रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
सद्यपरिस्थिती पाहाता आणि पसरत जाणारी रोगराई् आणि जीवनमानाविषयीचा धोका लक्षात घेता हेल्थ इन्श्युरन्स ही प्रत्येक व्यक्तिची प्राथमिक गरज झालेली आहे. आपण भविष्यातील आजार आणि अपघात यांपासून स्वत:ला लांब ठेवू शकत नाही, याउलट आपण सतत अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. नियमित हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये आजार, रूग्णालयात भरती करण्याचा खर्च, अपघाती मॄत्यू, जखमा आणि अजून बरेच काही या खर्चासंदर्भात कव्हर दिलेले असते.
आम्ही बजाज अलियांझ जनरल इन्श्युरन्समध्ये जेव्हा हेल्थ इन्श्युरन्सचा विषय असतो तेव्हा काहीतरी जास्तीच देण्याचा प्रयत्न करीत असतो. आमचा ‘टॅक्स गेन प्लॅन’ हा देखील याचाच एक भाग असून त्यामध्ये वैद्यकीय बिलांचा समावेश तर आहेच परंतु सदर पॉलिसीद्वारे आपण आपला पैसे वाचवून करामध्ये देखील लाभ घेवू शकता.
तथापि, एक्स्ट्रा केअर प्लससह, एकदा का तुमचे मूलभूत वैद्यकीय इन्श्युरन्स कव्हर संपल्यानंतर, ही शील्ड सुरू होईल. यामुळे तुमच्या हॉस्पिटलायझेशनमुळे निर्माण झालेले अतिरिक्त बिल क्लिअर करण्यास मदत होईल आणि तुम्ही निवडलेल्या एकूण वजावटीच्या वर झालेल्या खर्चाचे पेमेंट केले जाईल. त्यामुळेच हा टॉप-अप प्लॅन एक उत्तम गुंतवणूक आहे.
तसेच, याचाही विचार करा की वाढत्या महागाईमुळे मूलभूत हेल्थ इन्श्युरन्स कव्हर तुम्हाला पुरेसे पडणार नाही. शिवाय, मोठी सम इन्श्युअर्ड तुम्हाला परवडणारही नाही. त्यामुळे, या वाढत्या आरोग्यसेवांच्या खर्चांची काळजी घेण्यासाठी एका मोठ्या व्यापक हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेजसाठी ही पॉलिसी उत्तम आहे. सर्वोत्तम भाग जाणून घ्यायचा आहे? ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्हाला मूलभूत हेल्थ इन्श्युरन्सचीही गरज भासत नाही!
आम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सचा विचार खूप गांभीर्याने करतो आणि आमच्याकडे आमच्या पाठीशी अनेक वर्षांचा अनुभव आणि जागतिक ज्ञान आहे. एक सुरक्षित आणि चांगला टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला दुर्दैवी हॉस्पिटलायझेशनमधून पुढे नेईल याची आम्ही काळजी घेऊ. आमच्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीची प्रमुख वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेतः:
टॉप-अप हेल्थ पॉलिसी
एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीअंतर्गत उपलब्ध असले्लया विविध सम इन्शुअर्ड आणि एकूण डिडक्टिबलमधून तुम्हाला निवड करता येईल.
आधीच असलेल्या आजारांपासून कव्हर
तुमच्या पहिल्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीपासून 12 महिन्यांनी आधीच असलेल्या आजारांना कव्हर केले जाते.
मॅटर्निटी कव्हर
मॅटर्निटीशी संबंधित गुंतागुंतीसह मॅटर्निटी खर्च अटी आणि शर्तींच्या सापेक्ष पॉलिसीअंतर्गत कव्हर करण्यात आला आहे.
सम इन्शुअर्ड: 10 लाख रूपये, अॅग्रेगेट डिडक्टिबल ऑप्टेडः: 2 लाख रूपये |
||||||
क्लेमचे तपशील |
हॉस्पिटलायझेशनची तारीख |
एकूण क्लेम रक्कम |
डिडक्टिबल वापर |
शिल्लक डिडक्टिबल |
इन्शुअर्डने देय रक्कम |
एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीअंतर्गत देय (रूपयांमध्ये) |
क्लेम 1 |
10-Aug-2017 |
1.5 लाख |
1.5 लाख |
50,000 |
1.5 लाख |
0 |
क्लेम 2 |
10-Sep-2017 |
3 लाख |
50,000 |
0 |
50,000 |
2.5 लाख |
क्लेम 3 |
10-Oct-2017 |
7.5 लाख |
0 |
0 |
0 |
7.5 लाख |
प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर
ही पॉलिसी हॉस्पिटलायझेशनपूर्वी तात्काळ 60 दिवस आणि नंतर 90 दिवस वैद्यकीय खर्च कव्हर करते.
इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स कव्हर
प्रति क्लेम 3,000 रूपयांपर्यंत इमर्जन्सी अॅम्ब्युलन्स कव्हर मिळवा..तुम्ही अॅड-ऑनच्या स्वरूपात एअर अॅम्ब्युलन्स कव्हरची निवडही करू शकता.
संपूर्ण कुटुंबासाठी फ्लोटर कव्हर
एकाच पॉलिसीअंतर्गत तुमचे जोडीदार, अवलंबून असलेली मुले आणि पालक यांना कव्हर करते.
प्रवेशासाठी वयोमर्यादा 80 वर्षांपर्यंत
वाढीव वयोमर्यादेसह ही पॉलिसी वयाच्या 80 वर्षांपर्यंत सदस्यांना कव्हर देऊ शकते.
55 वर्षे वयापर्यंत पूर्व पॉलिसी तपासणी नाही
या पॉलिसीत फक्त 55 वर्षे वयावरील सदस्यांसाठी प्री-पॉलिसी आरोग्य तपासणीची गरज आहे.
डेकेअर प्रक्रिया कव्हर
या पॉलिसीत सूचीबद्ध डेकेअर प्रक्रिया किंवा सर्जरीच्या ट्रीटमेंट दरम्यान आलेला वैद्यकीय खर्च कव्हर केलेला आहे.
एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी तुम्ही निवडलेल्या एकूण डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त आलेला हॉस्पिटलायझेशनचा खर्च देते. ही कशी काम करते हे उदाहरणाने जाणून घेऊयाः:
उदाहरण पाहासम इन्शुअर्ड: ₹10 लाख रूपये, एकूण डिडक्टिबल निवडले: ₹2 लाख रूपये
क्लेमचे तपशील | हॉस्पिटलायझेशनची तारीख | एकूण क्लेम रक्कम (रु. मध्ये) |
डिडक्टिबल वापर (रु. मध्ये) |
शिल्लक डिडक्टिबल (रु. मध्ये) |
इन्शुअर्डने देय रक्कम (जर असल्यास) (रुपयांमध्ये) |
एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीअंतर्गत देय (रुपयांमध्ये) |
---|---|---|---|---|---|---|
क्लेम 1 | 10-Aug-2017 | 1,50,000 | 1,50,000 | 50,000 | 0 | |
क्लेम 2 | 10-Sep-2017 | 3,00,000 | 50,000 | 0 | 1,50,000 | 2,50,000 |
क्लेम 3 | 10-Oct-2017 | 7,50,000 | 0 | 0 | 50,000 | 7,50,000 |
मोफत वैद्यकीय तपासणी अतिरिक्त फायदा असून त्यासाठी एकूण डिडक्टिबल लागू नाही. त्यामुळे तुमची एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी आमच्याकडे चालू असल्याच्या सलग 3 वर्षांच्या शेवटी आम्ही खालीलप्रमाणे मोफत वैद्यकीय तपासणी खर्च तुम्हाला देऊः:
**स्वतः, पती/पत्नी, मुले आणि आई-वडील यांच्याकरिता हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरले असल्यास, वजावट ₹25,000 प्रति वर्ष प्राप्त करू शकतो, त्यासाठी त्या व्यक्तीचे वय 60 पेक्षा अधिक नसावे. जर त्या व्यक्तीने स्वतःसाठी किंवा आई-वडिल, जे सीनिअर सिटीझन आहेत व ज्यांचे वय 60 किंवा अधिक आहे, यांच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी प्रीमियम भरले असेल तर कमाल कॅपिंग असेल ₹30,000. जर टॅक्सपेयरचे वय 60 पेक्षा कमी आणि आई-वडिलांचे वय 60 असेल तर ती व्यक्ती सेक्शन 80D अंतर्गत एकूण ₹55,000 पर्यंत टॅक्स लाभ वाढवू शकते. असे टॅक्सपेयर ज्यांचे वय 60 किंवा अधिक आहे आणि जे त्यांच्या आई-वडिलांसाठी हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम्स देखील भरत आहेत, ते सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स लाभ वाढवू शकतात, त्यामुळे जे होईल ₹60,000.
*हेल्थ CDC हे बजाज आलियान्झ इन्श्युरन्स वॉलेट अॅपमधील एक वैशिष्ट्य आहे ज्यामुळे तुम्हाला अॅपच्या माध्यमातून ₹20000 पर्यंत क्लेमची विनंती करता येऊ शकते. तुम्हाला क्लेमची विनंती करण्यासाठीचा हा एक सोपा मार्ग आहे
नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा संपूर्ण वर्षभर सेवेतील कोणत्याही अडथळ्यांशिवाय 24x7 उपलब्ध आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी हॉस्पिटलची यादी तपासणे गरजेचे आहे. कॅशलेस सेटलमेंट देणारी हॉस्पिटल्स कोणत्याही सूचनेशिवाय त्यांची पॉलिसी बदलू शकतात.. अद्ययावत लिस्ट आमच्या वेबसाइटवर आणि कॉलसेंटरमध्ये उपलब्ध आहे.. कॅशलेस सुविधा मिळवत असताना बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड आणि सरकारी आयडी प्रूफ सक्तीचे आहे.
तुम्ही कॅशलेस क्लेमचा पर्याय निवडता तेव्हा प्रक्रिया खालीलप्रमाणे असतेः:
महत्त्वाचे मुद्दे:
पॉलिसी अनुसार रुग्णालयात भर्तीपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर करण्यात आलेल्या संबंधित वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल. यासाठी सही केलेल्या क्लेम फॉर्मसहित प्रिस्क्रिप्शन तसेच बिल अथवा पावती बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडे सुपूर्त करणे अनिवार्य आहे.
रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे
सर्व मूळ क्लेम डॉक्युमेंट्स खालील ॲड्रेसवर सबमिट करणे आवश्यक आहे:
हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीम
बजाज आलियान्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411006
आपला पॉलिसी क्रमांक, आरोग्य कार्ड क्रमांक आणि मोबाईल नंबर या बाबी स्पष्टपणे लिफाफ्याच्या दर्शनीय बाजूस नमूद करा.
नोंदःतुमच्या रेकॉर्डसाठी कागदपत्रे आणि कुरियर संदर्भ क्रमांकाची एक प्रत ठेवा.
टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी हा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन किंवा मेडिक्लेम पॉलिसीद्वारे आधीच इन्श्युअर्ड व्यक्तींसाठी अतिरिक्त कव्हरेज आहे. तथापि, जरी तुम्ही प्रायमरी मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनद्वारे इन्श्युअर्ड नसाल तरीही तुम्ही आमच्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीची निवड करू शकता.
आपल्या आवडत्या गोष्टींची जास्तीची काळजी घेणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळेच आपण नाजूक वस्तूंना बबल रॅपने गुंडाळतो आणि घरांना बेबी-प्रूफ करतो. मग तुमच्या हेल्थकेअरसाठीही जास्तीची काळजी का घ्यायची नाही ?
तुम्हाला असे वाटत असेल की तुमची विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज तुमच्या सर्व आरोग्याशी संबंधित गरजांसाठी पुरेशी आहे. परंतु दिलेले कव्हरेज तुमच्या वैद्यकीय बिलांसाठी पुरेसे नसल्यास काय होईल ? तुमचे सध्याचे कव्हर छोट्या आजारांसाठी पुरेसे असेल परंतु मोठी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आल्यास ते पुरेसे ठरेलच असे नाही.. आमची एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी हा एक टॉप-अप हेल्थ इन्शुरन् आहे जो तुमच्या जास्तीच्या वैद्यकीय खर्चांना कव्हर करण्यासाठी आणि तुमच्या बचतीचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो.
बजाज आलियान्झच्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीसोबत तुम्हाला खालील कव्हरेज मिळेलः:
हो, एक्स्ट्रा केअर प्लस टॉप-अप प्लॅनसाठी भरलेला प्रीमियम इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80डी अंतर्गत करांतून वगळलेला आहे.
हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीममध्ये डॉक्टर्स आणि पॅरामेडिक्सचा समावेश असतो जे हेल्थ अंडररायटिंग्स आणि क्लेम सेटलमेंटसाठी जबाबदार असतात..हे सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीधारकांसाठी हेल्थकेअर संबंधी सेवांसाठी सिंगल विंडो असिस्टंस आहे. ही इन-हाऊस टीम हेल्थ इन्श्युरन्स ग्राहकांशी संबंधित सर्व समस्या सोडवते आणि संपर्काचा एक टप्पा म्हणून वेगवान क्लेम सेटलमेंटची काळजी घेते.
माझ्या क्लेमच्या पुर्ततेबाबत जो 2 दिवसांच्या आत मंजूर झाला, मला झालेला आनंद आणि समाधान...
लॉकडाउनच्या काळात इन्श्युरन्स कॉपी वेगाने वितरीत केली गेली. बजाज आलियान्झच्या टीमला सलाम
बजाज आलियान्झ वडोदरा टीमचे, विशेषतः श्री हार्दिक मकवाना आणि श्री आशिष यांचे आभार...
एक्स्ट्रा केअर आणि प्रोटेक्शन आमच्या टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससोबत!
कोटेशन मिळवावयाच्या 55 वर्षांपर्यंत वैद्यकीय चाचणीची गरज नाही.
इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80डी अंतर्गत 1 लाख रूपयांची कर बचत.* अधिक जाणून घ्या
कर बचत
इन्कम टॅक्स अॅक्टच्या कलम 80डी अंतर्गत 1 लाख रूपयांची कर बचत.*
*स्वतः, जोडीदार, मुले आणि पालकांसाठी एक्स्टरा केअर प्लस पॉलिसी निवडल्यामुळे तुम्हाला तुमच्या करांवर वार्षिक 25,000 रूपयांपर्यंत डिडक्शन मिळू शकते. (तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक नसल्यास.)). तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांसाठी (वय वर्षे 60 आणि अधिक) प्रीमियम भरल्यास, करांच्या उद्दिष्टांसाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स फायदा 50,000 रूपये आहे. तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास तुम्हाला कलम 80डी अंतर्गत एकूण 75,000, रूपयांपर्यंत जास्तीत जास्त कर फायदा मिळू शकतो. तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि तुम्ही तुमच्या पालकांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम भरत असल्यास तुम्हाला कलम 80डी अंतर्गत एकूण 1 लाख रूपयांपर्यंत जास्तीत जास्त कर फायदा मिळू शकतो.
आमच्याकडे एक इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम आहे जी वेगवान, सुलभ आणि सोपी क्लेम सेटलमेंटची हमी देते... अधिक जाणून घ्या
विनासायास क्लेम सेटलमेंट
आमच्या स्वत:च्या क्लेम सेटलमेंट विभागातील कर्मचारी ही काळजी घेतात की क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया ही जलद, सहजतेने व सोप्या पद्धतीने होईल. तसेच, आम्ही भारतातील 6,500 हून अधिक हॉस्पिटल्समधून कॅशलेस क्लेम सेटलमेंटाची सुविधा देतो.. याचा फायदा, जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते अथवा उपचार घ्यावे लागतात व आम्ही तुमच्या बिलांचे पैसे थेट नेटवर्क हॉस्पिटलला भरतो, तेव्हा होतो व तुम्ही केवळ तब्येत सुधारून बरे होण्यावर लक्ष केंद्रित करु शकता.
तुम्ही तुमच्या आयुष्यभरासाठी एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी रिन्यू करू शकता.
तुम्ही कोणत्याही टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्सअंतर्गत इन्शुअर्ड असाल तर तुम्ही आमच्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीमध्ये स्विच करू शकता. .. Read more
पोर्टेबिलिटी फायदा
जर तुम्ही कोणत्याही टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन अंतर्गत इन्श्युअर्ड असाल तर तुम्ही तुमच्या प्राप्त लाभांसह (प्रतीक्षा कालावधीसाठी देय भत्तेनंतर) आमच्या एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीवर स्विच करू शकता आणि पॉलिसीच्या उपलब्ध लाभांचा आनंद घेऊ शकता.
तुमची एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी अॅक्टिव्ह असल्याच्या सलग 3 वर्षांचा कालावधी संपल्यावर मोफत प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक-अप.
सुंता, कॉस्मेटिक किंवा सौंदर्यासंबंधीचे उपचार, जीवन/ अथवा लिंग बदलासाठीची शस्त्रक्रिया...
अधिक जाणून घ्यापूर्व आजार, रोग किंवा दुखापत जी तुमच्या प्रपोजल फॉर्ममध्ये घोषित केलेली आहे आणि जी आम्ही स्वीकारली आहे, ती आमच्याकडे घेतलेल्या पहिल्या एक्स्ट्रा कव्हर प्लस पॉलिसीचे सातत्यपूर्ण कव्हरेजचे 12 महिने संपल्यानंतर. पॉलिसी कव्हर न थांबवता एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसीचे रिन्यूअल असल्यास विम्याची रक्कम वाढवल्यास ही वगळणूक फक्त त्या रकमेच्या मर्यादेसाठी लागू होईल ज्यातून नुकसानभरपाईची मर्यादा वाढवली गेली आहे.
कॅन्सर, जळणे किंवा अपघातातील शारीरिक दुखापत यांमध्ये अत्यावश्यक असणारी प्लास्टीक सर्जरी...
अधिक जाणून घ्याउद्भवलेला कोणताही आजार आणि / किंवा तुम्ही कोणत्याही आजारासाठी / रोगासाठी पॉलिसी सुरू झाल्यापासून पहिल्या 30 दिवसांत केलेला खर्च, अपघाती दुखापत वगळता.
कोवालेसेन्स, सामान्य दुर्बलता, विश्रांती उपचार, जन्मजात बाहय रोग किंवा विसंगती, अनुवांशिक विकार, स्टेम सेल इम्प्लांटेशन किंवा शस्त्रक्रिया किंवा ग्रोथ हार्मोन थेरपी...
अधिक जाणून घ्याआम्ही या पॉलिसीअंतर्गत मॅटर्निटीचा असा खर्च करण्यासाठी उत्तरदायी नाही जो आमच्यासोबतच्या पहिल्या पॉलिसीच्या तारखेपासून पहिल्या 12महिन्यांत आलेला असेल. तथापि, एक्स्ट्रा केअर प्लसच्या सातत्यपूर्ण रिन्यूअलप्रसंगी 12 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू नसेल.
नवजात बाळामुळे झालेला कोणताही वैद्यकीय खर्च.
रूग्णालयात दाखल करणे हे प्राथमिकत: आणि विशेषत: निदान, एक्स¹रे किंवा प्रयोगशाळा परीक्षण आणि तपासणी यांसंदर्भात असते.
युद्ध, आक्रमण, परदेशी दुश्मनांची कृती, शत्रुतेमुळे झालेली कोणतीही दुखापत किंवा वैद्यकीय खर्च...
अधिक जाणून घ्याकोणत्याही दुखापती किंवा वैद्यकीय खर्च जे युद्ध, हल्ला, परकीय शत्रूंच्या कारवाया, घातपात (युद्ध घोषित झालेले असो वा नसो), नागरी युद्ध, क्षोभ, उठाव, बंड, क्रांती, हल्ला, लष्करी किंवा हुकूमशाही शक्ती किंवा सत्ता काबीज करणे किंवा राष्ट्रीयीकरण किंवा कोणतेही सरकार किंवा सार्वजनिक स्थानिक प्राधिकरणाच्या आदेशाने झालेले नुकसान किंवा मागणी यांच्यामुळे आलेले आहेत.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
रामा अनिल माटे
तुमच्या वेबसाईटवर ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण सुलभ, यूजर-फ्रेंडली आणि सहज आहे.
सुरेश कडू
बजाज आलियान्झ अधिकाऱ्यांकडून सर्वोत्तम सपोर्ट प्रदान केला जातो आणि नक्कीच प्रशंसनीय आहे. धन्यवाद.
अजय बिंद्रा
बजाज आलियान्झ अधिकारी पॉलिसीचे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगतात. महिला अधिकाऱ्याचे संवाद कौशल्य सर्वोत्तम होते आणि योग्य प्रकारे माहिती दिली.
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
लिहिणारे: बजाज आलियान्झ - अपडेटेड : 16 मे 2022
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा