रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Vehicle Scrappage Policy in India
जानेवारी 31, 2023

भारतातील वाहन स्क्रॅपेज पॉलिसी

गुजरात मध्ये पार पडलेल्या गुंतवणूकदार परिषदेत भारताच्या पंतप्रधानांनी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 ची घोषणा केली होती. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीचा प्रारंभ आपल्या देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांच्या महत्वाकांक्षी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीचे उद्दीष्ट देशाच्या ऑटोमोटिव्ह आणि उत्पादन इंडस्ट्रीला अधिक प्रमाणात चालना देण्याचे आहे.

भारताची नवीन व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी काय आहे?

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 मुळे रस्त्यांवर चालविण्यास योग्य नसलेल्या वाहनांचा शोध घेण्यास मदत होईल. नवीन स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत नावाप्रमाणेच प्रदूषण करणारी आणि पर्यावरणाला हानी पोहोचविणारी वाहने स्क्रॅप केली जातील. कारचे रजिस्ट्रेशन संपल्याबरोबर व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी लागू असेल. निश्चित कालावधीनंतर, वाहनाची फिटनेस टेस्ट केली जाईल. देशातील मोटर व्हेईकल कायद्यांनुसार, वाहन केवळ 15 वर्षांसाठी योग्य मानले जाते. एकदा वाहनाने 15 वर्षांचा टप्पा ओलांडल्यानंतर कोणत्याही नवीन वाहनाच्या तुलनेत अशाप्रकारची वाहने वातावरणाला प्रदूषित करण्यास सुरुवात करतात. 15 आणि 20 वर्षांपेक्षा जुने अनुक्रमे कमर्शियल आणि प्रवासी वाहन स्क्रॅप केले जातील. जेव्हा कोणत्याही कारणाशिवाय फिटनेस टेस्टसाठी पात्र ठरणार नाहीत.

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 चे उद्दिष्ट काय आहे?

नवीन स्क्रॅपेज पॉलिसीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अनफिट वाहने शोधणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने रिसायकलिंग करणे हे आहे. स्क्रॅप पॉलिसीमागील महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे अशा प्रकारच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणांना थेट आळा घालणे आहे. अनफिट वाहनामुळे निर्माण होणारे प्रदूषण देशाच्या विकासाला मारक ठरत आहे. कार स्क्रॅपेज पॉलिसीमुळे प्रदूषणात घट होईल आणि त्यासोबत अन्य लाभही प्राप्त होतील. याचा अर्थ असा की ते स्टील, प्लास्टिक आणि इतर धातू सारख्या गोष्टींची पुनर्वापर करण्यास सक्षम बनवेल. उत्पादन खर्च देखील कमी केला जाईल. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी असल्यामुळे वाहन विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जुन्या कारचे रिसायकलिंग करण्यामुळे व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीच्या यशस्वी अंमलबजावणीसह नवीन वाहन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी कधी लागू होईल?

भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात रजिस्टर्ड वाहन स्क्रॅपिंग सुविधेच्या स्थापनेस प्रोत्साहन देण्याची योजना आखत आहे.. अशाप्रकारचे सेंटर सुरू करण्यासाठी खासगी आणि सार्वजनिक सहभागाला प्रोत्साहित केले जाईल. खालील तक्त्यात प्रस्तावित व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 च्या ॲप्लिकेशनसाठी संभाव्य कालमर्यादा दर्शवली आहे:
पैलू अंदाजित तारीख
फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅपिंग सेंटरसाठी नियम 01 ऑक्टोबर 2021
15 वर्षांपुढील सरकार आणि पीएसयू वाहनांचे स्क्रॅपिंग 01 एप्रिल 2022
अवजड व्यावसायिक वाहनासाठी फिटनेस टेस्टिंग 01 एप्रिल 2023
अन्य कॅटेगरीसाठी फिटनेस टेस्टिंग 01 जून 2024
  20 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेले खासगी वाहनांचे रजिस्ट्रेशन 01 जून 2024 पासून कॅन्सल केले जाईल. ज्यावेळी त्यांची टेस्ट अयशस्वी ठरेल किंवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी केले जाणार नाही. 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असलेल्या कमर्शियल वाहनांचे रजिस्ट्रेशन 01 एप्रिल 2023 पासून कॅन्सल केले जाईल.

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 चे लाभ कोणते आहेत?

चला, नवीन स्क्रॅपेज पॉलिसीच्या संभाव्य लाभांकडे एक नजर टाकूया:
  • अनफिट वाहने स्क्रॅपिंग करणे म्हणजे गुणवत्तापूर्ण हवा आणि हवेचे कमी प्रदूषण
  • जुनी वाहने स्क्रॅप केल्यास नवीन वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असेल
  • अंमलबजावणी केलेल्या कार स्क्रॅपेज पॉलिसीसह, नोकरीच्या संधी असतील. उदाहरणार्थ, वाहनांच्या स्क्रॅपिंग साठी मनुष्यबळ आवश्यक असेल
  • जुन्या वाहनाला स्क्रॅप करताना वाहन मालकाला प्रोत्साहन म्हणून टॅक्स लाभ देखील प्राप्त होऊ शकतात
  • रिसायकलिंग इंडस्ट्री मुळे मोठा महसूल प्राप्त होईल
  • जुन्या वाहनांच्या तुलनेत नवीन वाहने सुरक्षित असतील

स्क्रॅपेज पॉलिसीसाठी वाहनांची श्रेणीकरण काय आहे?

भारतीय रस्त्यांवर आपल्या विविध प्रकारचे वाहने आढळून येतात. विविधता असल्यामुळे सर्व कारवर समान नियम लागू केले जाऊ शकत नाहीत. म्हणून, जेव्हा व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 लागू करण्याची वेळ येते तेव्हा वाहनांच्या श्रेणीकरणाची आवश्यकता भासते.

व्यावसायिक वाहने

बस किंवा कोणत्याही वाहतूक वाहनांसारख्या व्यावसायिक उद्देशांसाठी वापरलेले सर्व वाहने व्यावसायिक वाहनांच्या कॅटेगरी अंतर्गत येतात. एकदा वाहनाने 15 वर्षे पूर्ण केल्यानंतर त्याला फिटनेस टेस्ट पास करणे आवश्यक ठरते. जर वाहन अनफिट असेल तर व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 नियमांनुसार वाहन स्क्रॅप केले जाईल.

सरकारी वाहने

जानेवारी 2021 मध्ये, सरकारी वाहनांसाठी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी मंजूर करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीचे आणि 15 वर्षांपेक्षा जास्त वर्षांची वाहने स्क्रॅप केले जातील. येत्या वर्षात प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत, निर्धारित तारीख एप्रिल 01, 2022 आहे.

खासगी वाहने

दैनंदिन स्वरुपात एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी वापरली जाणारी वाहने खासगी वाहन कॅटेगरी मध्ये येतात.. खासगी वाहनांचे रजिस्ट्रेशन 20 वर्षानंतर रद्द केले जाते. जर ती अनफिट आढळली किंवा आरसी रिन्यू करण्यासाठी अयशस्वी ठरली. तथापि, प्रारंभिक रजिस्ट्रेशन तारखेपासून 15 वर्षांपुढील वाहनासाठी पासून पुन्हा रजिस्ट्रेशन शुल्काची आकारणी केली जाईल.

व्हिंटेज वाहने

सरासरी वाहनांच्या तुलनेत व्हिंटेज वाहने जुने असतात. तथापि, व्हिंटेज वाहने कमी प्रमाणात रस्त्यावर धावतात. मात्र, त्यांचे व्यवस्थापन उत्तम असते.. सर्व बाबींचा विचार करता ही एक स्वतंत्र कॅटेगरी आहे आणि अशा वाहनांचे स्वरुप त्यांना स्क्रॅप करण्याच्या दिशेने विचारात घेतले जाईल.

वाहन स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत फिटनेस टेस्ट काय आहे?

  • फिटनेस टेस्ट निर्धारित करते की वाहन तांत्रिक आयुर्मानाच्या पलीकडे चालविण्यास योग्य आहे का. फिटनेस टेस्ट ही वाहनाची रस्त्यावरील योग्यता निर्धारित करणारी तपशीलवार चाचणी आहे.
  • वाहन पर्यावरणीय प्रदूषणासाठी घटक योगदान देत आहे का हे देखील निर्धारित करते. जुन्या वाहनाला इंजिन कामगिरी, ब्रेकिंग आणि अन्य विविध चाचणी सारख्या सुरक्षा परीक्षणांची गरज भासते.. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत फिटनेस टेस्ट सेंटरमध्ये फिटनेस टेस्ट घेतली जाईल.
  • आम्ही बहुतांश वेळा प्रदूषण नियंत्रण चाचणी द्वारे वाहनाची उत्सर्जन पातळी तपासतो.. त्याचप्रमाणे, आता तुम्हाला निर्धारित कालावधीनंतर वाहनाची स्वयंचलित फिटनेस टेस्ट करणे आवश्यक आहे.
  • अशा टेस्टची वैधता पाच वर्षे असेल. यानंतर, वाहनाला दुसऱ्या टेस्टला सामोरे जाणे आवश्यक असेल.
  • अंदाजित हरीत कर. रस्ते कराच्या 10-25 टक्के, प्रत्येक ठिकाणानुसार त्यामध्ये बदल होऊ शकते. शुल्क देखील आकारले जाऊ शकते. जुन्या वाहनांचे रजिस्ट्रेशन रिन्यू करणे आवश्यक आहे. ज्यामुळे अधिक खर्च येतो.
  • फिटनेस टेस्ट मध्ये अयशस्वी ठरल्यास ज्यावेळी वाहनाच्या रजिस्ट्रेशन रिन्यूवल करण्याची वेळ येईल त्यावेळी अडचणी निर्माण होऊ शकतात.. टेस्ट अयशस्वी झालेल्या कोणत्याही वाहनाला स्क्रॅप पॉलिसी अंतर्गत रजिस्टर्ड नसल्याचे मानले जाईल.. कायद्यांनुसार, भारतीय रस्त्यावर कोणतेही रजिस्टर्ड नसलेले वाहन चालविणे कायद्याने गुन्हा मानले जाते.
  • अशा कोणत्याही प्रकरणात वाहन मालकासमोरचा स्पष्ट पर्याय म्हणजे वाहन स्क्रॅप करणे. जर हे नसेल तर वाहनाची दुरुस्ती करा जेणेकरून ते फिटनेस टेस्ट पास करू शकेल. प्रोसेस फॉलो करा आणि रजिस्ट्रेशनच्या रिन्यूवल साठी पेमेंट करा.

मी वाहनाची चाचणी किंवा स्क्रॅप कुठे करावे?

कारची आरसी समाप्ती तारीख तपासा. जर तारीख नजीकची असेल आणि तुम्ही कार ठेऊ इच्छित असल्यास रजिस्टर्ड ऑटोमेटेड व्हेईकल इन्स्पेक्शन सेंटरला भेट द्या किंवा डिस्पोज करण्यासाठी स्क्रॅपिंग स्टेशनला भेट देण्याची शिफारस केली जाते. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यासाठी योग्य इन्स्पेक्शन सेंटर स्थापित करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. काही सेंटर यापूर्वीच सुरू करण्यात आले आहेत.. जर कुणी कार स्क्रॅप करण्याच्या विचारात असल्यास त्यांना रजिस्टर्ड स्क्रॅपिंग सेंटरची प्रतीक्षा करावी लागेल. स्क्रॅपिंग सुविधा आणि इन्स्पेक्शन सेंटर्स हे 'वाहन' डाटाबेस सोबत कनेक्ट होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत, कार स्क्रॅपेज पॉलिसीसाठी संपूर्ण चाचणी प्रक्रिया अद्याप तयार केली गेली नाही. इन्स्पेक्शन प्रोसेस अन्य विविध देशांमधील टेस्टिंगच्या सेफ्टी आणि इमिशन प्रोसेस प्रमाणेच आहे. तुम्ही कारमध्ये एअर बॅग्स, सीटबेल्ट सारखी सुरक्षा उपकरणांची तपासणी तसेच प्रदूषण चाचणी व हेडलाईन संरेखन तपासणी सारख्या अन्य चाचण्या अपेक्षित करू शकतात. कार ब्रेक्स आणि इंजिनचे घटक, इलेक्ट्रॉनिक घटक किंवा संरचनात्मक नुकसान आणि गंज चाचणी इ. अधिकाऱ्यांनी अपेक्षित आहे.

कार स्क्रॅप प्रोसेस नेमकी कशी आहे?

सर्व महानगरे आणि शहरांमध्ये ऑटोमोटिव्ह स्क्रॅपियार्डचे जाळे पसरले आहे. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 अंतर्गत प्रोत्साहन मिळवण्यासाठी, अधिकृत स्क्रॅपिंग स्टेशनवर कार रजिस्टर करणे आवश्यक आहे. कार संबंधित माहिती 'वाहन' डाटाबेसवर पाहिली जाईल. ओळख तपासा आणि कारशी संबंधित सर्व डॉक्युमेंट्स सोबत बाळगा. पडताळणी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर, स्क्रॅपिंग सर्टिफिकेट प्रदान केले जाईल. रजिस्टर्ड स्क्रॅपिंग सुविधा कारचे स्वीकृत स्क्रॅप मूल्याला बँक अकाउंटमध्ये देखील जमा करेल. तसेच तुम्ही रक्कम बँक चेक स्वरुपात देखील प्राप्त करू शकतात.

मर्यादा ओलांडलेली सर्व वाहने स्क्रॅप केले जातील का?

सर्व वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. जेव्हा वाहन निश्चित केलेली मर्यादा गाठते, तेव्हा त्याला फिटनेस टेस्ट करणे आवश्यक आहे. सोप्या शब्दांमध्ये, फिटनेस वाहन चालविण्यास योग्य आहे की नाही हे निर्धारित करते. वाहनाची फिटनेस टेस्ट अयशस्वी ठरल्यास रिन्यूवल सर्टिफिकेट मिळणार नाही आणि व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीनुसार भारतीय रस्त्यांवर वाहन चालविण्यास देखील सक्षम असणार नाही.. आणि ज्यावेळी वाहन टेस्ट पास करेल. तेव्हा रिन्यूवल सर्टिफिकेट प्राप्त होईल आणि प्रत्येक पाच वर्षासाठी फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

स्क्रॅपिंग सुविधेमध्ये कारचे काय होते?

स्क्रॅपिंग सुविधेच्या ठिकाणी कारचे विभाजन केले जाते व भाग सुटे केले जातात. फ्यूएल, इंजिन ऑईल, ब्रेक ऑईल इ. सारखे द्रव पदार्थ काढून टाकले जातात. यानंतर टायर्स, व्हील्स आणि बॅटरी काढून टाकल्या जातात. इन्फोटेनमेंट सिस्टीम, इंजिन,अल्टरनेटर, ट्रान्समिशन आणि यांत्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक सब असेंब्ली कदाचित योग्य स्थितीत असू शकतात आणि नंतर विक्री केली जाऊ शकते. हे करण्यासाठी कामगारांच्या श्रमाची आवश्यकता भासते. जेव्हा प्रक्रिया योग्यरित्या पार पडते. तेव्हा स्क्रॅपिंग सेंटर्सच्या नफ्यात निश्चितपणे वाढ होते.. जेव्हा कारचे बहुतांश भाग स्वतंत्र केले जातात त्यानंतर पुढील प्रोसेसिंग केली जाते.. पाईप्स, एसी युनिट आणि हीटर कोअर हे देखील जोडलेले असतात. त्यामुळे देखील वाचवले जाऊ शकतात. प्लास्टिक व ग्लास बिट्स काढले जातात आणि पेंटही काढला जातो. उर्वरित भाग ठोकून बारीक केले जातात. नंतर तुकडे केले जातात आणि नवीन मेटल बनविण्यासाठी रिसायकल केले जातात.

जर वाहनाची फिटनेस टेस्ट अयशस्वी झाले तर काय होईल?

वाहन फिटनेस टेस्ट मध्ये अपात्र ठरल्यास त्याचा समावेश ईओएलव्ही अंतर्गत केला जाईल. याचा अर्थ म्हणजे वाहनाचे आयुष्य संपले आहे (एन्ड ऑफ लाईफ व्हेईकल). रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग सुविधांमध्ये वाहन स्क्रॅप करण्यासाठी मालकाला पर्याय दिला जाईल. आतापर्यंत, वाहन फिटनेस टेस्टसाठी तीन वेळा पात्र आहे. यानंतर, वाहनाला ईओएलव्ही मानले जाईल.

जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्यासाठी कोणते प्रोत्साहन आहेत?

जुन्या आणि अयोग्य वाहनांना रद्द करण्यासाठी सरकारने अनेक प्रोत्साहन जाहीर केले आहेत. चला व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत खालील प्रोत्साहन लाभ पाहूया:
  • जुन्या आणि अनफिट वाहनांच्या मालकांना एक स्क्रॅप मूल्य प्राप्त होईल. जे नवीन वाहनाच्या एक्स-शोरुम किंमतीच्या 4-6% समतुल्य असेल.
  • जर मालकाने डिपॉझिट सर्टिफिकेट सादर केल्यास नवीन वाहन खरेदीसाठी कोणतेही रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जाणार नाही.
  • मोटर वाहन करात राज्य सरकारला सवलत देण्यास सांगितले गेले आहे. वाहतूक/व्यावसायिक वाहनांसाठी, सवलत 15% पर्यंत असू शकते आणि गैर-वाहतूक/वैयक्तिक वाहन 25% पर्यंत असू शकते.
  • वाहनाच्या उत्पादकांना डिपॉझिट सर्टिफिकेट सापेक्ष नवीन वाहन खरेदीवर 5% सवलत देण्याचा सल्ला दिला जातो.
  • नवीन वाहनाच्या निवडीमुळे कमी मेंटेनन्स खर्च येतो.. याचाच अर्थ म्हणजे ग्राहक इंधन खर्चातही मोठ्या प्रमाणात बचत करू शकतात.

जुने वाहन धारण करण्याचे निष्कर्ष काय आहेत?

15 वर्षांहून अधिक जुने वाहन वापरणे मोठी खर्चिक स्वरुपाची बाब असू शकते. तसेच प्रत्येक वाहन मालकाला राज्य सरकारद्वारे रस्ते करावर लादलेला हरित कर अदा करणे देखील बंधनकारक ठरते.

जुन्या वाहनांचे मालक होण्यासाठी किती खर्च लागणार आहे?

जुन्या वाहनांचे रिन्यूवल आणि अनिवार्य फिटनेस टेस्ट करण्याच्या संदर्भातील येणारा एकूण खर्च सर्वाधिक आहे.. जुने वाहन स्क्रॅप करणे हाच योग्य पर्याय ठरू शकतो.. आगामी काळात फी मध्ये संभाव्य वाढ देखील अपेक्षित आहे आणि महागाईचा विचार केल्यास नियमित अंतराने होऊ शकते.. खासगी वाहन 15 वर्षांपेक्षा जास्त जुने असल्यास साधारण किती खर्च येऊ शकतो याची माहिती याठिकाणी दिली आहे:
  • रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी शुल्क
  • फिटनेस टेस्टसाठी शुल्क
  • रोड टॅक्स
  • ग्रीन सेस

रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठी शुल्क

खालील तक्त्यात 15 वर्षे जुन्या खासगी वाहनासाठी नवीन रजिस्ट्रेशन रिन्यूवल शुल्क दर्शविले आहे:
वाहन नियमित रजिस्ट्रेशन शुल्क रिन्यूवल शुल्क
कार/जीप ₹600 ₹5,000
मोटरसायकल ₹300 ₹1,000
थ्री-व्हीलर/ क्वाड्रिसायकल ₹600 ₹2500
इम्पोर्टेड मोटर वाहन ₹5,000 ₹40,000
  अस्वीकरण: कृपया अधिकृत वेबसाईट रेफर करा. आकडे बदलाच्या अधीन असल्याने. खालील तक्त्यामध्ये, 15 वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनासाठी फिटनेस सर्टिफिकेट रिन्यूवलचे शुल्क दर्शविले आहे:
वाहन नियमित रजिस्ट्रेशन शुल्क रिन्यूवल शुल्क
टॅक्सी/कॅब ₹1000 ₹7,000
मोटरसायकल ₹500 ₹1,000
थ्री-व्हीलर/ क्वाड्रिसायकल ₹1000 ₹3500
अवजड वस्तू/प्रवासी ₹1500 ₹12,500
मध्यम वस्तू/प्रवासी ₹13,000 ₹10,000
  अस्वीकरण: कृपया अधिकृत वेबसाईट रेफर करा. आकडे बदलाच्या अधीन असल्याने.

फिटनेस टेस्ट आणि फिटनेस सर्टिफिकेट मंजूर करण्यासाठी सुधारित फी रचना

15 वर्षांहून अधिक वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट मान्यता किंवा रिन्यूवल साठी वाहनाची टेस्ट करण्यासाठी खालील तक्त्यात फी रचना दर्शविली आहे:
वाहनाचा प्रकार विद्यमान शुल्क सुधारित शुल्क
हलके मोटर वाहन ₹600 ₹1,000
मध्यम वस्तू / प्रवासी वाहन ₹1,000 ₹1,300
अवजड वस्तू/प्रवासी वाहन ₹1,000 ₹1,500
  अस्वीकरण: कृपया अधिकृत वेबसाईट रेफर करा. आकडे बदलाच्या अधीन असल्याने. 15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी फिटनेस सर्टिफिकेट मिळवा किंवा रिन्यूवल करा:
वाहनाचा प्रकार विद्यमान शुल्क सुधारित शुल्क
हलके मोटर वाहन ₹200 ₹7,500
मध्यम वस्तू / प्रवासी वाहन ₹200 ₹10,000
अवजड वस्तू/प्रवासी वाहन ₹200 ₹12,500
  अस्वीकरण: कृपया अधिकृत वेबसाईट रेफर करा. आकडे बदलाच्या अधीन असल्याने. खालील तक्त्यात पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी, फिटनेस टेस्ट आणि बिगर-वाहतुकीच्या मध्यम वजनाच्या वाहनांच्या सर्टिफिकेट यासाठी सुधारित शुल्क दर्शविते:
मापदंड वर्तमान रजिस्ट्रेशन/रिन्यूवल शुल्क सुधारित रजिस्ट्रेशन आणि रिन्यूवल शुल्क
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी करणे किंवा रिन्यूवल करणे ₹ 600 (नवीन आणि रजिस्ट्रेशन रिन्यूवलसाठी) ₹ 600 (नवीन रजिस्ट्रेशन साठी) ₹ 5,000 (15 वर्षांनंतर रजिस्ट्रेशन रिन्यूवल साठी)
15 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी अनुदान किंवा फिटनेस सर्टिफिकेट रिन्यूवल साठी वाहन चाचणीचे आयोजन ₹600 ₹ 1,000 (स्वयंचलित चाचणी)
  अस्वीकरण: कृपया अधिकृत वेबसाईट रेफर करा. आकडे बदलाच्या अधीन असल्याने.

स्क्रॅपिंग मुळे कार इन्श्युरन्स पॉलिसीवर कसा परिणाम होतो?

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 नुसार, 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी खासगी कार आणि 15 वर्षांपेक्षा मोठ्या व्यावसायिक वाहनांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल केले जाईल. चाचणी पास करणारी वाहने पुन्हा रजिस्टर्ड केली जातात. परंतु टेस्ट अयशस्वी झालेल्या वाहनांना स्क्रॅप करणे आवश्यक आहे. कार स्क्रॅप केल्यामुळे प्रभावित होऊ शकते तुमची कार इन्श्युरन्स पॉलिसी:
  • कार उत्पादकांना त्या अनफिट वाहनांच्या स्क्रॅपेज मुळे स्टील, ॲल्युमिनियम, रबर, प्लास्टिक आणि कॉपर सारख्या इंडस्ट्री मटेरिअलचा ॲक्सेस मिळेल.. आता, कमी किंमतीच्या उत्पादन मटेरिअलच्या ॲक्सेस मुळे उत्पादकांद्वारे वाहन उत्पादनावरील खर्च कमी केला जाऊ शकतो.
  • जेव्हा नवीन कारच्या किंमत कमी होतील. तेव्हा कार इन्श्युरन्सचा खर्च देखील कमी होऊ शकतो. कारचे बाजार मूल्य म्हणून आयडीव्ही महत्वपूर्ण ठरते आणि निर्धारित करते कार इन्श्युरन्सची किंमत.
  • थर्ड-पार्टी कार इन्श्युरन्स प्रीमियम साठी काही नियम आहेत. स्वत:च्या नुकसानीच्या इन्श्युरन्स क्लेमच्या तुलनेत थर्ड-पार्टी क्लेमचे प्रमाण अधिक आहे. निश्चितच, थर्ड-पार्टी क्लेमच्या वाढत्या संख्येला अनफिट वाहने देखील कारणीभूत ठरतात. व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीच्या अंमलबजावणीमुळे अनफिट वाहने स्क्रॅप करण्यात आल्यामुळे थर्ड-पार्टी क्लेमचे प्रमाण कमी होईल.
तुम्ही आमचे ऑनलाईन कार इन्श्युरन्स कॅल्क्युलेटर वापरुन तुमच्या वाहनाचे प्रीमियम कॅल्क्युलेट करू शकता.
  • अनफिट आणि जुन्या कार मुळे इन्श्युरन्स कंपन्यांकडील इनक्युर्ड क्लेम रेशिओत निश्चितपणे वाढ होते.. इनक्युर्ड क्लेम रेशिओ म्हणजे आर्थिक वर्षात क्लेम सेटलेमेंटची एकूण वॅल्यू व प्राप्त प्रीमियमची संपूर्ण वॅल्यू यांचा रेशिओ होय.. त्यामुळे, अनफिट कार स्क्रॅप केल्यास आयसीआर मध्ये देखील घट होईल.
इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/ पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

माझी कार स्क्रॅप करण्यापूर्वी मी कार इन्श्युरन्स रद्द करावा का?

पॉलिसी कॅन्सल करण्यासाठी तुमच्या कार इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क साधण्यापूर्वी तुमच्या कारची आरसी कॅन्सल करणे आवश्यक आहे.. आरटीओ येथे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सल करा. कारचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कॅन्सल झाल्यानंतर, कार इन्श्युरन्स पॉलिसी कॅन्सल करण्याविषयी इन्श्युररला सूचित करा. पॉलिसीच्या रिफंडच्या बाबतीत, ते प्रो-रेटा आधारावर कॅल्क्युलेट केले जाईल. तरीही, जर वर्तमान पॉलिसी वर्षात क्लेम केला गेला असेल तर कार इन्श्युरन्स पॉलिसी कॅन्सल केली जाऊ शकत नाही.

जर मी कार इन्श्युरन्स पॉलिसी रद्द केली नाही आणि कार स्क्रॅप केली असेल तर काय होईल?

जर कार स्क्रॅप करायची असेल तेव्हा संबंधित आरटीओ कडे कारचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अनुक्रमे कॅन्सल करणे महत्त्वाचे आहे. चला कारच्या आरसीच्या रद्दीकरणाची समज घेऊया आणि वाहनाच्या स्क्रॅपेजविषयी इन्श्युरन्सला सूचित करूयात.
  • वाहन चोरी प्रतिबंध: आरसी कॅन्सल नसल्यास चोरीच्या वाहनासाठी गुन्हेगार स्क्रॅप केलेल्या कार डॉक्युमेंटचा वापर करू शकतात. त्यामुळे, जेव्हा तुम्ही कारची आरसी कॅन्सल कराल, तेव्हा वाहन चोरीची शक्यता टाळली जाऊ शकते.
  • कार डॉक्युमेंट्सचा गैरवापर: एकदा कार स्क्रॅप केल्यानंतर, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्वरित कॅन्सल केले जाते. आरसी कॅन्सल न केल्याच्या स्थितीत, फसवणूक करणाऱ्या व्यक्ती कारच्या डॉक्युमेंट्सचा गैरवापर करू शकतात. असा डॉक्युमेंट्स वापर अवैध कृतीसाठी किंवा चोरीच्या वाहनांसाठी केला जाऊ शकतो.

स्क्रॅप केलेल्या कारसाठी, मला कोणताही कार इन्श्युरन्स रिफंड प्राप्त होईल का?

कार स्क्रॅप करतेवेळी नोंद घ्या, आरसी कॅन्सल करणे आवश्यक आहे. जेव्हा प्रादेशिक वाहतूक कार्यालय आरसी कॅन्सल करते. तेव्हा तुम्ही पॉलिसी कॅन्सल करण्यासह पुढे सुरू ठेवू शकता. रिफंड प्रो-रेटा आधारावर असतील. पॉलिसीच्या कालावधीदरम्यान या वेळी क्लेम केला गेल्यास कोणताही रिफंड प्राप्त होणार नाही. क्लेम केला आहे की नाही याचा विचार न करता पॉलिसी कॅन्सल केली असल्याची खात्री करा. वाहन रजिस्ट्रेशन कॅन्सल झाल्यावर कार इन्श्युरन्स पॉलिसी निष्क्रिय करणे आवश्यक आहे.

व्हिंटेज कार मालकांसाठी नवीन स्क्रॅपेज पॉलिसी म्हणजे काय?

व्हिंटेज वाहनांच्या वारसाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील व्हिंटेज मोटर वाहनांच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसचे आराखडा निश्चित केला आहे. नवीन स्क्रॅप पॉलिसीसह ती एक त्रासमुक्त प्रोसेस असेल. मुख्य वैशिष्ट्यांमध्ये यापूर्वीच रजिस्टर्ड असलेल्या वाहनांसाठी जुना नंबर कायम ठेवणे आणि व्हीए सीरिज मध्ये नवीन रजिस्ट्रेशनचा समावेश होतो. 'व्हीए' सीरिज ही युनिक रजिस्ट्रेशन मार्क असेल. व्हिंटेज कार रॅलीत सहभाग, टेक्निकल रिसर्च, इंधन भरणे, मेंटेनन्स किंवा प्रदर्शनात सहभाग यासाठी भारतीय रस्त्यांवर धावण्यास व्हिंटेज मोटर वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

भारतात कार स्क्रॅप म्हणून विकण्यासाठी आरटीओचे कोणते नियम आहेत?

प्रादेशिक परिवहन कार्यालयात जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्यासाठी निर्धारित केलेले काही नियम आहेत. जुन्या वाहनाला स्क्रॅप करणे हा एक सुयोग्य आणि सुरक्षित पर्याय आहे. वाहन स्क्रॅप करणे म्हणजे तुकड्यांमध्ये कापणे आणि रिसायकल करणे होय. तसेच, कोणत्याही अनधिकृत कृतीची शक्यता देखील काढून टाकली जाते. भारतातील स्क्रॅपिंग प्रोसेस बाबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण याठिकाणी देण्यात आले आहे:
  • स्क्रॅप रिसायकलिंग साठी पाठविण्यापूर्वी कारचा चेसिस नंबर काढला जातो.
  • कार मालकाने अधिकृत स्क्रॅप डीलरशी संपर्क साधावा. डीलरने हे सुनिश्चित करावे की कार सर्वात सुरक्षितपणे स्क्रॅप करायला हवी. जेणेकरुन पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही.
  • कार मालकाने आरटीओच्या संपर्कात राहावे आणि त्यांना स्क्रॅपिंग बाबत सूचित करावे. कारची रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
  • स्क्रॅप डीलर प्रत्यक्ष इन्स्पेक्शन करेल आणि वाहनाच्या वजनाच्या आधारावर किंमत निश्चित करेल.. कराराच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर स्क्रॅप डीलर कारचे भाग सुटे करण्यास सुरुवात करेल. त्यांची विभागणी प्लास्टिक, रबर, आयर्न आणि अन्य गोष्टींमध्ये केली जाईल.
  • स्क्रॅप डीलरद्वारे वाहन स्क्रॅप केले असल्याची खात्री करा. भविष्यात असिस्टन्स साठी त्याचे फोटो घ्या.
अस्वीकरण: नियम बदलाच्या अधीन आहेत.

जुन्या वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि स्क्रॅपिंग रद्द करण्यासाठी आरटीओचे नियम कोणते आहेत?

जेव्हा जुन्या वाहनांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची आणि स्क्रॅपिंग करण्याची वेळ येते तेव्हा आरटीओ नियमांविषयी जाणून घ्या:
  • कार स्क्रॅपिंग विषयी त्यांना सूचित करण्यासाठी आरटीओला एक पत्र लिहा.
  • चेसिस नंबरसह कारचे मूळ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सरेंडर करा.
  • लेटरहेडवर अधिकृत स्क्रॅप डीलरचे कन्फर्मेशन असावे. संपूर्ण ॲड्रेसचा त्यावर समावेश असावा. तसेच, तुम्ही यावेळी कारचे फोटो सबमिट करू शकता.
  • वाहनाच्या मालकाने रजिस्ट्रेशन कॅन्सल आणि स्क्रॅप साठी ॲप्लिकेशन सोबत शपथपत्र सबमिट करावे. शपथपत्रात स्पष्टपणे नमूद असावे की वाहन कोणतेही इन्श्युरन्स क्लेम, लोन, प्रलंबित न्यायालय प्रकरणे अंतर्गत नाही किंवा कोणत्याही चोरीच्या कृतीत सहभागी नाही.
आरटीओ डॉक्युमेंट्सची पडताळणी करतील आणि त्यांना पुढील स्टेप्स साठी दिशादर्शन करतील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आणि वाहतूक पोलिसांकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हे होईल. कारच्या खरेदी किंवा विक्रीसंदर्भात आरटीओ कार्यालयात नोंदी राखण्यासाठी ही पडताळणी केली जाते. जेव्हा सर्व रेकॉर्ड समाधानकारक आढळतील, तेव्हा आरटीओ कारचे रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल. अस्वीकरण: नियम बदलाच्या अधीन आहेत.

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 संबंधी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  1. 15 वर्षांनंतर माझी कार स्क्रॅप करणे आवश्यक आहे का?

15 वर्षांपेक्षा जुन्या कारची फिटनेस टेस्ट करणे आवश्यक आहे. जर कारची फिटनेस टेस्ट अयशस्वी झाली तर नवीन व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीनुसार ते स्क्रॅप करणे आवश्यक आहे.
  1. आम्ही 15 वर्षांनंतर कार किंवा बाईक वापरू शकतो का?

केंद्रीय मोटर वाहन नियमानुसार, प्रत्येक 5 वर्षानंतर 15 वर्षांपुढील खासगी वाहने आणि 20 वर्षांपुढील व्यावसायिक वाहने ही पुन्हा रजिस्टर्ड करणे आवश्यक आहेत. जोपर्यंत वाहनाची फिटनेस टेस्ट अयशस्वी ठरत नाही. तोपर्यंत वाहन भारतीय रस्त्यांवर धावू शकते.
  1. फिटनेस टेस्ट मोफत आहे का?

नितीन गडकरी व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी 2021 नुसार, फिटनेस चाचणीसाठी विहित शुल्क भरावे लागेल. ₹40,000 पर्यंत शुल्क असू शकते आणि भविष्यात त्यामध्ये बदल देखील होऊ शकतो. आतापर्यंत, फिटनेस टेस्ट करण्याचे शुल्क वाहनाच्या प्रकारानुसार जवळपास ₹200 ते ₹1,000 आहे.
  1. फिटनेस टेस्टसाठी कोणते मापदंड तपासले जातात?

भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या वाहनाची फिटनेस तपासण्यासाठी ही फिटनेस चाचणी केली जाईल. आणि पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होत आहे की नाही हे तपासले जाईल. अनफिट वाहने स्क्रॅप करणे म्हणजे कमी प्रदूषण आणि भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राला वाढीच्या मोठ्या प्रमाणात संधी.
  1. वाहन स्क्रॅप पॉलिसी डिझेल आणि पेट्रोल दोन्ही वाहनांसाठी लागू आहे का?

होय, व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी डिझेल आणि पेट्रोल दोन्ही वाहनांना लागू होते.
  1. जुन्या वाहनाला कायद्यानुसार स्क्रॅप करणे अनिवार्य आहे का?

आतापर्यंत, जुने कोणतेही वाहन स्क्रॅप करणे अनिवार्य नाही. वाहन अनफिट असल्यास स्क्रॅप करण्याची शिफारस केली जाते.
  1. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसीचा लाभ कुणाला होईल?

केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मते, व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी मुळे 20 वर्षापुढील अंदाजित 51 लाख मध्यम वजनाची वाहने (एलएमव्ही) आणि 15 वर्षापुढील 34 लाखांहून अधिक एलएमव्हींना लाभ होईल. ऑटोमोबाईल सेक्टरसाठी वाहन स्क्रॅप पॉलिसीची मुख्य विशेषता खालीलप्रमाणे आहे:
  • प्रदूषण कमी करण्यास मदत करते
  • नवीन वाहनाची विक्री
  • नोकरीची संधी
  1. स्क्रॅपेज पॉलिसी ऐच्छिक आहे का?

व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी स्वैच्छिक आहे. जर वाहनाने फिटनेस टेस्ट क्लिअर केली नाही आणि मान्यताप्राप्त रिटेस्ट मध्ये देखील अयशस्वी ठरल्यास वाहन वाहनाचे आयुर्मान संपले (एन्ड ऑफ लाईफ व्हेईकल) EOLV म्हणून घोषित केले जाईल.
  1. कार कोणत्या पात्रता घटकांसाठी स्क्रॅप केली जाऊ शकते?

खालील अटींमध्ये, कार स्क्रॅप करण्यास पात्र आहे:
  • जेव्हा कारची आरसी कालबाह्य होईल
  • जेव्हा वाहनाची रजिस्टर्ड इन्स्पेक्शन सेंटर वर फिटनेस चाचणी अयशस्वी ठरेल.
  • जर अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये कारचे नुकसान झाले असेल तर
  • कार जप्त करण्यात आली असेल
याव्यतिरिक्त, वापरात नसलेल्या कार किंवा निर्गमित सरकारी वाहने देखील स्क्रॅप केली जाऊ शकतात. कारचे स्क्रॅपिंग करणे स्वैच्छिक आहे, तथापि; इन्स्पेक्शन अयशस्वी झाल्यास ते रस्त्यांवर चालविले जाऊ शकत नाही.
  1. तुम्ही तुमची कार कुठे स्क्रॅप किंवा टेस्ट करू शकता?

फिटनेस टेस्ट करण्यासाठी रजिस्टर्ड स्वयंचलित वाहन इन्स्पेक्शन सेंटरला भेट द्या. आणि वाहन डिस्पोज करण्यासाठी रजिस्टर्ड स्क्रॅपिंग स्टेशनला भेट द्या.
  1. व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत वाहन स्क्रॅप केल्यानंतर सर्टिफिकेट मिळेल का?

होय, व्हेईकल स्क्रॅपेज पॉलिसी अंतर्गत तुम्हाला वाहन स्क्रॅप केल्यानंतर सर्टिफिकेट प्राप्त होईल.
  1. स्क्रॅपेज टेस्ट पास केली आहे?? तुम्हाला पुढे काय करावे लागेल हे येथे आहे.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यू करणे आवश्यक आहे.. निरंतर वापरासाठी रजिस्ट्रेशन समाप्ती तारखेपूर्वी साठ दिवसांपेक्षा अधिक असू नये.. खालील काही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे:
  • फॉर्म 25 मध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूवल साठी अप्लाय करा. हे नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणाकडे केले जाणे आवश्यक आहे ज्याच्या अधिकारक्षेत्राखाली वाहन कालबाह्य तारखेपूर्वी सहा दिवसांपेक्षा अधिक नाही.
  • वाहनावरील सर्व देय टॅक्स अदा करा.
  • केंद्रीय मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1989 च्या नियम 81 नुसार सुयोग्य फी देय करावी.
खालील तक्त्यात आवश्यक सर्व महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सची यादी आहे:
ॲप्लिकेशन मधील फॉर्म 25
पीयूसी
फिटनेस सर्टिफिकेट*
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट*
इन्श्युरन्स सर्टिफिकेट*
आरसी बुक*
आजच्या तारखे पर्यंत देय केलेल्या रोड-टॅक्सच्या पेमेंटचा पुरावा*
इंजिन पेन्सिल आणि चेसिस प्रिंट*
PAN कार्ड किंवा फॉर्म 60/61 ची कॉपी*
स्वाक्षरी ओळख*
  अस्वीकरण: काही राज्यांमध्ये स्वाक्षांकित डॉक्युमेंट्स सादर करणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटर व्हेईकल्स ॲक्ट नुसार, वाहनाला फिट मानले जाईपर्यंत खासगी वाहनांनी प्रत्येक पाच वर्षानंतर 15 वर्षानंतर पुन्हा रजिस्टर करणे आवश्यक आहे. खाली आवश्यक असलेल्या प्रमुख डॉक्युमेंट्सची सूची आहे आणि वाहनाची पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस देखील विशद केली आहे:
  • योग्यरित्या भरलेला फॉर्म 25
  • मूळ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट
  • इन्श्युरन्स सर्टिफिकेट
  • पोल्यूशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
इन्स्पेक्शन साठी, वाहन नंतर रजिस्टर्ड प्राधिकरणाच्या समोर सादर करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन फी काउंटरवर देय करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी पावती जारी केली जाईल. नंतर विभागाद्वारे नवीन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जारी केले जाईल.
  1. जर तुम्ही तुमची कार स्क्रॅप केली तर तुम्हाला तुमच्या इन्श्युररला सूचित करणे आवश्यक आहे का?

होय, जेव्हा आपण कार स्क्रॅप करण्याचा निर्णय घेता, तेव्हा इन्श्युररला सूचित करणे महत्त्वाचे आहे. इन्श्युरन्स कंपनी कार इन्श्युरन्स प्लॅन रद्द करेल कारण त्यास सार्वजनिक रस्त्यांवर वापरण्यासाठी रजिस्टर्ड केले जाणार नाही.
  1. तुमची कार स्क्रॅप केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करणे आवश्यक आहे का?

होय, कार स्क्रॅप केल्यानंतर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द करणे महत्त्वाचे आहे. कोणतीही बेकायदेशीर कृती करण्यासाठी लोक स्क्रॅप केलेल्या कारच्या विद्यमान डॉक्युमेंट्सचा वापर करू शकतात. यामुळे कायदेशीर परिणाम होऊ शकतात. आरसी रद्द करणे अशा संभाव्य उपक्रमांना प्रतिबंधित करते. याचा अर्थ असा की कोणीही त्यांच्या फायद्यासाठी कारची ओळख किंवा माहिती गैरवापर करू शकणार नाही.   *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत