रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स

तुमची उपकरणे, आमचे संरक्षण
Extended Warranty Insurance

चला सुरुवात करूया

कृपया नाव एन्टर करा
https://general.bajajallianz.com/Insurance/extendedWarranty/index.jsp कोटेशन मिळवा
कोटेशन पुन्हा मिळवा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा
सबमिट करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

भारताच्या 400+ शहरांमध्ये कॅशलेस सेवा

3 वर्षांपर्यंत कव्हरेज

दुरूस्ती आणि बदली कव्हरेज

बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स

या चित्राचा विचार कराः: तुम्ही बॉलीवूड ब्लॉकबस्टरचा प्रीमियर टीव्हीवर पाहत आहात आणि क्लायमॅक्स येतो आणि नेमकी लाइट जाते, समोरचे दृश्य नाहीसे होते. तुम्ही पूर्ण आठवडाभर या वीकेंडची वाट पाहिलेली असते आणि नेमका तो खराब होतो. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी टीव्ही पुन्हा सुरू होत नाही. काही मिनिटे तासांमध्ये रूपांतरित होतात. तुमचा टेक्निशियन येऊन टीव्ही पाहतो तेव्हा कळते की टीव्ही खराब झाला आहे.

तो सांगतो की तुमच्या टीव्हीचे आतील सर्किट जळाले आहे आणि टीव्ही एक्स्टेंडेड वॉरंटीअंतर्गत कव्हर केलेला नसेल तर तुम्हाला खर्च करावा लागेल. दुर्दैवाने तुम्हाला कळते की ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर वॉरंटी मागच्याच महिन्यात संपली आहे. टीव्ही खरेदी करण्याचा खर्च आणि दुरूस्ती आणि देखभालीचा खर्च यांच्यामुळे तुमचा नवा कोरा एलईडी टीव्ही तुमच्यासाठी एक दुःस्वप्न ठरू शकतो

तुमचा टीव्ही वॉरंटीअंतर्गत कव्हर केलेला असतो तेव्हा उत्पादकाने विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत कोणत्याही दुरूस्तीबाबत तुम्ही निश्चिंत असता.. अनेक उत्पादक त्यांच्या उत्पादनांवर दीर्घकालीन टिकाऊपणासाठी वॉरंटी देतात. अनेक उपकरणांसोबत समाविष्ट असलेल्या युजर मॅन्युअलमध्ये त्यांच्या उपकरणांचे इन्स्टॉलेशन, वापर आणि मेन्टेनन्स यांच्याबाबत तपशीलवार सूचना असतात.

तुम्हाला वॉरंटीवर एक्स्टेंशन मिळाले तर छान होईल ना? तुम्हाला कायमच असे वाटत असेल की वॉरंटी या नेहमीच फसव्या असतात आणि गरज असते तेव्हा कधीच उपयोगी पडत नाहीत तर तुमच्यासाठी एक संधी आहे. बजाज आलियान्झने तुमची इच्छा सत्यात उतरवण्यासाठी एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स आणला आहे आणि आयुष्य सोपे केले आहे.

 बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्ससोबत तुम्ही वेळ आणि पैसा या दोन्हींची बचत करू शकता. तुमची उपकरणे तुमचा वेळ वाचवून तुमचे आयुष्य सोपे करतात. आमच्या एक्स्टेंडेड कव्हरेजसोबत ओरिजिनल मॅन्युफॅक्चरर वॉरंटी संपल्यावरही दुरूस्तीचा खर्च दूर राहू शकतो. महत्त्वाचे म्हणजे बजाज आलियान्झसोबत तुम्हाला जागतिक दर्जाच्या कस्टमर सर्व्हिस मिळतात. इथे तुमचे क्लेम वेगाने सेटल होतात आणि तुम्हाला असलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अत्यंत मैत्रीपूर्ण आणि व्यावसायिक पद्धतीने दिली जातात.

तुम्ही गृहिणी असाल तर तुमचा नीट काम न करणारा ओव्हन किंवा ग्रिल तुमच्या स्वयंपाकाच्या वेळापत्रकावर तर परिणाम करेलच पण तुम्ही त्या संध्याकाळी तुमच्या मुलांसोबत ठरवलेल्या आराम करण्याच्या कार्यक्रमावरही विरजण टाकू शकते. हे मुलांना तर निराश करतेच पण त्याचबरोबर तुम्हाला पटकन आणि परवडणाऱ्या दरात सेवा मिळेल याचीही शाश्वती नसते. तुमचे मासिक बजेट आणि कुटुंबाच्या वेळावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. अशा घटनांवर नियंत्रण आणले जाऊ शकत नाही किंवा त्यांचा अंदाजही लावता येत नाही. परंतु त्यांचा सामना करण्यासाठी येणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी तुम्हाला हाताळण्यासाठी परिणामकारक पद्धत आवश्यक असते.

एक बिझी व्यावसायिक म्हणून घरच्या आणि कामाच्या ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडणे एखादे इलेक्ट्रिकल किंवा कस्टमर अप्लायंस बंद पडते तेव्हा कठीण होते. ऑनलाइन एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्ससोबत तुम्ही एखाद्या दुर्दैवी घटनेमुळे तुमचा दिवस खराब होणार नाही याची काळजी घेऊ शकता. परिणामः हा नेहमीप्रमाणे बिझनेस आहे.

तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण तुम्ही कामावर असतानाही जास्त काम करून घेण्यास मदत करते. तुमचा लॅपटॉप आणि मोबाइल फोन यांच्या मदतीने तुम्ही अख्खा बिझनेस चालवू शकता. परंतु, ही उपकरणे वैविध्यपूर्ण असण्याबरोबरच नाजूकही आहेत. बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना कव्हर करते आणि तुमचा तणाव कमी करून तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी मदत करते. तुमच्या टीममध्ये काही प्रोफेशनल्स असतील तर बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी घेतल्याने तुमचा बिझनेस खूप चांगला टिकेल कारण अनपेक्षित नुकसानापासून होणारे धोके कमी होतील आणि तुमचा बिझनेस अधिक मजबूत होईल.

वॉरंटीचा कालावधी फक्त मर्यादित असल्याचे तुम्हाला कळेल तेव्हा वॉरंटीच्या अटी आणि शर्ती वाचण्यासाठी तासनतास घालवणे तुम्हाला निराश करू शकते. आता नाही. बजाज आलियान्झ ऑनलाइन एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्ससोबत तुम्ही उत्पादकाने दिलेला वॉरंटीचा कालावधी 3वर्षांपर्यत वाढवू शकता. काही क्लिक्सवर तुमची उपकरणे कोणत्याही काळजीशिवाय पूर्ण क्षमतेने वारली जातील याची तुम्ही काळजी घेऊ शकता. कोणत्याही नुकसानाची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत!

चांगले आहे.! पण मी बजाज आलियान्झकडून एक्स्टेंडेड वॉरंटी का घ्यायची?

इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस खरेदी करताना सर्वोत्तम ब्रँड्सकडून अद्ययावत मॉडेल खरेदीसाठी तुम्ही खूप वेळ आणि शक्ती खर्च करता. कशासाठी? कारण तुम्हाला अपेक्षा असते की तुम्ही खरेदी करत असलेले अप्लायन्स टिकाऊ आणि कार्यक्षम असेल. आम्हाला खात्री आहे की उत्पादनाच्या तपशिलांबरोबरच तुम्ही दिलेल्या वॉरंटीचाही नीट विचार करता. त्याचे कारण असे की तुम्हाला तुमचे उपकरण शक्य तितका जास्त काळ कोणताही अधिक खर्च न होता चालू राहील याची खात्री करायची असते. परंतु, जसजसा काळ पुढे जातो तसतसे अप्लायन्स स्थिरपणे चालू ठेवण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि पैसा वाढत जातो.

 बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्ससोबत तुम्ही या गोष्टीची खात्री बाळगू शकता की अप्लायन्स खरेदी करण्याच्या सुरूवातीच्या खर्चाखेरीज अप्लायन्स पूर्णपणे बदलायचे असले तरी इतर सर्व दुरूस्ती आणि देखभालीच्या खर्चाची काळजी घेतली जाईल. तुम्हाला वाढीव कालावधीसाठी वॉरंटी कव्हरेज मिळेल आणि तुम्ही चिंतामुक्त राहू शकाल. बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स उत्पादकाने दिलेल्या मूळ वॉरंटीचा कालावधी संपुष्टात आल्यावरही तुमच्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे आयुष्यमान वाढवतो.

बजाज आलियान्झकडून एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन घेतल्यामुळे तुम्हाला दर्जा आणि खर्चाबाबत जागरूक ग्राहकांच्या यादीत स्थान मिळते ज्यांना आपल्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा हवा आहे. बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स तुमच्या इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचे संरक्षण करण्यासाठी एक लवचिक आणि परवडणारा पर्याय असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेतः:

 • किमान खर्च

   

  अर्थात, तुम्ही केलेल्या प्रत्येक खरेदीतून तुम्ही खर्च केलेल्या पैशांबाबत मिळणाऱ्या फायद्यांचा विचार तुम्ही करत असता. त्यात अप्लायन्स खरेदी करण्याच्या खर्चाबरोबरच बराच कालावधी गेल्यानंतर ते चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाचाही विचार केला जातो. बजाज आलियान्झकडून उत्पादकाने दिलेल्या आदर्श वॉरंटी कव्हरवर ऑनलाइन एक्स्टेंडेड वॉरंटी कव्हरेज किमान खर्चात दिले जाते. काही इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसमध्ये हलते भाग असतात जे हाताळण्यासाठी प्रमाणित प्रोफेशनल्सची गरज भासते. बजाज आलियान्झ या गोष्टीची काळजी घेते की तुमचे अप्लायन्स ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये तज्ञांकडून तपासले गेले आहे, तसेच दर्जेदार स्पेअर पार्ट्स वापरले गेले आहेत आणि ब्रेकडाऊन पुन्हा होणार नाही याची शक्यता कमी केली जाते.

 • लवचिक कव्हरेज

  आमची एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स सर्व्हिस तुमच्या गरजांनुरूप टेलर्ड कव्हरेज देते. तुम्ही एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी कव्हरेज निवडू शकता आणि त्यामुळे ते परवडणारे आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह होते. आमचे रिपेअर आणि सर्व्हिस नेटवर्क संपूर्ण देशभरात पसरलेले आहे. ते तुम्हाला अभूतपूर्व लवचिकता देते. 

 • फास्ट क्लेम प्रोसेसिंग

  बजाज आलियान्झ क्लेम सेटलमेंट प्रोसेसना मागील अनेक वर्षांपासून सलग ICRA चे प्रमाणन मिलाले आहे.तुमच्या क्लेमना मदतीची गरज असते तेव्हा बजाज आलियान्झ एक खास फायदा देते हे तुमच्या लक्षात येईल. आमच्या ग्राहकांसाठी त्याचा अर्थ वेगवान आणि कार्यक्षम क्लेम प्रोसेसिंग, क्लेमच्या दर्जाबाबत नियमित अपडेट्स आणि क्लेम मान्यताप्राप्त झाल्यावर निधी वेगाने वितरित करणे असा आहे. 

 • 24*7 कस्टमर सर्व्हिस

  उन्हाळा असो की पावसाळा, आम्ही तुमच्यासाठी 24*7 उपलब्ध आहोत. बजाज आलियान्झसोबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळणे सोपे आणि सरळ आहे.आमची प्रोफेशनल्सची टीम तुम्हाला रिपेअर बुकिंग मिळणे, डीलर सपोर्ट मिळणे आणि तुम्हाला आवश्यक असलेली एक्स्टेंडेड वॉरंटीशी संबंधित प्रत्येक मदत करेल. आमच्या कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसोबत बोलण्यासाठी लागणाऱ्या काही मिनिटांत तुम्हाला आश्वस्त वाटेल आणि लक्षात येईल की तुमचे उपकरण योग्य हातांत आहे. आमचे लाखो ग्राहक हे मान्य करतील. तुम्हाला फक्त आमच्या टोल फ्री नंबर 1800-209-1021 वर फोन करायचा आहे आणि आमच्या जागतिक दर्जाच्या सेवांचा अनुभव तुम्हाला मिळेल.

 • क्लेमच्या स्थितीत मोफत होम व्हिजिट

  तुमचे अप्लायन्स पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हालाही तुम्हाला मदत करायची आहे. आमचे एक्सपर्ट्स क्लेम फाइल केल्यावर तुमच्या घरी येतात तेव्हा बजाज आलियान्झमध्ये कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. तुम्ही क्लेम दाखल केल्यावर अवघ्या काही तासांत आम्ही तुमच्या घरी येऊ. कारण, समस्या सोडवण्यासाठी वेळेत शोधणे हे पहिले पाऊल आहे. आम्ही समस्या पाहू, तुम्हाला सर्वोत्तम कृतीचा सल्ला देऊ आणि व्यावसायिक आणि पारदर्शक पद्धतीने दुरूस्तीसाठी मदत करू.  

 • इन्व्हॉइस रकमेइतकेच कव्हरेज

  चांगले बार्गेन मिळणे कायमच समाधान देते. तुम्ही उत्तम दर्जाच्या उत्पादनावर थोडे जास्त पैसे खर्च करायला तयार असता कारण टिकाऊपणा आणि सेवेच्या संदर्भात तुम्हाला पैशांचे जास्त चांगले मूल्य देण्याची हमी मिळते. बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटीसह तुम्हाला इन्व्हॉइस रकमेइतके कव्हरेज मिळते. त्यामुळे तुम्हाला खात्री पटते की तुम्ही नुकतेच खरेदी केलेले अप्लायन्स तुम्हाला दीर्घकाळ सेवा देऊ शकेल. तुम्हाला हे मॅन्युअल नीट वाचायचे आहे कारण मग तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करू शकाल. नादुरूस्ती आणि तांत्रिक समस्यांसाठी ऑनलाइन बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स तुम्हाला कव्हर करेल. हे सर्व काही क्लिक्सवर शक्य आहे

तुमचा क्लेम रजिस्टर करा

एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स अंतर्गत क्लेम फिल करणे सोपे आणि सोयीचे आहे.. तुम्हाला आमच्या 24*7 टोल-फ्री नंबर 1800-209-1021 वर कॉल करायचा आहे 1800-209-1021. पर्यायी स्वरूपात, तुम्ही कोणत्याही वेळी आम्हाला ew.cda@bajajallianz.co.in येथे इ-मेल पाठवून क्लेम रजिस्टर करू शकता ew.cda@bajajallianz.co.in किंवा ऑनलाइन नोंदणी करणे येथे क्लिक करा .


तुमची क्लेम स्थिती जाणून घेण्यासाठी  येथे क्लिक करा.

 

बजाज आलियान्झकडून विविध प्रकारच्या सेवा दिल्या जातात ज्यात दुरूस्ती आणि बदलणे यांचा समावेश आहे. क्लेम असल्यास आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी मोफत भेट देतात आणि तुमच्या उत्पादनाची तपासणी करतात.आम्ही ऑथोराइज्ड सर्व्हिस सेंटरमध्ये जेन्युइन पार्टसह त्याची दुरूस्ती करण्याचीही सोय करतो. तुमचे उत्पादन दुरूस्त होऊ शकत नसेल तर ते मोफत बदलून दिले जाते.

 

आणखी काय तर तुमचे इलेक्ट्रिक उपकरण चालू करणे हे आता पूर्णपणे कॅशलेस आहे. बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स आता भारतभरातील 400 पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. तुम्ही कुठेही राहत असलात तरी प्रोफेशनल सर्व्हिस एका फोनवर उपलब्ध आहे बजाज आलियान्झसोबत ऑनलाइन एक्स्टेंडेड वॉरंटी- अभूतपूर्व मूल्य उत्तम किमतीत.

काही शंका आहे? या काही उत्तरांचा फायदा होऊ शकेल

एक्स्टेंडेड वॉरंटी कोणाला घेता येईल?

एक्स्टेंडेड वॉरंटी उत्पादनाची रचना विविध इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल उपकरणे, स्वयंपाकघरातील उपकरणे, फर्निचर आणि जोडण्यास पोर्टेबल उपकरणे जसे कॅमेरा, लॅपटॉप, मोबाइल इत्यादींच्या अशा मालकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली गेली आहे ज्यांना मॅन्युफॅक्चरर्स वॉरंटी पीरियड संपल्यावर उत्पादनातील दोषामुळे झालेले नुकसान किंवा नादुरूस्ती भरून काढण्यासाठी इन्श्युरन्स संरक्षण घेण्याची इच्छा आहे. आपल्या ग्राहकांना एक्स्टेंडेड वॉरंटी देऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांनाही ते खरेदी करता येईल.

तुम्ही एक्स्टेंडेड वॉरंटी कधी घेऊ शकाल?

तुम्ही ही पॉलिसी एकतर वस्तूच्या खरेदीच्या तारखेलाच किंवा वस्तूवरील उत्पादकाची वॉरंटी संपण्यापूर्वी कधीही घेऊ शकाल.

तुम्हाला वस्तूची खरेदी केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांनी परंतु मॅन्युफॅक्चरर्स वॉरंटी संपण्यापूर्वी हे कव्हर खरेदी करायचे असल्यास प्रीमियमवरील भार खालीलप्रमाणे असेल 

वस्तू खरेदीच्या तारखेनंतर इन्श्युरन्स कव्हर खरेदी करण्यात झालेला विलंब

वर लोड होत आहे

प्रीमियम

6 महिन्यांपेक्षा कमी 0%

0%

6 महिने ते 1 वर्ष 4%

4%

1 वर्षापेक्षा अधिक आणि उत्पादकाच्या वॉरंटीपेक्षा कमी

5%

बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी कशासाठी?

बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी तुम्हाला तुमच्या विमाप्राप्त मालमत्तेशी संबंधित अनपेक्षित दुरूस्तीकामासाठी आर्थिक कव्हर देऊन मनःशांती देते. बजाज आलियान्झकडून एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्सचा विचार करण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेतः:

✓ भाग आणि कामगारांवर सर्वांगीण कव्हरेज

✓ विम्याच्या रकमेच्या सापेक्ष ईडब्ल्यू कालावधीत अमर्याद दुरूस्ती

✓ विनाअडथळा कॅशलेस सुविधा

✓ दर्जेदार दुरूस्तीची हमी

✓ जेन्युइन स्पेअर पार्ट्स

✓ विविध ब्रँड्ससाठी कव्हरेज

✓ मोठ्या उपकरणांसाठी डोअर-स्टेप सेवा

✓ राष्ट्रीय स्तरावर सेवा नेटवर्क

मोठे अपवाद काय आहेत?

काही मोठे अपवाद खालीलप्रमाणे आहेतः:

✓ कोणत्याही बाह्य कारणामुळे शारीरिक/पाणी/आग किंवा कोणतेही नुकसान

✓ विमा असलेल्या वस्तूचा व्यावसायिक/ भाडेतत्वावर /नफा निर्मितीसाठी वापर

✓ अतिवापरः अतिभार, ताण, शॉर्ट सर्किट, ओव्हर रनिंग, घर्षण, अनियमित विद्युत/ वायू/ पाणीपुरवठा इत्यादी.

✓ कारागिरी किंवा साहित्यात दोष किंवा नादुरूस्तीचा समावेश नसलेले सर्व्हिस कॉल्स

✓ ग्राहकोपयोगी (उदा. फिल्टर्स, बल्ब, पट्टे, बॅटरी, टोनर, सॉफ्टवेअर इत्यादी

✓ गंजणे, वाकणे, खरवडणे इत्यादी.

✓ अनधिकृत दुरूस्ती आणि बदल

✓ उत्पादक वॉरंटीअंतर्गत कव्हर करण्यात न आलेले दोष किंवा नादुरूस्ती

✓ गॅरंटी आणि/वॉरंटीअंतर्गत विमा काढलेल्या वस्तूचा मालक जबाबदार आहे असे नुकसान किंवा नादुरूस्ती.

अपवादांच्या तपशीलवार यादीसाठी कृपया पॉलिसी दस्तऐवज / प्रॉस्पेक्टस वाचा.

तुमच्या मालमत्तेसाठी प्रीमियमचा अंदाज कसा मिळवायचा?

तुमच्या मालमत्तेसाठी देय प्रीमियमचा अंदाज मिळवण्यासाठी तुम्हाला बजाज आलियान्झच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.. तुम्ही दिलेल्या माहितीवर आधारित राहून तुम्हाला देय असलेल्या प्रीमियमच्या रकमेची माहिती मिळेल.

सम इन्शुअर्ड म्हणजे काय?

विविध मालमत्तांसाठी विम्याची रक्कम ही त्यांच्या मूळ खरेदी किमतीच्या समान असेल.

काय कव्हर होते?

पॉलिसी कालावधीत उत्पादनातील दोष आणि/ किंवा प्राधिकृत वर्कशॉपमधील सर्व्हिस कर्मचाऱ्याकडून खराब कारागिरी केल्यामुळे तुमच्या विमा उतरवलेल्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास दुरूस्ती किंवा बदलीचा खर्च कव्हर करतो. ब्रेकडाऊन म्हणजे तुमच्या वस्तूचे मेकॅनिकल आणि/ किंवा इलेक्ट्रिकल नुकसान जेणेकरून ती तिच्या अपेक्षित पद्धतीने काम करणार नाही.

या उत्पादनाची निवड करताना तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची गरज पडेल

तुम्ही एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स खरेदी करता तेव्हा तुम्हाला उत्पादन/ विक्री इनव्हॉइसची गरज भासेल. 

क्लेम प्रोसेस कशी असेल?

एक्स्टेंडेड वॉरंटी क्लेम्सबाबत कोणत्याही सहकार्यासाठी कृपया येथे फोन करा- 1800-209-1021 किंवा आम्हाला येथे इमेल पाठवा- <a href="mailto:ew.cda@bajajallianz.co.in">ew.cda@bajajallianz.co.in</a>

तुमचा क्लेम ऑनलाइन नोंदवण्यासाठी किंवा तुमच्या क्लेमची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही खालील लिंकचा वापरही करू शकताः:

क्लेम नोंदवण्यासाठी येथे क्लिक करा

क्लेमची स्थिती तपासण्यासाठी येथे क्लिक करा

 

उत्तम! तुम्ही कोणकोणत्या गोष्टी कव्हर करता?

 • समावेश

 • अपवाद

उत्पादनाच्या दोषांबाबत सर्वांगीण कव्हरेज

तुम्ही तुमचे उपकरण घरी आणल्यापासून 3 वर्षांपर्यंत उत्पादनाच्या दोषांबाबत सर्वांगीण कव्हरेज

अधिक जाणून घ्या

तुम्ही तुमचे उपकरण घरी आणल्यापासून 3 वर्षांपर्यंत उत्पादनाच्या दोषांबाबत सर्वांगीण कव्हरेज

एकाच ब्रँडमचे गुणवत्ता ॲक्सेसरीज वापरणे आणि अनुकूल असलेल्या इलेक्ट्रिकल आऊटलेट्स आणि फिटिंग्सचा वापर करणे यासारख्या नॉन नेगोशिएबल विशिष्ट गोष्टी असतात; तथापि, पुन्हा अनपेक्षित दुर्घटनांमुळे तुमच्या डिव्हाईस कामगिरीवर परिणाम होऊ शकतो आणि आम्ही त्यावर कव्हर देतो.  

जेन्युइन स्पेअर पार्ट आणि क्वालिटी सर्व्हिसिंग

आमचे देशभरात पसरलेले व्यापक नेटवर्क ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) नियमावलींची पूर्तता करते

अधिक जाणून घ्या

जेन्युइन स्पेअर पार्ट आणि क्वालिटी सर्व्हिसिंग

जेव्हा वास्तविक, उच्च गुणवत्ता असलेले रिप्लेसमेंट पार्ट्स वापरण्याची वेळ येते तेव्हा देशभरातील आमचे व्यापक सर्व्हिस नेटवर्क भारतीय मानक ब्युरो (BIS) नियमांचे पालन करते.

अनपेक्षित साहित्यासंबंधी किंवा वाईट कारागिरीशी संबंधित दोष आढळल्यास आम्ही पॉलिसीच्या अटींमध्ये तुमचे उपकरण विनामूल्य बदलून देतो.

अत्यंत वाजवी दरात व्यापक कव्हरेज

तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांची तुम्ही खर्चाची तुलना कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ऑनलाइन बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी ही संपूर्ण विजेती आहे

अधिक जाणून घ्या

अत्यंत वाजवी दरात व्यापक कव्हरेज

तुम्हाला मिळणाऱ्या फायद्यांची तुम्ही खर्चाची तुलना कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ऑनलाइन बजाज आलियान्झ एक्स्टेंडेड वॉरंटी ही संपूर्ण विजेती आहे.

उत्पादक किंवा डीलर्सनी प्रदान केलेल्या अॅन्युअल मेन्टेनन्स काँट्रॅक्टच्या तुलनेत आम्ही तुमच्या उपकरणांना अत्यंत कमी किमतीत खूप जास्त व्यापक कव्हरेज देतो. 

खरेदीची लवचिकता

खरेदीच्या वेळी एक्स्टेंडेड वॉरंटी घेतलली नाही का? अजूनही उशीर झालेला नाही. आम्ही बिलाच्या तारखेपासून 180 दिवसांत तुम्हाला कव्हर खरेदी करण्याची लवचिकता देतो. 

1 चे 1

अनावश्यक वापर

एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स कव्हर लागू होण्यासाठी तुम्हाला वापरकर्ता माहितीपत्रकावरील सूचनांचे पालन करावे लागेल. मान्यताप्राप्त अॅक्सेसरीज 

अधिक जाणून घ्या

अनावश्यक वापर

एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स कव्हर लागू होण्यासाठी तुम्हाला वापरकर्ता माहितीपत्रकावरील सूचनांचे पालन करावे लागेल. मान्यताप्राप्त अॅक्सेसरीज, सुयोग्य इलेक्ट्रिकल फिटिंग्स, पुरेसे वायुविजन आणि सहाय्यक स्टँडचा वापर उपकरणाच्या सुरक्षित आणि विश्वासू कार्यान्वयनासाठी केला गेला पाहिजे.

पुरेशी सावधगिरी घेतली न गेल्यास आम्ही तुमचा क्लेम स्वीकारू शकणार नाही. 

ओव्हरलॅपिंग कव्हरेज

तुमच्या उपकरणाच्या काही विशिष्ट घटकांना इतरांच्या तुलनेत वाढीव उत्पादक वॉरंटी असू शकते. उदाहरणार्थ, कॉम्प्रेसर 

अधिक जाणून घ्या

ओव्हरलॅपिंग कव्हरेज

तुमच्या उपकरणाच्या काही विशिष्ट घटकांना इतरांच्या तुलनेत वाढीव उत्पादक वॉरंटी असू शकते. उदाहरणार्थ, तुमच्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा वॉरंटी कालावधी सामान्यतः जास्त असतो.वाढीव उत्पादक वॉरंटीअंतर्गत असलेले भाग आम्ही कव्हर करत नाही.

बाह्य घटना

आम्ही फक्त तांत्रिक दोष कव्हर करतो. चोरी, स्फोट, आग, पाणी शिरणे, ईश्वरी कृत्य इत्यादी गोष्टींमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील उपकरणांचे किंवा ग्राहकोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्यास आम्ही तुम्हाला फक्त शुभेच्छा देऊ शकतो.

अतिवापर

वस्तूंच्या अतिवापरामुळे त्यांत बिघाड झाल्यास एक्स्टेंडेड वॉरंटी लागू होत नाही. विद्युत शॉर्ट सर्किट, ओव्हरलोड इत्यादींसारख्या उदाहरणांमुळे जिथे वाढीव घर्षण होते.

मालकीमध्ये बदल

विम्याचे उत्पादन दुसऱ्या पक्षाला विकले गेल्यास किंवाfor व्यावसायिक कार्यांसाठी वापरण्यात आल्यास एक्स्टेंडेड वॉरंटीच्या अटींतर्गत कव्हरेज लागू होणार नाही.

1 चे 1

एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16 मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा