Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

मरीन इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते

Marine insurance in india

मरीन इन्श्युरन्स

तुमच्या आवडत्या फुटबॉल क्लबच्या मर्चंडाइजची ऑर्डर दिल्यामुळे तुमच्यातल्या चाहत्याला उत्सव साजरा करावासा वाटत असेल. त्यामुळे उत्पादक, लॉजिस्टिक कंपन्या आणि अर्थातच इन्श्युरन्स कंपन्यांच्या व्यापक नेटवर्कमध्ये चालणाऱ्या गुंतागुंतीच्या साखळ्याही कार्यरत होतात. मग साहजिकच तुम्ही विचाराल की इ-कॉमर्सशी इन्श्युरन्सचा काय संबंध? अब्जावधी डॉलर्सच्या किमतीच्या मालाचे संरक्षण मरीन इन्श्युरन्समुळे होते .अगदी त्यांचे उत्पादन झालेल्या कारखान्यातून ते बाहेर पडल्यापासून ते खरेदीदाराच्या गोदामात येईपर्यंत.

आंतरराष्ट्रीय पायरसी, रस्ते अपघात, मानवी चुकीमुळे व्यापारी टँकरमध्ये होणारी टक्कर आणि कार्गो लोड करताना किंवा अनलोड करताना स्टॉकचे नुकसान हे सर्व सामान्य होत आहे.

मरीन इन्श्युरन्समुळे माल तुमचा कारखाना किंवा गोदामातून निघून अंतिमतः समुद्र, जमिनीवरील प्रवास किंवा हवाईमार्गाने त्याच्या अंतिम स्थानी पोहोचेपर्यंत तुमच्या मालाला पूर्ण संरक्षण मिळते.

वाढत्या जागतिक व्यापारामुळे धोके कमी करून आपल्या वितरण नेटवर्कमध्ये एक सातत्यपूर्णता आणण्यासाठी बिझनेस आणि कॉर्पोरेशन्सना मरीन इन्श्युरन्स वापरणे गरजेचे ठरते.

भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थांसाठी क्रूड तेले आणि उच्च दर्जाची आयात या गोष्टी समुद्राचे भलेमोठे पट्टे पार करून शिपिंग मार्गाने कोणत्याही अडथळ्याविना प्रवाहावर अवलंबून असते. सरकारच्या उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नांवर भर दिला जात असल्यामुळे जास्त महसूल निर्मितीसाठी बाजारातील पोहोच आणि व्याप्ती यांच्याबाबत वैविध्यपूर्णता आणणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

विविध क्षेत्रांमध्ये अनेक भारतीय कंपन्यांसाठी बजाज आलियान्झ ही प्राधान्याची मरीन इन्श्युरन्स पुरवठादार कंपनी आहे. उद्योगाला समुद्रातील विविध धोक्यांपासून संरक्षण देऊन आम्ही कंपन्या तसेच गुंतवणूकदारांना वाढीची नवीन उद्दिष्टे समोर ठेवून ती साध्य करण्यासाठी जास्त आत्मविश्वास देतो.

Scroll

मरीन इन्श्युरन्स महत्त्वाचा का आहे?

मरीन इन्श्युरन्स पॉलिसीमुळे प्रवासात असताना तुमच्या मालाचे किंवा मालमत्तेचे नुकसान किंवा खराबी झाल्यास त्याचा धोका कमी करण्यास मदत होते.

एक ताफ्याचे मालक म्हणून तुमच्या वाहनांना ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (एआयए) ट्रान्सपॉंडर्स, जीपीएस नेव्हिगेशन रिसिव्हर्स, इको साऊंडर्स आणि वेदर रडार्स लावलेले असतीलच. तथापि, व्यापाराचे आकारमान वाढत असल्यामुळे शिपिंगच्या मार्गिका व्यग्र होतील तसे अलीकडील काळात अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे, असा अंदाज उद्योगाकडून लावला जातो.

तेल सांडण्यासारख्या सागरी दुर्घटनांप्रकरणी तुमच्यावर खटला आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि त्याचा खर्च प्रचंड मोठा असू शकतो. व्यवसायादरम्यान कायदेशीर खर्च हे खर्चाचा भाग मानले जात असले तरी तुमच्या कंपनीच्या आर्थिक रचनेवर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो. मरीन इन्श्युरन्समुळे तुम्हाला धोक्यांचे व्यवस्थापन करून तुमच्या बिझनेसची टिकून राहण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

एका सर्वसमावेशक मरीन इन्श्युरन्स प्लॅनसोबत तुमचा व्यावसायिक वाहनांचा ताफा कोणत्याही धोक्याविना प्रवास करू शकतो. तुमच्या कोट्यवधी रूपये किमतीच्या कार्गोचे झालेले नुकसान किंवा हरवण्यामुळे निर्माण होणारे धोके नियंत्रित करायला तुम्हाला मदत होते. उदाहरणार्थ, तुमचे वाहन रस्त्यावरून कोसळल्यास किंवा त्याची टक्कर झाल्यास टोइंग, दुरूस्ती आणि ओव्हरहॉलचा खर्च खूप जास्त असू शकतो. मरीन इन्श्युरन्स पॉलिसीमुळे तुम्हाला अशा धोक्यांचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

तसेच, मर्चंट वाहनांची मोठ्या प्रमाणावर देखभाल करावी लागत असल्यामुळे स्पेअर्सची किंवा त्यातील अत्यावश्यक घटकांची कमतरता निर्माण झाल्यास तुमचे वाहन दीर्घकाळ अनुपलब्ध राहू शकते. त्यामुळे त्याच्या वापरावर आणि नफ्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

चाच्यांकडून समुद्रात तुमचे जहाज हायजॅक होण्याची एक आपत्कालीन स्थितीही तुम्हाला विचारात घ्यावी लागते. हायजॅक केलेल्या मर्चंट जहाजाला सोडवून घेण्यासाठी अनेक महिने लागू शकतात आणि काही घातपात झाल्यास नुकसान आणि नादुरूस्ती होऊ शकते. मरीन इन्श्युरन्सच्या मदतीने तुम्ही अशा आपत्कालीन स्थितींचा सामना करण्यासाठी तग धकू शकता.

 मरीन इन्श्युरन्समधील गुंतवणूक संभाव्य धोके कमी करण्यासाठी आणि कंपनीची मूल्यसाखळी कायम राहील याची काळजी घेण्यासाठी अत्यावश्यक मानली जाते.

मरीन इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक केल्यामुळे तुमचा बिझनेस सातत्यपूर्ण पद्धतीने का चालू शकतो याची कारणे खालील प्रमाणेः:               

इंजिनीअरिंग प्रोजेक्ट कार्गो

  महागडे, प्रकल्पासाठी अत्यंत महत्त्वाचे उपकरण शिपिंग करणे अत्यंत धोक्याचे आहे कारण अशा प्रकारच्या शिपमेंट या अनेक प्रकारच्या धोक्यांना बळी पडू शकतात. बजाज आलियान्झमध्ये आमच्याकडे जगभरात प्रोजेक्ट कार्गो अंडररायटर्सची अत्यंत कौशल्यपूर्ण टीम तसेच मरीन रिस्क सल्लागारांची टीम आहे आणि आम्ही सर्वांत मोठे धोके हाताळू शकतो.

  आमच्या इंजिनीअरिंग प्रोजेक्ट कार्गो इन्श्युरन्सची रचना तुमच्या व्यवसायाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या धोक्यांचे कलात्मकतेने व्यवस्थापन करण्यासाठी केली गेली आहे.

  आम्ही मोठ्या सिव्हिल, प्रॉडक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट्सच्या घटकांच्या वाहतुकीदरम्यान नुकसान आणि नादुरूस्ती कव्हर करू आणि महत्त्वाचे घटक उशिरा आल्यास किंवा न आल्यास उत्पन्नाचे तसेच नफ्याच्या होणाऱ्या नुकसानासाठी अॅडव्हान्स्ड लॉस ऑफ प्रॉफिट (एएलओपी) देऊ.

मरीन इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

समुद्रात झालेल्या नुकसानामुळे कमर्शियल कार्गो आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचत नाहीत तेव्हा व्यवसाय करण्याचे धोके मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. तुमच्या मरीन इन्श्युरन्सचा तुम्हाला पूर्ण फायदा हवा असेल तर बजाज आलियान्झ त्यासाठी सर्वोत्तम आहे.

खालील सोप्या पद्धतींद्वारे तुम्ही मरीन इन्श्युरन्स क्लेम दाखल करू शकता

स्टेप 1

आमच्या मरीन इन्श्युरन्स पेजला भेट द्या आणि ‘रजिस्टर ए क्लेम’वर क्लिक करा.

स्टेप 2

नवीन उघडलेल्या पेजवर ‘क्लेम रजिस्ट्रेशन’ निवडा. पॉलिसी नंबर, इमेल, नोंदणीकृत मोबाइल नंबर असे इतर तपशील भरा आणि प्रोसीडवर क्लिक करा.

स्टेप 3

पुढील पेजवर इतर संबंधित तपशील भरा आणि क्लेम बटणवर क्लिक करा. तुम्हाला काही विशिष्ट कागदपत्रे अपलोड करावी लागू शकतात जसे ओरिजिनल इनव्हॉइस. ती क्लेमची पडताळणी करण्यासाठी आवश्यक असतात.

अभिनंदन! तुम्ही तुमचा क्लेम यशस्वीरित्या फाइल केला आहे!

 

कमर्शियल इन्श्युरन्स रजिस्टर क्लेम

आता तुम्ही ऑनलाइन क्लेम रजिस्टर करू शकता, क्लेमची स्थिती तपासू शकता आणि कागदपत्रे अपलोड करू शकता येथे क्लिक करा.

कमर्शियल इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा