना पूर, आग, घरफोडी, चोरी, इत्यादी घटनांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाविरुद्ध संरक्षण मिळेल. आपण राहत असलेलया भाड्याच्या घरातील आपली सामग्रीही आपण कव्हर करू शकतात.

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये कोणत्या बाबी समाविष्ट नाहीत?

बजाज आलियान्झ माय होम इन्श्युरन्स पॉलिसी ज्यामुळे आपल्या मालमत्तेच्या रचनेला आणि त्यातील सामग्रीला नुकसान होते, अशा अनेक संकटांविरुद्ध कव्हर प्रदान करते.. परंतु, हे कव्हर काही विशिष्ट परिस्थितींमध्ये लागू होत नाही जसे की घराच्या रचनेला आणि त्यातील सामग्रीला असलेले आधीपासूनचे नुकसान, सदोष कारागिरी, विद्युत आणि यांत्रिक उपकरणांमधील उत्पादन दोष, सामग्रीची अयोग्य हाताळणी, युद्ध, आक्रमण, किंवा परकीय देशांच्या वैमनस्यामुळे होणारे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नुकसान वा हानी, सामग्रीचे अनाकलनीय पद्धतीने गायब होणे आणि अस्पष्ट हानी, आणि अनैतिक वापरामुळे इंश्योअर्ड मालमत्ता अथवा सामान्य जनतेचे झालेले ननुकसान वा हानी.

‘माय होम इन्श्युरन्स पॉलिसी’मध्ये कोणते नुकसान कव्हर होते?

‘माय होम इन्श्युरन्स पॉलिसी’ आपल्याला सर्व प्रकारच्या धोक्यांमुळे उद्भवणाऱ्या मालमत्ता आणि/अथवा त्यातील सामग्रीच्या नुकसानाविरुद्ध कव्हर प्रदान करते, ज्यामध्ये प्रामुख्याने आग, घरफोडी, अपघाती नुकसान आणि नैसर्गिक आपत्ती समाविष्ट आहेत. आपल्या घरातील कलाकृती, दागिने आणि मौल्यवान वास्तुसाठीचे कव्हरही प्राप्त होते. वरील उल्लेख केलेल्या कोणत्याही संकटांमुळे जर आपली मालमत्ता काही कालावधीसाठी राहण्यायोग्य नसेल आणि त्यामध्ये डागडुजीची गरज असेल, तर आपल्याला मालमत्ता दुरुस्त होईपर्यंत पर्यायी निवासाचा लाभ प्राप्त होईल.

‘माय होम इन्श्युरन्स पॉलिसी’अंतर्गत क्लेम करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी’अंतर्गत क्लेम करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ही नुकसान कोणत्या आपत्तीमुळे झाले आहे त्यावर अवलंबून असतात कारण ती बाब पुरावा म्हणून सादर करता येते. जर नुकसान आगीमुळे झालेले असेल तर आपल्याला क्लेम फॉर्मसोबत फायर ब्रिगेडचा रिपोर्ट सादर करावा लागेल. तसेच, जर चोरी झाली असेल तर आपल्याला एफआयआर दाखल करून त्याचा तपशील आम्हाला द्यावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत क्लेम प्रक्रियेसाठी क्लेम फॉर्म आवश्यक आहे.

'सम इन्शुअर्ड' रकमेची गणना कशी करायची?

आपण आपल्या घराच्या आणि त्यातील सामग्रीच्या 'सम इन्शुअर्ड' रकमेची गणना संमत मूल्य बेसिस, पूर्वस्थिती बेसिस अथवा नुकसानभरपाई बेसिस प्रमाणे करू शकतात.

Can I increase my sum insured (SI)?

होय, आपण पॉलिसीच्या कालावधी दरम्यान ‘एस्केलेशन क्लॉझ’ची निवड करून, जादा प्रीमियम देऊन आपल्या घराची 'सम इन्शुअर्ड' रकम 25% पर्यंत वाढवू शकता. उदाहरणार्थ, 'सम इंश्योअर्ड' रु. 10 लाख आहे आणि आपण 25% ‘एस्केलेशन क्लोझ’चा पर्याय निवडला. 'सम इंश्योअर्ड' दिवसागणिक वाढत जाते आणि पॉलिसीच्या अंतिम दिवशी 'सम इंश्योअर्ड' रु. 12.5 लाख एवढी असेल.

टीप: एस्केलेशन क्लोझचा पर्याय केवळ बिल्डिंगच्या 'सम इंश्योअर्ड' करीता 'पूर्वस्थिती बेसिस' आणि 'नुकसान भरपाई बेसिस'वर उपलब्ध आहे.

मी दागिने, दुर्मिळ वस्तू आणि कलाकृती कशाप्रकारे कव्हर करू शकतो?

दागिने, दुर्मिळ वस्तू आणि कलाकृती साठीचा 'सम इन्शुअर्ड' रक्कम वस्तूंच्या शासन अधिकृत वॅल्युअरद्वारे केलेले मूल्यांकन आणि आमच्या स्वीकृतीवर अवलंबून असते.

जर मी दुर्मिळ वस्तू सोबत घेऊन प्रवास करत असेन तर त्यांचे कव्हर मिळवू शकतो?

नाही, दुर्मिळ वस्तू ह्या आपल्या घरात ठेवलेल्या असतील तरच त्याचे कव्हर आपल्याला प्राप्त होईल.

माय होम इन्श्युरन्स योजनेअंतर्गत संपूर्ण सोसायटी किंवा बिल्डिंग ईन्शुर होऊ शकते का?

नाही, होम इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत संपूर्ण सोसायटी किंवा बिल्डिंग इन्शुअर होऊ शकत नाही.

होम इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत सामान्यतः कोणत्या प्रकारच्या मालमत्ता कव्हर होत नाहीत?

माय होम इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत खालील प्रकारच्या मालमत्ता कव्हर होत नाहीत:

· निर्माणाधीन मालमत्ता

· जमीन आणि भूखंड

· दुकान व इतर व्यावसायिक जागा

· कच्चे बांधकाम

· असे निवास ज्यांचा कार्यालय म्हणूनही वापर होतो किंवा असे कार्यालय ज्यांचा निवास म्हणून वापर होतो.

आमचे आनंदी कस्टमर्स!

राधा गणेशन

पॉलिसी खरेदी करतानाचा सेल्स मॅनेजरसोबतचा अनुभव चांगला होता.

कार्तिक एस

सेल्स एक्झिक्युटिव्ह अत्यंत माहितीप्रद होता, त्याने माझ्या घरासाठी सर्वोत्तम पॉलिसी सुचविली. उत्कृष्ट मदत मिळाली.

रतन कोतवाल

होम इन्श्युरन्सची अत्यंत कार्यक्षम सेवा आणि बॅक अप.

आपल्या घराचे संरक्षण केवळ एका क्लिकवर.

संपूर्ण संरक्षणासाठी आपल्याला अनुकूल अशी पॉलिसी तयार करा

वैविध्यपूर्ण ॲड-ऑन कव्हर्स द्वारे आपल्या घरासाठी आणि त्यातील सामग्रीसाठी अतिरिक्त संरक्षण मिळावा

आपले घर खास आहे आणि आम्ही वैविध्यपूर्ण ॲड-ऑन कव्हर्स द्वारे त्याच्या संरक्षणाचे मूल्यवर्धन करू इच्छितो:

भाडे नुकसानीचे कव्हर

जर आपण भाड्याने दिलेली मालमत्ता काही आपत्तीमुळे नष्ट झाली आणि आपले भाडेकरू सोडून गेल्यामुळे आपल्याला भाडे मिळणे बंद झाले, तर आम्ही आपली मालमत्ता राहण्यालायक नसेल तोपर्यंत भाड्याच्या रकमेची नुकसान भरपाई देऊ.

हंगामी पुनर्वसन कव्हर

आग, पूर, इत्यादीमुळे जर आपले घर नष्ट झाले आणि आपल्याला पर्यायी निवासाची आवश्यकता असेल, तर आम्ही पॅकिंग आणि वाहतूकीसाठी लागण्याच्या रकमेची नुकसान भरपाई देऊ.

कुलूप आणि चावी बदलासाठी कव्हर

जर आपल्या घरात घरफोडी झाली किंवा आपल्या घराच्या वा वाहनाच्या किल्ल्या चोरीस गेल्या, तर आम्ही नवीन किल्ल्या बनविण्यासाठीच्या रकमेची नुकसानभरपाई देऊ.

एटीएम विथड्रॉअल दरोड्यासाठीचे कव्हर

एटीएम मधून पैसे काढल्याच्या पश्चात जर आपण लुटले गेलात, तर आम्ही दरोड्यात आपण गमाविलेल्या रकमेची नुकसानभरपाई देऊ.

पाकीट हरविल्याचे कव्हर

जर तुमचे पाकीट हरवले अथवा चोरीस गेले तर ते बदली करण्यासाठीची रकमेची त्याचप्रमाणे गमावलेली कागदपत्रं आणि पाकिटात असलेली कार्ड मिळविण्यासाठीच्या अर्जाकरिता लागणाऱ्या खर्चाची नुकसानभरपाई देऊ.

श्वान इन्श्युरन्स कव्हर

जर आपला पाळीव श्वान पॉलिसीच्या कालावधीत अपघाती आणि/अथवा रोगामुळे मरण पावला, तर आम्ही झालेल्या हानीबद्दल एक ठराविक रक्कमेची नुकसानभरपाई देऊ.

सार्वजनिक उत्तरदायित्व कव्हर

आपण एखादी जागा निवासी हेतूसाठी वापरात असाल किंवा राहत असाल आणि कोणाला इजा झाली किंवा त्यांच्या मालमत्तेचं नुकसान झाले, तर ते नुकसान भरून देण्यासाठी आलेल्या खर्चाची भरपाई आम्ही देऊ.

कामगारांच्या नुकसानभरपाईचे कव्हर

जर कामावर असताना एखाद्या कामगाराला अपघात होऊन तो जखमी झाला, तर त्याला नुकसानभरपाई दिली जाईल.

माय होम इन्श्युरन्स खरेदी करण्याअगोदर नोंदकरण्यायोग्य असे महत्वाचे मुद्दे

 • समावेश
 • अपवाद

बिल्डिंगला झालेले नुकसान किंवा हानी

आपण निवडलेल्या प्लॅननुसार आम्ही बिल्डिंगला झालेल्या अपघाती नुकसान व हानीची नुकसानभरपाई देऊ.

सामग्रीला झालेले नुकसान किंवा हानी

पॉलिसी खरेदीकरतेवेळी आपण इन्शुअर केलेल्या फर्निचर आणि फिक्स्चर्स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू, कपडे आणि वैयक्तिक सामान आणि इतर सामानाच्या हानी/नुकसानाची भरपाई केली जाईल

पोर्टेबल उपकरणांना भारतात कुठेही झालेले हानी वा नुकसान

आपल्या पोर्टेबल उपकरणांना भारतात कुठेही झालेल्या अपघाती हानी वा नुकसानाची भरपाई आम्ही देऊ. तथापि, अतिरिक्त होम इन्श्युरन्स प्रीमियम भरल्यास, पोर्टेबल उपकरणांसाठीचे कव्हरेज विश्वव्यापी करता येऊ शकते

दागिने व मौल्यवान वस्तूंची हानी वा नुकसान

 दागिने व मौल्यवान वस्तूंच्या भारतात कुठेही झालेल्या अपघाती हानी किंवा नुकसानाची भरपाई आम्ही देऊ. तथापि, अतिरिक्त होम इन्श्युरन्स प्रीमियम भरल्यास, दागिने व मौल्यवान वस्तूंसाठीचे कव्हरेज विश्वव्यापी करता येऊ शकते

आपल्या बिल्डिंगमध्ये ठेवलेल्या अथवा संग्रहित केलेल्या दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि चित्रांना झालेल्या अपघाती हानी किंवा नुकसानाची भरपाई

आम्ही आपल्याला ह्याबाबतीत अपघाती हानी वा नुकसानाची भरपाई देऊ 

अधिक जाणून घ्या

आपल्या बिल्डिंगमध्ये ठेवलेल्या अथवा संग्रहित केलेल्या दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि चित्रांना झालेल्या अपघाती हानी किंवा नुकसानाची भरपाई

आम्ही आपल्याला आपल्या बिल्डिंगमध्ये ठेवलेल्या अथवा संग्रहित केलेल्या दुर्मिळ वस्तू, कलाकृती आणि चित्रांना झालेल्या अपघाती हानी वा नुकसानाची भरपाई देऊ. ह्या वस्तूंचे मूल्यांकन शासनाच्या अधिकृत वॅल्युअर द्वारे केले जाईल आणि आमच्याकडून स्वीकृत केले जाईल

1 चे 1

पॉलिसीत उल्लेख केल्याप्रमाणे, ऐच्छिक वजाकरणेयोग्य रक्कम आपल्याला द्यावी लागेल

कुठल्याही चुकीच्या प्रतिनिधित्वाला किंवा माहिती लपविण्याच्या कृतीला प्रोत्साहन दिले जाणार नाही

Pre-existing damages (to building or its contents) will not find a place in our coverage checklist

रचनेतील दोष किंवा निकृष्ट कारागिरीपायी बिल्डिंगला नुकसान झाल्यास आम्ही तुमची मदद करण्यास असमर्थ असू

सामग्रीला घसारा, नैसर्गिक जीर्णता किंवा निष्काळजी

Should the contents sustain damages resulting from depreciation, natural wear and tear or one that is caused by human activity (careless handling, defective workmanship and the likes), we will not be able to entertain your claim

इलेक्ट्रॉनिक, विद्युत आणि यांत्रिक वस्तूंमधील उत्पादन दोष ही निर्मात्याची चूक आहे

कालापरत्वे उपभोग्य वस्तू आणि सामानाची हानी होत असते ह्या गोष्टीचा आपण स्वीकार करायला हवा

निर्मात्याने स्वीकृत केल्या खेरीज जर आपण उपकरणात सुधारणा किंवा बदल केले, तर त्यावेळी असलेल्या धोक्याचा विचार करावा कारण नुकसान झाल्यास आम्ही आपणास मदत करू शकणार नाही

निर्मात्याने स्वीकृत केल्या खेरीज जर आपण उपकरणात सुधारणा किंवा बदल केले, तर त्यावेळी असलेल्या धोक्याचा विचार करावा कारण नुकसान झाल्यास आम्ही आपणास मदत करू शकणार नाही

पोर्टेबल उपकरणांची मोडतोड, तुटणे किंवा इतर अंतर्गत नुकसान

Breakage, cracking or other internal damages of portable equipment  (watches, glass, cameras, crockery, musical instruments) will not be covered by the All Risk Insurance Policy

पैसे, सरकारी रोखे, हस्तलिखित, आणि डेबिट/क्रेडिट कार्ड

पैसे, सरकारी रोखे, हस्तलिखित, आणि डेबिट/क्रेडिट कार्ड ह्यांचे झालेले नुकसान आणि हानी अत्यंत अस्वस्थ करणारे ठरू शकते.. ह्याबाबत आमची सहानुभूती आपल्यासोबत असली तरीही आम्ही आपल्याला त्याचे कव्हर देऊ शकत नाही

आपण एक बहुमूल्य कलाकृती आपल्या हातात घ्या आणि तिचे दीर्घकाळ अवलोकन करा.

आपण एक बहुमूल्य कलाकृती आपल्या हातात घ्या आणि तिचे दीर्घकाळ अवलोकन करा. तथापि, दुसऱ्या क्षणाला ती आपल्या हातातून खाली पडते आणि तिचे तुकडे-तुकडे होतात. आम्ही ह्याबाबतीत अधिक काही करू शकत नाही. Bआम्ही ह्याबाबतीत अधिक काही करू शकत नाही. खरेतर, काहीच करू शकत नाही

वस्तूंचे अनाकलनीयरित्या गायब होणे आणि समजण्याच्या पलीकडली हानी चक्रावून टाकते. आम्हाला सुद्धा. हेच कारण आहे कि आम्ही ह्या बाबतीत कव्हरेज पुरवत नाही

1 चे 1

बिल्डिंगसाठी 'सम इन्शुअर्ड'
संमत मूल्य बेसिसवर
'सम इन्शुअर्ड' = एकूण स्क्वेर फीट(सेल डीड मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे) * प्रति स्क्वेर फूट दर (निर्दिष्ट लोकेशनसाठी)

पूर्वस्थिती मूल्य बेसिसवर
बिल्डिंगचे क्षेत्रफळ (स्क्वेर फीट मध्ये) * लोकॅलिटी प्रमाणे सध्याचा बांधकाम खर्च * (1 + निवडलेले एस्केलेशन %)

On Indemnity Value Basis Area of the building (sq. feet) * Present day cost of construction in the locality * (1+Escalation % chosen) * (1 – Depreciation at 2.5% P.A x Age of building, with final depreciation rate not exceeding 70% in aggregate).

सामग्रीसाठी 'सम इन्शुअर्ड'
जुन्याऐवजी नवं बेसिस वर
इन्शुअर केलेली वस्तू त्याच प्रकारच्या आणि क्षमतेच्या नवीन वस्तूद्वारे (जीर्णता आणि घसारा लक्षात न घेता) बदली करण्यासाठीची रक्कम.

नुकसानभरपाई बेसिस वर
ही आकृती इन्श्युअर्ड वस्तूंच्या बदली मूल्यावर आधारित आहे (सुधारणा, परिवर्तन आणि डेप्रीसीएशनसाठी भत्ता न मिळता).

दागिने आणि मुल्यवान वस्तूंसाठी 'सम इन्शुअर्ड'
दागिने अँड मौल्यवान वस्तू ज्यांचे मूल्य गोल्ड प्लॅन अंतर्गत रु. 2 लाख 50 हजार पर्यंत आहे,डायमंड प्लॅन अंतर्गत रु. 5 लाखापर्यंत आणि प्लॅटिनम प्लॅन अंतर्गत रु. 10 लाखापर्यंत असेल, त्याची, संपूर्ण वर्णन आणि बाजारमूल्यासह, वस्तू-निहाय सूची पुरवावी लागेल.

आपल्याला बजाज आलियान्झद्वारा स्वीकृत वॅल्युअरचा मूल्यांकन रिपोर्ट प्रस्तुत करावा लागेल. 'सम इन्शुअर्ड' दोन बेसिसवर आधारित असेल. पूर्ण 'सम इन्शुअर्ड' बेसिस आणि नुकसान मर्यादा बेसिस.
नुकसान मर्यादा बेसिस मध्ये खालील पर्याय मिळतील:
एकूण 'सम इन्शुअर्ड' चे 1 25%
एकूण 'सम इन्शुअर्ड' चे 2 40%

कला, चित्र आणि दुर्मिळ वस्तूंसाठी 'सम इन्शुअर्ड'
'सम इन्शुअर्ड' हा संमत मूल्य बेसिसवर असेल ज्याचा आधार बजाज अलियांझद्वारा स्वीकृत वॅल्युअरचा मूल्यांकन रिपोर्ट असेल.

Amid a range of other policies that are doing the rounds in the market, there are features to our policy that set us apart from our peers and rivals alike. After all, your need for safety (read insurance) is our command.

✓ 'माय होम इन्श्युरन्स ऑल रिस्क पॉलिसी' आपल्या घराला आणि त्यातील सामग्रीला आपण निश्चित कराल तेवढ्या कालावधीसाठी कव्हरेज पुरविते.

✓ आपल्याला दागिन्यांची प्रचंड आवड असू शकते. किंवा आपण कलाकृतीचे चाहते असू शकतात. . आपली गरज कोणतीही असो, आम्ही आपल्याला बऱ्या-वाईट प्रसंगात कव्हर करू. ऑल रिस्क इन्श्युरन्स पॉलिसी सोबत आपले दागिने, कलाकृती, चित्र, दुर्मिळ वस्तू आणि इतर वैयक्तिक मौल्यवान वस्तूंसाठी एकछत्री कव्हरेज मिळवा.

कारण की, त्यांना इन्शुअर केल्यामुळे आपण आपला वारसा पुढच्या पिढीसाठी जतन करू शकता.

✓ कालांतराने, आपले घर एक वेगळाली ओळख आत्मसात करते ज्यामध्ये आपली रुची आणि आपले व्यक्तिमत्व प्रतिबिंबित होते. घरातील एका वस्तूला कव्हर करणे आणि दुसऱ्या वस्तूला न करणे हे काहीसे अवघड ठरते. म्हणूनच जर आपला 'सम इन्शुअर्ड' रु. 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर आम्ही सामग्रीच्या सूचीची मागणी करत नाही.

✓ आपल्या प्राधान्य सूचीमध्ये प्रवास हा केव्हाही, अचानक समाविष्ट होऊ शकतो, मग तो व्यवसायाकरिता असो वा फुरसतीसाठी. आम्ही जाणतो की अशा वेळी मौल्यवान वस्तू अथवा उपकरणे चोरीला जाणे अथवा त्याचे नुकसान होणे किती तापदायक ठरू शकते. आपण परदेशात असाल तर नुकसानामुळे होणारा क्लेश हा कितीतरी पटीने जास्त असतो हे ध्यानात ठेऊन आम्ही आपले दागिने, मौल्यवान वस्तू आणि पोर्टेबल उपकरणांसाठी नाममात्र अधिक प्रीमियम आकारून जगव्यापी कव्हर देणारी पॉलिसी तयार केली आहे.

 

तर पुन्हा जेव्हा आपण प्रवासाचा विचार कराल, तेव्हा बजाज आलियान्झ ह्या नावाचा अवश्य विचार करा.

 

✓ तर पुन्हा जेव्हा आपण प्रवासाचा विचार कराल, तेव्हा बजाज अलियांझ ह्या नावाचा अवश्य विचार करा.. आपण आम्हाला त्याबद्दलची केवळ सूचना देणे गरजेचे आहे.. आम्ही उर्वरित सर्व बाबीची काळजी घेऊ.

✓ जर आपली सामग्री, दागिने, चित्र, कलाकृती, दुर्मिळ वस्तू आणि इतर मौल्यवान वस्तू त्यांच्या यथार्थ मूल्यापेक्षा कमी रकमेसाठी संमत मूल्य बेसिसवर इन्शुअर झाल्या असतील तर आम्ही सहर्ष 'कंडिशन ऑफ एव्हरेज' माफ करू.

आपल्या मालमत्तेच्या संरक्षणाकरिता आम्ही नेहमी तत्पर असू!
आमची 'ऑल रिस्क पॉलिसी' आपल्या गरजा ओळखूनच तयार केली गेली आहे. त्यामुळेच आपण ती एक दिवसापासून ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी निवडू शकता. 

माय होम इन्श्युरन्स बिल्डींग इन्श्युरन्स (रचना)
मान्य मूल्य आधार
(फ्लॅट / अपार्टमेंट)
पूर्वस्थिती मूल्य बेसिस
(फ्लॅट/सदनिका/स्वतंत्र बिल्डिंग)
नुकसानभरपाई बेसिस
(फ्लॅट/सदनिका/स्वतंत्र बिल्डिंग)
पोर्टेबल उपकरणे समाविष्ट असलेली सामग्री जुन्या ऐवजी नवं बेसिस (दागिने, मौल्यवान वस्तू, चित्र, कलाकृती आणि दुर्मिळ वस्तू वगळून)) प्लॅटिनम प्लॅन -I
फ्लॅट/सदनिका इन्श्युरन्स - संमत मूल्य बेसिस + सामग्री - जुन्या ऐवजी नवं बेसिस
डायमंड प्लॅन -I
फ्लॅट/सदनिका/बिल्डिंग इन्श्युरन्स - पूर्वस्थिती मूल्य बेसिस + सामग्री - जुन्या ऐवजी नवं बेसिस
गोल्ड प्लॅन – I
फ्लॅट/सदनिका/बिल्डिंग इन्श्युरन्स - नुकसानभरपाई बेसिस + सामग्री - जुन्या ऐवजी नवं बेसिस
नुकसानभरपाई बेसिस (दागिने, मौल्यवान वस्तू, चित्र, कलाकृती आणि दुर्मिळ वस्तू वगळून) प्लॅटिनम प्लॅन -II
फ्लॅट/सदनिका इन्श्युरन्स - संमत मूल्य बेसिस + सामग्री - नुकसानभरपाई बेसिस
डायमंड प्लॅन -II
फ्लॅट/सदनिका/बिल्डिंग इन्श्युरन्स - पूर्वस्थिती मूल्य बेसिस + सामग्री - नुकसानभरपाई बेसिस
गोल्ड प्लॅन – II
फ्लॅट/सदनिका/बिल्डिंग इन्श्युरन्स - नुकसानभरपाई बेसिस + सामग्री - नुकसानभरपाई बेसिस
पोर्टेबल उपकरणं कव्हरेज इन-बिल्ट कव्हरेज भारतभर कव्हरेज अतिरिक्त प्रीमियम आकारून विश्वव्यापी विस्तार शक्य
दागिने, मौल्यवान वस्तू , दुर्मिळ वस्तू, इत्यादी. दागिने, मौल्यवान वस्तू, दुर्मिळ वस्तू, चित्रे आणि कलाकृती दागिने आणि मौल्यवान वस्तूंसाठी: इन-बिल्ट कव्हरेज:भारतभर कव्हरेज अतिरिक्त प्रीमियम आकारून विश्वव्यापी विस्तार शक्य
अतिरिक्त लाभ वैकल्पिक निवासासाठी भाडे आणि दलाली i) वैकल्पिक निवासासाठी भाडे
a) फ्लॅट/सदनिकेच्या 'सम इन्शुअर्ड' च्या 0.5% किंवा
b) वास्तविक भाडे (a) आणि (b) मधून जे न्यून असेल ते तसेच मासिक कमाल रु. 50,000 ह्या अटीला अधीन, पुनर्निर्माण पूर्ण होईपर्यंत अथवा 24 महिने, ह्यातील जे न्यून असेल ते
ii) एक महिन्याच्या भाड्याहून अधिक नसेल अशी वास्तविक देय दलाली
i) वैकल्पिक निवासासाठी भाडे
a) फ्लॅट/सदनिकेच्या 'सम इन्शुअर्ड' च्या 0.3% किंवा
b) दलाली समाविष्ट असलेले वास्तविक भाडे (a) आणि (b) पैकी जे कमी असेल ते प्रति महिना कमाल रु. 35,000/- ह्या अटीला अधीन, पुनर्निर्माण पूर्ण होईपर्यंत अथवा 24 महिने, ह्यातील जे कमी असेल ते
ii) एक महिन्याच्या भाड्याहून अधिक नसेल अशी वास्तविक देय दलाली
-
आणीबाणीची खरेदी रू.20,000 किंवा वास्तविक रक्कम, जी न्यून असेल ती  
टीप इन्शुअर करण्यासाठीचे पर्याय इन्शुअर करणाऱ्या व्यक्तीसाठी केवळ फ्लॅट/सदनिका/बिल्डिंग किंवा केवळ सामग्री किंवा दोन्ही गोष्टी इनशुअर करण्याचा पर्याय आहे.
पॉलिसीचा कालावधी पॉलिसी कालावधीचे पर्याय i) अल्प मुदतीची पॉलिसी 15/30/60/90/120/150/180/210/240/270 दिवासांपर्यंतची
ii) वार्षिक पॉलिसी 1 वर्ष / 2 वर्षे / 3 वर्षे / 4 वर्षे / 5 वर्ष
(टीप: सर्व पॉलिसींसाठी निवडलेल्या कव्हर्सचा पॉलिसी कालावधी समान असेल)
ॲड-ऑन कव्हर्स सर्व प्लॅन साठी ॲड-ऑन कव्हर्स 1) भाड्याचे नुकसान
2) हंगामी पुनर्वसन कव्हर
3) कुलूप आणि किल्ली बदली कव्हर
4) एटीएम विथड्रॉअल दरोडा कव्हर
5) हरवलेले पाकीट कव्हर
6) श्वान इन्श्युरन्स कव्हर
7) पब्लिक लायबिलीटी कव्हर
8) कर्मचार्यांचा भरपाई कव्हर
सामग्री इनशुअर केल्याशिवाय दागिने आणि मौल्यवान वस्तू आणि/अथवा दुर्मिळ वस्तू , चित्रे आणि कलाकृतींसाठी स्वतंत्र कव्हरचा पर्याय निवडता येणार नाही.

होम इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमरचे अनुभव

सरासरी रेटिंग:

 4.6

(Based on 25 reviews & ratings)

NISHANT KUMAR

निशांत कुमार

होम इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदीचा सोपा आणि विनासायास, सोयीस्कर मार्ग.

RAVI PUTREVU

रवी पुत्रेवु

होम इन्श्युरन्स क्लेम करण्यासाठीची अत्यंत व्यावसायिक, जलद आणि सरल प्रक्रिया

PRAKHAR GUPTA

प्रखर गुप्ता

मी बजाज आलियान्झच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी मला होम इन्श्युरन्स बद्दल सर्व बाबी समजावून सांगितल्या. त्या गोष्टीचे मी कौतुक करतो.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 1st मार्च 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा