रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही बिझनेसच्या उद्देशाने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेली एक विशेष पॉलिसी आहे. या इन्श्युरन्समध्ये वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, फ्लाईट डीले, सामान हरवणे इत्यादींसह बिझनेस प्रवासादरम्यान होणाऱ्या अनपेक्षित घटना कव्हर केल्या जातात. कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे मुख्य उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की बिझनेस त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रवासाशी संबंधित समस्यांच्या आर्थिक परिणामापासून सुरक्षित ठेवू शकतात, ज्यामुळे संभाव्य जोखमीची चिंता न करता त्यांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल.
भारतातील कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स बिझनेस प्रवाशांच्या विशिष्ट मागण्यांनुसार तयार केलेल्या लाभ आणि वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक श्रेणी ऑफर करतो. प्रमुख लाभांमध्ये समाविष्ट आहे-
1) वैद्यकीय खर्च आणि आपत्कालीन वैद्यकीय निर्वासनासाठी कव्हरेज, जे कर्मचाऱ्यांना परदेशात आवश्यक वैद्यकीय लक्ष प्राप्त होण्याची खात्री देते.
2) या पॉलिसीमध्ये वैयक्तिक अपघात, चेक-इन केलेले सामान हरवणे आणि ट्रिप डीले देखील कव्हर केले जाते, ज्यामुळे विविध परिस्थितींमध्ये आर्थिक संरक्षण प्रदान केले जाते.
3) याव्यतिरिक्त, यामध्ये प्रत्यावर्तन सेवा, आपत्कालीन दातदुखी पासून आराम आणि वैयक्तिक दायित्व कव्हरेजचा समावेश होतो, ज्यामुळे ही कॉर्पोरेट प्रवाशांसाठी आवश्यक सुरक्षा जाळी बनते.
बिझनेस की आनंद? आतापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तुम्हाला हा प्रश्न शेकडो वेळा विचारला गेला असेल. तुमचे उत्तर अनेकदा पहिले असेल तर कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुमच्यासाठीच आहे.
मर्जर, ताबा आणि भागीदारी हे बिझनेस जगतातले कायम माहितीतले शब्द आहेत. बिझनेस आपले अस्तित्व परदेशी बाजारपेठांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न करत असताना कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स एक सतत प्रवास करणारे अधिकारी म्हणून तुमचे प्रवासाशी संबंधित धोक्यांपासून संरक्षण करतो.
परदेशातील बिझनेस प्रवास आनंददायी ठरू शकतो. परंतु त्याचेही काही धोके असतात. तुमच्या कनेक्टिंग फ्लाइट चुकू शकतात, सामान हरवू शकते, पासपोर्ट हरवू शकतो, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती आणि थर्ड पार्टी क्लेम्स जे तुमच्या प्रवासाचा आनंद बिघडवू शकतात. अशा परिस्थितीत एक चांगला ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला उपयोगी पडू शकतो.
काहीही चुकीचे घडण्याची भीती न बाळगता तुम्ही जगभरात फिरू शकलात तर ही चांगली गोष्ट आहे. बजाज आलियान्झ तुम्हाला नेमके हेच समाधान देते. आमच्या कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला या सर्व चिंतांमधून मुक्त करतात.
बजाज आलियान्झमध्ये आम्ही ओव्हरसीज ट्रॅव्हल शी संबंधित जवळपास सर्व धोक्यांची काळजी घेतो. बजाज आलियान्झ कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स ही एक सर्वांगीण ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी कोणत्याही बजेटला योग्य ठरते. त्यात वैद्यकीय परिस्थिती आणि आपत्कालीन घटना कव्हर केल्या जातात. आमच्या कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स सोबत रूग्णालयाचा खर्च आणि इतर संबंधित खर्चही नीट सांभाळले जाऊ शकतात.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन व्यापक कव्हरेज देतो आणि त्यात खालील गोष्टी कव्हर केलेल्या आहेतः:
प्लॅनअंतर्गत अपघातामुळे मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व कव्हर केलेले आहे.
परदेश प्रवासादरम्यान आजार किंवा दुखापतीमुळे आलेला मेडिकल खर्च कव्हर केलेला आहे. तुम्हाला आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि भारतात इव्हॅक्युएट करायची गरज असेल तर त्याचा खर्च कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत केला जाईल.
इन्श्युरन्सच्या रकमेत आपत्कालीन दाताच्या दुखण्यावरील उपचाराचा खर्च कव्हर केलेला आहे.
बिझनेस प्रवासादरम्यान इन्शुअर्ड व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांचे पार्थिव भारतात परत आणण्याचा खर्च या प्लॅनअंतर्गत केला जाईल.
चेक्ड इन बॅगेज कायमस्वरूपी आणि पूर्णपणे हरवल्यास ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर केले जाईल.
ट्राम, रेल्वे, बस किंवा विमान यांच्यासारख्या कॉमन कॅरियरमध्ये प्रवास करताना शारीरिक दुखापतीमुळे झालेला मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वही कव्हर केले जाईल.
तुम्ही परदेशी प्रवास करत असताना पासपोर्ट हरवल्यास डुप्लिकेट पासपोर्ट मिळवण्याचा खर्च कव्हर केला जाईल.
इन्शुअर्ड व्यक्तीकडून चुकीने झालेली शारीरिक इजा किंवा मालमत्तेचे नुकसान यांच्यामुळे उद्भवणारे थर्ड पार्टी क्लेम या इन्श्युरन्समधून कव्हर केले जातील.
तुम्ही हायजॅकचे बळी असल्यास शेड्यूलमध्ये नमूद केलेली कमाल रक्कम दिली जाईल.
पॉलिसी कालावधीत ट्रिप विलंबाची एक घटना आमच्याकडून कव्हर केली जाईल. मग तो भारतातून जाताना झालेला असो किंवा भारतात परतताना झालेला असो.
रूग्णालयात दाखल व्हायची गरज पडल्यास मेडिकल सेक्शनमध्ये नमूद अटींचे पालन होत असल्यास डेली अलाऊंस दिला जाईल.
अटळ परिस्थितीमुळे ट्रिप कॅन्सल झाल्यास तुम्हाला आलेला राहण्याचा आणि प्रवासाचा खर्च यांच्यासाठी कव्हर दिले जाईल. पॉलिसी कालावधीत ट्रिप कॅन्सलेशनची एकच घटना कव्हर केली जाईल.
ट्रिप रद्द झाल्यामुळे तुमचे झालेले नुकसानही कव्हर केले जाईल.
तुमचे बॅगेज 12 तासांपेक्षा अधिक काळ विलंबाने आल्यास तुम्हाला प्रसाधने, आपत्कालीन औषधे आणि कपडे खरेदी करण्यासाठी आलेला खर्च कव्हर केला जाईल.
इन्शुअर्ड व्यक्तीच्या भारतातील घरासाठी घरफोडी इन्श्युरन्स या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. प्रवास कालावधीत प्रत्यक्ष घरफोडी किंवा घरफोडीच्या प्रयत्नामुळे झालेले नुकसान कव्हर केले जाईल.
चोरी, बॅग कापणे किंवा चोरणे यांच्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीमुळे तुम्हाला रोख रकमेची गरज असल्यास आम्ही इमर्जन्सी कॅश सुविधेसह तुमच्या मदतीसाठी उपलब्ध असू.
तुम्ही चांगले गोल्फ खेळाडू असल्यास तुमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही परदेशातील कोणत्याही युनायटेड स्टेट्स गोल्फर्स असोसिएशन मान्यताप्राप्त गोल्फ कोर्सवर होल इन वन जिंकल्यास आम्ही तुम्हाला सेलिब्रेशन देऊ
कव्हरेज तपशीलासाठी पेजच्या खालील सेक्शनला रेफर करा.
सेक्शन: आमची ट्रॅव्हल पॉलिसी काय कव्हर करते
आमच्याकडून कॉर्पोरेट ट्रॅव्हल प्लॅन तुम्ही घ्यावा याची अनेक कारणे आहेत:
1 बजाज आलियान्झ तुमच्या खिशाला हलक्या प्रीमियम्ससोबत कस्टमाइज्ड प्लॅन्स देते.
2 प्रवासाच्या सर्व मोठ्या रिस्क कव्हर केल्यामुळे तुम्ही शांत चित्ताने प्रवास करू शकता.
3 सामान हरवणे, रूग्णालयाचे खर्च आणि इतर आपत्कालीन खर्चही कव्हर केलेले आहेत.
4 आमचा इंटरनॅशनल टोल-फ्री नंबर आणि फॅक्स नंबर वापरून तुम्ही आमच्यापर्यंत कोणत्याही देशातून पोहोचू शकता.
5 आम्ही कमीत कमी कागदपत्रांसह वेगवान क्लेम सेटलमेंटसाठी प्रसिद्ध आहोत.
तुम्हाला कॉर्पोरेट ट्रॅव्हल कव्हरचा आनंद वर्षातले कमाल 180 दिवस घेता येईल. एका वर्षात अनेक ट्रिप्स कव्हर केल्या जाऊ शकतात. कव्हर करण्यात आलेल्या प्रत्येक ट्रिपचा कमाल कालावधी तुम्ही निवडलेल्या प्लॅनवर आधारित 30, 45 किंवा 60 दिवस आहे.
हा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन आहे ज्यातून परदेशी प्रवासाशी संबंधित अनेक धोके कव्हर केले जातात. त्यातून 18 आणि 60 वयोगटातील कॉर्पोरेट प्रवाशांना कव्हर केले जाते.
या प्लॅनचे दोन प्रकार आहेतः:
ट्रॅव्हल कम्पॅनियन कॉर्पोरेट लाइट हा असा प्लॅन आहे ज्यात तुम्हाला 2,50,000 यूएसडीपर्यंत मेडिकल कव्हरेज मिळते
ट्रॅव्हल कम्पॅनियन कॉर्पोरेट प्लस हा प्लॅन तुम्हाला 5,00,000 यूएसडीपर्यंत मेडिकल कव्हरेज देतो
तुम्ही सातत्याने प्रवास करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी आहे. हा प्लॅन सातत्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवला आहे. त्यात ट्रॅव्हल कम्पॅनियन प्लॅनचे फायदे आणि अॅक्सिडेंटल डेथ आणि डिसेबिलिटी कव्हर (कॉमन कॅरियर) यांच्यासारखे अतिरिक्त फायदेही आहेत.
या प्लॅनचे दोन प्रकार आहेतः:
ट्रॅव्हल एलिट कॉर्पोरेट लाइट आणि ट्रॅव्हल एलिट कॉर्पोरेट प्लस- हे कॉर्पोरेट प्रवाशांसाठी खास प्लॅन्स असून त्यातील सम इन्शुअर्ड आणि प्रीमियम वेगवेगळे आहेत.
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट पॉलिसी ही कॉर्पोरेट प्रवाशांच्या गरजांची विशेष काळजी घेण्यासाठी आहे. वैध भारतीय पासपोर्ट असलेला परदेशी जाणारा कोणताही भारतीय या उत्पादनासाठी पात्र आहे. प्रपोजरचे वय 18 वर्षे आणि 70 वर्षांच्या दरम्यान असावे. हा प्लॅन अत्यंत वाजवी दरात हॉस्पिटलायझेशन आणि इतर संबंधित खर्चांसारख्या आपत्कालीन घटना अत्यंत कमी प्रीमियममध्ये कव्हर करतो.
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट पॉलिसी, अंतर्गत तुम्हाला आवश्यक असलेले ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर आणि तुम्हाला योग्य वाटणारा प्रीमियम यांच्यावर आधारित राहून विविध प्रकारचे प्लॅन्स निवडता येतात:
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट लाइट | यूएसडी 2,50,000 |
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट प्लस | यूएसडी 5,00,000 |
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट मॅक्सिमम | यूएसडी 10,00,000 |
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट एज लाइट | यूएसडी 50,000 |
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट एज प्लस | यूएसडी 2,00,000 |
ट्रॅव्हल प्राइम कॉर्पोरेट प्लॅन कमाल 365 दिवसांचा पॉलिसी कालावधी देत असून एका वर्षात कमाल 180 दिवसांचे कव्हर दिले जाते. ट्रिपचा कालावधी 30, 45 किंवा 60 दिवस असू शकतो.
होय, आमच्याकडे बजाज आलियान्झ कॉर्पोरेट एज प्लॅन आहे. हा एक ट्रॅव्हल प्लॅन आहे जो विशेषतः 61 ते 70 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाच्या गरजांसाठी बनवण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये आधीचे आजार कव्हर केले जाणार नाहीत.
तुम्हाला आवश्यक असलेल्या इन्श्युरन्स कव्हरवर आधारित दोन प्लॅन्स आहेत:
कॉर्पोरेट एज लाइट ज्यातून 50,000 यूएसडीपर्यंत मेडिकल कव्हरेज मिळेल
कॉर्पोरेट एज एलिट ज्यातून 2,00,000 यूएसडी पर्यंत मेडिकल कव्हरेज मिळेल
क्लेम रजिस्टर करण्याच्या दोन पद्धती आहेतः:
ऑनलाइन आणि ऑफलाइन
ऑनलाइन क्लेम सेटलमेंटसाठी तुम्हाला तुमचा क्लेम बजाज आलियान्झ साइटवर सादर करावा लागेल आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
ऑफलाईन क्लेम सेटलमेंटच्या बाबतीत, तुम्ही आमचा टोल फ्री नंबर 1800-209-5858 डायल करून क्लेम रजिस्टर करू शकता
कॅशलेस आणि रिएम्बर्समेंट क्लेम्स
कॅशलेस क्लेमसाठी तुम्ही कंपनीला कॉल, मेल किंवा फॅक्सद्वारे सूचना देऊ शकता आणि पॉलिसी तपशील सांगू शकता. हॉस्पिटलकडून आवश्यक ती कागदपत्रे सबमिट झाल्यावर हॉस्पिटलला गॅरंटी ऑफ पेमेंट पत्र पाठवले जाते आणि इन्शुअर्ड व्यक्तीवर मोफत उपचार होतात.
रिएम्बर्समेंट क्लेमसाठी ग्राहकाला हॉस्पिटलकडून आवश्यक ती कागदपत्रे घेऊन कंपनीला सबमिट करावी लागतात. सर्व कागदपत्रे नीट असल्यास क्लेम मान्य केला जातो आणि पेमेंट ग्राहकाच्या भारतीय बँक खात्यात एनईएफटीद्वारे पाठवले जाते. काही विशिष्ट परिस्थितीत तुम्हाला अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाऊ शकते.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्समध्ये सामान्यपणे वैद्यकीय खर्च, वैयक्तिक अपघात, चेक-इन केलेले सामान हरवणे, फ्लाईट डीले, ट्रिप रद्दीकरण, प्रत्यावर्तन, आपत्कालीन दातदुखी पासून आराम आणि वैयक्तिक दायित्व यांचा समावेश होतो. हे सुनिश्चित करते की कर्मचारी त्यांच्या बिझनेस प्रवासादरम्यान आर्थिकदृष्ट्या संरक्षित आहेत.
होय, कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अनेकदा पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थिती, पॉलिसी कालावधीच्या पलीकडे झालेले खर्च, नॉन-स्टँडर्ड उपचार आणि वाजवी सावधगिरी घेण्यात निष्काळजीपणा किंवा अयशस्वी झाल्यामुळे झालेले नुकसान वगळले जाते. सर्व वगळणुकी समजून घेण्यासाठी पॉलिसीच्या अटी काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे.
क्लेम दाखल करण्यासाठी, घटनेनंतर त्वरित इन्श्युरन्स प्रोव्हायडरला सूचित करा. वैद्यकीय रिपोर्ट्स, पोलिस रिपोर्ट्स आणि प्रवासाचा पुरावा यासारखे आवश्यक डॉक्युमेंटेशन सबमिट करा. सर्व डॉक्युमेंट्स पडताळल्यानंतर, इन्श्युरन्स कंपनी क्लेम रिव्ह्यू करेल आणि रिएम्बर्समेंट किंवा असिस्टन्सवर प्रोसेस करेल.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम ट्रिपच्या कालावधी, गंतव्य, प्रवाशांची संख्या आणि निवडलेल्या कव्हरेज मर्यादेसह अनेक घटकांवर आधारित बदलू शकतो. उच्च-जोखीम गंतव्ये आणि दीर्घ ट्रिप कालावधीचा परिणाम सामान्यपणे अधिक प्रीमियममध्ये होतो.
होय, अनेक कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी आपत्कालीन कॅश लाभ, होम बर्गलरी इन्श्युरन्स आणि गोल्फरचे होल-इन-वन कव्हर यासारखे अतिरिक्त लाभ ऑफर करतात. हे पर्क्स बिझनेस ट्रिप दरम्यान प्रवाशांसाठी अतिरिक्त मनःशांती आणि फायनान्शियल सिक्युरिटी प्रदान करतात.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.
खूप चांगली वेबसाईट. थोड्याच पायऱ्यांमधे सहजतेने पॉलिसी घेऊ शकता.
ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यासाठी जलद, सोपी व सुलभ प्रक्रिया.
तुमचे कॉर्पोरेट प्रवास सुरक्षित करण्यासाठी क्लिक करा
कोटेशन मिळवा
ट्रॅव्हल कम्पॅनियन हा एक मूलभूत ट्रॅव्हल प्लॅन आहे जो तुम्ही प्रवास करत असताना तुमच्याकडे असावा आंतरराष्ट्रीय स्तरावर. हे परदेशात असताना तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चाला कव्हर करते.
या प्लॅनमधून पुढील गोष्टी मिळतात:
कव्हरेज | लाभ - युएस $ | |
वैद्यकीय उपचारांचा खर्च, इव्हॅक्युएशन, रिपॅट्रिएशन | 50000 | |
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट | 500 | |
सामान हरवणे (चेक्ड) नोंद: प्रत्येक बॅगेजमागे कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %. |
250** | |
बॅगेजला विलंब | 100 | |
वैयक्तिक अपघात विमेदार व्यक्ती18 वर्षे वयाखालील असल्यास विमा रकमेच्या फक्त 50% |
10,000*** | |
पासपोर्ट हरवणे | 150 | |
वैयक्तिक दायित्व | 2,000 | |
**प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10% *** 18 वर्षांखालील इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम ॲश्युअर्डच्या फक्त 50%% |
ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनपेक्षा हा प्लॅन तुम्हाला जास्त व्यापक संरक्षण देतो. ट्रॅव्हल कंपॅनियन प्लॅनच्या सर्व लाभांव्यतिरिक्त, या प्लॅनमधून तुम्हाला चेक्ड बॅगेज, अपहरण, आपत्कालीन आगाऊ कॅश इत्यादींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून सुद्धा कव्हर देतो.
कव्हरेज | लाभ - युएस $ | |
वैद्यकीय खर्च आणि सुटका आणि देश प्रत्यावर्तन | 50000 | |
आपत्कालीन दातदुखी सुटका वरील (I) मध्ये समाविष्ट | 500 | |
पर्सनल ॲक्सिडेंट नोंद: 18 वर्षांखालील इन्श्युअर्ड व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सम ॲश्युअर्डच्या फक्त 50%% |
10,000** | |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | 2,500 | |
चेक केलेल्या सामानाचा तोटा** टीप: प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%. |
250** | |
बॅगेजला विलंब | 100 | |
पासपोर्ट हरवणे | 250 | |
हायजॅक | $50 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 300 |
|
ट्रिप डिले | $ 20 प्रति 12 तास ते कमाल $ 120 |
|
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 | |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स**** नोंद: कॅश अॅडव्हान्स्समध्ये डिलिव्हरी शुल्काचा समावेश असेल |
500 | |
गोल्फर होल-इन-वन | 250 | |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 | |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹1,00,000 | |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 | |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 100 | |
**प्रति बॅगेज कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %. *** 18 वर्षांखालील विमेदार व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सम इन्शुअर्डच्या फक्त 50%. ****कॅश अॅडव्हान्समध्ये डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट असतील |
ट्रॅव्हल टाईम प्लॅन मध्ये सुद्धा ट्रॅव्हल एलिट प्लॅन सारखे कव्हर मिळते. पण या प्लॅनमध्ये कव्हरेजची रक्कम ही खूप जास्त असते.
या प्लॅनअंतर्गत, तुम्हाला पुष्कळ पॉलिसी उपलब्ध आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्यासाठी योग्य पॉलिसी निवडू शकता यातील प्रत्येक पॉलिसी ही तुमच्या वैयक्तिक गरजेनुसार तयार करून दिली जाते.
तुम्ही 21 वर्षांचे असा अथवा 70 वर्षांचे, तुम्ही व्यावसायिक असा अथवा विद्यार्थी, तुमच्या गरजेनुसार अगदी योग्य असेल अशी पॉलिसी तुम्हाला मिळेल. सर्वसामान्य प्रवाशाच्या ज्या विविध गरजा असतात त्यासाठी आमच्याकडे सुयोग्य असा उपाय आहे.
ट्रॅव्हल टाईम प्लॅन हा, खाली दिल्याप्रमाणे तीन विशेष पर्यायांमध्ये मिळतो:
सिल्व्हर | गोल्ड | प्लॅटिनम | |
कव्हरेज | US$ मध्ये फायदा | US$ मध्ये फायदा | US$ मध्ये फायदा |
---|---|---|---|
वैद्यकीय खर्च कव्हर आणि रिपाट्रिएशन |
50,000 | 2,00,000 | 5,00,000 |
आपत्कालीन दंतदुखी साठी सहाय्य (I) मध्ये समाविष्ट |
500 | 500 | 500 |
वैयक्तिक अपघात विमेदार व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी विमा रकमेच्या फक्त 50%, अशा व्यक्तीचे वय यापेक्षा कमी असावेः 18 वर्ष |
15,000*** | 25,000*** | 25,000*** |
एडीअँडडी कॉमन कॅरियर | 2,500 | 5,000 | 5000 |
बॅगेजला विलंब | 100 | 100 | 100 |
चेक केलेल्या सामानाचा तोटा प्रत्येक बॅगेमागे जास्तीत जास्त 50% व प्रत्येक वस्तूमागे जास्तीत जास्त 10%. |
500** | 1,000** | 1,000** |
हायजॅक | $50 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 300 | $60 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 360 | $60 दर दिवशी ते जास्तीत जास्त $ 360 |
ट्रिप डिले | $ 20 प्रति 12 तास ते जास्तीत जास्त $ 120 |
$ 30 प्रति 12 तास ते जास्तीत जास्त $ 180 |
$ 30 प्रति 12 तास ते जास्तीत जास्त $ 180 |
वैयक्तिक दायित्व | 1,00,000 | 2,00,000 | 2,00,000 |
इमर्जन्सी कॅश अॅडव्हान्स**** आगाऊ रोख रकमेवर रक्कम पोहोचवण्याचा खर्च. |
500 | 1,000 | 1,000 |
गोल्फर होल-इन-वन | 250 | 500 | 500 |
ट्रिप कॅन्सलेशन | 500 | 1,000 | 1,000 |
होम बर्गलरी इन्श्युरन्स | ₹1,00,000 | ₹2,00,000 | ₹3,00,000 |
ट्रिप कर्टेलमेंट | 200 | 300 | 500 |
हॉस्पिटलायझेशन डेली अलाऊंस | दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 100 | दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 125 | दर दिवशी $ 25 ते जास्तीत जास्त $ 150 |
पासपोर्ट हरवणे | 250 | 250 | 250 |
**प्रति बॅगेज कमाल 50 % आणि बॅगेजमधील प्रत्येक वस्तूमागे 10 %. *** 18 वर्षांखालील विमेदार व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी सम इन्शुअर्डच्या फक्त 50%. ****कॅश अॅडव्हान्समध्ये डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट असतील. |
स्टँडर्ड कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे प्रदान केलेले संरक्षण वाढविण्यासाठी अनेक ॲड-ऑन कव्हर्स उपलब्ध आहेत. हे ॲड-ऑन्स बिझनेस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट गरजांवर आधारित कस्टमाईज केले जाऊ शकतात. लोकप्रिय ॲड-ऑन्समध्ये समाविष्ट आहे
1) हायजॅक कव्हर, जे हायजॅकिंगच्या स्थितीत भरपाई प्रदान करते आणि ट्रिप रद्दीकरण कव्हर, जे अनपेक्षित ट्रिप रद्दीकरणामुळे झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करते.
2) इतर ॲड-ऑन्समध्ये होम बर्गलरी इन्श्युरन्सचा समावेश असू शकतो, जो प्रवासादरम्यान इन्श्युअर्डच्या घरी बर्गलरीमुळे होणारे नुकसान कव्हर करतो आणि आपत्कालीन कॅश लाभ आपत्कालीन परिस्थितीत त्वरित फायनान्शियल असिस्टन्स ऑफर करतात.
कॉर्पोरेट ट्रॅव्हल इन्श्युरन्स अंतर्गत क्लेम दाखल करणे सोपे आणि त्रासमुक्त असण्यासाठी डिझाईन केलेले आहे. प्रोसेसमध्ये सामान्यपणे समावेश होतो
1) जेव्हा घटना घडते तेव्हा इन्श्युरन्स प्रोव्हायडरला सूचित करणे.
2) त्यानंतर इन्श्युअर्ड व्यक्तीला वैद्यकीय रिपोर्ट्स, पोलिस रिपोर्ट्स (चोरी किंवा नुकसान झाल्यास) आणि प्रवासाचा पुरावा यासारखे आवश्यक डॉक्युमेंटेशन प्रदान करणे आवश्यक आहे.
3) सर्व आवश्यक डॉक्युमेंट्स सबमिट केल्यानंतर, इन्श्युरन्स कंपनी क्लेम रिव्ह्यू करेल आणि त्यानुसार रिएम्बर्समेंट किंवा असिस्टन्सवर प्रोसेस करेल.
4) सुरळीत क्लेम प्रोसेस सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित पावत्या आणि रिपोर्ट्स ठेवणे महत्त्वाचे आहे.
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
(5,340 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)
मदनमोहन गोविंदाराजुलु
अगदी सरळ ऑनलाईन ट्रॅव्हल इन्श्युरन्स कोटेशन आणि किंमत. पेमेंट करणे आणि खरेदी करणे सोपे आहे
पायल नायक
खूपच यूजर फ्रेंडली व सुविधाजनक. बजाज आलियान्झ टीम, खूप आभार.
किंजल बोघारा
ट्रॅव्हल इन्श्युरन्सच्या परवडणार्या प्रीमियमसह खूप चांगल्या सर्व्हिसेस
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा