1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस पॉलिसी

कुटुंबासोबत प्रवासात सुट्टीचा आनंद घेताय? आम्ही तुम्हाला कव्हर देऊ
Buy Family Travel Insurance Policy Online in India

चला, सुरूवात करुया

Please enter name
/travel-insurance-online/buy-online.html कोट मिळवा
कोट शोधून काढा
Please enter valid quote reference ID
सबमिट

त्यात तुमच्यासाठी काय आहे?

आऊटलूक ट्रॅव्हलर कडून सर्वोत्तम ट्रॅव्हल इंश्युरंसचा पुरस्कार मिळाला

24/7 दिवस मिस्ड कॉलच्या सुविधेमार्फत जगभरांत सहाय्य उपलब्ध.

संपूर्ण कुटुंब ए्काच पॉलिसीमध्ये कवर होते.

स्वत:साठी, जोडीदारासाठी आणि मुलांसाठी संरक्षण

बजाज अलियांज ट्रॅव्हल इंश्युरंस का?

जेव्हा तुमच्या कुटुंबासाठी एखादी गोष्ट निवडायची असते, तेव्हा तुम्ही सर्वोत्तम  गोष्टीचीच निवड करता. फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस काही वेगळे नाही! अनेक वर्षांपासून, आम्ही ट्रॅव्हल इंश्युरंस बाबतच्या तुमच्या अत्यंत महत्वाच्या गरजा समजत आलेलो आहोत. आणि त्या गरजा लक्षांत ठेवून आम्ही ग्राहकांसाठी कस्टमाईज्ड फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन्स बनवलेे आहेत.

सीएनबीसीने इंश्युरंस कंपनी विभागातील, ट्रॅव्हल इंश्युरंस कंपनीचा सर्वोत्तम प्र्तिष्ठित पुरस्कार देऊन आमचा गौरव  केला आहे. आमच्या फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅनची काही खास वैशिष्ट्ये आणि तुम्हाला होणारे लाभ:

✓    ग्राहकांसाठी जगभरांत कुठेही 24X7 टोल फ्री सहाय्य सेवा.

✓     विम्याच्या क्लेमची सेटलमेंट सहज व जलद रितीने पूर्ण.

✓     ईमरजन्सी कॅश वैशिष्ट्यामुळे तुम्हाला जगभरांत कुठेही रोख रक्कम मिळू शकते. 

 ✓     प्रवासात जर तुमचे सामान हरवले,पासपोर्ट हरवला किंवा आकस्मिक इतर  खर्च झाले तर आम्ही तातडीने मदत करतो.

 ✓     तुम्हाला अथवा तुमच्या कुटुंबातील कोण्या व्यक्तीला शारिरीक इजा झाल्यास हॉस्पिटलचा खर्च 

 ✓     विमान उड्डाण रद्द होणे अथवा प्रवास अर्धवट सोडावा लागणे यापासून संरक्षण. 

 ✓    चोरीपासून संरक्षण. 

 ✓     क्लेमची प्रक्रिया करणाऱ्या भागीदारांचे अनेक देशांमधील आंतरराष्ट्रीय नेटवर्क. 

✓    कॅसलेस उपचाराची सोय. 

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस विकत घेणे हे त्यासाठी मोजलेल्या किंमतीएवढे योग्य़ ठरेल का? नक्कीच. याचा विचार करा: फक्त रु 1400 च्या प्रिमियम मध्ये  तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी 50,000 अमेरिकन डॉलरचे संरक्षण 15 दिवसांच्या इंग्लंडच्या प्रवासासाठी मिळते.

पारितोषिके व पुरस्कार

आम्हाला सीएनबीसी (CNBC)चा 2010, 2011 व 2014 सालचा बेस्ट ट्रॅव्हल इंश्युरंस कंपनी अवॉर्ड मिळाला. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्यामुळे आम्हाला तुमच्या अपेक्षांपेक्षाही अधिक चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळते!

ऑनलाईन ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन

विविध गोष्टीपासून असलेला आरोग्याला धोका जसे की अति प्रदूषण, भेसळयुक्त अन्नपदार्थ व अपघात, विशेष करून मुलांना प्रवासात किती उत्साह असतो हे लक्षात घेऊन फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस घेणे हे अत्यावश्यक झाले आहे. परदेशात वैद्यकीय उपचारांचा खर्चही कितीतरी अधिक पटीने जास्त असतो.

जगाच्या काही भागात रस्त्यांवरील अपघात व सामान चोरीला जाणे हे सुद्धा अगदी सर्वसामान्य आहे. आपण आपल्या सामानाची काळजी घेणे तर आवश्यक आहेच पण फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस तुम्हाला आणीबाणीच्या प्रसंगात कव्हर देतो.

तुम्ही जपानला जात असाल किंवा युरोपच्या रहस्यांचा शोध घेण्यास जात असाल, तुम्ही तयार असणे या गोष्टीनेच खूप फरक पडतो.

म्हणूनच, बजाज अलियांज फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंसच्या बऱ्याच योजनांचे पर्याय ऑनलाईन देते ज्यातून तुम्हाला तुमच्या पैशांची पुरेपूर किंमत मिळते व खूप व्यापक कव्हरेज मिळते. कुठची पॉलिसी घ्यावी हे तुम्ही जर ठरवू शकत नसाल किंवा एखाद्या पॉलिसीमध्ये कुठल्या गोष्टींचा कव्हर आहे याबद्दल विचार करत असाल तर तुम्हाला फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंससबंधीच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या वेबसाईटवर मिळतील. थोड्याच क्लिकमध्ये ब्राऊस करा, निवडा, पैसे भरा आणि हे सर्व तुमच्या सोयीनुसार!

 • त्वरीत व अचूक कोट

  फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस ऑनलाईन विकत घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला अगदी अचूक किंमत ताबडतोब मिळते. म्हणूनच, जेव्हा तुम्हाला फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस विकत घ्यायचा असेल, तुम्ही विविध पॉलिसींमध्ये असलेल्या कव्हर्स, अटी व शर्ती इत्यादींची सहजतेने तुलना करू शकता व या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकता.

 • पॉलिसीच्या संदर्भातील माहिती सहजतेने मिळते.

  ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन ऑनलाईन विकत घेण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला सर्व संबंधित माहिती सहजतेने मिळते. विविध पॉलिसींमध्ये कोणत्या गोष्टींपासून कव्हर आहे हे तुम्ही ताबडतोब तपासून पाहू शकता आणि त्यातील तुमच्यासाठी जी सर्वात योग्य आहे ती निवडू शकता. ही प्रक्रिया अजून सोपी करण्यासाठी, आमचा बोईंग (BOING) या चॅटबॉट मुळे पॉलिसी संदर्भातील कोणत्याही प्रश्नाचे चटकन उत्तर मिळवू शकता.

  आम्ही असे सांगितले का की आमची वेबसाईट आमच्या योजना व त्यांची वैशिष्ट्ये सोप्या व सहज रितीने रोचक रितीने सांगते आणि तुम्हाला अती प्रमाणात माहिती (information overload syndrome) देणे टाळते?

 • वेळ वाचतो

  परदेश प्रवासाचे नियोजन करता एवढ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते की तुम्हाला नेहमीच वेळ कमी पडतो. तुम्ही परदेशात एखाद्या विद्यापीठाच्या कुठल्याश्या अभ्यासक्रमाविषयी माहिती घेणारे विद्यार्थी असाल किंवा हवाईच्या समुद्रातील लाटांमध्ये आपले पाय ओले करुया अशी स्वप्न बघणारे ज्येष्ठ नागरिक असाल, तुम्हाला तुमच्यासाठी तयार केलेला ट्रॅव्हल इंश्युरंस अगदी हॅसल फ्री मिळू शकेल

  तुम्ही केवळ आमच्या शब्दावर विसंबून राहू नका! आमच्या वेबसाईटला भेट द्या व बघा की आमच्या ऑनलाईन ट्रॅव्हल इंश्युरंसच्या पर्यायांंमुळे तुमचे शोधाशोध करायचे किती तास वाचतात. तो वाचलेला वेळ त्याऐवजी तुमच्या येऊ घातलेल्या प्रवासाच्या नियोजनासाठी वापरा.

ट्रॅव्हल इंश्युरंस कशासाठी?

आम्ही नेहमी अशी आशा करतो की तुमचे प्रवास हे कुठल्याही अडचणींशिवाय पूर्ण होवोत. पण जर काही विपरीत घटना घडल्या व तुम्हाला दावा नोंदवावा लागला, तर आम्ही तुमच्यासाठी 24  तास उपलब्ध आहोत. तुम्हाला फक्त आमच्या ग्लोबल ट्रॅव्हल मदत क्रमांक +91 124 6174720 यावर एक मिस्ड कॉल द्यायचा आहे किंवा आम्हाला आमच्या टोल फ्री क्रमांक 1800 209 यावर फोन करा.  एकदा तुम्ही आमच्याशी संपर्क साधलात की आमचा प्रतिनिधी तुम्हाला सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करेल.

तुमचा क्लेम हा कॅशलेस पद्धतीने पूर्ण करायचा आहे की रिइंबर्समेंट पद्धतीने पूर्ण करायचा आहे यावर ट्रॅव्हल इंश्युरंसच्या क्लेमची प्रक्रिया अवलंबून राहील.

जर तुमचा कॅशलेस क्लेम असेल:

✓  तुम्ही फोन अथवा ई-मेल द्वारे संपर्क साधा.  पुढच्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्यास आमचा सल्लागार तुम्हाला मदत करेल 

✓  हॅसल फ्री क्लेम सेटलमेंट करण्यासाठी, जरूर असलेली कागदपत्रे तयार ठेवा

✓ एकदा तुम्ही कागदपत्रे सूपूर्द केलीत व आम्ही ती पडताळून पाहिली की आम्ही तुम्हाला त्याच्या स्वीकृतीचा निर्णय कळवू 

✓ आम्हाला अधिक माहितीची गरज असल्यास आम्ही त्याबाबत खुलासा मागणारे एक चौकशी पत्र तुम्हाला पाठवू 

✓ जर तुमचा क्लेम स्वीकारण्यात आला, तर खात्री बाळगा की आम्ही इतर सर्व गोष्टींची काळजी घेऊ.  आम्ही तुम्हाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीसोबत समन्वय साधून त्यांना एक भरपाईची हमी देणारे पत्र देऊ

✓ जर दुर्दैवाने तुमचा क्लेम फेटाळण्यात आला, तर तुम्हाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या बिलांचा भरणा करावा लागेल 

जर तुमचा क्लेम हा रिइंबर्समेंट प्रक्रियेचा असेल, तर पुढील पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील:

✓  तुम्हाला वैद्यकीय सेवा देणाऱ्या व्यक्तीकडून सर्व वैद्यकीय कागदपत्रे घेऊन ती क्लेम नोंदवताना आम्हाला सुपूर्द करा.  ही आमच्या स्वत:च्या कर्मचाऱ्यांची (इन-हाऊस) समर्पित अशी हेल्थ अ‍ॅडमिनीस्ट्रेशन टीम (एचएटी)ला देण्यात येतील व ते यावर त्वरित प्रक्रिया करतील 

✓ एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही दिलेल्या माहितीनुसार व तुम्ही निवडलेल्या लाभांनुसार तुमचा क्लेम पडताळून पहाण्यात येईल, कागदपत्रांची सत्यता व इतर माहिती पडताळण्यात येईल 

जर कागदपत्रे अपुरी वाटली:

तुमच्या केसप्रमाणे तुम्हाला अजून काही कागदपत्रे सुपूर्द करण्यास सांगण्यात येईल

✓  गरज असलेल्या कागदपत्रांचा तपशील तुम्हाला ई-मेल द्वारे कळवण्यात येईल 

✓   एकदा तुम्ही ही अधिकची कागदपत्रे दिलीत की तुमच्या क्लेमची प्रक्रिया पुढे चालू करण्यात येईल.  आम्हाला जर का ही कागदपत्रे मूळ पत्राच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत नाही मिळाली नाहीत, तर तुम्हाला एक स्मरणपत्र पाठवण्यात येईल.  आम्ही तुम्हाला 3 स्मरणपत्रे पाठ्वू, ज्यानंतरही जर आम्हाला कागदपत्रे मिळाली नाहीत, तर तुमचा क्लेम अपुऱ्या माहितीसाठी म्हणून फेटाळण्यात येईल. 

✓ तुम्हाला तुमच्या क्लेमच्या मंजूरीची / नाकारल्याची सविस्तर माहिती सुद्धा ई-मेल द्वारे देण्यात येईल 

जर तुमचा क्लेम फेटाळण्यात आला:

✓ तुमची क्लेमची याचिका व सुपूर्द केलेली कागदपत्रे पडताळून पाहिल्यावर, पॉलिसीमधील अटी व शर्तींनुसार, तुमचा क्लेम फेटाळलाही जाऊ शकतो 

✓  अश्या परिस्थितीमध्ये, आमची कारणे समजावून सांगणारे, क्लेम अस्वीकार केल्याचे पत्र तुम्हाला मिळेल 

जर तुमचा क्लेम स्वीकारण्यात आला:

✓  जर सर्व काही योग्य असेल, आणि तुमचा क्लेम हा पॉलिसीमध्ये दिलेल्या अटींनुसार असेल, तर आम्ही त्वरेने तुमच्या क्लेमची सेटलमेंट पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया करतो.  तुम्हाला क्लेमचे पैसे एनईएफटी (NEFT) द्वारे तुम्ही दिलेल्या माहितीनुसार थेट तुमच्या बॅंक खात्यात जमा होतील 

तुमचा क्लेम नोंदवण्यासाठी इथे क्लिक करा.

Read more Read less

आता ट्रॅव्हल इंश्युरंस सोपा करून बघूया का?

मी परदेशात प्रवास करत असताना मला जर तातडीने कॅशची गरज लागली तर?

परदेशात प्रवास करत असताना, बऱ्याचदा आणीबाणीची परिस्थिती उद्भवू शकते. तुम्हाला अपघात झाल्यास तातडीने वैद्यकीय मदत लागू शकते किंवा काही चोरी होऊ शकते इ.

अश्या सर्व प्रसंगी तुमचा फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन उपयोगी पडू शकतो. इमर्जन्सी कॅश अ‍ॅडव्हान्स फॅसिलिटीमुळे तुम्हाला पॉलिसीमधून तात्काळ कॅश मिळू शकते. रकमेवरील मर्यादा ही पॉलिसीच्या अटी व शर्तींमध्ये दिलेली असते.

जर कुटुंबातील एखादा 60 वर्षांवरील सदस्य आमच्यासोबत प्रवास करत असेल, तर त्या व्यक्तीचाही पॉलिसीमध्ये समावेश होतो का?

तुम्ही जर ट्रॅव्हल कंपॅनियन किंवा ट्रॅव्हल एलिट प्लॅन निवडला असेल, तर त्यामध्ये 18 वर्ष ते 60 वर्षांमधील व्यक्तींचा समावेश होतो.

म्हणून, जर 60 वर्षांवरील व्यक्ती तुमच्याबरोबर प्रवास करत असेल. तर फक्त त्या व्यक्तीसाठी ट्रॅव्हल प्राईम एज प्लॅन किंवा आमच्या कुठल्याही ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या प्लॅनची निवड करणे योग्य ठरेल.

या पॉलिसीमध्ये मला कॅशलेस सेवा मिळू शकेल का?

हो, आपण परदेशात असताना तुम्ही हॉस्पिटलमधे दाखल झाल्यास फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस पॉलिसी अंतर्गत तुम्ही या खर्चासाठी कॅशलेस व्यवहार करु शकता. अधिक सविस्तर माहितीसाठी, तुमच्या पॉलिसीच्या शर्ती व उप-मर्यादा तपासून पहा.

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅनची काही खास वैशिष्ट्ये आहेत का?

आमच्या आश्वासनाप्रमाणे, आम्हाला फक्त एक फोन करा आणि आम्ही तुमच्यासाठी हजर आहोत! तुमच्यावर काही आणीबाणीची परिस्थिती ओढवल्यास, तुम्ही +91-124-6174720 या क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्या आणि आम्ही प्राधान्य देऊन तुम्हाला परत फोन करू.

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस पॉलिसीमध्ये काही विशेष लाभ सुद्धा आहेत. तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फ्लोटर संरक्षण मिळते. यामुळे ही पॉलिसी हा तुमच्यासाठी एक परवडणारा पर्याय आहे.

याशिवाय, तुम्ही दूर, प्रवासात असताना तुमच्या घरी जर चोरी झाली तर त्यापासून कव्हर मिळते व तुमचा प्रवास रद्द करावा लागला किंवा तुम्हाला अर्धवट सोडून परतावे लागले तर त्याचा खर्चही तुम्हाला मिळतो.

कुठच्या परिस्थितीमध्ये मला ट्रॅव्हल इंश्युरंंस प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात येणार नाही?

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन हा तुमच्यासाठी एका छ्त्रासारखा आहे. तुम्ही परदेश प्रवास करत असताना विविध घटना घडू शकतात व हा प्लॅन तुम्हाला त्यापासून कव्हर देतो. पण, जेव्हा वादळ येते तेव्हा अतिशय मजबूत असे छत्र सुद्धा उलटे होऊ शकते.

पुढील काही परिस्थितींमध्ये फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंसचा क्लेम फेटाळला जाऊ शकतो.

●       तुमची पॉलिसी सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काही आजार असल्यास किंवा तुमचे काही वैद्यकीय उपचार सुरू असल्यास.

●       परदेशात असताना तुमच्या नित्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी

●        पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर होणारा वैद्यकीय खर्च

●        आत्महत्येचा प्रयत्न किंवा स्वतः करून घेतलेली इजा किंवा आजार.

●        गुप्तरोग किंवा दारूच्या आहारी जाणे किंवा अमली पदार्थांचे सेवन

●       धोकादायक अश्या कुठल्या शारिरीक कामाशी तुमचा संबंध असला तर

●        तुम्ही एखादी गरज नसलेली जोखीम उचलल्यास, अपवाद फक्त ही जोखीम एखाद्या सोबतीच्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी उचलली असेल तर.

●        तुम्ही जर सिद्ध न झालेली किंवा अप्रमाणित उपचारपद्धती वापरलीत

●        गर्भावस्था, ज्यातून मूल जन्माला येणे, गर्भपात होणे किंवा यात काही गुंतागुंत निर्माण झाल्याने होणारा खर्च

●        अ‍ॅलोपथी सोडून इतर कुठल्या वैद्यकीय पद्धतीचा वापर करून उपचार केल्यास त्याचा खर्च

●        निदान किंवा उपचार करण्यासाठी वापरण्यात आलेला चष्मा, कॉंटॅक्ट लेन्स, हिअरिंग एड किंवा इतर कुठ्लेही वैद्यकीय उपकरण याचा खर्च

●        कस्टम्स किंवा पोलीस किंवा इतर तत्सम अधिकाऱ्यांनी पासपोर्ट जप्त केल्याने हरवणे

●       पासपोर्ट हरवला आहे हे समजल्यानंतर 24 तासात तुम्ही त्याची तक्रार नोंदवून जर अधिकृत अहवाल घेतला नाहीत

●        तुम्ही भारतात परतत असताना तुमचे सामान उशिराने आल्यास

●      तुम्ही पासपोर्ट सांभाळण्यात असमर्थ ठरल्याने जर तुमचा पासपोर्ट हरवला

मी माझा ट्रॅव्हल इंश्युरंस कसा रद्द करु शकतो?

कधी अशी परिस्थिती उद्भवू शकते की तुम्हाला तुमचा ट्रॅव्हल इंश्युरंस रद्द करावा लागू शकतो. तुम्ही पॉलिसीचा कालावधी सुरू होण्याआधी किंवा पॉलिसी सुरू झाल्यानंतर ट्रॅव्हल इंश्युरंस प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकता. रद्द करण्याची प्रक्रिया ही या दोन्ही परिस्थितीमध्ये वेगळी असेल व ती इथे खाली दिलेली आहे:

पॉलिसी सुरू होण्यापूर्वी

तुम्हाला जर कालावधी सुरू होण्याआधी पॉलिसी रद्द करायची असेल, तर तुम्ही तसे आम्हाला कळवणे आवश्यक आहे. हे कळवताना तुमचा पॉलिसी क्रमांक किंवा सूची क्रमांक लिहीणे गरजेचे आहे.

हे लक्षात घ्या की रद्द करण्याचा काही आकार लावण्यात येईल.

पॉलिसीचा कालावधी सुरू झाल्यानंतर - जर तुम्ही प्रवास केला नसेल तर

अश्या परिस्थितीत, तुम्ही पुढील यादीप्रमाणे कागदपत्रे आमच्याकडे पाठवा.

●       तुम्ही परदेश प्रवास केला नाही हे सिद्ध करणारा दस्तऐवज 

●        पासपोर्टच्या रिकाम्या पानांसहित सर्व पानांच्या फोटोकॉपी किंवा स्कॅनकॉपी

●        रद्द करण्याचे कारण देणारे एक पत्र

●        जर तुम्हाला दुतावासाने व्हिसा  नाकारला असेल, तर दुतावासाने दिलेल्या व्हिसा नाकारल्याच्या पत्राची एक प्रत

त्यावर अंडररायटरने दिलेल्या अनुमतीनुसार, तुमची पॉलिसी कामकाजाच्या एका दिवसात रद्द करण्यात येईल.

पॉलिसीचा कालावधी सुरु झाल्यानंतर - जर तुम्ही प्रवास केला असेल तर

तुम्ही जर पॉलिसीचा कालावधी संपण्याआधी परतलात, तर तुम्हाला पुढील यादीत दिलेल्या दराप्रमणे पैसे परत मिळतील-

आमचे आनंदी ग्राहक

अभिजीत डोईफोडे

ट्रॅव्हल इंश्युरंस घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.

प्रदीप कुमार

खूप चांगली वेबसाईट. थोड्याच पायऱ्यांमधे सहजतेने पॉलिसी घेऊ शकता.

विनोद व्ही नायर

ट्रॅव्हल इंश्युरंस घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.

बजाज अलियांझ सोबत तुमच्या कुटुंबाला परदेशात असताना संरक्षण द्या!

कोट मिळवा

आमच्या ट्रॅव्हल पॉलिसीमध्ये कोणत्या गोष्टींचे कव्हर आहे?

 

ट्रॅव्हल कंपॅनियन हा सर्वात मूलभूत प्लॅन आहे जो तुम्ही परदेश प्रवास करत असल्यास घेणे आवश्यक आहे. तुम्ही परदेशात असताना या प्लॅनमुळे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना वैद्यकीय खर्चाचे कव्हर मिळते.

या प्लॅनमधून पुढील गोष्टी मिळतात:

 

पुढील गोष्टींचा समावेश लाभ - युएस $
वैद्यकीय उपचारांचा खर्च, इव्हॅक्युएशन, रिपॅट्रिएशन 50000
वरती (I) मध्ये अंतर्भूत करण्यात आल्याप्रमाणे दातदुखीवर तातडीने उपचार 500
सामान हरवणे (चेक्ड)
टीप: प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%
250**
सामान येण्यास उशीर 100
वैयक्तिक अपघात
18 वर्षांखालील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम अश्युअर्डच्या फक्त 50%
10,000***
पासपोर्ट हरवणे 150
वैयक्तिक जबाबदारी 2,000
**प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** 18 वर्षांखालील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम अश्युअर्डच्या फक्त 50%

ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनपेक्षा हा प्लॅन तुम्हाला जास्त व्यापक संरक्षण देतो. ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनच्या सर्व लाभांव्यतिरिक्त, या प्लॅनमधून तुम्हाला चेक्ड बॅगेज, अपहरण, आपत्कालीन आगाऊ कॅश इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून सुद्धा कव्हर देतो.

पुढील गोष्टींचा समावेश लाभ - युएस $
वैद्यकीय उपचारांचा खर्च, इव्हॅक्युएशन, रिपॅट्रिएशन 50000
वरती (I) मध्ये अंतर्भूत करण्यात आल्याप्रमाणे दातदुखीवर तातडीने उपचार 500
वैयक्तिक अपघात
टीप: 18 वर्षांखालील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम अश्युअर्डच्या फक्त 50%
10,000**
एडी अ‍ॅंड डी कॉमन कॅरियर 2,500
चेक्ड बॅगेज हरवणे
टीप: प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%
250**
सामान येण्यास उशीर 100
पासपोर्ट हरवणे 250
अपहरण $ 50 दर दिवशी ते
जास्तीत जास्त $ 300
प्रवासात उशीर $ 20 प्रति 12 तास ते
जास्तीत जास्त $ 120
वैयक्तिक जबाबदारी 1,00,000
आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये आगाऊ कॅश ****
टीप: आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च
500
गोल्फर्स होल-इन-वन (स्पर्धेच्या बक्षिसाच्या रकमेसाठी) 250
प्रवास रद्द होणे 500
घरातील चोरीचा इंश्युरंस रु 1,00,000
प्रवास अर्धवट सोडावा लागणे 200
हॉस्पिटलायझेशन डेली अ‍ॅडव्हान्स दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 100
**प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** 18 वर्षांखालील व्यक्तीचा मृत्यू झाल्यास विमा काढल्याच्या रकमेच्या फक्त 50% **** आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च

ट्रॅव्हल टाईम प्लॅन मध्ये सुद्धा ट्रॅव्हल एलिट प्लॅन सारखे कव्हर मिळते. पण या प्लॅनमध्ये कव्हरेजची रक्कम ही खूप जास्त असते.

या प्लॅनअंतर्गत, तुम्हाला पुष्कळ पॉलिसी उपलब्ध आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पॉलिसी निवडू शकता यातील प्रत्येक पॉलिसी ही तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार तयार करून दिली जाते.

तुम्ही 21 वर्षांचे असा अथवा 60 वर्षांचे, तुम्ही व्यावसायिक असा अथवा विद्यार्थी, तुमच्या गरजेनुसार अगदी योग्य असेल अशी पॉलिसी तुम्हाला मिळेल. सर्वसामान्य प्रवाशाच्या ज्या विविध गरजा असतात त्यासाठी आमच्याकडे सुयोग्य असा उपाय आहे.

ट्रॅव्हल टाईम प्लॅन हा, खाली दिल्याप्रमाणे तीन विशेष पर्यायांमध्ये मिळतो:

पुढील गोष्टींचा समावेश प्रमाणित 50,000 युएसडी रजत 1 लाख युएसडी डिडक्टीबल
वैयक्तिक अपघात* 10,000 युएसडी 10,000 युएसडी काही नाही
वैद्यकीय उपचाराचा खर्च व ईव्हॅक्युएशन 50,000 युएसडी 100,000 युएसडी 100 युएसडी
दात दुखीवरील तातडीने केलेल्या उपचारांचा खर्च हा वैद्यकीय उपचाराचा खर्च व ईव्हॅक्युएशनच्या संरक्षणाच्या रकमेमध्ये समाविष्ट आहे 500 युएसडी 500 युएसडी 100 युएसडी
रिपॅट्रीएशन 5,000 युएसडी 5,000 युएसडी काही नाही
चेक्ड बॅगेज हरवणे** 250 युएसडी 250 युएसडी काही नाही
अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व (सार्वजनिक वाहनातून जाताना) (कॉमन कॅरियर) 2,500 युएसडी 2,500 युएसडी काही नाही
पासपोर्ट हरवणे 250 युएसडी 250 युएसडी 25 युएसडी
वैयक्तिक जबाबदारी 100,000 युएसडी 100,000 युएसडी 100 युएसडी
अपहरणाचा समावेश दर दिवशी 50 युएसडी ते जास्तीत जास्त 300 युएसडी दर दिवशी 50 युएसडी ते जास्तीत जास्त 300 युएसडी काही नाही
प्रवासात उशीर दर 12 तासांना 20 युएसडी ते जास्तीत जास्त 120 युएसडी दर 12 तासांना 20 युएसडी ते जास्तीत जास्त 120 युएसडी 12 तास
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी रोजचा भत्ता दर दिवशी 25 युएसडी ते जास्तीत जस्त 100 युएसडी दर दिवशी 25 युएसडी ते जास्तीत जस्त 100 युएसडी काही नाही
गोल्फर्स होल-इन-वन 250 युएसडी 250 युएसडी काही नाही
प्रवास रद्द होणे 500 युएसडी 500 युएसडी काही नाही
प्रवास अर्धवट सोडावा लागणे 200 युएसडी 200 युएसडी काही नाही
चेक्ड बॅगेजला उशीर 100 युएसडी 100 युएसडी 12 तास
घरातील चोरीचा इंश्युरंस रु 100,000 रु 100,000 काही नाही
आपत्कालीन रोख रकमेचा लाभ *** 500 युएसडी 500 युएसडी काही नाही
* वैयक्तिक अपघात कव्हर हे फ्लोटर पद्धतीने मिळत नाही . क्लेम केला गेल्यास सम अश्युअर्ड ही पुढील प्रमाणे लागू होईल:

• प्रस्तावकासाठी व मिळवत्या जोडीदारासाठी सम अश्युअर्डच्या 100%
• न मिळवत्या जोडीदारासाठी व इतर अधिक प्रौढ व्यक्तींसाठी सम अश्युअर्डच्या 50%
• प्रत्येक मूलाला सम अश्युअर्डच्या 25%

** प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%

*** आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च

मला फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंसची का गरज आहे?

तुम्ही तुमच्या मुलांच्या अफ्रिकन सफारीवर जायच्या सततच्या तगाद्याला शरण गेला असाल किंवा तेथे जाण्याचा मनसुबा तुम्हीही आखला असेल, आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या प्रवासातला ओरत्यक क्षण आनंदात घालवाल! पण कुटुंबासोबत प्रवास करण्याआधी पुष्कळ नियोजन करावे लागते.

तुम्ही जरी प्रवासात लागणारी प्रत्येक गोष्ट बरोबर घेतली असली तरीही, तुम्हाला नेहमी असेच वाटत राहते की अजून काही बरोबर घेऊ या, अगदीच गरज पडली तर! जशी की ती नवीन, चकचकीत सेल्फी स्टिक जी तुम्ही मागच्या आठवड्यात सुंदर दृश्य टिपण्यासाठी घेतली होतीत!

आणि मग तुमच्या लक्षात येते की स्वयंपाकघरातील एक सिंक सोडून सर्व काही बरोबर तर घेतले पण प्रवासात ते सर्व सामान ओढून तुमची मनगटे दुखायला लागतील. हो, आणि त्याशिवाय सामानाच्या वजनावर असलेल्या मर्यादा सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतात! हुश्श! ठीक आहे, आता बघू, विमानाचे आरक्षण, हॉटेल्स... हं, सर्व केले. पण थांबा, फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंसचे काय?

परदेश प्रवास हा जोखीम रहित नाही. आंतरराष्ट्रीय ठिकाणांना जाताना विविध जोखीमींना / अडचणींना सामोरे जावे लागेल व फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस तुम्हाला यापासून कव्हर करतो. उशीरा येणारे सामान, शारिरीक दुखापती किंवा पासपोर्ट हरवणे ही फक्त तुम्हाला कशा कशाचा सामना करावा लागेल याची काही उदाहरणे आहेत. पण सुदैवाने फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस तुमचा यातून उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींपासून बचाव करतो.

तुम्ही आंतरराष्ट्रीय ठिकाणी असताना, एखादा स्कीईंग करताना झालेला अपघात अथवा सामान हरवणे अश्या प्रसंगांनी तुमची स्वप्नातील सुट्टी ही एक दुर्दैवी घटना होऊ शकते. फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस अश्या सर्व घटनांत तुमची काळजी घेतो.

तेव्हा, तुमचे सीटबेल्ट बांधा आणि काळजी न करता तुमच्या प्रिय व्यक्तींबरोबर सुखद वेळ घालवण्यासाठी सहलीवर निघा!

कुठच्याही वेळेस 24/7 मिस्ड कॉल सुविधेद्वारा आंतरराष्ट्रीय सहाय्य

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंस विकत घेण्यापूर्वी लक्षात घेण्यासारखे महत्वाचे मुद्दे

 • समावेश
 • अपवाद

वैद्यकीय व हॉस्पिटलमध्ये दाखल होणे

प्रवास रद्द होणे अथवा अर्ध्यातच सोडणे

(ट्रॅव्हल कंपॅनियन फॅमिली प्लॅन साठी उपलब्ध नाही)

पासपोर्ट/सामान हरवणे

वैयक्तिक जबाबदारी

विमान उशीरा सुटणे

(ट्रॅव्हल कंपॅनियन फॅमिली प्लॅन साठी उपलब्ध नाही)

1 of 1

पूर्वीपासून असलेली अवस्था किंवा आजारपण

पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर आलेले आजारपण

आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, अथवा हेतुपुरस्सर स्वत:च करून घेतलेल्या जखमा किंवा आजारपण, चिंता/ताण/औदासीन्य/उदासीनता, अमली पदार्थांचे सेवन.

शारिरीक काम अथवा धोक्याचा पेशा, गरज नसताना स्वत:हून संकटाला सामोरे जाणे (फक्त दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणे हा अपवाद), कुठल्याही गुन्हेगारी अथवा बेकायदेशीर कामात सहभागी होणे.

गर्भावस्था, ज्यातून मूल जन्माला आले, गर्भपात होणे अथवा करवणे किंवा यामधील कशातूनही गुंतागुंत निर्माण होणे.

प्रायोगिक, सिद्ध न झालेली किंवा अप्रमाणित उपचार पद्धती.

आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती (ज्यास अ‍ॅलोपथी असेही म्हणतात) सोडून इतर कुठल्याही पद्धतीने उपचार करून घेणे.

चष्मा, कॉंटॅक्ट लेन्स, हिअरिंग एड , कुबड्या व इतर सर्व बाह्य उपकरणे यावर निदानाच्यावेळी अथवा उपचारादरम्यान झालेला खर्च.

सामान मिळण्यास उशीर जेव्हा प्रवासाचे अंतिम ठिकाण भारतात असेल

कस्टम अधिकाऱ्यांनी, पोलीस अथवा इतर कोणत्याही अधिकाऱ्यांनी जप्त केल्यामुळे विमा काढलेल्या व्यक्तीचा पासपोर्ट हरवणे अथवा खराब होणे.

एखादी गोष्ट हरवल्यानंतर योग्य पोलीस अधिकाऱ्यांकडे 24 तासांच्या आत हरवल्याची तक्रार नोंदवली नसेल, व त्या संदर्भातील अधिकृत दाखला घेतला नसेल.

पासपोर्ट हरवू नये या बद्दल विमा काढलेल्या व्यक्तीने योग्य ती खबरदारी घेतली नसल्यास.

1 of 1

फॅमिली ट्रॅव्हल इंश्युरंसची कागदपत्रे डाऊनलोड करा

Set Renewal Reminder

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select date

Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.

ग्राहकांचे अनुभव

मदनमोहन गोविंदराजूलू

ट्रॅव्हल इंश्युरंसच्या कोट आणि किंमती संबंधी सोपी सरळ माहिती.  सहजतेने विकत घेऊ शकता व पैसे भरू शकता

पायल नायक

वापरकर्त्यांसाठी अत्यंत सोपे व सोयीचे. बजाज अलियांझच्या टीमचे खूप कौतुक.

किंजल बोघारा

ट्रॅव्हल इंश्युरंस विषयी खूप छान सेवा व परवडणारे प्रिमियम

Thank You for Your Interest in Bajaj Allianz Insurance Policy, A Customer Support Executive will call you back shortly to assist you through the Process.

Request Call Back

Please enter name
+91
Please enter valid mobile number
Please select valid option
Please select the checkbox

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go
Chat with Us