Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्ससाठी 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

हेल्थ इन्श्युरन्स

Cashless treatment at 8,000 + network hospitals

इन-हाऊसहेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम

Cover 09 plans/options with Health Prime Rider

*सर्व सेव्हिंग्स IRDAI मंजूर इन्श्युरन्स प्लॅननुसार इन्श्युरर द्वारे पुरविली जातात. स्टँडर्ड अटी व शर्ती अप्लाय होतात

 

What is Health Insurance

हेल्थ इन्श्युरन्स म्हणजे काय ?

हेल्थ इन्श्युरन्स किंवा मेडिकल इन्श्युरन्स हे एक इन्श्युरन्स प्रॉडक्ट आहे जे आजार किंवा दुखापत झाल्यास वैद्यकीय खर्चांसाठी कव्हरेज प्रदान करते. हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हॉस्पिटलायझेशन, औषधे, कन्सल्टेशन आणि इतर अनेक गोष्टींवर खर्च होणारा तुमचा मेहनतीचा निधी सुरक्षित ठेवतात. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ही तुम्ही व तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी यांमधील करार म्हणून पाहिली जाऊ शकते जी त्यांना कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कव्हर करण्यास बंधनकारक आहे.

भारतात अनेक प्रकारचे हेल्थ इन्श्युरन्स आहेत. आणि, तुम्ही तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी निवडावी जेणेकरून जेव्हा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय बिल येते तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. तुम्‍हाला तुमच्‍या प्‍लॅनमध्‍ये केवळ वैद्यकीय खर्चासाठीच संरक्षण मिळत नाही तर प्रतिष्ठित नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट आणि गुणवत्तापूर्ण हेल्थ केअर यासारख्या सुविधा देखील मिळतात.

 

2022 मध्ये कशाला हवा आहे हेल्थ इन्श्युरन्स?

एक प्रभावशाली वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी अत्यावश्यक असते कारण दिवसेंदिवस औषधांच्या आणि हॉस्पिटल ट्रीटमेंट संबंधी किमती वाढू लागल्या आहेत. तुमचा एखादा अपघात झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एक मोठा आर्थिक ताण सोसावा लागतो. एक कठोर सत्य असे की, तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेहमीप्रमाणे जा किंवा अचानक जा, तुम्हाला मोठा खर्च सोसावा लागणार हे नक्की. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे संरक्षण घेणे चांगले असते. ती तुम्हाला आर्थिक बाबी मॅनेज करण्यात तर मदत करतेच पण अत्यंत परवडणाऱ्या प्रीमियमच्या दरात इतरही अनेक लाभ देते. तुम्ही विविध हेल्थ इन्श्युरन्स कोटेशन ऑनलाईन पाहू शकता व तुमच्या बजेटमध्ये असणारे व परवडणारे तुम्ही निवडू शकता.

 

सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन असणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यासाठी 5 महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेतः:

 • आर्थिक मदत : तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या खिशातून भली मोठी वैद्यकीय बिले भरण्याचा तुमचा ताण कमी करेल. तुम्ही मेहनतीने कमावलेला पैसा वैद्यकीय सेवेवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याऐवजी तुमचे आयुष्य परिपूर्ण पद्धतीने जगण्यासाठी बचत करू शकता. जर तुम्हाला प्रीमियमच्या दरांची काळजी असेल तर अत्यंत परवडणाऱ्या प्रीमियम दरात तुम्हाला पुरेशा प्रमाणात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मिळेल याची खात्री बाळगा. तुम्हाला कौटुंबिक सवलतीसारख्या विविध सवलतीही मिळतील, त्यामुळे तुम्हाला तुलनेने कमी प्रीमियम भरत असताना तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनचे कव्हरेज कायम ठेवण्यास मदत होईल..

 • ✓ दर्जेदार वैद्यकीय सेवा : तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार करून घ्यायचे ठरवल्यास तुम्हाला कॅशलेस क्लेम आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा यांचे फायदे मिळू शकतील. एक नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे असे हॉस्पिटल ज्याचा तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीसोबत करार आहे, जे तुम्हाला तुमच्या खिशाला भोक न पाडता सर्वोत्तम उपचार मिळवण्यासाठी मदत करते.

 • ✓ कर बचत : भारतात तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्ही करत असलेल्या रकमेचे प्रदान प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 D अंतर्गत कर वजावटी साठी पात्र आहेत. तुम्ही स्वतःसाठी आणि प्रियजनांसाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी केल्यास आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास कमाल 1 लाख रूपयांपर्यंत कमाल वजावट मिळवू शकता.

 • व्यापक कव्हरेज : भारतातील हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला केवळ हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी कव्हर करत नाहीत, तर गंभीर आजार, अपघाताशी संबंधित, मातृत्व, कन्सल्टेशन्स, चेक-अप्स आणि इतर गोष्टींसाठीही कव्हर प्रदान करतात. हे विस्तृत कव्हरेज विविध प्रकारच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या विस्तृत श्रेणीद्वारे ऑफर केले जाते.

 • ✓ मनःशांती : तुम्ही आर्थिक बाबतीत सुरक्षित असाल तर रूग्णालयात दाखल व्हावे लागले तरी तुम्हाला फार ताण येणार नाही. एका तणावपूर्ण परिस्थितीत तुम्हाला शांत राहण्यासाठी वैद्यकीय इन्श्युरन्स असल्याचा फायदा मिळतो.

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स अनेक वैशिष्ट्ये आणि लाभांसह विविध कंपन्यांद्वारे ऑफर केले जाते. तुम्ही निश्चितच या पॉलिसींचे मूल्यांकन करू शकता आणि त्यांच्यामधून सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडू शकता.

 

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे प्रकार

भारतात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे सक्तीचे नाही. परंतु, मेडिकल इन्श्युरन्स असणे फायदेशीर आहे आणि अनेक लोकांनी आता हेल्थ इन्श्युरन्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरूवात केली आहे. तथापि, त्यातील अनेकांना बाजारात उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींमधील फरक समजत नाही आणि कदाचित त्यामुळे त्यांच्या विशिष्ट गरजा कव्हर न करणारा प्लॅन ते खरेदी करतात.

इथे आम्ही तुम्हाला भारतात उपलब्ध असले्ल्या विविध प्रकारच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या गरजा सर्वोत्तम पद्धतीने कोणता प्लॅन पूर्ण करतो हे ठरवता येईल:

 

 • भारतात इन्डेम्निटी वर आधारित हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स

  इन्डेम्निटीवर आधारित हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला तुमच्या हॉस्पिटलायझेशनसाठी आलेल्या खर्चाचा परतावा देतात किंवा तुम्ही निवडलेल्या विम्याच्या रकमेसाठी कॅशलेस क्लेम सेटलमेंट देतात. या प्लॅन्सना पारंपरिक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स या नावानेही ओळखले जाते. हे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स डॉक्टरांचे शुल्क, हॉस्पिटलच्या खोलीचे भाडे, ओटी (ऑपरेशन थिएटर) शुल्क, औषधे आणि इतर गोष्टींसाठी आलेल्या खर्चासाठी तुम्हाला कव्हर करतात.

 • भारतात फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स

  फिक्स्ड बेनिफिट हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीवर दावा सादर केल्यावर संपूर्ण दाव्याची रक्कम प्रदान करतात. पूर्वनिश्चित असलेले आजार, गंभीर आजार आणि अपघाताप्रकरणी आलेल्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी हे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स सामान्यतः उपयुक्त ठरतात.

 • Individual Health Insurance

  इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स

  एक परवडणाऱ्या दरातील हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन जो व्यक्तींचे वैद्यकीय बिलांपासून रक्षण करतो इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचार, डे केअर प्रक्रिया शुल्क, बॅरिएट्रिक सर्जरी, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, अवयव दाता खर्च, रुग्णवाहिका खर्च यांच्यासाठी कव्हर करते आणि रोजच्या रोख रकमेचे फायदेही देते

 • Family Health Insurance

  फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स

  हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स फॉर फॅमिली   किंवा एक फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्स तुम्हाला इंडिव्हिज्युअल सम इन्शुअर्ड (एसआय) सोबत तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना कव्हर करण्याचा पर्याय देते. या प्लॅनची काही प्रमुख वैशिष्टे अशी की त्यात अनेक सम इन्शुअर्ड पर्याय, तात्काळ फॅमिली कव्हर, आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांसाठी कव्हरेज, बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, मॅटर्निटी आणि नवजात बालक कव्हर यांचा समावेश आहे.

 • Critical Illness Insurance

  क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स

  क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला कर्करोग, ट्यूमर, स्ट्रेक इत्यादींसारख्या जीवघेण्या आजारांसाठी जास्त खर्चिक उपचारांपासून कव्हर करतात क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स कव्हरचा फायदा असा की, तुम्हाला गंभीर आजाराचे निदान झाल्यावर देय असलेले फायदे मिळण्यास मदत करते.

 • Critical Illness Insurance for Women

  क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स फॉर विमेन

  हा महिलांच्या आरोग्याचा इन्श्युरन्स महिलांना काही गंभीर आजार म्हणजे स्तनांचा कर्करोग, भाजणे, योनीचा कर्करोग अशा गंभीर आजारांचे निदान झाल्यास त्यांच्या गरजा पूर्ण करतो.

 • Health Insurance for Senior Citizens

  सीनिअर सिटीझन्ससाठी हेल्थ इन्श्युरन्स

  आपण वृद्ध होत जातो तसे आपले शरीर कमजोर होत जाते आणि तुम्हाला वयाशी संबंधित समस्यांचा त्रासही होऊ शकतो. तसेच तुमची बचत नंतरच्या कालावधीत मर्यादित राहते. सीनिअर सिटीझन्ससाठी हेल्थ इन्श्युरन्स या समस्यांची काळजी घेतो आणि तुमच्या सुवर्ण काळात तुमच्या वैद्यकीय खर्चांपासून तुमचे रक्षण करतो.

 • Health Infinity Plan

  हेल्थ इन्फिनिटी प्लॅन:

  बजाज आलियान्झचा हेल्थ इन्फिनिटी प्लॅन हा एक विशेष प्लॅन आहे ज्यात कोणतीही सम इन्श्युअर्ड लिमिट नाही. तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सपैकी एक आहे! सम इन्श्युअर्ड, प्री व पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हरेज, डे केअर प्रक्रिया, रोड ॲम्ब्युलन्स खर्च आणि मल्टीपल पॉलिसी टर्म पर्याय ही या प्लॅनची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

 • Top Up Health Insurance

  टॉप अप हेल्थ इन्श्युरन्स

  टॉप अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समुळे तुमच्या मूळ वैद्यकीय इन्श्युरन्स प्लॅनची विम्याची रक्कम संपल्यावरही तुम्हाला कव्हर केले जाईल याची काळजी घेतली जाते. बजाज आलियान्झमध्ये आम्ही टॉप अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स देतो जसे एक्स्ट्रा केअर प्लस & एक्स्ट्रा केअर जे तुमच्या विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी अतिरिक्त कव्हर देतात. या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनची प्रमुख वैशिष्टे म्हणजे प्रसूतीसाठीच्या खर्चांसाठी कव्हरेज, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, संपूर्ण कुटुंबासाठी फ्लोटर कव्हर, पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी कव्हर आणि डे केअर प्रोसिजर ही आहेत.

 • Personal Accident Insurance

  पर्सनल अ‍ॅक्सिडेंट इन्श्युरन्स

  पर्सनल अ‍ॅक्सिडंट इन्श्युरन्स तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी दुर्दैवी अपघातांदरम्यान घेते. बजाज आलियान्झमध्ये आम्ही तुम्हाला पर्सनल अ‍ॅक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी विविध वैशिष्ट्यांसह देतो जसे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी भत्ता, मुलांच्या शिक्षणाचा फायदा आणि मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, तात्पुरते अंशतः अपंगत्व, तात्पुरते संपूर्ण अपंगत्व अशा विविध गोष्टींसाठी पर्सनल गार्ड सारख्या प्लॅन्ससोबत कव्हर करते तसेच आमची ग्लोबल पर्सनल गार्ड पॉलिसी तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलात तरी अपघात आणि दुखापतींसाठी तुम्हाला कव्हर करते. आमच्या आंतरराष्ट्रीय अपघात इन्श्युरन्सची प्रमुख वैशिष्टे म्हणजे 25 कोटी रूपयांप्यंत विम्याच्या रकमेचे पर्याय, कम्युलेटिव्ह बोनस आणि जीवनशैली सुधारणा फायदा, जगात कुठेही संपूर्ण कुटुंबासाठी कव्हरेज आणि 3 वर्षांपर्यंत पॉलिसी कालावधी अशी आहेत.

 • M Care Health Insurance

  एम केअर हेल्थ इन्श्युरन्स

  बजाज आलियान्झची एम केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला 7 डासांमुळे होणाऱ्या आजारांपासून रक्षण करते जसे डेंग्यू ताप, मलेरिया, चिकनगुन्या, झिका विषाणू इत्यादी. हे आजार खूप सामान्य आहेत आणि या आजारांशी संबंधित वैद्यकीय उपचार खूप महागडी आहे. त्यामुळे आमच्या एम केअर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुम्ही डासांच्या चाव्यापासून होणाऱ्या आजारांतून बरे होत असताना स्वतःची काळजी घेऊ शकता. या पॉलिसीची प्रमुख वैशिष्टे म्हणजे कायमस्वरूपी रिन्यूअल सुविधा, 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी, विविध सम इन्शुअर्डचे पर्याय आणि कॅशलेस क्लेम सुविधा आहेत.

 • Hospital Cash

  हॉस्पिटल कॅश

  हा बजाज आलियान्झकडून दिला जाणारा टॉप अप प्लॅन असून तो तुमचे रक्षण अनपेक्षित हॉस्पिटलायझेशनच्या खर्चापासून करतो. ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला अत्यंत परवडणाऱ्या प्रीमियम दरात रोजच्या हॉस्पिटल कॅश चा फायदा देते. या आमच्या हॉस्पिटल कॅश पॉलिसीची प्रमुख वैशिष्टे म्हणजे अनेक सम इन्शुअर्ड पर्याय, लाईफटाईम रिन्युअबिलिटी, प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80D नुसार कर बचत आणि आयसीयू हॉस्पिटलायझेशनच्या प्रकरणी डबल कॅश फायदा ही आहेत.

 • Arogya Sanjeevani Policy

  आरोग्य संजीवनी पॉलिसी

  ही एक आदर्श हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी हॉस्पिटलायझेशनच्या परिस्थितीत तुमच्यावर येऊ शकणाऱ्या आर्थिक ताणाची काळजी घेते. आरोग्य संजीवनी पॉलिसी च्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये मासिक हत्त्यांवर आधारित राहून या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा हप्ता भरण्याचा पर्याय आहे (वार्षिक, अर्धवार्षिक, तिमाही किंवा मासिक), आयुष आणि मोतीबिंदू उपचारांसाठी कव्हरेज, आयुष्यभरासाठी रिन्यूअल पर्याय, 5 लाख रूपयांपर्यंत सम इन्शुअर्डचे पर्याय आणि स्वतःसाठी (वैयक्तिक) किंवा तुमच्या कुटुंबासाठीही (फॅमिली फ्लोटर) पॉलिसी खरेदी करण्याचे पर्याय आहेत.

 • Comprehensive Health Insurance

  कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्श्युरन्स

  बजाज आलियान्झची हेल्थ केअर सुप्रीम ही कॉम्प्रेहेन्सिव्ह हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी तुम्हाला विविध प्रकारच्या हॉस्पिटल खर्चांसाठी कव्हर करते. ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला व्यापक हेल्थकेअर फायदे देते आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना एक व्यापक संरक्षण देते जेणेकरून तुम्ही नशिबावर काहीच सोडून देणार नाही. या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची प्रमुख वैशिष्टे म्हणजे आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांसाठी कव्हरेज, अवयव दात्याचा खर्च, डे केअर प्रक्रिया खर्च कव्हरेज, रुग्णवाहिका खर्च आणि प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च.

 • Tax Gain

  टॅक्स लाभ

  टॅक्स गेन ही एक खास फॅमिली फ्लोटर हेल्थ पॉलिसी आहे. ती एका स्मार्ट पद्धतीने तुमच्यासाठी दोन्ही जगांतील सर्वोत्तम आणते. या प्लॅनची प्रमुख वैशिष्टे म्हणजे कॅशलेस सुविधा, को-पेमेंटला वेव्हर, प्रतीक्षा कालावधीचे बंधन नाही, रूग्णवाहिका कव्हर, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाचे कव्हरेज, प्रत्येक 4 क्लेम मुक्त वर्षांच्या शेवटी आरोग्य तपासणीचा फायदा.

 • Star Package Policy

  स्टार पॅकेज पॉलिसी

  स्टार पॅकेज पॉलिसी हा एक फॅमिली फ्लोटर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स प्लॅन आहे. त्यातून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे विविध आरोग्याचे धोक्यांपासून, शैक्षणिक अनुदान, घरगुती साहित्य आणि सामान आणि प्रवास तसेच सार्वजनिक उत्तरदायित्वापासून रक्षण होते. त्यात पर्सनल अ‍ॅक्सिडेंट कव्हरही समाविष्ट आहे.

 • Health Ensure

  हेल्थ इन्शुअर

  हेल्थ एन्शुअर हा कोणत्याही वयोमर्यादेशिवाय असलेलाल कॉम्प्रिहेन्सिव्ह हेल्थ प्लॅन आहे. त्यात डे केअर प्रक्रिया, रूग्णवाहिका खर्च, अवयव दाता खर्च आणि आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक अपघाती दुखापती यांचा समावेश आहे. सम इन्शुअर्डच्या श्रेणीच्या पर्यायांमध्ये 10 लाख रूपयांपासून ते 25 लाख रूपयांपर्यंत समाविष्ट आहे.

 • Global Personal Guard

  ग्लोबल पर्सनल गार्ड

  ग्लोबल पर्सनल गार्ड ही एक इंटरनॅशनल एक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी आहे जी अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व किंवा संपूर्ण कायमस्वरूपी अपंगत्व, अपघातामुळे होणाऱ्या इतर कोणत्याही दुखापती किंवा मृत्यू यांच्यामधून जागतिक पातळीवर व्यापक कव्हरेज देते. परदेशी प्रवास करताना ती अपघातही कव्हर करते कारण ती जागतिक कव्हरेज देते.

 

 

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे फायदे

वैद्यकीय सेवेशी संवंधित वाढता खर्च हे हेल्त इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याच्या सर्वांत मोठ्या कारणांपैकी एक आहे. आणि पुरेशा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनमध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा असा की ते तुम्हाला तुमच्या साध्या डे केअर प्रक्रिया किंवा प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठीही रूग्णालयाचे बिल भरण्यासाठी स्थैर्य देतात.

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनचे प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेतः:

 • Cashless Treatment

  कॅशलेस उपचार:

  तुम्ही उपचारासाठी एका नेटवर्क हॉस्पिटलला भेट दिल्यास तुम्हाला कॅशलेस उपचारांचे फायदे मिळू शकता. याचाच अर्थ असा की दर्जेदार आरोग्यसेवा मिळवत असातना तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या पॉलिसी नंबरची माहिती नेटवर्क हॉस्पिटलमधील इन्श्युरन्स डेस्कला द्यायची आहे. ते तुमच्या इन्श्युरन्स कंपनीकडून पूर्व मान्यता पत्राची व्यवस्था करतील आणि हॉस्पिटल आणि तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी यांच्याकडून हॉस्पिटलचे बिल समायोजित केले जाईल.

 • Tax Benefits

  कर फायदे:

  तुम्हाला भारतात तुमचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससाठीचे प्रीमियम भरून कराचे फायदे मिळू शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किंवा स्वतःसाठी हेल्थ इन्श्युरन्स घेतल्यास प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत तुम्हाला करातून सूट मिळू शकते. तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास स्वतःसाठी भरलेल्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमसाठी तुम्हाला 25,000 रूपयांपर्यंत वजावट मिळू शकते आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास 50,000 रूपयांपर्यंत मिळू शकते.

 • Daily Hospital Cash

  रोजची हॉस्पिटल कॅश*:

  तुमच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असल्यास तुम्हाला रोजच्या हॉस्पिटल कॅशचा फायदा मिळू शकतो. याचाच अर्थ असा की तुम्हाला कंपनीकडून एक निश्चित रोजची रक्कम (मर्यादित दिवसांच्या कालावधीपर्यंत) मिळू शकते आणि तिचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य / काळजीवाहकासाठी राहण्याची सोय करण्यासाठी करू शकता. हे वैशिष्ट्य इंडिव्हिज्युअल हेल्थ गार्ड, फॅमिली फ्लोटर हेल्थ गार्ड आणि हेल्थ केअर सुप्रीममध्ये उपलब्ध आहे

 • Cumulative Bonus

  संचयी बोनस

  तुम्ही मध्ये न थांबवता तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू केल्यास आणि मागील वर्षी कोणत्याही प्रकारचा दावा नसल्यास पहिल्या वर्षी तुमची विम्याची रक्कम (एसआय) 5% वाढते आणि प्रत्येक यशस्वी दावामुक्त पॉलिसी रिन्यूअलसाठी 10 % ने वाढते. आमच्या एसआयमधील ही वाढ कमाल 50% पर्यंत मर्यादित आहे. हे वैशिष्ट्य सर्व हेल्थ इन्श्युरन्स उत्पादनांसाठी उपलब्ध आहे.

 • Free Health Check-Ups

  मोफत हेल्थ चेकअप

  उपचारांपेक्षा प्रतिबंध योग्य असे म्हटले जाते. आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुम्हाला प्रतिबंधात्मक सेवेचा फायदा मिळू शकेल. वैद्यकीय बिले भरण्याची काळजी न करता तुम्ही नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेऊ शकता.

 • Life Long Renewability

  कायमस्वरूपी रिन्युअ‍ॅबिलिटी

  तुम्ही तुमची वार्षिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यावर तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्सचे फायदे दीर्घकाळासाठी घेण्यासाठी ती दरवर्षी कालावदी संपण्यापूर्वी रिन्यू करावी लागेल. रिन्यूअलच्या वेळी तुमच्या कुटुंबाचा आकार आणि आवश्यक असलेले कव्हरेज यांच्यासारख्या गरजा त्यात समाविष्ट करू शकता.

 

हेल्थ प्राईम रायडर

हेल्थ प्राईम रायडर म्हणजे काय?

हेल्थ प्राईम हा निवडक रिटेल आणि ग्रुप हेल्थ/PA प्रॉडक्ट्ससाठी रायडर आहे.. हेल्थ प्राईम हा रायडर आहे, जो अन्यथा अनकव्हर राहणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा खर्चांची काळजी घेईल.

हेल्थ प्राईम रायडर कोण निवडू शकतो?

बजाज आलियान्झ रिटेल हेल्थ इन्श्युरन्स किंवा PA पॉलिसी असलेले कोणीही स्वत:साठी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हेल्थ प्राइम रायडर खरेदी करू शकतात. हेल्थ प्राइम रायडरकडे एकूण 09 प्लॅन्स/पर्याय आहेत.

 

हेल्थ प्राईम रायडर निवडण्यासाठी पात्रता निकष?

 

प्रवेश वय निवडलेल्या बेस पॉलिसीनुसार
पॉलिसीचा कालावधी बेस प्लॅनच्या मुदतीनुसार 1 वर्ष, 2 वर्षे किंवा 3 वर्षे

 

समूह उत्पादनांसाठी, पॉलिसीचा कालावधी मूलभूत पॉलिसी कालावधीनुसार जास्तीत जास्त 05 वर्षांपर्यंत असू शकतो
प्रीमियम बेस पॉलिसीचा इंस्टॉलमेंट प्रीमियम पर्याय म्युटॅटिस म्युटंडिस हप्त्याच्या प्रीमियमवर लागू होईल

अस्वीकरण: कृपया पूर्ण अटी व शर्तींसाठी पॉलिसीच्या शब्दांचा काळजीपूर्वक संदर्भ घ्या

हेल्थ प्राईम रायडरचे लाभ

आमचे हेल्थ प्राईम रायडर हेल्थ सर्व्हिसेस सोल्यूशन्स ऑफर करतात.. आमच्या हेल्थ प्राईम रायडरच्या फायद्यांविषयी जाणून घेण्यासाठी वाचा.

टेलि कन्सल्टेशन कव्हर

जर विमाधारक सदस्य कोणत्याही आजार किंवा दुखापतीने ग्रस्त असेल तर व्हिडिओ, ऑडिओ किंवा चॅट चॅनेलद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध वैद्यकीय व्यावसायिक/चिकित्सक/डॉक्टरांशी सहजपणे संपर्क साधू शकतो. 

डॉक्टर कन्सल्टेशन कव्हर

कोणत्याही आजार किंवा दुखापतीमुळे ग्रस्त विमाधारक व्यक्तीस विहित नेटवर्क सेंटरमधून वैद्यकीय व्यवसायिक/चिकित्सक/डॉक्टरांचा सहजपणे सल्ला घेऊ शकतो. आवश्यक असल्यास, अटी व शर्तींमध्ये निर्दिष्ट केल्यानुसार मर्यादेपर्यंत विहित नेटवर्क सेंटरचाही सल्ला घेऊ शकतो.

तपासणी कव्हर – पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी खर्च

कोणत्याही आजार किंवा दुखापतीने ग्रस्त विमाधारक व्यक्ती विहित नेटवर्क सेंटर किंवा बाहेरील पॅथोलॉजी किंवा रेडिओलॉजीसाठी तपासणीसाठी सेवेचा लाभ घेऊ शकतात.. अटी व शर्तींमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही मर्यादा असेल. 

वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी संरक्षण

विमाधारक व्यक्ती खालील गोष्टींसाठी प्रत्येक पॉलिसी वर्षात एकदा विनामूल्य प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा लाभ घेऊ शकतात: 

 • ✓ ब्लड शूगर - उपवास
 • ✓ ब्लड युरिया
 • ✓ ECG
 • ✓ HbA1C
 • ✓ हेमोग्राम आणि ईएसआर
 • ✓ लिपिड प्रोफाईल
 • ✓ लिव्हर फंक्शन टेस्ट
 • ✓ सीरम क्रिएटिनाईन
 • ✓ T3/T4/TSH
 • ✓ मूत्र दिनचर्या

हॉस्पिटल्स किंवा निदान केंद्रांच्या कोणत्याही विहित यादीमध्ये कॅशलेस आधारावर हेल्थ चेक-अप सहजपणे घेतले जाऊ शकते. हे केवळ रायडर कालावधीमध्येच प्राप्त करणे आवश्यक आहे. रायडर कालावधी समाप्त झाल्यानंतर हे कव्हर वाढविले जाऊ शकत नाही. 

हेल्थ प्राईम रायडरमध्ये उपलब्ध पर्याय

चालक कालावधीच्या अंतर्गत प्रत्येक पॉलिसी वर्षात, विमाधारक सदस्य खालील टेबलमधून निवडलेल्या प्लॅननुसार कव्हरेज देण्यास पात्र आहेत.. चालकाअंतर्गत कव्हर केलेल्या प्रत्येक विमाबद्ध सदस्यासाठी प्लॅन स्वतंत्रपणे निवडला पाहिजे.. बेस पॉलिसी हा एक वैयक्तिक विमा रक्कम प्लॅन आहे की फ्लोटर प्लॅन आहे का हे वस्तुस्थितीशिवाय आहे.. रायडरसाठी प्रत्येक वर्षी एकापेक्षा जास्त रायडर कालावधीसह कव्हर लागू केले जाईल. 

वैयक्तिक पॉलिसी :

लाभ पर्याय 1 (रुपयांमध्ये) पर्याय 2 (रुपयांमध्ये) पर्याय 3 (रुपयांमध्ये) पर्याय 4 (रुपयांमध्ये) पर्याय 5 (रुपयांमध्ये) पर्याय 6 (रुपयांमध्ये)
टेलि कन्सल्टेशन कव्हर अमर्यादित अमर्यादित अमर्यादित अमर्यादित अमर्यादित अमर्यादित
(जीपीएस) (सर्व विशेषता) (सर्व विशेषता) (सर्व विशेषता) (सर्व विशेषता) (सर्व विशेषता)
डॉक्टर कन्सल्टेशन कव्हर NA 1500 3000 5000 7000 15000
तपासणी कव्हर – पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी खर्च NA NA 1000 2000 3000
वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी संरक्षण होय होय होय होय होय होय
(1 व्हाउचर) (1 व्हाउचर) (1 व्हाउचर) (1 व्हाउचर) (1 व्हाउचर) (1 व्हाउचर)

फॅमिली फ्लोटर :

लाभ पर्याय 1 (रुपयांमध्ये) पर्याय 2 (रुपयांमध्ये) पर्याय 3 (रुपयांमध्ये)
टेलि कन्सल्टेशन कव्हर अमर्यादित अमर्यादित अमर्यादित
(सर्व विशेषता) (सर्व विशेषता) (सर्व विशेषता)
डॉक्टर कन्सल्टेशन कव्हर   10,000 20,000 25,000
तपासणी कव्हर – पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी खर्च  
वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी संरक्षण होय होय होय
(2 व्हाउचर) (2 व्हाउचर) (2 व्हाउचर)

 

हेल्थ प्राईम रायडर अंतर्गत अपवाद

हेल्थ प्राईम रायडर अंतर्गत सामान्य अपवाद समजून घेऊया

 • ✓ 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी केवळ रायडर कालावधीच्या पहिल्या वर्षात लागू आहे. तरीही, ब्रेकशिवाय नूतनीकरणासाठी अपवाद लागू नाही.
 • ✓ जर चालकाच्या कालावधीदरम्यान पॉलिसी वर्षात कोणतेही कव्हरेज घेतले नसेल, तर चालकाच्या कालावधीदरम्यान पुढील पॉलिसी वर्षात लाभ घेता येणार नाही.

पुढे जाऊन आम्हाला हेल्थ प्राईम रायडर अंतर्गत विशिष्ट अपवाद समजून घेऊ या.

टेलि कन्सल्टेशन कव्हरसाठी

डिजिटल प्लॅटफॉर्मच्या बाहेर टेलिकन्सल्टेशन रायडर अंतर्गत कव्हर केलेले नाही.. बेस पॉलिसी अंतर्गत सदस्य कव्हर केले नसल्यास आणि या रायडरची निवड केल्याशिवाय टेलिकन्सल्टेशन लाभ इतर कोणत्याही सदस्याला ट्रान्सफर केले जाणार नाहीत. 

डॉक्टरांच्या कन्सल्टेशन कव्हरसाठी

तपासणी, औषधे, प्रक्रिया किंवा कोणत्याही वैद्यकीय, गैर-वैद्यकीय वस्तूंचा इतर खर्च कव्हर केला जात नाही.

तपासणी कव्हरसाठी- पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजी खर्च

जर संबंधित पॉलिसी वर्षात तपासणी कव्हरचा लाभ घेतला नसेल, तर नूतनीकरणानंतर पुढील पॉलिसी वर्षात लाभ घेता येणार नाही.. तसेच, पहिल्या 30 दिवसांचा प्रतीक्षा कालावधी तपासणी कव्हरसाठी लागू आहे- केवळ पहिल्या रायडर वर्षात आजाराशी संबंधित पॅथोलॉजी आणि रेडिओलॉजी खर्च. हा प्रतीक्षा कालावधी ब्रेकशिवाय नूतनीकरणासाठी लागू नाही.

वार्षिक प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी कव्हरसाठी

प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीचा लाभ रुग्णालयांच्या निर्धारित यादी किंवा निदान केंद्रांच्या बाहेर घेता येणार नाही. निवडक ठिकाणी, होम कलेक्शन सुविधा प्राप्त करू शकता.. होम नमुना कलेक्शन उपलब्ध नसलेल्या लोकेशनसाठी, कस्टमरला प्रत्यक्षपणे टेस्ट करावी लागेल.. वर नमूद केलेल्या सर्व टेस्ट एकाच अपॉईंटमेंटमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. 

 

आमचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स कोरोनाव्हायरस कव्हर करतात

कोरोनाव्हायरस हा प्रचंड संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो संपूर्ण जगात प्रसार करून धुमाकूळ घालतो आहे.कोरोनाव्हायरस हा प्रचंड संसर्गजन्य आहे. त्यामुळे तो संपूर्ण जगात प्रसार करून धुमाकूळ घालतो आहे. या आजारामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यांच्यावर व्यापक आणि सातत्यपूर्ण उपचारांची गरज असते आणि तुमची आर्थिक घडी ते विस्कटवू शकतात. आपण सावधगिरी बाळगणे अत्यंत महत्त्वाचे असताना हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे हा मदतीचा दुसरा भाग असू शकतो. आमच्या योजनांमधून सर्वांगीण कव्हरेज दिले जात असताना तुम्हाला कोविड 19शी संबंधित वैद्यकीय खर्च कव्हर केले जात आहेत याची खात्री बाळगता येईल. आमचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हॉस्पिटलायझेशन, डे केअर प्रक्रिया, आयुष ट्रीटमेंट, रूगणवाहिकेचे शुल्क कव्हर करतात आणि वेगवान क्लेम सेटलमेंट देतात. स्वतःला, तुमच्या कुटुंबातील सदस्य, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती मातांसाठी तुमच्या आवश्यकतांनुसार कव्हर करणारी पुरेशी पॉलिसी शोधून निवडा म्हणजे तुम्ही या कठीण परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाल. आम्ही कोरोना कवच पॉलिसी या नावाची एक निश्चित कव्हरही देतो. सामान्य समावेशांसह ही पॉलिसी विद्यमान आजार, सहआजार, घरातील काळजी आणि इतर खर्च यांची काळजी कोरोनाव्हायरसच्या उपचारांखाळी येणाऱ्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार कव्हरेज देऊन घेते.

कोरोनाव्हायरसला कव्हर करणारे बजाज आलियान्झकडून देण्यात येणारे प्लॅन्स खालीलप्रमाणे आहेत:

 • बजाज आलियान्झ इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन
 • बजाज आलियान्झ फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स
 • बजाज आलियान्झ सिल्व्हर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स
 • आरोग्य संजीवनी पॉलिसी
 • कोरोना कवच पॉलिसी

 

तुम्ही बजाज आलियान्झकडून हेल्थ इन्श्युरन्स का खरेदी करावा?

वैद्यकीय इन्श्युरन्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स ही कंपनी भारतात विविध प्रकारच्या परवडणाऱ्या दरांतील हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससोबत आघाडीवर आहे. हॉस्पिटलच्या बिलांपासून तुमच्या बचतीचे रक्षण करण्यासाठी त्या कस्टमाइज्ड आहेत. आम्हाला तुमच्या पैसा आणि वेळेचा आदर आहे आणि आमची ऑफरिंग्स तुमच्याप्रति आमच्या वचनबद्धतेत प्रतिबिंबित होतात. दुर्दैवी घटना तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात. त्यामुळे मोठ्या वैद्यकीय बिलांवर आपण मेहनतीने कमावलेला पैसा खर्च होण्यापासून सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही हे समजू शकतो आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला आमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससोबतत खालील फायदे देतो:

 • देशभरातील 8,000+ रूग्णालयांमध्ये कॅशलेस क्लेम सुविधा
 • क्लेम सेटलमेंट 60 मिनिटांत
 • क्लेम सेटलमेंट आणि तुमच्या सर्व हेल्थ इन्श्युरन्ससंबंधी प्रश्नांसाठी 24*7 कॉल सहकार्य
 • वेगवान क्लेम प्रोसेसिंगसाठी इन हाऊस हेल्थ एडमिनिस्ट्रेशन टीम
 • परवडणाऱ्या दरात कमाल कव्हरेज
 • ऑनलाइन इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे/ रिन्यू करणे सोपे
 • आमच्या हेल्थ सीडीसी (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) द्वारे 20,000 रूपयांपर्यंत वेगवान क्लेम सेटलमेंट
 • संपूर्ण देशभरात आमच्या व्यापक नेटवर्क हॉस्पिटलच्या रेंजद्वारे चांगल्या वैद्यकीय सेवा उपलब्ध

बजाज आलियान्झकडून आपण आरोग्य विमा का विकत घ्यावा?

 

Why Buy Health Insurance With Us

 

आम्ही एक पुरस्कारविजेती हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादार कंपनी आहोत आणि आमची सद्भावना तुमचा मौल्यवान वेळ आणि कष्टाने कमावलेल्या पैशाच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहे. आम्ही तुमची काळजी करतो आणि आमचा सरासरी क्लेम सेटलमेंट कालावधी 1 तासांच्या आसपास असेल याची खात्री देतो. हा 60 मिनिटांचा कालावधी हा हेल्थ इन्श्युरन्स उद्योगात सर्वांत वेगवान क्लेम सेटलमेंट कालावधींपैकी एक आहे. तसेच आमचे प्रीमियमचे दर खूप वाजवी आहेत आणि आमच्या सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अद्ययावत वैशिष्टे आणि सर्वोत्तम कव्हरेज मिळेल. आम्ही या गोष्टीसाठी वचनबद्ध आहोत की तुम्हाला तुमच्या पैशांचे मूल्य प्रत्येक टप्प्यावर मिळेल आणि त्यामुळे तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी आणि नूतनीकरण करण्याच्या प्रत्येक टप्प्यावर तसेच तुमच्या क्लेम सेटलमेंट प्रोसेसमध्ये तुमच्यासोबत आहोत.

 

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याआधी या गोष्टींचा विचार करा

आज उपलब्ध असलेले विविध प्रकारचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स आणि कव्हर्स यांच्यामुळे इन्श्युरन्स खरेदी करण्याच्या बाबतीत तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, तुमच्या गरजांनुरूप असलेली वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील माहिती असणे गरजेचे आहे.

प्रतीक्षा कालावधी, क्लेम सेटलमेंट प्रक्रिया, नेटवर्क हॉस्पिटल्सची यादी आणि इतर गोष्टींसारख्या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवल्याने तुम्हाला स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समधून निवड करण्यास मदत होईल.आपले आयुष्य सोपे बनवण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन बनवणारे घटक एका यादीत समाविष्ट केले आहेत: ते खालीलप्रमाणे आहेतः:
येथे ते आहेत:

 • ✓ कायम पुरेसे कव्हर खरेदी करा आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ते पुरेसे आहे याची काळजी घ्या.
 • ✓ कायम पुरेसे कव्हर खरेदी करा आणि तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी ते पुरेसे आहे याची काळजी घ्या.
 • ✓ अलीकडच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीच्या मेडिकल इन्श्युरन्सने कव्हर केलेले असते. मात्र, सर्व अटी आणि शर्ती जाणून घेतल्यावर तुमचा स्वतःचा मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन निवडून खरेदी करणे हा एक अतिरिक्त फयादा असतो.
 • ✓ बिगर देय नुकसानासाठी काही प्रकारची नुकसानभरपाई मिळण्यासाठी तुमच्या पायाभूत कव्हरमध्ये हॉस्पिटलसाठी रोख रक्कम, गंभीर आजार आणि इतर फायदे एकत्र करणे योग्य ठरेल.
 • ✓ कायम तुमच्य विमा कंपनीला आधी अस्तित्वात असलेल्या आजारांची माहिती द्या.
 • ✓ कव्हर्स, कमाल मर्यादा आणि प्रतीक्षा कालावधी यांची नोंद ठेवा.
 • ✓ तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्सच्या संदर्भातील संज्ञांची जसे डिडक्टिबल्स, कम्युलेटीव्ह बोनस, प्रतीक्षा कालावधी, फ्री लुक पीरियड आणि इतर अनेक गोष्टींची माहिती असेल याची काळजी घ्यावी.
 • ✓ जास्त सम इन्शुअर्ड असणे कायमच चांगले असते कारण वैद्यकीय खर्चाच्या रकमेत सातत्याने वाढ होत राहते.
 • ✓ विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंट इतिहास तपासणे योग्य ठरते. तुम्ही कायम चांगल्या क्लेम सेटलमेंट रेकॉर्ड असलेल्या कंपनीचा पर्याय निवडाव.. यामुळे तुमचा क्लेम सेटलमेंट चुकीच्या पद्धतीने थांबवला जाणार नाही याची काळजी घेतली जाते आणि भविष्यात कोणत्याही अनावश्यक क्लेमच्या समस्या थांबवू शकता.
 • ✓ तुमच्या पॉलिसीचे सातत्यपूर्ण पद्धतीने रिन्यूअल करा. अंतिम तारीख आणि रिन्यूअलची तारीख यांच्यामध्ये अंतर पडल्यास तुम्हाला विम्याच्या रकमेचे फायदे कदाचित मिळणार नाहीत.
 • ✓ क्लेमसाठी आणि सेटलमेंट प्रक्रियेसाठी मदत करणारी अंतर्गत टीम असणारी विमा कंपनी निवडा कारण ते तुम्हाला चांगला टर्नअराऊंड कालावधी आणि एक चांगली प्रक्रिया देऊ शकतात.
 • ✓ इन्श्युरन्सशी संबंधित नफा देऊ शकणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीचा पर्याय निवडा. Tयामुळे तुम्हाला तुमची विमा कंपनी बदलून तुमच्या सध्याच्या मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसीचा पर्याय निवडणे शक्य होईल.
 • ✓ तुम्ही एका सुदृढ हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करावी म्हणजे तुम्हाला तुमचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर कमी प्रीमियम रकमेवर सुरू करता येईल आणि तुम्ही निवृत्त होण्याच्या तयारीत असता तेव्हा हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्याच्या तुलनेत व्यापक कव्हरेज मिळू शकेल.
 • ✓ हॉस्पिटल्ससोबत जास्तीत जास्त भागीदारी असलेल्या हेल्थइन्श्युरन्स पॉलिसीची निवड तुम्ही करावी म्हणजे तुम्हाला कॅशलेस क्लेमचा फायदा मिळू शकेल.
  .

या मुद्द्यांमुळे तुम्हाला एक योग्य निर्णय घेणे शक्य होईल हेल्थ इन्श्युरन्सची तुलना करा आणि तुमच्यासाठी तसेच तुमच्या कुटुंबासठी सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन निवडण्यास मदत होईल अशी आशा आहे. 

 

हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज

 • In Patient Hospitalization

  इन पेशंट हॉस्पिटलायझेशन

  आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कोणताही आजार, अपघात आणि इजा यांच्यासाठी रूग्णालयात तुमच्यावर होणाऱ्या उपचारांना आलेल्या खर्चांसाठी पूर्ण काळजी घेऊन कव्हर करेल.

 • Pre & Post Hospitalization expenses

  प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च

  तुम्ही अनुक्रमे 60 दिवस आणि 90 दिवसांपर्यंत प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी पात्र असाल, हे खर्च तुम्हाला मिळत असलेल्या उपचारांशी संबंधित असल्यास.

 • Organ donor expenses

  अवयव दाता खर्च

  एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अवयव दान करणे हे एक परोपकारी कार्य आहे आणि बजाज आलियान्झमध्ये आम्ही तुम्हाला या सत्कार्यासाठी शक्य तितकी मदत करतो. आमचे बरेचसे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला अवयव दानाशी संबंधित शस्त्रक्रिया / वैद्यकीय प्रक्रियांसाठी कव्हर करतात.

 • Day care procedures

  डे केअर प्रोसीजर्स

  तंत्रज्ञानाचा विकास होत असताना तुम्हाला छोट्या वैद्यकीय प्रक्रिया ऊर्फ डे केअर प्रक्रियांसाठी 24 तासांपेक्षा अधिक काळ रूग्णालयात राहायची गरज नाही. आणि आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला या उपचारांसाठीही कव्हर करतात.

 • Ambulance Charges

  रुग्णवाहिकेचा खर्च

  बजाज आलियान्झमध्ये आम्ही रूग्णालयात जात असताना किंवा रूग्णालयातून परतताना येणाऱ्या रूग्णवाहिकेच्या शुल्कासाठी तुम्हाला कव्हर करतो.

 • Convalescence Benefit

  कॉन्व्हलेसन्स लाभ

  बजाज आलियान्झच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत 10 दिवस किंवा अधिक काळासाठी सातत्यपूर्ण हॉस्पिटलायझेशन करावे लागल्यास वार्षिक 5,000 रूपयांच्या फायद्याच्या प्रदानासाठी पात्र असाल.

 • Ayurvedic / Homeopathic expenses

  आयुर्वेदिक/ होमिओपॅथिक खर्च

  पर्यायी उपचार पद्धती म्हणून तुम्ही घेत असले्लया आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक उपचारांसाठीचा खर्च आम्ही तुमच्यासाठी कव्हर करू.

 • Maternity expenses and new born baby cover

  प्रसूती खर्च आणि नवजात बालक कव्हर

  आमचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला प्रसूतीचे खर्च आणि नवजात बालकाच्या उपचारासाठी येणारे वैद्यकीय खर्च यांच्यासाठी विशिष्ट अटी आणि शर्तींच्या सापेक्ष कव्हर करतात.

 • Daily Cash Benefit

  रोज रोख लाभ

  आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुम्हाला रोजच्या रोख रकमेचाही फायदा मिळू शकतो. त्याचा वापर तुम्ही तुमच्यासोबत रूग्णालयात राहणाऱ्या व्यक्तीच्या निवासासाठी करू शकता.

यातून तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेजबद्दल माहिती मिळत असली तरी तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांकडे त्या देत असलेल्या विविध अतिरिक्त लाभांबद्दल चौकशी केली पाहिजे. तसेच, समावेश आणि अपवादांची तपशीलवार यादी जाणून घेण्यासाठी, पाहा हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी वर्डींग्स पाहा

 

अपवाद

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधील सामान्य अपवाद खालीलप्रमाणे आहेत:

 • युद्ध:

  आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी युद्धामुळे होणाऱ्या उपचारांच्या खर्चासाठी आणलेले कोणतेही क्लेम्स कव्हर करत नाहीत.

 • दातांचे उपचार:

  अत्यंत गंभीर अपघाती इजा किंवा कर्करोग यामुळे उद्भवलेल्या दातांच्या उपचारांखेरीज इतर उपचारांसाठी आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कव्हर करत नाहीत.

 • बाह्य उपकरणे / साधने:

  चष्मा, काँटॅक्ट लेन्सेस, श्रवणयंत्रे, क्रचेस, कृत्रिम अवयव, कवळी, कृत्रिम दात इत्यादी गोष्टींचा खर्च हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स कडून देण्यात येणाऱ्या कव्हरेजमधून वगळण्यात आला आहे.

 • हेतुपुरस्सर स्वत:ला इजा करणे:

  तुमची काळजी घेणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि विशेषतः स्वतःला इजा करून घेताना आम्ही तुम्हाला पाहू शकत नाही. आमचे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हेतुपुरस्सर स्व-दुखापतीसाठी तुम्हाला कव्हर करत नाहीत.

 • प्लास्टिक सर्जरी:

  कर्करोग, भाजणे किंवा अपघाती शारीरिक इजा यांच्यासाठी अत्यावश्यक असल्याशिवाय इतर कोणत्याही प्रकारची कॉस्मेटिक सर्जरी आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधून वगळण्यात आली आहे.

 • भारताबाहेर उपचार:

  आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्ही भारताबाहेर घेत असलेल्या कोणत्याही उपचारांसाठी तुम्हाला कव्हर करत नाहीत.

योग्य हेल्थ इन्श्युरन्स कव्हर कसे निवडायचे?

आपली आवश्यकता सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स हेल्थ इन्श्युरन्सचे उपयुक्त वैशिष्ट्य
ज्येष्ठ नागरिकांसाठी कव्हरेज बजाज आलियान्झ सिल्व्हर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स अगोदरच्या आजाराला कव्हर करते
तुमच्या कुटुंबासाठी एकाच प्लॅनमध्ये कव्हरेज बजाज आलियान्झ हेल्थ इन्फिनिटी प्लॅन, इंडिव्हिज्युअल हेल्थ गार्ड प्लॅन आणि हेल्थ केअर सुप्रीम इन्श्युरन्सची रक्कम
गंभीर आजारांसाठी कव्हरेज बजाज आलियान्झ क्रिटिकल इलनेस कव्हर 100% पेआऊट
कोरोनाव्हायरसच्या साथीसाठी कव्हरेज इतर हेल्थ उत्पादनांमध्ये नमूद केलेले आरोग्य संजीवनी पॉलिसी आणि हेल्थ इन्डेम्निटी कलम
प्रीमियम भरण्यासाठी हप्त्यांची सोय
महिलांसाठी विशिष्ट गंभीर आजारांसाठी कव्हर बजाज आलियान्झ क्रिटिकल इलनेस प्लॅन्स फॉर विमेन जन्मजात अपंगत्व लाभ
अपघातामुळे शरीराला होणारी इजा किंवा मृत्यू यांच्यापासून कव्हरेज बजाज आलियान्झ पर्सनल गार्ड चाइल्ड एज्युकेशन बेनिफिट
अपघातामुळे शरीराला होणारी इजा किंवा मृत्यू यांच्यापासून कव्हरेज बजाज आलियान्झ पर्सनल गार्ड चाइल्ड एज्युकेशन बेनिफिट
डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून कव्हरेज बजाज आलियान्झ एम केअर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स कॅशलेस सुविधाेसह सर्वांसाठी कव्हर

हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम

हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडरला देय करत असलेली रक्कम होय जेणेकरून तुम्हाला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत योजनाबद्ध आर्थिक मदत मिळेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला आरोग्यासंबंधी खर्चांसाठी त्यांच्या सेवा घेण्यासाठी नियतकालिक पद्धतीने (सामान्यतः वार्षिक) प्रदान करत असलेली रक्कम होय. विविध हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींचे त्यांच्याकडून देण्यात येत असलेल्या कव्हरेजवर आधारित विविध प्रीमियम्स असतात. कोणतेही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही विचारात घ्यावा असा एक मोठा घटक म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम होय. तुम्ही बजाज आलियान्झचे मोफत ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर वापरून तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कोटेशनचा अंदाज किंवा तुमच्या पॉलिसीसाठी भरावे लागणारे प्रीमियम शोधू शकता.

हेल्थ व्हिलर इन्श्युरन्स प्रीमियमवर परिणाम करणारे घटक

तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम ठरवणारे काही विशिष्ट घटक आहेत:

 • ✓ निवडलेली सम इन्शुअर्ड : तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सच्या गरजांनुसार तुम्ही निवडलेले कव्हरेज आणि तुम्ही निवडलेली विम्याची रक्कम यांच्यावरही आधारित असतो.

 • ✓ कव्हर केलेल्या सदस्यांची संख्या : तुम्ही कव्हर होण्यासाठी तुमच्या सदस्यांची संख्या वाढवल्यास तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम बदलतो. फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये हे घडते.

 • ✓ वय : तरूण लोक हे वृद्धांच्या तुलनेत सुदृढ असतात आणि त्यांच्याशी संबंधित धोका कमी असतो. त्यामुळे तुम्ही तरूण असताना हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेतल्यास तुमचा प्रीमियम कमी असतो.

 • ✓ बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) : तुमची उंची आणि वजन यांचे प्रमाण म्हणजे तुमचा बीएमआय होय. तुमचा बीएमआय सामान्य मर्यादेपेेक्षा जास्त असल्यास तुम्हाला जास्त हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरावा लागू शकतो.

 • ✓ वैद्यकीय इतिहास : तुमच्या कुटुंबात एखाद्या आजाराचा इतिहास असल्यास किंवा तुम्हाला एखादा गुंतागुंतीचा वैद्यकीय आजार असल्यास तुम्हाला जास्त प्रीमियम भरण्याची गरज पडू शकते.

 • ✓ तंबाखू सेवन : तुम्ही तंबाखू किंवा तंबाखूसंबंधी उत्पादनांचे धूम्रपान करत असल्यास किंवा खात असल्यास तुमच्या प्रीमियमचा खर्च वाढू शकतो.

 • ✓ महिलांना जास्त वेळा रूग्णालयात जाण्याची गरज भासत असल्यामुळे पुरूषांच्या तुलनेत त्यांना जास्त प्रीमियम भरावा लागू शकतो.

तुमच्या वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी प्रीमियमवरील सर्वांत मोठा प्रभाव म्हणजे त्यासोबत येणारे हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज आहे.

 

हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रीमियमची ऑनलाईन गणना करण्याच्या स्टेप्स

 

तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्हाला भरावयाच्या अंदाजित प्रीमियमची रक्कम जाणून घेण्यासाठी बजाज आलियान्झच्या मोफत हेल्थ इन्श्युरन्स कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम ऑनलाईन मोजण्यासाठी जलद आणि सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे आहेत:

 • स्टेप 2 : तुमची वैयक्तिक माहिती जसे तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, तुम्हाला हवी असलेली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आणि निवडलेल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला कुटुंबातील ज्या सदस्यांना कव्हर करायचे आहे त्यांचे तपशील, तुमचा पिनकोड, संपर्क क्रमांक तेथे नमूद करा.

 • स्टेप 3 : गेट माय कोट बटणावर क्लिक करा.

 • स्टेप 4 : तुमचे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम तपशील स्क्रीनवर दाखवले जातील. जिथे तुम्ही तुमच्या सोयीने सह प्रदान निवडू शकता आणि हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी प्लॅन कन्फर्म करा बटणावर क्लिक करू शकता.

तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स क्वोट्स मिळाल्यावर आणि तुमचा प्रीमियम तुम्ही ऑनलाइन भरल्यावर तुम्हाला तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी (सॉफ्ट कॉपी) तात्काळ मिळेल.

हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस

तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारासोबतचा हेल्थ इन्श्युरन्स क्लेम एकतर कॅशलेस क्लेम सेटलमेंटद्वारे किंवा रिएम्बर्समेंट क्लेम सेटलमेंट प्रक्रियेद्वारे सेटल करू शकता. तुमचे हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सेटल करण्या्च्या दोन्ही पद्धती सोप्या, वेगवान आणि सोयीच्या आहेत.

 • कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट

  तुम्हाला तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्येवर उपचार स्वतःच्या खिशातून पैसे खर्च न करता घेता येतील. तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत कॅशलेस क्लेमचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. तुमचे मेडिकल बिल तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलकडून आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून तुमच्या पॉलिसीत नमूद अटी आणि शर्तींनुसार भरले जाईल. भारतातील अनेक हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या एक हेल्थ कार्ड देतात ज्याचा वापर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळवण्यासाठी केला जाऊ शकतो.

 • रिएम्बर्समेंट हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट

  तुम्ही तुमच्या आजारावरील उपचार बिगर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये करायचे ठरवल्यास किंवा तुमच्या प्राधान्याचे हॉस्पिटल नेटवर्क हॉस्पिटल नसल्यास तुम्ही रिएम्बर्समेंट हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल करू शकता. एक हेल्थ इन्श्युरन्स क्लेम नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमची हॉस्पिटलची बिले आणि मिळालेल्या उपचारांशी संबंधित वैद्यकीय नोंदींची माहिती तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला पाठवावी लागेल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यावर क्लेमची रक्कम तुमच्या नोंदणीकृत बँक खात्यात समायोजित केली जाईल.

 • नियोजित हॉस्पिटलायझेशन

  तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसारख्या नियोजित वैद्यकीय प्रक्रिया करायच्या असल्यास कोणतीही रक्कम न भरता शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी तुम्ही कॅशलेस क्लेम सुविधेचा वापर करू शकता. तुम्हाला फक्त नेटवर्क हॉस्पिटलमध्ये प्री-ऑथोरायझेशन फॉर्म भरायचा आहे आणि ते हा अर्ज तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला पाठवतील. ती कंपनी आवश्यक त्या तपशिलांची पडताळणी करेल आणि कॅशलेस उपचारांसाठी मान्यता देईल.

 • इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन

  एखाद्या अपघातासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीने दिलेल्या हेल्थ कार्डचा वापर करून प्री-ऑथोरायझेशन पत्रासोबत ते सादर करू शकता.तुम्हाला मान्यता मिळाल्यास तुम्ही कॅशलेस क्लेम्सचा फायदा घेऊ शकता. नसल्यास तुम्ही रिएम्बर्समेंट हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सेटलमेंट प्रक्रिया वापरू शकता.

 • हेल्थ सीडीसी

  हेल्थ सीडीसी (क्लेम बाय डायरेक्ट सेटलमेंट) हे बजाज आलियान्झकडून तुम्हाला 20,000 रूपयांपर्यंतचे हेल्थ इन्श्युरन्स क्लेम्स आमच्या कॅरिंगली युर्स मोबाइल एपचा वापर करून तात्काळ सेटल करण्यासाठी देण्यात आलेले वैशिष्ट्य आहे.

 

नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे काय?

नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे असे हॉस्पिटल ज्याने तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीसोबत करार केला आहे. हॉस्पिटल व तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडर यांच्यातील करार तुम्हाला कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स क्लेमचा लाभ प्रदान करण्यास मदत करतो. तुम्ही ऑनलाईन बजाज आलियान्झ नेटवर्क हॉस्पिटलची सूची पाहू शकता. तुम्ही आमच्या वेबसाईटवर हॉस्पिटलचे नाव किंवा तुम्हाला कोणत्या शहरात वैद्यकीय उपचार घ्यायचे आहेत त्या शहराचे नाव एन्टर करून नेटवर्क हॉस्पिटल शोधू शकता. शोध निकष एन्टर केल्यानंतर तुम्हाला ‘हॉस्पिटल शोधा’ बटनावर क्लिक करावे लागेल. तुमच्या शोध निकषाच्या आधारावर नेटवर्क हॉस्पिटलची सूची प्रदर्शित केली जाईल.

तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या उपचारासाठी नेटवर्क हॉस्पिटल निवडण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

 • तुम्हाला कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्सचे फायदे मिळतात जेणेकरून तुम्हाला समोरून उपचाराचा खर्च करावा लागत नाही.
 • तुम्हाला उत्तमरित्या प्रशिक्षित डॉक्टर्स, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि वर्गातील सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी यांच्यासह दर्जाची हमी मिळते.
 • तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराकडून तुमच्या वैद्यकीय बिल प्रदानाची काळजी घेतली जाते तेव्हा तुम्ही शांतपणे राहू शकता.
 • तुमची हॉस्पिटलायझेशन आणि प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन उपचारांदरम्यान आवश्यक ती काळजी घेतली जाते.

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचे कर फायदे

भारतात तुम्ही तुमच्यासाठी आणि / किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरल्यास प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80D अंतर्गत कर फायदा मिळू शकेल. तुम्हाला मनःशांती देण्याबरोबरच वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत, दर्जेदार आरोग्यसेवांपर्यंत पोहोच, सोपी, वेगवान आणि अडथळामुक्त दावा सेटलमेंट प्रक्रिया हे सर्व देऊन तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला करबचत करण्यात मदत करून तुमची काळजी घेते. त्यामुळे तुम्ही एका सुयोग्य हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून खूप बचत करू शकता.
.

एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला भरलेल्या प्रीमियमच्या बदल्यात प्राप्तीकर कायदा 1961 च्या कलम 80 D अंतर्गत 1 लाख रूपयांपर्यंत करबचत करण्यात मदत करू शकते. कलम 80 D वजावटीनुसार तुम्हही कर फायदा खालीलप्रमाणे मिळवू शकता:

 • स्वतःसाठी, तुमचे जोडीदार, मुले आणि पालकांसाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा पर्याय निवडून तुम्ही तुमच्या करांवर वार्षिक 25,000 रूपये वजावटीच्या स्वरूपात मिळवू शकता. (परंतु तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक नसल्यास.).
 • तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांसाठी प्रीमियम भरल्यास (वय वर्षे 60 किंवा अधिक) करांच्या हेतूसाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स बेनिफिट कमाल 50,000 रूपयांपर्यंत आहे.
 • त्यामुळे तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि तुमचे आईवडील ज्येष्ठ नागरिक असल्यास तुम्हाला एक करदाता म्हणून कलम 80D अंतर्गत एकूण 75,000 रूपयांचा कमाल कर फायदा मिळू शकेल.
 • तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमच्या आईवडीलांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम भरत असल्यास कलम 80D अंतर्गत तुम्हाला कमाल कर फायदा 1 लाख रूपये मिळू शकतो.

 

तुम्हाला या सामान्य हेल्थ इन्श्युरन्स संज्ञा माहीत असल्या पाहिजेत

 •   1

  सम इन्शुअर्ड (एसआय: तुम्ही रूग्णालयात दाखल झाल्यास तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी तुम्हाल देय असलेली कमाल रक्कम म्हणजे सम इन्शुअर्ड होय. तुम्ही निवडलेल्या सम इन्शुअर्डपेक्षा अधिक तुमच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च झाल्यास तुम्हाला सम इन्शुअर्डपेक्षा अधिक असलेली रक्कम स्वतः भरावी लागेल. त्यामुळे तुम्ही जास्त सम इन्शुअर्ड असलेले हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स निवडले पाहिजेत.

 •   2

  पूर्वी पासून असलेले रोग: तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेण्यापूर्वी काही आजार असल्यास ते आजार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांच्या वर्गवारीत येतात.

 •   3

  प्रतीक्षा कालावधी: तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे संपूर्ण किंवा काही प्रमाणात कव्हरेज सुरू होण्यापूर्वी तुम्हाला या कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे संपूर्ण किंवा काही प्रमाणात कव्हरेज सुरू होण्यापूर्वी तुम्हाला या कालावधीसाठी प्रतीक्षा करावी लागेल.

 •   4

  उप मर्यादा: एका विशिष्ट आजारासाठी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारांना करायच्या खर्चावर मर्यादा आणण्यासाठी ते ठेवत असलेली मर्यादा म्हणजे उप मर्यादा होय. हे मुख्यत्वे खोटे क्लेमचे दावे कमी करण्यासाठी केले जाते. अनेक हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांचे खोलीचे भाडे, सामान्य आजार, पूर्वनियोजित प्रक्रिया, रूग्णवाहिकेचा खर्च आणि डॉक्टरांची फी यांच्यावर उप मर्यादा ठेवतात. उप मर्यादा ही तुम्ही निवडलेल्या सम इन्शुअर्डची निश्चित टक्केवारी असते किंवा तुम्ही आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीने आपसात मान्य केलेली रक्कम असते.

 •   5

  को-पेमेंट: को-पेमेंट किंवा को-पे ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी तुमच्या आरोग्याशी संबंधित खर्चांसाठी प्रदान करण्यापूर्वी तुम्ही प्रदान करायची तुमच्या क्लेमच्या रकमेतील एक ठराविक टक्केवारी आहे. को-पेचा निर्णय तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करता किंवा रिन्यू करता तेव्हा घ्यायचा असतो. जास्त को-पेमुळे तुमच्या प्रीमियमची रक्कम कमी होऊ शकते.

 •   6

  डिडक्टिबल: तुमचे हेल्थ केअरचे खर्च पूर्ण करण्यासाठी तुम्ही आणि तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी यांच्यादरम्यान खर्चाच्या वाटपाची संकल्पना म्हणजे डिडक्टिबल आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा हेल्थ इन्श्युरन्स क्लेम कराल तेव्हा तुम्हाला ही एक निश्चित रक्कम भरावी लागेल. तुमच्या डॉक्टर / हॉस्पिटलच्या भेटी वारंवार नसल्यास तुम्हाला जास्त डिडक्टिबल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स फायदेशीर ठरू शकतात. तसेच, जास्त डिडक्टिबल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स घेतल्याने तुमची प्रीमियमची रक्कम कमी होण्यासही मदत होऊ शकते.

 •   7

  खोली भाडे मर्यादा: तुम्ही रूग्णालयात दाखल झाल्यास तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला देत असलेले रोजच्या खोलीच्या भाड्यासाठीचे कमाल कव्हरेज म्हणजे खोली भाडे मर्यादा होय.

 •   8

  कोइन्श्युरन्स: तुमच्याकडे अनेक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असल्यास तुम्ही त्या सर्वांमध्ये हेल्थ इन्श्युरन्सचा दावा दाखल करू शकता आणि तुम्ही ठरवलेल्या निश्चित टक्केवारीनुसार सर्व हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांकडून तुम्हाला दाव्याच्या रकमेचा परतावा मिळेल. या संकल्पनेला कोइन्श्युरन्स असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही दोन हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांदरम्यान (ए आणि बी) अनुक्रमे 40% आणि 60% असा कोइन्श्युरन्स ठरवल्यास, तुम्हाला 1 लाख रूपयाच्या क्लमेवर ए कंपनी 40,000 रूपयांचा परतावा देईल आणि कंपनी बी तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींच्या अटी आणि शर्तींनुसार 60,000 रूपयांचा परतावा देईल.

 •   9

  मोफत लुकअप कालावधी: हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या तुम्हाला 15 दिवसांचा मोफत लुक अप कालावधी देतात. या कालावधीत तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तपासू शकता आणि ती तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे का याचा निर्णय घेऊ शकता.तुम्हाला हा तुमच्यासाठी पुरेसा इन्श्युरन्स प्लॅन नाही असे वाटल्यास तुम्ही 15 दिवसांत ही मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी रद्द करू शकता. तुम्ही पॉलिसी 15 दिवसांत रद्द केल्यास रद्दीकरण शुल्क लागू होणार नाही. परंतु, तुम्ही निर्णय घ्यायला जितका वेळ लावाल त्या कालावधीसाठी तुम्हाला प्रीमियम आकारला जाईल.

 • 10

  वाढीव कालावधी: तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर तुम्हाला तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नूतनीकरण करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी मिळतो. या 30 दिवसांच्या कालावधीला वाढीव कालावधी असे म्हणतात. तुम्ही या 30 दिवसांत तुमची पॉलिसी रिन्यू केल्यास तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे फायदे मिळतात, जसे प्रतीक्षा कालावधी, पूर्वीपासून असलेल्या रोगांसाठी कव्हरेज इत्यादी पुनर्स्थापित करणे. पण या वाढीव कालावधीत तुम्ही केलेल्या क्लेमसाठी तुम्हाला कव्हर केले जाणार नाही.

हेल्थ इन्श्युरन्स आणि मेडिक्लेम इन्श्युरन्समधील फरक

 

हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आणि मेडिक्लेम पॉलिसी यांच्यामधील फरक काय हे तुम्हाला जाणून घ्यायचे असल्यास तुम्हाला पुढे वाचायची गरज आहे.

मेडिक्लेम इन्श्युरन्स ही इन्श्युरन्सची वर्गवारी आहे. मेडिक्लेम पॉलिसी मेडिक्लेम पॉलिसीच्या कालावधीदरम्यान फक्त हॉस्पिटलायझेशनशी संबंधित खर्च कव्हर करते. मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्सप्रमाणे मेडिक्लेम प्लॅन तुम्हाला सर्वांगीण कव्हरेज देणार नाही. भारतात मेडिक्लेम इन्श्युरन्स आणि हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीदरम्यान इतरही काही फरक आहेत.

खालील तक्त्यात आम्ही मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स आणि मेडिक्लेम पॉलिसी यांच्यादरम्यान हे फरक अधोरेखित केले आहेत जेणेकरून तुम्हाला अधिक चांगल्या रितीने समजून मेडिकल इन्श्युरन्स ऑनलाइन किंवा अन्यथा घेण्याबाबत योग्य निर्णय घेता येईल.

 

फरकाचा मुद्दा हेल्थ इन्श्युरन्स मेडिक्लेम पॉलिसी
कव्हरेज व्यापक कव्हरेज देते. जसे हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी कव्हरेज, वार्षिक आरोग्य तपासणीसाठी कव्हरेज, ओपीडी खर्च, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, रोजच्या रोख रकमेचा फायदा आणि इतर. मेडिक्लेम पॉलिसी अपघातादरम्यान, अचानक आलेले आजार आणि शस्त्रक्रियेबाबतच्या हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर करते.
अ‍ॅड-ऑन कव्हर तुम्ही बजाज आलियान्झचे एक्स्ट्रा केअर अ‍ॅड-ऑन कव्हर, हॉस्पिटल कॅश डेली अलाऊन्स पॉलिसी यांचा पर्याय निवडू शकता. मेडिक्लेम पॉलिसीसोबत अ‍ॅड-ऑन कव्हर्स खरेदी करता येणार नाहीत.
सम इन्शुअर्ड 1.5 लाख ते 25 कोटी रूपयांपर्यंत व्यापक श्रेणीत विविध सम इन्शुअर्डचे पर्याय. मेडिक्लेम पॉलिसीसाठी कमाल सम इन्शुअर्ड 5 लाख रूपयांपर्यंत असू शकते
क्लेम तुम्ही तुमचे क्लेम्स कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट प्रक्रियेद्वारे सेटल करू शकता. गंभीर आजाराचे कव्हर यासारख्या हेल्थ कव्हर्समध्ये तुम्हाला क्लेम सेटलमेंटसाठी एकरकमी रक्कमही मिळू शकते. मेडिक्लेम पॉलिसीसोबत तुम्ही तुमची एसआय संपेपर्यंत पॉलिसीच्या वर्षात क्लेम सेटल करू शकता.
लवचिकता जास्त लवचिक कारण तुमच्याकडे विविध सम इन्शुअर्ड पर्याय, अ‍ॅड ऑन कव्हर्सचे पर्याय, सम इन्शुअर्ड वाढवण्याची सुविधा आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज असे पर्याय आहेत. हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सच्या तुलनेत मेडिक्लेम पॉलिसी तितकीशी लवचिक असेलच असे नाही.
क्रिटीकल इलनेस कव्हर क्रिटिकल इलनेस कव्हर देते. मेडिक्लेम पॉलिसीमध्ये क्रिटिकल इलनेस कव्हर मिळेलच असे नाही.

 

मेडिक्लेम आणि मेडिक्लेम पॉलिसी यांच्यामधील फरकाच्या माहितीमुळे तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स आणि मेडिक्लेम पॉलिसी यांच्यातील फरक समजला असेल अशी आशा आहे.

दीर्घकालीन विरूद्ध लघुकालीन हेल्थ इन्श्युरन्स

 

फरकाचा मुद्दा लघुकालीन हेल्थ इन्श्युरन्स दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स
कालावधी लघुकालीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी 12 महिन्यांसाठी वैध आहे. दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी 2 ते 3 वर्षांसाठी वैध आहे.
रिन्यूअल तुम्हाला तुमचे लघुकालीन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स दर 12 महिन्यांनी रिन्यू करावे लागतात. तुम्ही तुमचे दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स 2 ते 3 वर्षांनी रिन्यू करण्याची काळजी सोडू शकता.
प्रीमियम तुम्ही तुमचे दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स 2 ते 3 वर्षांनी रिन्यू करण्याची काळजी सोडू शकता. प्रीमियम.
प्रीमियम दर सुधारणा दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रीमियम जास्त असतो. प्रीमियमच्या दरांत सुधारणा.
प्रीमियमवर सवलत तुमच्या पॉलिसीचा कालावदी संपेपर्यंत प्रीमियमच्या दरांत बदल लागू होत नाहीत. प्रीमियमवर सवलत
.
यासाठी समर्पकः तुम्ही दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेतल्यास हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या तुम्हाला मोठी सवलत देऊ करतात. यांच्यासाठी सुयोग्य.

 

भारतात ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 

 •   1

  पासपोर्ट आकाराचे फोटोग्राफ्स

 •   2

  पॉलिसी प्रपोजल फॉर्म

 •   3

  निवासी पुरावा: तुम्ही निवासी पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे दाखल करू शकता:

  • ✓ मतदार ओळखपत्र
  • ✓ आधार कार्ड
  • ✓ पासपोर्ट
  • ✓ वीज बिल
  • ✓ वाहनचालक परवाना
  • ✓ रेशन कार्ड

   

 •   4

  वयाचा पुरावा: तुम्ही तुमच्या वयाचा पुरावा म्हणून खालील कागदपत्रे देऊ शकता:

  • ✓ पासपोर्ट
  • ✓ आधार कार्ड
  • ✓ जन्म प्रमाणपत्र
  • ✓ पॅन कार्ड
  • ✓ 10 आणि 12 इयत्ता गुणपत्रिका
  • ✓ मतदार ओळखपत्र
  • ✓ वाहनचालक परवाना

   

 •   5

  ओळखीचा पुरावा: तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतीही कागदपत्रे दाखल करू शकता:

  • ✓ आधार कार्ड
  • ✓ वाहनचालक परवाना
  • ✓ पासपोर्ट
  • ✓ पॅन कार्ड
  • ✓ मतदार ओळखपत्र

   

तुम्ही निवडलेला कव्हरेजचा पर्याय, तुमचे वय, वैद्यकीय इतिहास, सध्याच्या जीवनशैलीच्या निवडी आणि तुमचा निवासी पत्ता यांच्यावर आधारित राहून तुम्हाला आणखी काही कागदपत्रे दाखल करण्यास सांगितली जाऊ शकतात.

ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करण्याच्या स्टेप्स

 

तुम्ही मेडिकल इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करू इच्छित असाल तर विचार करू नका. तुम्ही बजाज आलियान्झची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खालील टप्प्यांचा वापर करून अत्यंत वेगाने आणि सुलभतेने खरेदी करू शकता:

 • स्टेप 1
 • स्टेप 2

  तुम्हाला खरेदी करायचा असलेला मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन निवडा.

 • स्टेप 3

  तुमची वैयक्तिक माहिती जसे तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, तुम्हाला हवी असलेली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आणि निवडलेल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये तुम्हाला कुटुंबातील ज्या सदस्यांना कव्हर करायचे आहे त्यांचे तपशील, तुमचा पिनकोड, संपर्क क्रमांक तेथे नमूद करा.

 • स्टेप 4

  गेट माय कोट बटणावर क्लिक करा.

 • स्टेप 5

  तुमचे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम तपशील स्क्रीनवर दाखवले जातील. जिथे तुम्ही तुमच्या सोयीने सह प्रदान निवडू शकता आणि हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी प्लॅन कन्फर्म करा बटणावर क्लिक करू शकता.

तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स क्वोट्स मिळाल्यावर आणि तुमचा प्रीमियम तुम्ही ऑनलाइन भरल्यावर तुम्हाला तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी (सॉफ्ट कॉपी) तात्काळ मिळेल.

भारतातील अनेक हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांची एक वेबसाइट आहे जिथे त्यांच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींची माहिती देण्यात आली आहे. बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्ससह काही कंपन्यांकडे तुमच्या ऑनलाइन हेल्थ इन्श्युरन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक अ‍ॅपही आहे.

तुम्ही आमचा कॅरिंगली युर्स मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून, आम्हाला आमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक +91 75072 45858 वर ‘Hi’ असे लिहून किंवा आम्हाला +91 91 80809 45060 वर मिस्ड कॉल देऊन आमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता.

वेळेवर हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूवलचे महत्त्व

हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअल हे तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कडून देण्यात आलेले कव्हरेज पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी ती रिन्यू करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतरही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू केली नाही तर तुमची विमा कंपनी तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअल . मात्र या 30दिवसांत हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूवल . हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअल . मात्र या 30 दिवसांत तुम्हाला कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स क्लेमसाठी कव्हर केले जाणार नाही. आणि तुम्ही या अतिरिक्त कालावधीतही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू केली नाही तर तुम्ही मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनचे सर्व फायदे जसे एनसीबी (नो क्लेम बोनस), प्रतीक्षा कालावधी इत्यादी गमावाल.

तुमची बजाज आलियान्झची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू, करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा आमचा मोबाइल अ‍ॅपः केअलिंगली युअर्स डाऊनलोड करू शकता. तुम्ही आम्हाला आमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक (+91 75072 45858) वर ‘Hi’ असे लिहून पाठवू शकता आणि आमची कस्टमर सपोर्ट टीम तुम्हाला तुमच्या गरजेसाठी मदत करेल.

 

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीमुळे तुम्हाला तुमच्या विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे फायदे न सोडता तुमचा हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादार बदलता येईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या विद्यमान मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनने समाधानी नसाल किंवा तुम्ही तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये आणखी काही मिळवू इच्छित असाल तर तुम्ही तुमचा हेल्थ इन्शुरर बदलू शकता किंवा तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी त्याच कंपनीसोबत तुम्हाला तुमच्या विद्यमान मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनमध्ये मिळालेल्या सर्व क्रेडिट्ससह बदलू शकता.

तुम्ही तुमचा हेल्थ इन्श्युरन्स बदलण्याचा निर्णय घेतल्यावर तुमच्याकडे खालील पर्याय असतील:

 • तुम्ही एका हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराकडून दुसऱ्या पुरवठादाराकडे स्थलांतरित होऊ शकता.
 • तुम्ही एका हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराकडून दुसऱ्या पुरवठादाराकडे स्थलांतरित होऊ शकता.
 • तुम्ही त्याच हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराकडील मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स बदलू शकता.
 • तुम्ही वैयक्तिक पॉलिसीकडून फ्लोटर पॉलिसीकडे जाऊ शकता आणि उलटेही जाऊ शकता.
 • तुम्ही नवीन विमा कंपनीकडे सुधारिस सम इन्शुअर्ड (एसआय) साठी अर्ज करू शकता.

 

हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटी निकष:

 • तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी फक्त रिन्यूअलच्या वेळीच बदलू शकता.
 • तुम्ही तुमची विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संपण्याच्या किमान 45 दिवस आधी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारांशी संपर्क साधला पाहिजे.
 • तुम्ही तुमची विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संपण्याच्या किमान 45 दिवस आधी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारांशी संपर्क साधला पाहिजे.
 • हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअल प्रक्रियेत अंतर पडणार नाही याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे:

   हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसाठी तुम्ही खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे

   ✓ आधीच्या पॉलिसी

   ✓ क्लेमचा तपशीलवार अनुभव

   ✓ वयाचा पुरावा

   ✓ वयाचा पुरावा

   ✓ कोणतेही सकारात्मक घोषणापत्रे असल्यासः डिस्चार्ज कार्ड, तपासणी अहवाल, अद्ययावत प्रिस्क्रिप्शन्स आणि क्लिनिकल आजार

लिहिणारे: बजाज आलियान्झ - अपडेटेड : 16 मे 2022

 

कस्टमरचे अनुभव

 

सरासरी रेटिंग:

 4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

 

आशिष झुंझुनवाला

माझ्या क्लेमच्या पुर्ततेबाबत जो 2 दिवसांच्या आत मंजूर झाला, मला झालेला आनंद आणि समाधान ...

सुनिता एम आहूजा

लॉकडाउनच्या काळात इन्श्युरन्स कॉपी वेगाने वितरीत केली गेली. बजाज आलियान्झच्या टीमला सलाम.

रेनी जॉर्ज

बजाज आलियान्झ वडोदरा टीमचे, विशेषतः श्री हार्दिक मकवाना आणि श्री आशिष गुप्ता यांचे आभार...

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी खूप सोपी, विनासायास, विना गुंतागुंत. छान काम. शुभेच्छा.

जयकुमार राव

खूप यूजर फ्रेंडली आहे. मला माझी पॉलिसी 10 मिनिटांपेक्षा कमी वेळेत मिळाली.

 

हेल्थ इन्श्युरन्स बद्दल सामान्य प्रश्न

 

 

 

   भारतात हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करणे आवश्यक आहे का?

भारतात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे सक्तीचे नाही. परंतु हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसारखी आर्थिक सुरक्षा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती हाताळता येतील.

   मला बजाज आलियान्झ हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत काय मिळेल?

आमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुम्हाला अनुक्रमे 60 आणि 90 दिवसांसाठी हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि नंतरच्या खर्चांसाठी कव्हरेज मिळते. या पॉलिसीत इन हॉस्पिटल खर्च, अ‍ॅम्ब्युलन्स शुल्क, खोलीचे भाडे आणि बोर्डिंग खर्च कव्हर करण्यात आला आहे. (कव्हरेज निवडलेल्या उत्पादनानुसार बदलते.) तुम्हाला भारतात 8,000+ हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार मिळू शकतील. आम्ही मेडिकल तपासण्या, डॉक्टरांचे शुल्क / डॉक्टर सल्ला फी आणि रूग्णवाहिका शुल्कही कव्हर करतो. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे तणावमुक्त राहता

   मी हेल्थ इन्श्युरन्स ऑनलाइन खरेदी करावा का?

तुम्हाला वेगवान आणि अडथळामुक्त खरेदी हवी असल्यास ऑनलाइन खरेदी करणे हा योग्य पर्याय आहे. आम्ही तुम्हाला सहज आणि सुलभपणे हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी मदत करायला सज्ज आहोत. आमचे विविध पेमेंटचे पर्याय तुमच्या पेमेंटच्या समस्या सोडवण्यात उपयुक्त ठरतील. तुमची मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाइन जारी केले जाते. त्यामुळे हार्ड कॉपी सोबत नेण्यासाठीचा तुमचा त्रास कमी होतो. हे सर्व घटक आणि सकारात्मक ग्राहक सहकार्य यांच्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ऑनलाइन खरेदी करणे एक चांगला पर्याय ठरतात.

   मला हेल्थ इन्श्युरन्ससोबत करबचत कशी करता येईल?

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला देय केलेल्या प्रीमियम सापेक्ष 80D अंतर्गत ₹1 लाख पर्यंत टॅक्स सेव्ह करू शकतात. तुम्ही टॅक्स कसे सेव्ह करू शकता हे येथे दिले आहे:
तुम्ही स्वत:साठी, तुमचे पती/पत्नी, मुले आणि पालकांसाठी भरलेल्या प्रीमियम वर तुम्ही तुमच्या टॅक्स सापेक्ष कपात प्रति वर्ष ₹25,000 प्राप्त करू शकता (तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त नसल्यास). तुम्ही तुमच्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांसाठी प्रीमियम भरल्यास (वय वर्षे 60 किंवा अधिक) करांच्या हेतूसाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स बेनिफिट कमाल 50,000. रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि तुमचे आईवडील ज्येष्ठ नागरिक असल्यास तुम्हाला एक करदाता म्हणून कलम 80D अंतर्गत एकूण 75,000 रूपयांचा कमाल कर फायदा मिळू शकेल. तुमचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमच्या आईवडीलांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम भरत असल्यास कलम 80D अंतर्गत तुम्हाला कमाल कर फायदा 1 लाख रूपये मिळू शकतो.

   हेल्थ इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी कोण पात्र आहे?

तुम्ही भारतीय नागरिक असल्यास आणि तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुम्ही भारतात हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता. तुम्ही अज्ञान असल्यास (18 वर्षे वयाखालील) तुमचे पालक तुम्हाला त्यांच्या कोणत्याही मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर करू शकतात.

   हेल्थ इन्श्युरन्समध्ये काय कव्हर केले जाते?

हेल्थ इन्श्युरन्स तुम्हाला हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हर करतात. त्यात प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च, डॉक्टरांच्या सल्ल्याचे शुल्क आणि इन-पेशंट खर्चाचा समावेश आहे.

   मी आधीच जीवनविम्यात गुंतवणूक केली आहे. तरीही मला हेल्थ इन्श्युरन्सची गरज आहे का?

लाइफ इन्श्युरन्स हा एक उत्तम गुंतवणुकीचा आणि मृत्यूच्या कव्हरचा पर्याय आहे. परंतु वाढत्या मेडिकल बिलांसाठी तो फायदेशीर ठरणार नाही. हेल्थ इन्श्युरन्स कव्हर हा हॉस्पिटलायझेशनसाठी आणि कोणतेही मोठे वैद्यकीय खर्च उद्भवल्यास त्यांच्यावरील उपाय आहे. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स हे तुमची बचत कमी करण्याचा धोका ठरणाऱ्या कोणत्याही आरोग्याशी संबंधित खर्चाबाबतचे तुमचे कव्हर आहेत.

   एंट्री एज आणि एक्झिट एज म्हणजे काय ?

एंट्री एज म्हणजे तुमचे वय किमान अमुक असले पाहिजे म्हणजे तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हरेज मिळू शकेल.एक्झिट एज म्हणजे तुम्ही एक विशिष्ट वयोमर्यादा पार केल्यानंतर तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर मिळणार नाही. एंट्री एज आणि एक्झिट एज हे वेगवेगळ्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी वेगवेगळे आहेत.

   फ्री लुक कालावधी म्हणजे काय ?

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या तुम्हाला 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी देतात. त्या दरम्यान तुम्ही खरेदी केलेल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा अभ्यास करू शकता. तुम्हाला असे वाटले की तो मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन हा तुमच्या गरजेसाठी योग्य नाही तर तुम्ही कोणतेही रद्दीकरण शुल्क न भरता तो या 15 दिवसांच्या काळात रद्द करू शकता.

   अवलंबून असलेल्या व्यक्ती म्हणजे कोण ?

तुमची मुले, जोडीदार, आईवडील आणि सासूसासरे हे तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीत अवलंबून असलेल्या व्यक्ती म्हणून समाविष्ट केल्या जाऊ शकतात.

   सहप्रदान म्हणजे काय ’? डिडक्टिबल्स म्हणजे काय ?

सह प्रदान म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक हेल्थ इन्श्युरन्स क्लेमसाठी भरावी लागणारी क्लेम रकमेची निश्चित टक्केवारी होय. त्याचवेळी डिडक्टिबल म्हणजे तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल करताना तुम्हाला भरावी लागणारी निश्चित रक्कम होय.

   सम इन्शुअर्डचे 'रिस्टोरेशन' किंवा 'रिइन्स्टेटमेंट' म्हणजे काय ?

सम इन्शुअर्डचे रिस्टोरेशन किंवा रिइन्स्टेटमेंट म्हणजे तुमचा विद्यमान एसआय संपल्यास त्याच पॉलिसी वर्षात तुमच्या पुढील हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासाठी तो आपोआप जारी केला जाईल. मात्र, तुमच्या पॉलिसी वर्षात तुम्ही तुम्ही रिस्टोरेशनचा फायदा पुढे नेऊ शकत नाही आणि एकदा क्लेम केल्यास त्याच आजार / दुखापतीसाठी त्याचा वापर केला जाऊ शकत नाही.

    डे केअर हेल्थ इन्श्युरन्सचा फायदा काय?

तंत्रज्ञानाच्या विकासासोबत तुम्हाला सेप्टोप्लास्टी किंवा लिथोट्रिप्सीसारख्या प्रक्रियांसाठी रूग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. परंतु या प्रक्रियांसाठी येणारा वैद्यकीय खर्च खूप जास्त आहे. तुमच्याकडे डेकेअर मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन असणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय प्रक्रियांसाठी कव्हर केले जाता ज्यासाठी तुम्हाला 24 तासांपेक्षा जास्त काळ रूग्णालयात दाखल व्हावे लागत नाही.

   'कोणताही एक आजार’ म्हणजे काय?

कोणताही एक आजार म्हणजे आजाराचा सलग कालावधी होय ज्यात तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार एका विशिष्ट दिवसांच्या संख्येत तो आजार उलटून आल्यास त्याचा समावेश आहे.

   इन्श्युरन्समुळे हेल्थ चेक अप सुविधेत कसा फायदा होतो?

तुम्ही कोणताही हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल न करता 4 वर्षे सलग तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू केल्यास तुम्ही मोफत हेल्थ चेक अपसाठी पात्र ठरता. सदर हेल्थ चेक अपशी संबंधित आलेला खर्च तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून उचलला जातो.

   पॉलिसीचा कमाल आणि किमान कालावधी किती असतो?

तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी 1, 2 किंवा 3 वर्षांच्या कालावधीसाठी खरेदी करू शकता. तुम्ही दीर्घकालीन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केल्यास (1 वर्षापेक्षा अधिक काळ) तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात.

   हेल्थ इन्श्युरन्सबद्दल मोठ्या गैरसमजुती काय आहेत ?

हेल्थ इन्श्युरन्सशी संबंधित काही मोठ्या गैरसमजुती खालीलप्रमाणेः:

✓ तुम्ही कोणतेही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स घेता तेव्हा तुम्हाला फक्त पॅनलवरील हॉस्पिटल्सच तपासावी लागतात.

✓ कंपनीने दिलेले हेल्थ इन्श्युरन्स कव्हर तुमच्यासाठी पुरेसे आहे.

✓ तुमच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स असल्यास तुमचे सर्व वैद्यकीय खर्च कव्हर केले जातात.

✓ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सचा फायदा मिळण्यासाठी तुम्ही किमान 3 तास हॉस्पिटलाइज्ड असणे गरजेचे आहे.

✓ तुम्ही तंदुरूस्त असाल तर तुम्हाला हेल्थ इन्श्युरन्सची गरज नाही.

✓ धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती हेल्थ इन्श्युरन्स घेऊ शकत नाहीत

 

   पूर्वीपासून असलेले रोग आणि प्रतीक्षा कालावधी यांच्याबाबत अधिक माहिती द्या.

पूर्वीपासून असलेले रोग हे असे आजार आहेत जे तुम्ही मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी घेण्याच्या आधीपासून तुम्हाला आहेत हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कोणतेही आधीपासून असलेले आजार / त्रास घोषित केले पाहिजेत.


लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पूर्वीपासून असलेल्या आजारांना एक प्रतीक्षा कालावधी असतो. (तो कंपनीनुसार बदलत जातो.) त्यामुळे तरूण वयात पॉलिसी घेऊन तुम्ही ही आशा करू शकता आणि तुम्हाला पूर्वीपासून असलेल्या रोगांच्या वर्गवारीत असलेल्या कोणत्याही रोगाचे निदान झाल्यास तुमचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण होईल. तसेच तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसीचे पूर्ण फायदे मिळण्याची खात्री तुम्हाला मिळू शकते.

   पोट मर्यादेच्या रकमेत कोणते खर्च समाविष्ट केले जातात ?

पोट मर्यादा म्हणजे अशी कमाल रक्कम जी तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या मेडिकल खर्चासाठी भरेल. सामान्यतः पोट मर्यादेत खोलीचे भाडे पोट मर्यादा, हॉस्पिटलायझेशन नंतरची उपमर्यादा, रूग्णवाहिका शुल्क, ऑक्सिजन पुरवठा, डॉक्टरांचे शुल्क, निदान चाचण्या इत्यादींचा समावेश आहे.

   हेल्थ इन्श्युरन्स आणि पर्सनल एक्सिडेंट इन्श्युरन्समध्ये काय फरक आहे ?

हेल्थ इन्श्युरन्समध्ये तुम्ही क्लेम दाखल करू शकता आणि तुमची विमा कंपनी सम इन्शुअर्डइतकी क्लेम रक्कम तुम्हाला परत करेल. त्याचवेळी पर्सनल एक्सिडेंट इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला तुम्ही क्लेम दाखल केल्यावर संपूर्ण सम इन्शुअर्ड प्रदान करेल.

   फॅमिली फ्लोटर आणि इंडिव्हिज्युअल हेल्थ पॉलिसीमध्ये काय फरक आहे ?

इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये पॉलिसीमध्ये कव्हर करण्यात आलेल्या सर्व सदस्यांसाठी वेगवेगळी सम इन्शुअर्ड आहे तर फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्समध्ये विमा उतरवम्यात आलेले सर्व सदस्यांना सामायिक सम इन्शुअर्ड असते.

   महिलांसाठी कोणते हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत ?

बजाज आलियान्झमध्ये आमच्याकडे महिलांच्या आरोग्याच्या समस्यांशी संबंधित खर्चांची काळजी घेणारे स्पेशल हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स आहेत. आमचा महिलांसाठीचा क्रिटिकल इलनेस प्लॅन ही सर्व स्त्रियांसाठीची खास पॉलिसी आहे. ती तुम्हाला भाजणे, स्तनांचा कर्करोग, योनीचा कर्करोग इत्यादी 8 गंभीर आजारांच्या धोक्यापासून कव्हर देते.

   भारतात मॅटर्निटी इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी प्रतीक्षा कालावधी आणि विम्याची रक्कम काय आहे?

मॅटर्निटी खर्चाच्या कव्हरेजसाठी 72 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी लागू आहे. तुम्ही याचा पर्याय घेतल्यास 3 लाख रूपये आणि 7.5 लाख रूपयांच्या दरम्यान सम इन्शुअर्ड, तर कव्हरेज सामान्य प्रसूतीसाठी 15000 रूपयांपर्यंत आणि सिझेरियनसाठी 25000 रूपयांपर्यंत मर्यादित आहे आणि तुम्ही 10लाख रूपये आणि 50 लाख रूपयांपर्यंत सम इन्शुअर्डचा पर्याय निवडल्यास हीच रक्कम सामान्य प्रसूतीसाठी 25000 रूपये आणि सिझेरियनसाठी 35000 रूपयांपर्यंत मर्यादित आहे. प्रत्येक उत्पादनासाठी प्रसूतीचा प्रतीक्षा कालावधी हा प्रत्येक उत्पादनाच्या अटी आणि शर्तींनुसार बदलत जाईल.

   मला माझ्या विद्यमान फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्श्युरन्समध्ये सदस्याची वाढ कशा प्रकारे करता येईल?

तुम्ही कोणत्याही विद्यमान फॅमिली फ्लोटर मेडिकल इन्श्युरन्स योजनेत एका नवीन सदस्याला कव्हर करण्यासाठी अतिरिक्त प्रीमियमच्या रकमेसह आरोग्य घोषणापत्र आणि एन्डोर्समेंट फॉर्म भरू शकता.

   मला पॉलिसीची कागदपत्रे मिळाल्यानंतर माझ्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या तपशिलात कशा प्रकारे बदल करता येतील?

तुम्ही आमच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन बदल करू शकता किंवा आमच्या कस्टमर केअर प्रतिनिधीला फोन करू शकता. तो तुम्हाला आवश्यक ते बदल करून देण्यास मदत करेल.

   मी माझ्या पॉलिसीची स्थिती कशा प्रकारे तपासू शकेन?

तुम्हाला तुमच्या पॉलिसीची स्थिती ऑनलाइन तपासता येईल. आमच्या वेबसाइटवर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग ऑन करा आणि तुमच्या पॉलिसीचे तपशील नमूद करा- पॉलिसी क्रमांक इत्यादी आणि तुमची स्थिती तपासा. त्याचप्रमाणे तुम्ही आमचा कस्टमर पोर्टल अ‍ॅप डाऊनलोड करून तुमच्या पॉलिसीची स्थिती तपासू शकता.

   मला एकापेक्षा जास्त हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कशा प्रकारे घेता येतील ?

हो, तुम्ही एकापेक्षा जास्त हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेऊ शकता.मात्र, एका वेळी अनेक पॉलिसी हाताळणे त्रासदायक होते. आम्ही तुम्हाला कमी एसआयसोबत अनेक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याऐवजी जास्त एसआय असलेली एकच हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा सल्ला देतो.

   मला एका वर्षानंतर माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करायची असल्यास काय ?

तुम्ही एका वर्षानंतर तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करू शकता. पण तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअलमध्ये अंतर असल्यास तुम्हाला आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधावा लागेल. ते तुम्हाला पुढील आवश्यक पावलांबद्दल मार्गदर्शन करू शकतील.

   मी माझी पॉलिसी रिन्यू करत असल्याच्या प्रत्येक वेळी मला वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे का ?

नाही, तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करत असताना प्रत्येक वेळी तुम्हाला वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही. मात्र, हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअलमध्ये अंतर पडल्यास किंवा तुम्ही पॉलिसी रिन्यू करत असताना तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅनच्या कव्हरेजमध्ये सुधारणा केल्यास तुम्हाला काही प्रमाणात वैद्यकीय तपासणी करण्याची गरज भासू शकेल.

   माझ्याकडे आधीपासूनच हेल्थ इन्श्युरन्स आहे आणि मला माझी सम इन्शुअर्ड वाढवायची आहे. तर मी काय केले पाहिजे ?

तुम्ही आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधून सम इन्शुअर्ड वाढवण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेल्या पावलांची माहिती घेऊ शकता.

   माझी पॉलिसी अंतिम तारखेपूर्वी रिन्यू करण्यात न आल्यास मला रिन्यूअल नाकारले जाईल का ?

तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतिम तारीख उलटल्यावर 30 दिवसांच्या अतिरिक्त कालावधीत रिन्यू करू शकता आणि तुमचे सर्व फायदे पुनर्स्थापित होतील. मात्र, तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी वाढीव कालावधी संपल्यावर रिन्यू केली नाही तर तुम्हाला स्वतःला कव्हर करण्यासाठी शून्यापासून सुरूवात करण्याची गरज पडू शकते.

   माझी पॉलिसी एका विमा कंपनीकडून दुसऱ्या कंपनीकडून रिन्यूअलचे फायदे न गमावता हस्तांतरित करणे शक्य आहे का?

हो, हेल्थ इन्श्युरन्स पोर्टेबिलिटीसोबत तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी बदलू शकता.

   प्रत्येकासाठी वैद्यकीय तपासणी सक्तीची आहे का ?

नाही, सामान्यतः 45 वर्षे वयाखालील व्यक्तींसाठी वैद्यकीय तपासणी सक्तीची नाही. मात्र, तुम्ही दाखल केलेला वैद्यकीय इतिहास आणि तुम्ही निवडलेली हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी यांच्यावर आधारित राहून तुमची इन्श्युरन्स कंपनी तुम्हाला काही विशिष्ट वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगू शकते.

   वैद्यकीय चाचणीचा खर्च कोण करते ?

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी कऱण्यापूर्वी येणारा वैद्यकीय चाचणीचा खर्च तुम्हालाच करावा लागेल. पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार त्याचा परतावाही होऊ शकेल.

   माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संपूर्ण भारतात वैध आहे का?

हो, तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारासोबत तुमच्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तींच्या सापेक्ष संपूर्ण भारतभरात तुम्हाला कव्हर केले जाईल.

   हेल्थ पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी मला कोणत्या छोट्या गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे ?

तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहेः:

✓ तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी देत असलेले निश्चित कव्हरेज तुम्ही पाहणे गरजेचे आहे.

✓ तुम्ही प्रतीक्षा कालावधी आणि अपवाद यांचा अभ्यास केला पाहिजे.

✓ तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादारापासून आधीपासून असलेल्या रोगांसारख्या कोणत्याही गोष्टी लपवू नयेत.

✓ तुम्ही इन्श्युरन्स कंपनीच्या ऑनलाइन प्रक्रिया तपासल्या पाहिजेत.

✓ तुम्ही पॉलिसी रद्दीकरण, पॉलिसा कालावधी संपणे आणि पॉलिसी रिन्यूअल अशा विषयांबद्दल तुमच्या विमा कंपनीकडे चौकशी केली पाहिजे.

✓ तुम्ही पेमेंट करण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमच्या ब्रेकअपचा नीट अभ्यास करावा आणि तुमच्या सर्व शंकांचे निरसन करावे.

 

   हेल्थ कार्ड म्हणजे काय ?

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत हेल्थ कार्ड देतात. त्याचा वापर तुम्ही कॅशलेस उपचारांसाचा फायदा घेण्यासाठी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये करू शकता.

   तुमची मूळ पॉलिसी हरवल्यास तुम्हाला डुप्लिकेट पॉलिसी मिळते का ?

हो, तुमची मूळ पॉलिसी हरवल्यास तुम्हाला डुप्लिकेट हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी दिली जाईल. मात्र, तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची डुप्लिकेट प्रत मिळवण्यासाठी एक निश्चित रक्कम भरावी लागेल.

   मला माझी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कशा प्रकारे रद्द करता येईल ?

तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नुकतीच खरेदी केली असल्यास तुम्ही कोणतेही रद्दीकरण शुल्क न भरता फ्री लुक कालावधीत ती रद्द करू शकता. परंतु तुम्हाला पॉलिसीचे कव्हरेज जितक्या दिवसांसाठी मिळेल त्या कालावधीचा प्रीमियम भरावा लागेल.


तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तिचा कालावधी संपण्यापूर्वी रिन्यू करण्याऐवजी रद्द करू शकता.


तुम्ही काही विशिष्ट वर्षांसाठी अंतर न देता सलग रिन्यू केल्यास ती सरेंडर केल्यास तुम्हाला त्याचे काही फायदेही मिळू शकतील. तुम्ही तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराशी संपर्क साधून तुमचा मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन रद्द करण्यासाठी संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकता.

 

 

   मला किती कव्हरेजची गरज आहे ?

तुमचे कव्हरेज तुमची जीवनशैली, वैद्यकीय पार्श्वभूमी, पूर्वीपासून असलेले रोग, तुमच्या कुटुंबातील सदस्य, वार्षिक उत्पन्न, निवासी पत्ता आणि वय यांच्यावर आधारित असते.

   तुम्ही कव्हर करत असलेल्या प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन वैद्यकीय खर्चांची मला माहिती द्या.

प्री हॉस्पिटलायझेशन खर्च हा एखाद्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी करावा लागणाऱ्या चाचण्या, औषधे यांचा परिणाम असू शकतो.. त्याचप्रमाणे पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च हा हॉस्पिटलायझेशनच्या उपचारांनंतर बरे होण्यासाठी तसेच औषधांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चासाठी असू शकतो. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च हे पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार अनुक्रमे 60 and 90 दिवसांचे असू शकतात. तुम्ही आजारी पडता तेव्हा सामान्यतः तुमच्या कुटुंबातील डॉक्टरांशी चर्चा करून संबंधित चाचण्या करून घेता. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज असल्यास तुम्ही पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल होता. हॉस्पिटलायझेशनपूर्वी आलेल्या या वैद्यकीय खर्चांना प्री हॉस्पिटलायझेशन खर्च म्हटले जाते. पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्चात तुम्हाला हॉस्पिटलायझेशनचे उपचार झाल्यावर डिस्चार्जनंतर आलेले सर्व खर्च किंवा शुल्क होय. उदाहरणार्थ, सल्ला देणारे डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रियेनंतर तुमची प्रगती किंवा सुधारणा निश्चित करण्यासाठी विशिष्ट चाचण्या सुचवू शकतात.

   डोमिसिलिअरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय? त्यात काय कव्हर केले जाते?

डोमिसिलिएरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे अशी एक परिस्थिती जिथे तुम्ही रूग्णालयाऐवजी घरी उपचार घेत आहात किंवा वैद्यकीय काळजी घेत आहात आणि तरीही तुम्ही हॉस्पिटलाइज्ड असल्याचे मानले जाते. तुम्ही घरीच उपचार घेत असू शकता कारण हॉस्पिटलमध्ये बेड / खोली उपलब्ध नाही किंवा तुम्हाला रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करावे अशी तुमची स्थित नाही.

डोमिसिलीएरी हॉस्पिटलायझेशन तुम्हाला हॉस्पिटलऐवजी घरी एखादा आजार/ रोग/ दुखापतीसाठी मिळणाऱ्या उपचारांचा खर्च कव्हर करते.

   तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनअंतर्गत देय नसलेल्या बाबी कोणत्या?

बिगर वैद्यकीय बाबी जसे केस काढण्याची क्रीम, हँडवॉश, आरामदायी टॉवेल, बाळाच्या बाटल्या, ब्रश, पेस्ट, मॉइश्चरायझर, टोप्या, आयपॅड, क्रेडल बड्स, कंगवा इत्यादी सर्व गोष्टी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत देय नाहीत. देय नसलेल्या वस्तूंच्या तपशीलवार यादीसाठी कृपया तुमचे पॉलिसी वर्डिंग्स काळजीपूर्वक वाचा.

   हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी डायबेटिसच्या रूग्णांना कव्हर देते का?

हो, हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या डायबेटिसच्या रूग्णांना कव्हरेज देतात. मात्र, तुम्हाला कव्हरेज देण्यापूर्वी काही चाचण्या करून घेणे आवश्यक असेल. तसेच तुमच्या वैद्यकीय चाचणी अहवालानुसार काही प्रतीक्षा कालावधीही लागू असू शकतो. * तसेच यूडब्ल्यूच्या स्वीकाराच्या सापेक्ष

   भारतातील हेल्थ इन्श्युरन्स MRI X-Ray किंवा इतर बॉडी स्कॅनचे निदान शुल्क कव्हर करतात का ?

हो, भारतातील हेल्थ इन्श्युरन्स इन पेशंट हॉस्पिटलायझेशनसाठी तुमच्या पॉलिसीत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींनुसार काही वैद्यकीय तपासण्या आणि स्कॅन्स कव्हर करतात.

   हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स मॅटर्निटी कव्हर करतात का ?

हो, हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला मॅटर्निटी आणि नवजात बालकाच्या सेवेसाठी कव्हर करतात. तथापि, त्यासाठीचे कव्हरेज सुरू होण्यापूर्वी तुम्हाला एक प्रतीक्षा कालावधी असेल. तुम्ही विशेषतः मॅटर्निटी खर्चाच्या कव्हरेजसाठी भारतात हेल्थ इन्श्युरन्स घेत असल्यास तुमच्या विमा कंपनीसोबत प्रतीक्षा कालावधी आणि कव्हरेजही तपासावे लागेल.

    इन्श्युरन्स पॉलिसी आऊटपेशंट खर्चही कव्हर करतात का ?

हो, सुमारे 24 तासांच्या सक्तीच्या हॉस्पिटलायझेशनसोबत किंवा ओपीडी कव्हरच्या स्वरूपात टॉपअप म्हणून मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये आऊटपेशंट खर्च कव्हर केलेले आहेत.

   भारतात डे केअर हेल्थ इन्श्युरन्समध्ये काय उपचार कव्हर केलेले आहेत ?

भारतात हेल्थ इन्श्युरन्सअंतर्गत कव्हर करण्यात आलेल्या काही डे केअर प्रक्रिया खालीलप्रमाणेः:

✓ बोनचे, सेप्टिक आणि असेप्टिक इन्सिजन

✓ डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट स्ट्रिक्चर्सचे डायलेटेशन

✓ हेमोरॉइड्सची सर्जिकल प्रक्रिया

✓ लिगामेंट फाटण्यावर शस्त्रक्रिया

✓ मोतीबिंदू शस्त्रक्रिया

✓ ग्लुकोमा शस्त्रक्रिया

✓ नाकातून बाहेरील वस्तू काढून टाकणे

✓ धातूची वायर काढून टाकणे

✓ फ्रॅक्चर पिन्स / खिळे काढून टाकणे

✓ डोळ्याच्या लेन्समधून बाहेरील वस्तू काढून टाकणे

डेकेअर प्रक्रियांच्या तपशीलवार यादीसाठी तुम्ही तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट पाहू शकता.

    भारतात हेल्थ इन्श्युरन्सअंतर्गत दंतोपचार कव्हर केलेले आहेत का?

दातांचे उपचार म्हणजे दातांशी संबंधित किंवा दातांना आधार देणाऱ्या रचनांशी संबंधित उपचार. त्यात तपासणी, फिलिंग्स (योग्य असेल तेथे), क्राऊन्स, दात काढून टाकणे आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

कोणतेही दंतोपचार ज्यात कॉस्मेटिक सर्जरी, डेंचर्स, डेंटल प्रोस्थेसिस, डेंटल इम्प्लान्ट्स, ऑर्थोडोंटिक्स,कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया नैसर्गिक दाताला अपघाती इजा असल्याशिवाय आणि हॉस्पिटलायझेशनची गरज असल्याशिवाय वगळण्यात आली आहे.

   भारतात हेल्थ इन्श्युरन्समध्ये होमिओपॅथी उपचार कव्हर केलेले आहेत का ?

आयुष उपचारांना कव्हर करणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी होमिओपॅथिक उपचारही कव्हर करतात. तुमच्या हेल्थ कव्हरमध्ये कव्हरेज समाविष्ट केले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही ते तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराला विचारू शकता किंवा तुमची पॉलिसी वर्डिंग्स पाहू शकता.

   क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्समध्ये कोणकोणते आजार कव्हर केलेले आहेत ?

बजाज आलियान्झच्या क्रिटिकल इलनेस पॉलिसीसोबत तुम्हाला 10 मोठ्या गंभीर आजारांसाठी कव्हर केलेले आहे:

✓ एओर्टा ग्राफ्ट शस्त्रक्रिया

✓ कर्करोग

✓ कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया

✓ पहिला हार्ट अटॅक (मायोकार्डियल इन्फार्क्शन)

✓ मूत्रपिंड निकामी

✓ मोठे अवयव प्रत्यारोपण

✓ सातत्यपूर्ण लक्षणांसह मल्टिपल स्क्लेरोसिस

✓ अवयव कायमस्वरूपी पॅरालिसिस होणे

✓ प्रायमरी पल्मनरी आर्ट्ररियल हायपरटेंशन

✓ स्ट्रोक

   माझ्या कंपनीकडून मला आधीच हेल्थ इन्श्युरन्स दिलेला असताना आणि माझ्या कंपनीकडून मला आणि माझ्या कुटुंबाला कव्हर केलेले असताना मी हेल्थ पॉलिसी का खरेदी करावी ?

तुमच्या कंपनीकडून दिलेल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीत तुम्हाला काही फायदे दिलेले असतील पण कॉर्पोरेट हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सशी संबंधित काही त्रुटीही आहेत, जसेः:

✓ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सच्या गरजांनुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार तुमचा कॉर्पोरेट प्लॅन तुम्हाला कस्टमाइज करता येणार नाही.

✓ तुम्ही कंपनीतून राजीनामा दिल्याबरोबर तुमचे कव्हरेज संपेल.

✓ तुमच्या कंपनीकडून आलेले हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स तुम्हाला निवृत्तीनंतर कव्हर करणार नाहीत.

✓ कॉर्पोरेट हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये तुमच्या भविष्याच्या नियोजनासाठी खूप कमी व्याप्ती आहे.

✓ खासगी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सच्या तुलनेत तुम्हाला कमी एसआयसाठी कव्हर केले जाते.

त्यामुळे तुमच्या बजेटला साजेसा आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सच्या गरजेनुसार तुम्ही वैयक्तिक मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन खरेदी केला पाहिजे.

   रिन्यूअलच्या वेळी मला हेल्थ इन्श्युरन्स कव्हर वाढवता येईल का ?

हो, रिन्यूअलच्या वेळी तुम्ही तुमचे मेडिकल इन्श्युरन्स कव्हर वाढवू शकता. तुम्हाला त्यासाठी काही कागदपत्रे सादर करावी लागतील आणि तुमच्या मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी तुमचे कव्हरेज वाढवण्यासाठी अतिरिक्त प्रीमियमही भरावा लागेल.

   मला माझ्या मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये माझ्या वृद्ध आईवडिलांना समाविष्ट करता येईल का ?

पण तुम्ही आमचा सिल्व्हर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन घेऊ शकता. तो ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खास हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे.

 

 

   माझ्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमच्या रकमेवर कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडतो?

हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमची रक्कम मुख्यत्वे सम इन्शुअर्ड आणि हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत कव्हर करण्यात आलेल्या सदस्यांच्या संख्येवर अवलंबून असते. तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम ठरवणारे इतर काही घटक खालीलप्रमाणे आहेत:

✓ तुमचे वय

✓ पूर्वी पासून असलेले रोग

✓ अ‍ॅड-ऑन कव्हर्स (पर्यायी)

   मला भारतात हेल्थ इन्श्युरन्सचा खर्च कसा मोजता येईल?

तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी तुम्हाला भराव्या लागणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमची रक्कम शोधण्यासाठी तुम्ही आमच्या हेल्थ इन्श्युरन्स कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी आमचा हेल्थ इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर मोफत वापरू शकता आणि तयार केलेले क्वोट्सही वापरू शकता.

   प्रीमियमच्या प्रदानासाठी पेमेंटचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

तुम्ही प्रीमियमचे पेमेंट खालील पद्धतींचा वापर करून करू शकताः:

✓ आमच्या शाखेत चेक किंवा रोख पेमेंट

✓ ईसीएस

✓ ऑनलाइन पेमेंट- डेबिट / क्रेडिट कार्ड आणि नेटबँकिंग

   कोणत्या परिस्थितीत रिन्यूअलच्या वेळी माझा पॉलिसीचा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे ?

खालील परिस्थितीत तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम रिन्यूअलच्या वेळी वाढण्याची शक्यता आहेः:

✓ वयोगटात बदल

✓ रेग्युलेटरकडून प्रीमियममध्ये बदल (त्याची माहिती तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स रिन्यूअलच्या वेळी आगाऊ स्वरूपात दिली जाईल.)

✓ सरकारी नियमांनुसार करांमध्ये, शुल्कातील बदल

   धूम्रपानाचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमवर कशा प्रकारे प्रभाव पडतो ?

तुम्ही धूम्रपान करत असल्यास तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसाठी जास्त प्रीमियम भरावा लागण्याची शक्यता आहे. तसेच, एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कव्हरेज देण्यापूर्वी तुम्हाला काही वैद्यकीय चाचण्या करण्याची गरज पडू शकते.

   मी माझे हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरण्यास विसरल्यास काय होईल ?

तुमच्या पॉलिसीचा कालावधी संपण्यापूर्वी तुम्ही तुमचा हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधून मिळणाऱ्या कव्हरेजमध्ये सातत्यपूर्णता राहील. अतिरिक्त कालावधी वापरू शकता. परंतु तुम्ही अतिरिक्त कालावधीतही तुमची पॉलिसी रिन्यू न केल्यास तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संपेल आणि तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन स्थितीसाठी कव्हर केले जाणार नाही.

    जीएसटी म्हणजे काय आणि त्याचा हेल्थ इन्श्युरन्सवर कसा प्रभाव पडतो ?

जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. त्याची सुरूवात 2017 मध्ये झाली आणि त्यात सेवा कर, व्हॅट इत्यादी सर्व अप्रत्यक्ष कर कव्हर केले जातात. जीएसटी अंतर्गत चार कर स्लॅब आहेत- 0%, 5%, 12% आणि 28%.. आणि, जीएसटीचे दोन प्रकार आहेत- राज्य जीएसटी आणि केंद्रीय जीएसटी.

जीएसटीपूर्वी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीवर लागू असलेला कर दर 15% होता आणि आता सर्व हेल्थ इन्श्युरन्स उत्पादनांसाठी लागू असलेला कर दर 18% आहे.

   मला हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम महिन्याला भरता येईल का?

सर्व हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम्सचे प्रदान हप्त्यांवर स्वीकारत नाहीत. मात्र आरोग्य संजीवनीसारख्या पॉलिसींसोबत तुम्ही तुमच्या सोयीने हप्त्यांवर हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम भरू शकता- वार्षिक, अर्धवार्षिक, त्रैमासिक आणि मासिक.

 

 

   क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे काय?

हेल्थ इन्श्युरन्स कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे एका दिलेल्या कालावधीत समोर आणलेल्या क्लेम्सच्या संख्येच्या प्रमाणात हेल्थ इन्श्युरन्स कंपनीने सेटल केलेल्या क्लेम्सच्या संख्येचे प्रमाण होय. क्लेम सेटलमेंट रेशोची संख्या जितकी जास्त तितकी हेल्थ इन्श्युरन्स कंपनी चांगली असते.

   माझ्या हेल्थ इन्श्युरन्स क्लेम स्टेटसची स्थिती कशी तपासायची ?

तुम्ही आमचा मोबाइल एप- Caringly Yours, आमचे ऑनलाइन क्लेम सेटलमेंट पोर्टल वापरून आणि आमच्या कस्टमर केअरला फोन करून तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स क्लेमची स्थिती तपासू शकता.

   भारतात हेल्थ इन्श्युरन्ससाठी क्लेम करताना कोणत्या प्रक्रिया समाविष्ट आहेत ?

तुम्ही एकतर कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्स क्लेम किंवा रिएम्बर्समेंट क्लेम दाखल करू शकता. बजाज आलियान्झमध्ये आमच्याकडे अंतर्गत हेल्थ अँड एडमिनिस्ट्रेशन टीम (हॅट) आहे. त्यामुळे क्लेम प्रक्रिया सोपी आणि सुलभ होते.

कॅशलेस क्लेम्ससाठी तुम्हाला तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलमधून प्री-ऑथोरायझेशन पत्र आणावे लागेल आणि आम्ही तुमच्या प्री ऑथोरायझेशन अर्जाच्या आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या यशस्वी पडताळणीनंतर तुमचा क्लेम मान्य करू.. आम्ही नेटवर्क हॉस्पिटलला मान्यता दिल्यानंतर कॅशलेस क्लेमचा फायदा तुम्हाला मिळू शकेल.

रिएम्बर्समेंट क्लेम सेटलमेंट प्रकरणी तुम्हाला तुमच्या पॉलिसीच्या तपशीलासह तसेच बिगर नेटवर्क हॉस्पिटलने दिलेली डिस्चार्ज समरी यांच्यासह तुमची वैद्यकीय बिलांसारखी कागदपत्रे पाठवावी लागतील. आम्ही या कागदपत्रांची पडताळणी करू आणि अंतिम क्लेमची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा करून तुमचा क्लेम सेटल करू.

   हेल्थ इन्श्युरन्स क्लेम प्रोसेस होण्यासाठी किती वेळ लागतो ?

बजाज आलियान्झमध्ये आम्ही आमच्या वेगवान क्लेम प्रोसेसिंग- इन हाऊस हेल्थ एडमिनिस्ट्रेशन टीम (हॅट)च्या मदतीने तुमचा कॅशलेस क्लेम 60 मिनिटांत सेटल करतो.

आमच्या Caringly Yours अ‍ॅपमधील हेल्थ CDC (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) वैशिष्ट्यामुळे 20,000 रूपयांपर्यंतचे क्लेम आम्ही 20 मिनिटांत सेटल करतो.

तुम्ही दाखल केलेली सर्व कागदपत्रे मिळवून त्यांची पडताळणी केल्यावर आम्ही तुमचा रिएम्बर्समेंट क्लेम 10 दिवसांत सेटल करतो.

   मी क्लेम कधी केला पाहिजे ?

वैद्यकीय खर्च खूप जास्त आहे आणि तुम्हाला तुमच्या खिशातून तो करणे शक्य नाही असे तुम्हाला वाटत असल्यासच तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स क्लेम केला पाहिजे. यामुळे तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करत असताना तुम्हाला एनसीबी (नो क्लेम बोनसचा) फायदा मिळू शकेल.

    मला एका वर्षात जास्तीत जास्त किती क्लेम्स दाखल करता येतील ?

तुम्ही एका पॉलिसी वर्षात कितीही वैध हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल करू शकता. मात्र, तुम्ही दाखल करत असलेल्या क्लेम्सची संख्या तुमच्या सम इन्शुअर्डच्या वापरावर अवलंबून असते.

   कॅशलेस मेडिक्लेम म्हणजे काय?

तुम्ही नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुमच्या आजार / दुखापतीसाठी उपचार घेतल्यास तुम्ही कॅशलेस मेडिक्लेमसाठी पात्र असता. कॅशलेस मेडिक्लेसमोबत तुमचे मेडिकल बिल तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराकडून तुम्ही उपचार घेत असलेल्या नेटवर्क हॉस्पिटलला आपोआप पाठवले जाईल. मात्र, तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीनुसार बिगर वैद्यकीय बाबी आणि इतर बिगर देय बाबींचा खर्च उचलावा लागेल.

   मला कॅशलेस उपचारांसाठी क्लेम हवा असल्यास मी कसा संपर्क साधावा ?

कॅशलेस क्लेम्सचा फायदा मिळवण्यासाठी तुमहाला नेटवर्क हॉस्पिटलशी संपर्क साधून तुमचे हेल्थ कार्ड दाखवायचे आहे. त्यावर तुमचा पॉलिसी नंबर, विमा कंपनीचे नाव आणि हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रकार नमूद असतो. तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटलकडून तुमच्या विमा कंपनीला पाठवण्यात येणारा प्री-ऑथोरायझेशन फॉर्मही भरावा लागेल.. या कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तुमचा क्लेम तुमच्या विमा कंपनीकडून हॉस्पिटलला थेट सादर केला जाईल.

   क्लेम भरल्यानंतर कव्हरेज रकमेचे काय होते ?

तुमचा क्लेम भरून सेटल केल्यानंतर तुमचे इन्श्युरन्स कव्हर हे तुम्हाला आधीच देण्यात आलेल्या रकमेने कमी होते.

   मी कॅशलेस सुविधा घेतल्यास तुम्हीच सर्व रक्कम भरणार की मला हॉस्पिटलमध्ये बिलाचा काही भाग भरावा लागेल ?

हो, सर्वोत्तम हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला सर्व वैद्यकीय खर्चांसाठी कव्हर करेल. मात्र, तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीनुसार बिगर वैद्यकीय बाबी आणि इतर बिगर देय बाबींचा खर्च उचलावा लागेल.

   क्लेम दाखल करून सेटल झाल्यावर माझ्या पॉलिसीचे काय होते ?

तुमचा क्लेम भरून सेटल केल्यानंतर तुमचे इन्श्युरन्स कव्हर हे तुम्हाला आधीच देण्यात आलेल्या रकमेने कमी होते. उदाहरणार्थ, तुमची पॉलिसी जानेवारी महिन्यात 5 लाख रूपयांच्या कव्हरेजसोबत जारी केली असेल आणि तुम्ही जुलै महिन्यात 3 लाख रूपयांचा क्लेम दाखल केल्यास तुमच्यासाठी ऑगस्ट- डिसेंबर या कालावधीसाठी उर्वरित 2 लाख रूपयांची रक्कम उपलब्ध असेल.

   मी पॉलिसी कालावधीत क्लेम केला नाही तर मला माझ्या पैशांचा परतावा मिळेल का ?

तुम्ही पॉलिसी वर्षात हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल केलेला नसला तरी तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियमचा परतावा मिळणार नाही. पण तुम्ही एनसीबीसाठी (नो क्लेम बोनस) पात्र असा. त्यामुळे तुम्ही तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रिन्यू करताना प्रीमियमची रक्कम कमी होईल. तसेच तुम्ही कम्युलेटीव्ह बोनससाठी पात्र असाल, त्यामुळे तुम्ही मागील पॉलिसी वर्षात भरलेल्या प्रीमियमइतकाच प्रीमियम भरून वाढीव एसआयचा फायदा मिळवू शकाल.

    टीपीए म्हणजे काय ?

टीपीए म्हणजे थर्ड पार्टी प्रशासक होय. ही अशी संस्था आहे जी तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पुरवठादाराच्या वतीने क्लेम प्रोसेस करते ती तुमच्या आणि तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीमधील मध्यस्थ आहे आणि ती तुमचे हेल्थ इन्श्युरन्स क्लेम्स प्रोसेस आणि सेटल करण्यासाठी काम करते.

   मला उपचारांदरम्यान हॉस्पिटल बदलता येईल का ?

हो, तुम्ही उपचारांदरम्यान हॉस्पिटल बदलू शकता. पण तुम्हाला त्याची माहिती तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीला द्यावी लागेल आणि संबंधित कागदपत्रे त्यांना सादर करावी लागतील.

   मला कन्व्हलसन्स बोनस किती वेळा क्लेम करता येईल ?

तुम्ही कन्व्हलसन्स बोनस वर्षातून एकदा क्लेम करता येईल.

   माझी पॉलिसी मी निवडलेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय खर्च कव्हर करेल का ?

हो, तुमची पॉलिसी तुम्ही निवडत असलेल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार कव्हर करेल. (नेटवर्क किंवा बिगर नेटवर्क हॉस्पिटल). तथापि, तुमच्या विमा कंपनीकडून यादीतून काढून टाकलेली काही हॉस्पिटल असू शकतात आणि तुम्ही आवश्यक ती वैद्यकीय काळजी मिळवण्यासाठी त्यातील एखादे हॉस्पिटल निवडल्यास तुम्हाला कव्हर मिळणार नाही.

   मी बिगर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास मला रिएम्बर्समेंट मिळू शकेल का ?

हो, तुम्ही एखाद्या बिगर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास एक रिएम्बर्समेंट क्लेम दाखल करण्यासाठी तुमचे मेडिकल बिल्स आणि इतर कागदपत्रे दाखल करू शकता.

   प्रत्यक्ष खर्च कव्हरपेक्षा जास्त असल्यास मला फरक भरावा लागेल का ?

हो, प्रत्यक्ष खर्च हा तुम्ही निवडलेल्या कव्हरपेक्षा जास्त असल्यास तुम्हाला फरकाची रक्कम भरावी लागेल.

   हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन टीम म्हणजे काय?

हेल्थ एडमिनिस्ट्रेशन टीम (हॅट)मध्ये हेल्थ अंडररायटिंग आणि क्लेम सेटलमेंटसाठी जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि निमवैद्यकीय टीमचा समावेश असतो.ती हेल्थकेअर संबंधी सेवांसाठी सिंगल विंडो मदत आहे. ही इन-हाऊस टीम हेल्थ इन्श्युरन्स ग्राहकांशी संबंधित समस्या सोडवते. ही टीम एक संपर्क टप्पा म्हणून वेगवान क्लेम सेटलमेंटची काळजी घेते. हेल्थ इन्श्युरन्स तज्ञांकडून ग्राहकांच्या समस्या वेगवान पद्धतीने सोडवण्यासाठी खूप प्रभावशाली आहे तिच्या इन हाऊस क्षमतांमुळे ती क्लेम सेटलमेंट आणि ग्राहक सेवाही नियंत्रित करते.

    हेल्थ इन्श्युरन्सअंतर्गत क्लेम नाकारण्याची कारणे काय आहेत ?

खालील परिस्थितीत तुमची हेल्थ इन्श्युरन्स कंपनी तुमचा क्लेम सेटलमेंट नाकारू शकते:

✓ स्वतःहून केलेल्या इजेसाठी दाखल केलेला क्लेम

✓ खोटेपणा, चुकीची माहिती, घोटाळा, प्रत्यक्ष तथ्ये घोषित न करणे किंवा विमेदाराकडून असहकार्याच्या प्रकरणी

✓ प्रतीक्षा कालावधी संपण्यापूर्वी पूर्वीपासून असलेल्या आजारांसाठी दाखल केलेला क्लेम

✓ पॉलिसी दस्तऐवजात कोणत्याही अपवादासाठी क्लेम दाखल केलेला असल्यास

 

 

   कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च माझी विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी उचलेला का?

हो, तुमच्या पॉलिसीत नमूद अटी आणि शर्तींनुसार इन पेशंट हॉस्पिटलायझेशनअंतर्गत तुमची विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कोविड-19 मुळे उद्भवलेला हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर करेल.

   कोविड-19 मुळे आलेल्या खर्चांसाठी माझ्या कुटुंबातील सदस्यांना कव्हर केले जाईल का?

तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विद्यमान हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर केलेले असल्यास त्यांना कोविड-19 शी संबंधित आजारांसाठी पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार हॉस्पिटलायझेशनचा खर्च (इन पेशंट हॉस्पिटलायझेशन अंतर्गत) कव्हर केले जाईल.

   माझ्या पॉलिसीअंतर्गत कव्हर न करण्यात आलेले कोविड-19 साठीचे खर्च कोणते ?

तुमच्या पॉलिसी दस्तऐवजात नमूद केलेले देय नसलेल्या सर्व बाबी आणि आयआरडीएआयने जारी केलेली देय नसलेल्या वस्तूंची यादी कोविड -19 कव्हरेजमधून वगळली जाईल.

   कोविड -19 शी संबंधित वैद्यकीय सेवाकर्त्यांशी केलेली चर्चा आणि निदान चाचण्या माझ्या हेल्थ इन्श्युरन्समध्ये कव्हर केल्या जातील का ?

तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हरेज देत असल्यास हे खर्च कव्हर केले जातील. कृपया तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधून तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत या कव्हरेजबाबत स्पष्टीकरण मिळवा.

   माझा परदेशी प्रवासाचा इतिहास पॉलिसीअंतर्गत क्लेम दाखल करण्यावर प्रभाव टाकू शकेल का ?

नाही, तुम्ही भारतात हॉस्पिटलाइज झालेले असल्यास तुमचा परदेशी प्रवासाचा इतिहास तुमच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीअंतर्गत क्लेम दाखल करण्यावर प्रभाव टाकू शकणार नाही.

   मला हॉस्पिटलायझेशननंतर माझा क्लेम कसा सूचित करता येईल?

बजाज आलियान्झच्या अत्यंत सुलभ क्लेम सेटलमेंट प्रोसेससोबत तुम्ही खालील प्रकारे लॉकडाऊनदरम्यान तुमचा क्लेम रजिस्टर करून सेटल करू शकता:

✓ आमच्या Caringly Yours अ‍ॅपसोबत तुम्ही 20,000 रूपयांपर्यंतचा क्लेम आमच्या Caringly Yours अ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या हेल्थ CDC (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) या पेपरलेस प्रक्रियेद्वारे दाखल करू शकता.

✓ तुम्ही +91 80809 45060 या नंबरवर मिस्ड कॉल देऊ शकता आणि आम्ही तुम्हाला कॉल बॅक करून प्रक्रियेत मदत करू शकतो.

✓ तुम्ही 575758 वर 'चिंता' एसएमएस करू शकता.

✓ तुम्ही bagichelp@bajajallianz.co.in या इमेल वर तुमचा क्लेम रजिस्टरही करू शकता.

✓ क्लेम रजिस्टर करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे आमच्या ऑनलाइन क्लेम पोर्टलला भेट देणे. येथे तुम्ही तुमचा पॉलिसी नंबरसारखे तपशील देऊन लवकरात लवकर क्लेम दाखल करू शकता.

   कोविड 19 अंतर्गत कोणते प्रतीक्षा कालावधी लागू आहेत का?

हो, कोविड-19 चे उपचार कव्हर करणाऱ्या हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सना 30 दिवसांचा नियत प्रतीक्षा कालावधी लागू आहे.

   मला सम इन्शुअर्ड वाढवून घेण्याची परवानगी असेल का?

तुम्हाला नियत अटी आणि शर्तींनुसार तुमची सम इन्शुअर्ड वाढवून मिळू शकेल.

 

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

 • कस्टमर लॉग-इन

  गो
 • भागीदाराचे लॉग-इन

  गो
 • कर्मचारी लॉग-इन

  गो
आमच्यासह चॅट करा