1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

इंजिनीअरिंग इन्श्युरन्स आणि मशीनरी ब्रेकडाऊन इन्श्युरन्स

Engineering insurance & machinery breakdown insurance by Bajaj Allianz

इंजिनीअरिंग इन्श्युरन्स

इंजिनीअरिंग आणि बांधकाम उद्योग हे पूर्णपणे वेगळे उद्योग आहेत आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या आहेत. बजाज अलियांझमध्ये आम्ही हे समजून घेतो आणि तुमच्या सर्व इंजिनीअरिंग आणि बांधकाम इन्श्युरन्सच्या गरजांसाठी विशेष कव्हर देतो.

इंजिनीअरिंग इन्श्युरन्स कव्हर म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. इंजिनीअरिंग इन्श्युरन्स पॉलिसी या अशा पॉलिसी असतात ज्या तुमच्या उद्योगातील धोक्यांपासून तुमचे संरक्षण करतात. इंजिनीअरिंग इन्श्युरन्समध्ये मशीनरी स्थापित करत असताना ते काम सुरू असताना आणि थंडावलेल्या असताना तुमच्या व्यवसायाला असलेल्या धोक्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट समाविष्ट आहे.

बजाज अलियांझमध्ये आमचे धोका समुपदेशन, क्लेम आणि अंडररायटिंग त्यांच्यासोबत फक्त सर्वांत मोठ्या इंजिनीअरिंग धोक्यांचे ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवच आणत नाही तर तुमचा व्यवसाय तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे समजून घेऊन त्याची काळजीही घेतली जाते. 

आम्ही आमच्या इंजिनीअरिंग इन्श्युरन्स सर्व्हिसेस सर्व पक्षांसोबत संवाद ठेवून काम करतो. ते फक्त आमच्या क्लेम्स, धोका समुपदेशन आणि अंडररायटिंग टीम्ससोबतच नाही तर आमच्या मुख्य अकाऊंट मॅनेजमेंट तत्वज्ञानाद्वारे ग्राहक आणि त्यांच्या प्रोफेशनल टीमसोबतही असते.

हे तत्वज्ञान आमच्या तज्ञ टीम्सच्या ज्ञानावर आधारित राहून स्थापित केलेली आहे. त्यात विशिष्ट अभियांत्रिकी धोके कव्हर केलेले आहेत. जसे, वीज आणि कंपन्या, तेल आणि वायू, बांधकाम, जड उद्योग, मोठे जड सिव्हिल इंजिनीअरिंग प्रकल्प आणि वाहतूक यंत्रणा. 

आम्ही आमचे ग्राहक आणि त्यांचे सल्लागार यांच्यासोबत खुल्या पद्धतीने संवाद साधतो आणि त्याद्वारे सर्व पक्षांमध्ये लवचिक दृष्टीकोन आणि आपसातील सामंजस्य यांचा अंगीकार करतो. आम्ही देत असलेल्या सर्व प्रकारच्या इंजिनीअरिंग इन्श्युरन्स पॉलिसींची रचना तुमच्या व्यवसायाच्या स्वरूपाला योग्य ठरेल अशा प्रकारे कस्टमाइज केलेली आहे.

इरेक्शन ऑल रिस्क्स (ईअर) इन्श्युरन्स

  कारखाना आणि मशिनरी हे तुमच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी असतील तर ते स्थापित करताना किंवा उभे करताना येणारे धोके तुम्हाला माहीत आहेत. त्याचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात.

  आमची इरेक्शन ऑल रिस्क्स (ईएआर) इन्श्युरन्स पॉलिसी मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल कारखान्यांचे बांधकाम आणि/स्थापना यांदरम्यान तुम्हाला होणाऱ्या नुकसानापासून कव्हर करण्यासाठी तयार केलेल्या इंजिनीअरिंग इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रकार आहे.

  इरेक्शन ऑल रिस्क्स पॉलिसी तुमची कंपनी नवीन प्रकल्प स्थापित करत असताना किंवा विद्यमान प्रकल्पाचा विस्तार किंवा विद्यमान प्रकल्प मोडीत काढून पुन्हा उभारत असताना सर्वांगीण कव्हरेज देते. पहिल्या कन्साइनमेंटला उतरवण्यापासून ते त्याच्या तपासणीपर्यंत तुम्हाला कव्हर दिले जाते.

काँट्रॅक्टर्स ऑल रिस्क्स इन्श्युरन्स

  बांधकाम साइट हे पत्त्याच्या घरांप्रमाणे असते- एक चुकीचे पाऊल आणि सर्व कोसळू शकते. अपघातांमुळे फक्त आर्थिक नुकसानच होत नाही तर इजाही होऊ शकते. अपघातामुळे साइटवरील आधीच्या कामाचे नुकसान होऊ शकते आणि वेळापत्रकानुसार काम करणे अशक्य होऊ शकते. 

  बांधकाम साइट्सना अशा प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो हे जाणून घेऊन फक्त तुमच्यासारखे शूर लोकच व्यवसायात उतरतात. परंतु तुम्हाला पुरेशा संरक्षणाची गरज असते आणि बजाज अलियांझमध्ये आम्ही तुमच्या बिझनेसचे रक्षण करण्यासाठी काँट्रॅक्टर्स ऑल रिस्क इन्श्युरन्स तुम्हाला देतो.

  काँट्रॅक्टर्स ऑल रिस्क्स (सीआएर) इन्श्युरन्स हा एक सर्वांगीण इन्श्युरन्स आहे जो मुख्यत्वे सर्व प्रकारच्या सिव्हिल बांधकाम प्रकल्पांना कव्हर करतो. (जसे, इमारती, कारखाने, रस्ते, पूल यांचे बांधकाम... इत्यादी.) तो तुम्हाला विशिष्टपणे वगळलेल्या कोणत्याही कारणाशिवाय इतर कारणामुळे नुकसान झालेल्या किंवा नष्ट झालेल्या मालमत्तेसाठी कव्हर देतो.

कंत्राटदाराचा कारखाना आणि उपकरणे

  बांधकाम साइटवर करण्यात येणाऱ्या कोणत्याही कामाचे सुविधाकारक हे कारखाना आणि उपकरणे असतात. ते अक्षरशः सर्व अवजड वस्तू उचलतात.तुमचा कारखाना आणि उपकरणांचे काहीही नुकसान झाल्यास बांधकाम साइटवर तुमचे काम थांबवू शकते. आम्हाला कल्पना आहे की तुम्हाला हे नको असते.

  अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा कारखाना आणि उपकरण तात्काळ दुरूस्त करून हवे असते, परंतु त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असल्याने ते नेहमीच शक्य नसते.

  बजाज अलियांझ काँट्रॅक्टर्स प्लान्ट अँड इक्विपमेंट इन्श्युरन्स तुमच्यासाठी दुरूस्ती आणि/ किंवा बदलीचा खर्च उचलेल जेणेकरून बांधकाम साइटवरील काम लगेचच सुरू होईल आणि वेगाने चालू राहील.

इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्स

  संगणकासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कंपन्यांना आपले रोजचे काम सहजपणे आणि परिणामकारकतेने चालू करणे शक्य होते. तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे कोणतेही नुकसान तुमच्या व्यवसायाच्या कार्यात अडथळा आणते आणि त्यामुळे अत्यंत नकोसे परिणाम होऊ शकतात.

  बजाज अलियांझ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पॉलिसी तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे रक्षण प्रत्यक्ष ते माहितीच्या नुकसानापर्यंत सर्व प्रकारच्या धोक्यांपासून करते.

  इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन्श्युरन्समधून अपघाती, अनपेक्षित, अचानक झालेले प्रत्यक्ष नुकसान किंवा पॉलिसीमध्ये वगळण्यात न आलेल्या कोणत्याही कारणामुळे किंवा घटनेमुळे अचानक किंवा अनपेक्षित प्रत्यक्ष नुकसानापासून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे रक्षण केले जाते.

  संगणक, प्रिंटर्स, स्कॅनर्स, सर्व्हर्स आणि डेटा स्टोअरेज उपकरणे यांच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाऊ शकते.

मशीनरी ब्रेकडाऊन इन्श्युरन्स

  व्यवसायात मशीनरी बंद पडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट असते कारण मशीनरी आणि उपकरणांशिवाय उत्पादन अशक्य असते आणि माल पाठवण्याचे वेळापत्रक सामान्यतः घाईचे असते. वेळापत्रकानुसार काम न केल्यास दंड होऊ शकतो आणि व्यावसायिक संबंध तणावपूर्ण होऊ शकतात.

  अनपेक्षित वेळी मशीनरी दुरूस्त करण्यासाठी  किंवा बदलण्यासाठी लागणारा मोठा पैसा प्रत्येक वेळी असेलच असे नाही. अशा परिस्थितीत बॅक अप प्लॅन असणे अत्यावश्यक असते आणि आमची मशीनरी ब्रेकडाऊन इन्श्युरन्स पॉलिसी हेच उद्दिष्ट साध्य करते.

  ही मशीनरी ब्रेकडाऊन पॉलिसी अनपेक्षित आणि अचानक झालेल्या ब्रेकडाऊनपासून तुमच्या मशीनरीचे रक्षण करते.

धोका व्यवस्थापन सेवा

  काही तज्ञांच्या मते व्यवसाय आणि धोके या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वतःचा बिझनेस चालवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक असते.'न करण्यापेक्षा विलंब बरा' या तत्वज्ञानानुसार धोके टाळण्यासाठी आणि त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी धोरणात्मक कृती करणे महत्त्वाचे ठरते.

  बजाज अलियांझ रिस्क मॅनेजमेंट सर्व्हिसेसमुळे तुम्हाला संभाव्य धोक्यांचा अंदाज लावणे आणि ते टाळणेच शक्य होत नाही तर प्राधान्यपूर्वक निर्णय घेणेही शक्य होते. यामुळे आर्थिक धक्का कमी होणे शक्य होते आणि तुमची कंपनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकते.

  आमच्या इंजिनीअरिंग इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट आणि वगळलेल्या गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आमची इंजिनीअरिंग इन्श्युरन्स पीडीएफ वाचू शकता.

बॉयलर प्रेशर प्लांट (बीपीपी)

  बॉयलर इन्श्युरन्स तुम्हाला फक्त स्फोट किंवा कोसळल्यामुळे बॉयलर्स आणि किंवा प्रेशर प्लांट्सना होणाऱ्या नुकसानापासून (आगीखेरीज) तुम्हाला सुरक्षित करेल.

  या पॉलिसीअंतर्गत काही इतरही विस्तार अतिरिक्त प्रीमियम भरल्यास उपलब्ध आहेत, जसे ओनर्स सराऊंडिंग प्रॉपर्टी आणि थर्ड पार्टी लायबिलिटी.

  आम्ही या गोष्टीची शिफारस करू की तुम्ही पॉलिसीच्या अटींची पूर्तता करण्यासाठी तुमचे बॉयलर आणि प्रेशर प्लांट्स यांची तपासणी दरवर्षी सरकारने नेमलेल्या तपासणी अधिकाऱ्यांकडून किंवा इतर कोणत्याही स्वतंत्र सक्षम व्यक्तीकडून करून घ्यावी.

व्यावसायिक विमा दस्तऐवज डाउनलोड करा

Set Renewal Reminder

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select date

Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.

Thank You for Your Interest in Bajaj Allianz Insurance Policy, A Customer Support Executive will call you back shortly to assist you through the Process.

Request Call Back

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select valid option
Please select the checkbox

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go
Chat with Us