रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
तुमच्या बिझनेसची वाढ आणि यश हे सरळ चढणीच्या रेषेत नसेल आणि तसे असले तरी हरकत नाही. हा आलेख चढ-उताराचा असणार आहे आणि तुम्ही त्याबद्दल काहीही करू शकत नसलात तरी तुम्ही या गोष्टीची काळजी घेऊ शकता की ते वारंवार होणार नाही आणि खूप तीक्ष्ण नसेल. बजाज आलियान्झमध्ये आम्ही आमच्या फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्स पॉलिसीसोबत तुम्हाला हे साध्य करण्यास मदत करतो.
आजच्या प्रचंड स्पर्धात्मक बाजारपेठेत आणि सातत्याने बदलत्या जगात फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्सचे पाठबळ असणे हे तुमच्या बिझनेसच्या स्थैर्यासाठीच नाही तर टिकण्यासाठीही महत्त्वाचे आहे.
तुम्ही व्यावसायिक संबंध निर्माण केलेल्या कोणत्याही व्यक्तीने मग ते कर्मचारी असोत की ग्राहक आणि त्यामधल्या टप्प्यातील कुणीही, तुमच्या कंपनीविरोधात खटला दाखल केल्यास तुमच्या व्यवसायाची कामगिरी आणि नफा यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
चुकीच्या पद्धतीने कामावरून काढून टाकणे किंवा आपल्या गोपनीयतेचा भंग अशा कारणांसाठी कंपनीचे नाराज कर्मचारी किंवा ग्राहकांकडून खटला दाखल करणे ही कधीही घडू शकणारी गोष्ट आहे. असे क्लेम्स तुमच्या कंपनीवर दूरगामी परिणाम करू शकतात.
फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्स पॉलिसीची रचना सर्व उद्योग आणि व्यवसाय यांचा पूर्ण विचार करून विविध प्रकारच्या क्लेमची काळजी घेण्यासाठी करण्यात आली आहे. आमच्या सेवा सर्व कंपन्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी टेलरमेड करण्यात आल्या आहेत. त्यात सर्वांत मोठ्या जागतिक मल्टीनॅशनल कंपन्यांपासून ते छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांपर्यंत अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
आम्ही अनेक औद्योगिक क्षेत्रे कव्हर करतो आणि सामान्य वाणिज्यिक ग्राहकांना फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्सची सेवा पुरवतो.
आम्ही हे समजतो की, बाजारपेठा वेगाने विकसित होत आहेत आणि त्यासाठी नवनवीन धोक्यांच्या तपशीलवार माहितीसह तसेच कायदेशीर अद्ययावत ज्ञानासह एक प्रतिसादात्मक दृष्टीकोन अवलंबणे गरजेचे आहे. त्यामुळे आमचे लोक आणि प्रक्रिया तुम्हाला त्या देण्यासाठी वचनबद्ध आहेत.
आमचा उद्योगातील अनुभव, तज्ञ अंडररायटर्सच्या टीम्स आणि आमची बदलत्या बाजारपेठांशी जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला आमची गरज असेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू या गोष्टीची हमी देण्यास मदत करते.
तुमचा उद्योग (आणि त्याचे वेगवेगळे घटक) हे विविध प्रकारच्या धोक्यांना सामोरे जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही विविध प्रकारच्या फायनान्शियल लाइन सोल्यूशन्स देतो.
डायरेक्टर्स अँड ऑफिसर्स इन्श्युरन्स (डी अँड ओ) हा अत्यंत महत्त्वाच्या फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्स कव्हरपैकी एक आहे जो तुमच्या कंपनीकडे असणे गरजेचे आहे. आम्हाला कल्पना आहे की, तुमच्या कंपनीचे संचालक आणि अधिकारी तिच्या यशात एक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि कंपनीचे सर्व धोरणात्मक निर्णय त्यांच्यावर अवलंबून असतात.
आम्ही हे समजतो की, त्यांना तुमच्या कंपनीची वाढ आणि विकासासाठी रोजच्या रोज मोठे आणि गुंतागुंतीचे निर्णय घ्यावे लागतात. तुमची कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असल्यास तुमच्या संचालकांना फक्त देशांतर्गत बाजारपेठाच आणि नियमावली नाही तर जगभरातील विविध बाजारपेठांमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि पूर्तता नियमनांचा विचार करावा लागतो.
इतका मोठा प्रभाव असलेले, प्रचंड तणावाच्या भूमिका असलेले संचालक आणि व्यवस्थापक चुका करू शकतात आणि त्यांच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते. त्यांच्या डोक्यावर वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाण्याची भीती असेल तर ते धोके पत्करणार नाहीत आणि बिझनेस चालवत असताना धोका ही अविभाज्य बाब असते. त्याचप्रमाणे कर्मचारी आणि भागधारक यांच्यासह थर्ड पार्टी आरोपांचीही त्यांना भीती असते.
बजाज आलियान्झ डायरेक्टर्स अँड ऑफिसर्स इन्श्युरन्स (डी अँड ओ) पॉलिसीची रचना तुमचे संचालक, अधिकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांचे रक्षण त्यांच्या कार्यालयीन कर्तव्य बजावत असताना घेतलेल्या निर्णयातून उद्भवणाऱ्या धोक्यांपासून करण्यासाठी आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी किंवा नियामक आरोप लावण्यात आल्यास आम्ही बचावाचा खर्चही कव्हर करतो.
आमच्या डायरेक्टर्स अँड ऑफिसर्स पॉलिसीच्या (डी अँड ओ) मदतीने तुम्ही आणि तुमची कंपनी सुरक्षित वातावरणात काम करू शकता कारण आम्ही तुमची पाठराखण करतो.
तुमचा बिझनेस आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल तर त्यात धोके पत्करावे लागतात याची तुम्हाला कल्पना आहे.तुम्हाला अशा जोडीदाराची गरज आहे जो तुम्हाला जगभरात वाढत्या आणि गुंतागुंतीच्या बिझनेस धोक्यांना पत्करण्यासाठी कस्टमाइज्ड जागतिक उपाययोजना देईल. बजाज आलियान्झमध्ये आम्ही आमच्या जागतिक व्याप्तीसाठी आणि उद्योगातील ज्ञानासह इंटरनॅशनल इन्श्युरन्स प्रोग्राम्स (आयआयपीज)च्या मदतीने त्यासाठी सज्ज आहोत.
आमच्या फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्सच्या या कव्हरअंतर्गत आम्ही तुमच्या कंपनीला, ती कोणत्याही उद्योगातील किंवा आकारमानाची असली तरी खास सुविधा दिल्या आहेत.
आम्ही स्थानिक पॉलिसी देतो जी धोक्यांसाठी पुरेशी असतात आणि ती स्थानिक नियामक आणि आर्थिक नियम तसेच इतर पूर्ततेच्या गरजांचा विचार करून बनवलेली असतात. एका सुयोग्य डीआयसी संरक्षणासह मास्टर पॉलिसीसोबत समन्वयित करून या पॉलिसी बनवण्यात आल्या आहेत.
आमच्या तज्ञ टीम्स धोके हाताळण्यासाठी सुसज्ज आहेत आणि त्या लॉस कंट्रोल नियत्रण प्रभावशाली पद्धतीने राबवू शकतात जेणेकरून तुम्हाला कशाचीही काळजी करण्याची गरज पडत नाही आणि जगाच्या कोणत्याही भागात तुमचा व्यवसाय तुम्ही विस्तारू शकता.
अलीकडच्या काळात बिझनेससमोर उभे राहणारे एक मोठे आव्हान म्हणजे विविध मुद्द्यांवरून त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून दाखल करण्यात येणारे खटले हे आहे. हा धोका फक्त मोठ्या कॉर्पोरेशन्सनाच नाही तर सर्व लहानमोठ्या कंपन्यांना या गोष्टीचा त्रास होतो.
कर्मचारी आपल्या कंपन्यांवर खटले दाखल करण्याचे प्रमुख कारण म्हणजे कामावरून चुकीच्या पद्धतीने काढून टाकणे, भेदभाव, नेमणूक करण्यात किंवा पदोन्नती देण्यात अपयश, लैंगिक छळ, चुकीचे शिस्तपालन आणि कर्मचारी लाभ योजनांचे चुकीचे व्यवस्थापन.
अशा परिस्थिती, एम्प्लॉयमेंट प्रॅक्टिसेस लायबिलिटी (ईपीएलआय) ही एक अत्यावश्यक फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्स पॉलिसी ठरते. ती तुमच्या कंपनीसाठी खटल्यांच्या सततच्या भीतीशिवाय शांतपणे काम करण्यास तुम्हाला आणि तुमच्या व्यवस्थापनाला आवश्यक ते संरक्षण देते.
तुम्हाला जनतेकडून भांडवल उभारायचे असते किंवा नियामक बाजारपेठांमध्ये तुमच्या सिक्युरिटीज विकायच्या असता तेव्हा तुम्हाला प्रॉस्पेक्टस जारी करणे गरजेचे ठरते. जारी केले जाणारे प्रॉस्पेक्टस महत्त्वाचे असते. कारण त्यातील कोणतीही माहिती थोडीही चुकीची असल्यास गुंतवणूकदार तुमच्या कंपनीकडून त्यांच्या झालेल्या नुकसानाचे पूर्ण मूल्य मागू शकतात.
असे क्लेम्स फक्त प्रॉस्पेक्टस जारी करतानाच नाही तर अनेक वर्षांनीही दाखल केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही सार्वजनिक ऑफरिंग करता आणि प्रॉस्पेक्टस जारी करता तेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीला संभाव्य लायबिलिटीसाठी खुले करत असता.
तसेच तुम्ही आणि तुमच्या कंपनीच्या संचालकांना प्रॉस्पेक्टसमधील माहिती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्याचे सिद्ध झाल्यास दिवाणी आणि गुन्हेगारी आरोपांना सामोरे जावे लागू शकते.
होय, अशा धोक्यांमुळे तुम्हाला प्रॉस्पेक्ट तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. परंतु, त्याचबरोबर तुम्हाला प्रॉस्पेक्टस लायबिलिटी इन्श्युरन्सचीही गरज भासते कारण ही एक महत्त्वाची फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्स पॉलिसी आहे.
तुम्ही जारी केलेल्या प्रॉस्पेक्टसमधून उद्भवणाऱ्या उत्तरदायित्वामध्ये आमची प्रॉस्पेक्टस लायबिलिटी इन्श्युरन्स पॉलिसी तुम्हाला कव्हर करेल.
तुमची कंपनी तुमच्या ग्राहकांना तज्ञ सल्ला देत असल्यास अशा बिझनेसच्या पावलांमधून उद्भवणारे धोके तुम्हाला निश्चितच माहीत असणार. त्याचमुळे तुम्ही तुमच्या कंपनीचे संरक्षण बजाज आलियान्झ कमर्शियल प्रोफेशनल इन्डेम्निटी इन्श्युरन्सने तात्काळ केले पाहिजे.
आमच्या फायनान्शियल लाइन्स इन्श्युरन्सचे हे कव्हर दुर्लक्ष किंवा चुकीचा सल्ला आणि सेवा यांच्यासाठी ग्राहकांनी केलेल्या क्लेम्सपासून तुमचे रक्षण करण्यासाठी तयार केलेले आहे. प्रोफेशनल इन्डेम्निटी इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या बिझनेसविरोधात केलेल्या कोणत्याही आरोपांपासून बचावासाठीचा खर्चही कव्हर करेल.
आम्हाला कल्पना आहे की वेगवेगळ्या व्यावसायिकांना आणि उद्योगांना विविध प्रकारच्या संरक्षणाची गरज असते. त्यामुळे आम्ही खालील गोष्टी कव्हर करतो:
रिन्यूवल रिमाइंडर सेट करा
तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.
बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.
कॉलबॅकची विनंती
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा