Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सायबर इन्श्युरन्स क्लेम्स प्रोसेस

तुम्ही एका सर्वांगीण जनरल इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटपासून अवघ्या एका क्लिकवर आहात

मग तो मालवेअर हल्ला असो, आयटी चोरीचे नुकसान, सायबर पाठलाग, खंडणी किंवा गोपनीयतेचा आणि माहितीचा भंग असो, आमच्या सायबर सेफ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत बजाज आलियान्झमध्ये सर्व गोष्टी कव्हर केेलेल्या आहेत. तुम्ही अशा सायबर हल्ल्याचे बळी असल्याची खात्री पटल्यावर आम्ही (हे काही कारण नाही), आमची सायबर इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कोणत्याही संभाव्य आर्थिक धक्क्यापासून सावरण्यास कव्हर करते.

सायबर क्लेम प्रोसेस

तुमचा सायबर इन्श्युरन्स क्लेम रजिस्टर करा

आमचा टोल फ्री नंबर डायल करा

1800-209-5858

आम्हाला येथे ईमेल पाठवा

bagichelp@bajajallianz.co.in

तुमच्या सायबर सेफ इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंटकडे 6 सोपी पावले

 • 1

  तुम्हाला हे कळते की थर्ड पार्टीकडून खासगीपणाचे आणि डेटाचे उल्लंघन झाले आहे

 • 2

  तुम्ही वेळ वाया न घालवता पोलिस ठाण्यात आणि सायबर सेल विभागात एफआयआर / लेखी तक्रार नोंदवता

 • 3

  तुम्हाला तुमच्या क्लेमबद्द्ल आम्हाला 1 - 2 कार्यालयीन दिवसांत कळवावे लागेल. हे तुम्ही आमच्या टोल फ्री हेल्पलाइन 1800-209-5858. वर फोन करून कळवू शकता. आम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्ध आहोत

 • 4

  तुमची सूचना आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसोबत पाठवा. (खाली चेकलिस्ट पाहा.)

 • 5

  तुम्ही तुमचे काम केले आहे, आता आम्ही आमचे काम करू. आम्ही फोरेन्सिक तज्ञांशी चर्चा करू आणि क्लेम योग्य आहे का तपासू

 • 6

  असल्यास आम्ही क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुरू करू आणि तुम्हाला पेमेंट 5 कार्यालयीन दिवसांत जमा करू

तुमचे पैसे घरी लवकर येण्यासाठी या गोष्टी विसरू नका:
 • क्लेम अर्ज- पूर्ण भरलेला आणि सही केलेला
 • एफआयआरची प्रत
 • कायदेशीर सूचनेच्या प्रती
 • न्यायालयाकडून जारी केले्लया समन्सच्या प्रती
 • आयटी चोरी नुकसानासंबंधी आर्थिक संस्थांसोबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती
 • डेटा किंंवा गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी थर्ड पार्टीला पाठवलेल्या कायदेशीर सूचनेच्या प्रती
 • संबंधित कलमांतर्गत थर्ड पार्टीविरोधात दाखल केलेल्या गुन्हेगारी खटल्याच्या प्रती
 • पुनर्स्थापना खर्चासाठीच्या बिलांच्या प्रती
 • आयटी कन्सल्टंट्स सर्व्हिसेस कव्हरअंतर्गत आलेल्या खर्चांसाठी बिलांच्या प्रती
 • थर्ड पार्टीकडून गुन्हेगारी खटला / दावा दाखल करण्यासाठी आलेल्या खर्चाच्या बिलांच्या प्रती
 • तुम्हाला झालेल्या नुकसानाचे पुरावे
 • तुमच्या मालकीच्या वैयक्तिक डेटाचे पुरावे
क्लेम फॉर्म्स:
 • पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म
 • पोलिस अधिकारी / सायबर सेलकडे दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रती
 • कोणत्याही बाधित व्यक्ती/ कंपनीकडून प्राप्त झालेल्या कायदेशीर सूचनेच्या प्रती
 • बाधित व्यक्ती/ कंपनीने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी कोणत्याही न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या समन्सच्या प्रती
 • आयटी चोरी नुकसानासंबंधी आर्थिक संस्थांसोबत केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती
 • आयटी चोरी नुकसानासाठी कोणत्याही वित्तीय संस्थेला पाठवलेली कायदेशीर नोटीस आणि/ किंवा दाखल केलेला खटला
 • डेटा उल्लंघन किंवा गोपनीयतेच्या उल्लंघनासाठी कोणत्याही थर्ड पार्टीला जारी केलेल्या कायदेशीर सूचनेच्या प्रती
 • संबंधित कलमांतर्गत थर्ड पार्टीविरोधात दाखल केलेल्या गुन्हेगारी खटल्याच्या प्रती
 • पुनर्स्थापना खर्चासाठीच्या बिलांच्या प्रती
 • आयटी कन्सल्टंट्स सर्व्हिसेस कव्हरअंतर्गत आलेल्या खर्चांसाठी बिलांच्या प्रती
 • थर्ड पार्टी विरोधात नुकसानासाठी दाखल केलेल्या गुन्हेगारी खटला / क्लेम दाखल करण्यासाठी आलेल्या खर्चाचे तपशील / बिले
 • पर्सनल डेटा ही विमेदाराच्या मालकीची माहिती असल्याचे सिद्ध करणारे पुरावे
 • विमेदाराला नुकसान झाल्याचे सिद्ध करणारे पुरावे

हे सुलभ करूया

कव्हर नोट म्हणजे काय?

हे एक तात्पुरते विमा प्रमाणपत्र आहे जे तुम्हाला पॉलिसी जारी करण्यापूर्वी तुमचा विमेदार देईल. तुम्ही प्रपोजल फॉर्म पूर्ण भरून त्यावर सही केल्यावर आणि प्रीमियम पूर्ण भरल्यावर दिले जाईल.

हे 60 दिवसांच्या कालावधीसाठी वैध आहे (जारी केल्याच्या तारखेपासून) आणि कव्हर नोटचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी विमा कंपनीला विमा सर्टिफिकेट जारी करण्याची परवानगी देते.

पॉलिसीमध्ये मला काही विशिष्ट बदल करायचे असल्यास मी काय करावे?

इथे तुम्हाला जी संज्ञा अपेक्षित आहे ती एन्डोर्समेंट आहे, जे तुमच्या विमा पॉलिसीमधील बदलांसंदर्भातील लेखी स्वरूपातील करार आहे. एन्डोर्समेंटला अॅड ऑन्स समाविष्ट करण्यासाठी आणि अधिक व्यापक कव्हरेजसाठी किंवा विशिष्ट प्रतिबंध घालण्यासाठी पॉलिसी जारी करण्याच्या कळात कार्यान्वयित करता येईल.

नो क्लेम बोनस म्हणजे काय?

तुमच्या पॉलिसीच्या कालावधीत तुम्ही एकही क्लेम न दाखल केल्यास तुम्ही नो क्लेम बोनससाठी (एनसीबी) पात्र आहात. त्यामुळे तुमच्या कार इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम कमी होतो आणि तुम्ही एक चांगले चालक असल्याचे ते प्रमाणपत्र आहे.

एनसीबी एकाच वर्गातील नवीन वाहनाला हस्तांतरित करता येईल आणि तुमच्या मोटर इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपुष्टात येण्याआधी 90 दिवसांपर्यंत तो लागू आहे. तथापि, तुमचे नवीन वाहन अधिक महागडे असल्यास तुम्हाला अधिक इन्श्युरन्स प्रीमियमच्या व्यतिरिक्त अतिरिक्त प्रशासकीय शुल्कही लागू केले जाऊ शकते.

माझ्या पॉलिसीचा कालावधी संपल्यावर मी काय करावे?

बजाज आलियान्झला तुमच्या स्पीड डायलवर ठेवा आणि तुमची पॉलिसी संपल्यास आमचा टोल फ्री क्रमांक 1800-209-5858 वर संपर्क साधा. तुम्हाला एक विनाअडथळा अनुभव देण्यासाठी आम्ही 24 तास कार्यरत आहोत!

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा