1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

मोटर इन्शुरन्स क्लेम प्रोसेस

तुम्ही सर्वांगीण मोटर इन्शुरन्स क्लेम सेटलमेेंटपासून तुम्ही फक्त एक क्लिकवर आहात.

आमच्या तुम्हाला सर्वोत्तम कव्हरेज आणि त्याचबरोबर इतर मूल्यवर्धित सेवांबरोबरच आपल्याला सर्वोत्तम कव्हरेज प्रदान करण्याच्या आमच्या प्रयत्नात, आमची ऑनलाइन जनरल इन्शुरन्स क्लेम सिस्टम आपली सोय लक्षात ठेवून तयार केली गेली आहे. एका सोयीच्या इन्शुरन्स क्लेम प्रोसेससोबत तुम्ही तुमचा क्लेम तात्काळ रजिस्टर करू शकता, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करू शकता आणि स्थिती जाणू शकता.

सल्लागार पाहण्यासाठी क्लिक करा - महाराष्ट्र मुसळधार पावसासाठी

मोटर इन्शुरन्स क्लेम प्रोसेस

तुमचा मोटर इन्शुरन्स क्लेम रजिस्टर करा.

आमचा टोल फ्री नंबर डायल करा.

1800-209-5858

आम्हाला येथे इमेल पाठवा

bagichelp@bajajallianz.co.in

क्लेम अ‍ॅपद्वारे रजिस्टर करा आणि अ‍ॅपच्या मोटर ऑन दि स्पॉट (ओटीएस) वैशिष्ट्याद्वारे आम्ही तो 20 मिनिटांत* सेटल करू.
कॅरिंगली अ‍ॅप डाऊनलोड करा

थर्ड पार्टी क्लेम


पोलिसांना अपघाताची माहिती, कागदपत्रे आणि अहवाल पाठविण्यासाठी ईमेलः

air@bajajallianz.co.in

सूचना/बोलावणे, हक्क याचिका आणि पुरस्काराची प्रत पाठविण्यासाठी एमएसीएटीला ईमेल करा:

claimslegal@bajajallianz.co.in

 • 1

  तुमचा क्लेम रजिस्टर

 • 2

  तुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.

 • 3

  सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट

मोटर इन्शुरन्स क्लेम रजिस्टर करा.

तुमच्या कारचे नुकसान झाले आहे का? घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

तुम्ही तुमचा कार इन्शुरन्स क्लेम दाखल करत असाल तर आम्ही ही प्रक्रिया अडथळामुक्त केली आहे. तुम्ही ऑनलाइन क्लेम दाखल करायचे ठरवल्यास येथे क्लिक करा. अन्यथा आमच्या टोल फ्री नंबर 1800-209-5858 वर फोन केल्यास आम्ही तुम्हाला तात्काळ मदत करू शकतो. दिवसाची कुठलीही वेळ असली तरी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.

तुम्हाला खालील गोष्टी द्याव्या लागतील.

आम्ही विनाअडथळा म्हणतो तेव्हा खरोखरच विनाअडथळा प्रक्रिया होते. तुमचा वेळ मौल्यवान आहे हे आम्हाला कळते, विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला खूप कमी गोष्टी द्याव्या लागतील.

 • संपर्क क्रमांक
 • इंजिन आणि चेसिस क्रमांक
 • अपघाताची तारीख आणि वेळ
 • अपघाताचे वर्णन आणि स्थान
 • वाहन तपासणी पत्ता
 • किलोमीटर रीडिंग

तुमचा मोटर इन्शुरन्स क्लेम दाखल केल्यावर तुम्हाला आमच्या कस्टमर सपोर्ट प्रतिनिधीकडून क्लेम रेफरंस नंबर मिळेल. तुम्हाला तुमच्या क्लेमच्या निश्चित स्थितीबाबत एसएमएसद्वारे माहिती दिली जाईल. तुमच्या जनरल इन्शुरन्स क्लेमची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या टोल फ्री नंबरवर आमच्याशी संपर्क साधून क्लेम रेफरंस नंबर देऊ शकता.

कृपया नोंद घ्या- आम्ही कोणत्याही रोडसाइड मदतीसाठी 24x7 आमचा टोल फ्री नंबर 1800-103-5858 येथेही उपलब्ध आहोत. ही सेवा आपल्या कार इन्शुरन्स पॉलिसीमध्ये या वैशिष्ट्याची निवड करणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.

तुमचे वाहन दुरूस्तीसाठी पाठवा.

आम्ही तुम्हाला तुमचे वाहन अपघात स्थळापासून (अपघात झाल्यास) गॅरेजला नेण्याचा सल्ला देऊ किंवा पुढील नुकसान टाळण्यासाठी ते टो करण्याचा सल्ला देऊ.

चोरीच्या प्रकरणी, लेखी स्वरूपात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा आणि आमच्या टोल-फ्री नंबरवर आम्हाला सूचना द्या. तुमचे वाहन 90 दिवसांत न सापडल्यास पोलिसांना नॉन ट्रेसेबल रिपोर्ट द्यायला सांगा (तुम्हाला तुमचे वाहन अद्याप मिळालेले नाही हे सांगणारे हमीपत्र) आणि हा रिपोर्ट आम्हाला पाठवा.

आता तुम्ही शांत बसून उरलेल्या गोष्टींची आम्हाला काळजी घेऊ द्या.

सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट

तुमच्या जनरल इन्शुरन्स क्लेमच्या आधारे कागदपत्रांची प्रत तुमच्या प्राधान्याच्या गॅरेज/ डीलरला पाठवा आणि त्यांना मूळ कागदपत्रांशी ती जुळवू द्या.

नुकसान खूप गंभीर स्वरूपाचे नाही ? फक्त गाडीच्या विंडशील्डला तडा गेला आहे किंवा बंपर सैल होऊन पडला आहे ? या प्रकरणी आम्ही तुम्हाला मोटर ओटीएस (ऑन-दि-स्पॉट)ला काळजी घेऊ द्या असा सल्ला देऊ.

इन्शुरन्स खरेदी करण्यापासून ते पॉलिसी रिन्यूअल एलर्ट मिळणे आणि जनरल इन्शुरन्स क्लेम्सना कळवण्याप्रयंत बजाज अलियांझ इन्शुरन्स वॉलेट हा आमचा मोबाइल अॅप तुमच्या इन्शुरन्सशी संबंधित सर्व गरजांसाठीचा वन स्टॉप सोपा अॅप आहे.

आम्ही तुमचे वाहन तुमच्या प्राधान्याच्या नेटवर्क गॅरेजमध्ये (10 कार्यालयीन दिवसांत) दुरूस्त करू, तुमच्या घरापर्यंत ते पोहोचवू आणि गॅरेजला थेट रक्कम प्रदान करू. तुम्हाला फक्त अतिरिक्त रक्कम (पॉलिसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे) आणि सर्व्हेयरने सूचित केलेले घसारा मूल्य भरायचे आहे.

बजाज अलियांझ मोटर इन्शुरन्ससोबत तुम्ही फक्त तुमचे वाहनच सुरक्षित करणार नाही तर रोडसाइड असिस्टन्स यांच्यासारख्या इतर अॅड-ऑन सुविधाही तुम्हाला मिळतील.

क्लेम अर्ज

खालील आवश्यक ते क्लेम अर्ज तुमच्या क्लेमच्या स्वरूपानुसार भरा.

 • विमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज.
 • इन्शुरन्स पॉलिसीचा पुरावा/ कव्हर नोट प्रत
 • रजिस्ट्रेशन बुक, टॅक्स रिसीटची पावती
 • त्या वेळी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या मोटर ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत.
 • पोलिस पंचनामा/ एफआयआर (थर्ड पार्टी प्रॉपर्टी नुकसानाच्या प्रकरणी)/ मृत्यू/ शारीरिक इजा
 • वाहन जिथून दुरूस्ती होणार आहे त्या दुरूस्ती कारागिरीकडून दुरूस्तीच्या खर्चाचा अंदाज
 • काम पूर्ण झाल्यावर दुरूस्ती बिल आणि पैसे भरल्याच्या पावत्या
 • रेव्हेन्यू स्टँपवर तिरकी सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज कम सॅटिसफॅक्शन व्हाऊचर.
 • विमेदाराने पूर्ण भरलेला आणि सही केलेला क्लेम अर्ज.
 • ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट
 • ओरिजिनल रजिस्ट्रेशन बुक/ सर्टिफिकेट आणि टॅक्स पेमेंट रिसीट
 • पूर्वीच्या विम्याचे तपशील- पॉलिसी नंबर, इन्शुरिंग कार्यालय / कंपनी, विम्याचा कालावधी.
 • किल्ल्या / सर्व्हिस बुकलेट / वॉरंटी कार्डचे सर्व संच.
 • पोलिस पंचनामा / एफआयआर आणि अंतिम तपासणी अहवाल.
 • आरटीओला चोरीची सूचना देणारे आणि वाहन नॉन-यूज करणारे पत्र पाठवून त्याची पावती घेतलेली प्रत.
 • विमेदाराने सही केलेला अर्ज 28, 29 आणि 30 ची प्रत.
 • लेटर ऑफ सब्रोगेशन
 • तुम्ही आणि फायनान्सरने निश्चित केलेल्या सेटलमेंट मूल्याप्रती संमती.
 • क्लेम तुमच्या हितामध्ये सेटल करायचा असल्यास फायनान्सरचा एनओसी.
 • रिक्त आणि विनातारीख वकालतनामा.
 • रेव्हेन्यू स्टँपवर तिरकी सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज व्हाऊचर.

मोटार इन्शुरन्स समजून घेवूया

मोटार/ वाहन इन्शुरन्स म्हणजे काय?

मोटार/ वाहन इन्शुरन्स म्हणजे अशी इन्शुरन्स पॉलिसी जी तुमच्या वाहनाचे प्रत्यक्ष नुकसान आणि तुमचे शारीरिक इजा/ मृत्यू आणि थर्ड पार्टी लायबिलिटीपासून संरक्षण करते. तुम्ही रस्त्यावर जेव्हा जेव्हा प्रवास करता तेव्हा ती तुम्हाला मनःशांती देते.

मी मोटर इन्शुरन्स का खरेदी करावा?

मोटर इन्शुरन्स असणे महत्त्वाचे आहे कारण तुम्हाला अशा कठीण परिस्थितीपासून तो वाचवतो जिथे मोठा खर्च उद्भवू शकतो. त्यामुळे तुमचे बजेट आणि ध्येये पूर्ण करणे तुम्हाला शक्य होते कारण अशा अपघातांच्या प्रकरणी इन्शुरन्स क्लेमद्वारे कव्हर होतात.

त्याशिवाय, तुम्हाला ते कायदेशीर अडचणींपासूनही वाचवते कारण भारतात थर्ड पार्टी इन्शुरन्स ही वैधानिक गरज आहे.

मोटर इन्शुरन्स मिळवण्यासाठी पात्रता निकष काय आहेत ?

तुमच्याकडे तुमच्या नावाने नोंदणीकृत वाहन असले पाहिजे, नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), वैध चालक परावना आणि पोल्यूशन अंडर कंट्रोल (पीयूसी) प्रमाणपत्र.

मोटर इन्शुरन्समध्ये काय कव्हर केले आहे ?

आमचा मोटर इन्शुरन्स खालील गोष्टी कव्हर करतोः

तुमच्या वाहनाचे नुकसान

आपत्कालीन घटना नैसर्गिक असो किंवा मनुष्यनिर्मित, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे वाहन किंवा त्याच्या भागांना झालेले कोणतेही नुकसान आम्ही कव्हर करू.

 

थर्ड पार्टी लिगल लायबिलिटी

तुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो. त्यामुळे आमची पॉलिसी थर्ड पार्टीच्या मृत्यू किंवा दुखापतीच्या क्लेम्ससाठी नुकसानभरपाई देण्याची तुमची कायदेशीर लायबिलिटी कव्हर करते ज्यात तुमच्या वाहनातील प्रवासी आणि तुमचा चालक यांचाही समावेश आहे.

 

पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर

तुमच्या सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही तर तुमच्या वाहनाच्या सुरक्षेला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे आम्ही 750[1] रूपयांच्या प्रीमियमसाठी वाहनाच्या मालक-चालकाला 15 लाख रूपयांचे सक्तीचे अॅक्सिडंट कव्हर देतो. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या सह प्रवाशांसाठीही अतिरिक्त कव्हरेज घेऊ शकता.

 

आम्ही वाहनातील प्रवाशांसाठी पीए कव्हरसाठी दुसरा मुद्दा समाविष्ट करू शकतो का

मोटार इन्शुरन्स पॉलिसीला अपवाद काय आहेत?

आम्ही संपूर्ण पारदर्शकतेवर विश्वास ठेवतो आणि या गोष्टी कव्हर करत नाही.

 • सामान्य घर्षण आणि घसारा
 • विद्युत/ मेकॅनिकल ब्रेकडाऊन
 • पर्याय निवडला असेल तर व्हॉलंटरी एक्सेस.
 • वैध चालक परवान्याशिवाय गाडी चालवणे.
 • गाडीचे नुकसान होण्याच्या वेळी मद्य किंवा अंमली पदार्थांच्या अंमलाखालील व्यक्ती गाडी चालवत असणे.
 • तुमच्या वैयक्तिक मालमत्तेचे नुकसान.
 • तुमच्या वेतनावरील ड्रायव्हर्सच्या कायदेशीर लायबिलिटीचे संरक्षण
 • पॉलिसी वर्डींग्सनुसार इतर कोणतेही अपवाद

मोटार इन्शुरन्स क्लेम कसा दाखल करायचा?

सर्वप्रथम तुमचा क्लेम रजिस्टर करण्यासाठी आमचा टोल-फ्री नंबर 1800-209-5858 वर कॉल करा किंवा ऑनलाइन भेट द्या. त्यानंतर अपघात झालेला असल्यास आमची टोईंग सुविधा आणि चोवीस तास रोड असिस्टन्स सुविधा वापरून तुमचे वाहन गॅरेजला न्या.

शेवटचा टप्पा म्हणजे सर्व्हे आणि क्लेम सेटलमेंट. आमच्या मोटार-ऑन-दि-स्पॉट सेवेचा वापर करून तुम्ही अत्यंत वेगवान आणि विना अडथळा पद्धतीने सेल्फ-सर्व्हे करून 20,000 रूपयांपर्यंतचे क्लेम आमच्या मोबाइल एप- इन्शुरन्स वॉलेटद्वारे दाखल करू शकता. तुमचा क्लेम 20 हजार रूपयांपेक्षा कमी रकमेचा असेल तर तुम्ही आमचा मोबाइल एप-इन्शुरन्स वॉलेटद्वारे सेल्फ सर्व्हे करू शकता.

नो क्लेम बोनस म्हणजे काय आणि मला त्याचा कसा फायदा होईल?

आमचा विश्वास आहे की चांगल्या सवयींचा गौरव केला जावा आणि नो क्लेम बोनस हा चांगले चालक असण्यासाठी आम्ही तुमचा केलेला गौरव आहे. तुम्ही मागील पॉलिसी काळात कोणताही क्लेम न केल्यास ही आम्ही तुम्हाला दिलेली भेटवस्तू आहे आणि त्याचा फायदा पुढील कालावधीत जमा केला जातो.

नो क्लेम बोनस असल्यामुळे तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 20-50% च्या दरम्यान सवलत मिळू शकते.

मला पॉलिसीत बदल / एन्डॉर्समेंट करायचे असतील तर काय ?

तुम्हाला तुमच्या पॉलिसीत बदल करायचे असतील ते एन्डॉर्समेंटने करता येईल. पॉलिसीतील स्वीकृत केलेल्या बदलाचा हा लेखी पुरावा आहे. अतिरिक्त फायदे किंवा कव्हर देण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या वेळी ते जारी केले जाऊ शकते.

नंतर एन्डॉर्समेंट करण्यासाठी, उदा. तुमचा पत्ता किंवा वाहन बदलण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा.

मला माझ्या वाहनासाठी इन्शुरन्स प्रीमियम कसा कमी करता येईल ?

तुम्ही क्लेम फ्री रेकॉर्ड ठेवल्यास तुम्हाला नो क्लेम बोनस मिळेल आणि त्यात तुम्हाला ओन डॅमेज प्रीमियमवर 50% पर्यंत सवलत मिळू शकेल.

तुमचा प्रीमियम कमी करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे व्हॉलंटरी एक्सेस होय जिथे तुम्ही प्रत्येक क्लेमसाठी एक विशिष्ट रक्कम भराल.

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go
Chat with Us