रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

कोरोना कवच पॉलिसी

 

हेल्थ इन्श्युरन्स फॉर कोरोना व्हायरस
Corona Kavach Policy by Bajaj Allianz

आपल्यासाठी विशेष कोविड -19 हेल्थ इन्श्युरन्स

कृपया नाव एन्टर करा
आम्हाला कॉल करा
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

तुमच्यासाठी यामध्ये काय आहे?

कोविड-19 साथीचा रोगाला कव्हर करते

कुटुंबासाठी विस्तारित कव्हर्स स्वत:, जोडीदार, पालक, सासू-सासरे आणि अवलंबून मुले समाविष्ट.

50,000 ते 5 लाखांपर्यंतचे अनेक सम इन्शुअर्ड पर्याय

कोरोना कवच पॉलिसी काय आहे?

नावाप्रमाणेच, कोरोना कवच पॉलिसी ही एक मानक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे, जी विशेषतः कोरोना व्हायरसच्या हेल्थ इन्श्युरन्सची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे. जास्तीत जास्त लोकांना इन्श्युरन्सचे संरक्षण देणे हे या कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्सचे उद्दीष्ट आहे, जेणेकरुन आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र येऊन या साथीवर मात करू शकू.ही एक मानक पॉलिसी असल्याने, कव्हरेज आणि कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्सच्या करार आणि अटी व शर्ती वेगवेगळ्या कंपन्यांसाठी समान आहेत.

दुसऱ्या शब्दांत, कोरोना कवच कव्हरसह तुम्ही विभिन्न तुलना करण्याची चिंता न करता कोरोना विषाणूंच्या संकटाचा सामना करण्यासाठी पुढे जाऊ शकता आणि स्वत:ला आर्थिकदृष्ट्या सज्ज करू शकता हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी. या सरळ आणि सुलभ कोविड -19 हेल्थ इन्श्युरन्सच्या सहाय्याने तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित करू शकता.

कोविड -19 च्या उद्रेकादरम्यान हेल्थ इन्श्युरन्स आवश्यक आहे

कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे सर्व जगात उद्भवलेल्या अराजक आणि भयंकर परिस्थितीबद्दल फार काही बोलण्याची आवश्यकता नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे आणि संपूर्ण देश थांबला आहे. सर्व देशभरातून आपण सर्व अजूनही या साथीच्या रोगाशी लढण्याचा प्रयत्न करीत आहोत, यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे ती म्हणजे एका चांगल्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची आवश्यकता.

का हे जाणून घ्यायचे आहे हेल्थ इन्श्युरन्स फॉर कोरोना व्हायरस, आणि विशेषत: कोरोना कवच पॉलिसी महत्त्वाची आहे का?? यावर वाचा! कोरोना विषाणुचा सार्वत्रिक प्रसार होत असल्याचं चित्र आहे. वेगाने प्रसार होणाऱ्या विषाणुमुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत.. लॉकडाउन तसेच अन्य उपाययोजना केल्यामुळे विषाणू आटोक्यात आणण्यास चालना मिळत आहे. आपण सर्वजण लॉकडाउन मधून बाहेर पडत असताना आपण सर्वांनी निश्चितच विचार करावयास हवा की आपण समजतो तितक्या जवळ कोरोना विषाणू आहे. 

आपणा सर्वांना हे माहित आहे की व्हायरसच्या संपर्कात येऊ नये म्हणून आपल्याला स्वच्छता राखणे आणि सामाजिक अंतराचा सराव करणे आवश्यक आहे. परंतु कोणतीही पद्धत 100% खात्रीशीर नसते. वास्तविक, सीडीडीईपीच्या (यूएस स्थित सेंटर फॉर डिसीज, डायनेमिक्स अँड इकोनॉमिक पॉलिसी) अहवालात असा अंदाज व्यक्त केला आहे की सप्टेंबर 2020 पर्यंत भारतामधील केसेस 55-138 कोटींच्या आसपास असू शकतात. आणि म्हणूनच कोरोनाव्हायरस इन्श्युरन्स पॉलिसी या रोगाशी लढण्यासाठी आपले सर्वात मोठे शस्त्र बनू शकते.

SARS-COV-2 -विषाणूच्या अंदाज बांधता न येण्याच्या स्वरूपामुळे आणि वाढणाऱ्या खर्चाशी लढा देण्याची गरज निर्माण झाल्यामुळे, कोरोनावायरसची आपली चाचणी सकारात्मक येणे यासारख्या सर्वात वाईट परिस्थितीत, कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स आपल्यासाठी खरोखरच अंधारातील प्रकाशाचा किरण बनू शकते.

कोरोना कवच पॉलिसीची प्रमुख वैशिष्ट्ये

सर्वसमावेशक हेल्थ इन्श्युरन्स उपाय प्रदान करणे ही आमच्या वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे वैशिष्ट्य आहे.

आमच्या वैयक्तिक वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी आणि त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.

  • वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर पर्याय

    कोरोना कवच पॉलिसी आपल्याला आपल्या कुटूंबातील प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र इन्श्युरन्स रक्कम निवडण्याचा पर्याय देत आहे. जर आपण आपल्या संपूर्ण कुटुंबाला एकाच कव्हरमध्ये कव्हर करू इच्छित असल्यास, कोरोना कवच पॉलिसी हा पर्याय देखील ऑफर करते. 

  • किमान प्रतीक्षा कालावधी

    कोरोना कवच कव्हर सोबत, आपल्याकडे पारंपारिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी इतका जास्त प्रतीक्षा कालावधी नसतो. या कोविड-19 हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या स्थापनेपासून प्रतीक्षा कालावधी हा अवघ्या 15 दिवसांचा आहे.

  • एकाधिक सम इन्श्युअर्ड पर्याय

    आपल्याकडे इन्श्युरन्स रक्कम निवडण्यासाठी रुपये 50,000 ते रुपये 5 लाखांदरम्यान 50,000 च्या पटीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत

  • नाममात्र उप-मर्यादा

    कोरोना कवच पॉलिसी घेण्यासाठी प्रति घटना किती दिवस कव्हर झालेले आहेत या स्वरुपा केवळ खूप कमी आणि वाजवी उप-मर्यादा आहेत. ही संख्या पूर्णपणे कोरोनाव्हायरस रूग्णांच्या रोगमुक्ततेसाठी लागलेल्या सरासरी कालावधीच्या आधारे आहे, जो सुमारे 15 दिवसांचा आहे.रूग्णालय रक्कमेच्या पर्यायी कव्हरवर देखील एक उप-मर्यादा आहे, जी आपण निवडलेल्या इन्श्युरन्सच्या रक्कमेच्या टक्केवारीवर आधारित आहे. 

    या व्यतिरिक्त, कोरोना कवच कव्हरसाठी इतर कोणत्याही उप-मर्यादा नाहीत!

  • व्यापक पात्रता

    जर आपण कोरोना कवच कव्हर खरेदी करण्यासाठी कोण पात्र आहे हे जाणून घेण्याकरिता उत्सुक असाल तर येथे आपले उत्तर आहे - 18 ते 65 वयोगटातील कोणीतीही व्यक्ती! जर आपण स्वतःसह आपल्या कुटुंबाला कव्हर करू इच्छित असाल, तर कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कोणाला कव्हर केले जाऊ शकते ते येथे दिले आहे:

    • आपला जोडीदार
    • आपले आई-वडील / सासू-सासरे
    • आपली मुले (1 दिवस ते 25 वर्षे वयोगटातील)
  • खोलीच्या भाड्यासाठी कव्हर

    जर कोरोनाव्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे आपणास रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास, कोरोना कवच पॉलिसीमध्ये खोलीच्या भाड्याच्या खर्चासाठी देखील कव्हरेज देण्यात येते आले आहे.

विविध लाभांसह कोरोना कवच पॉलिसी. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.

सुलभ, त्रासमुक्त आणि त्वरित क्लेम सेटलमेंट

कोणत्याही कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची खरी परीक्षा क्लेम करतांना असते. कोरोना कवच सह, विशेषतः, क्लेम सेटलमेंटची सुलभता हा भिन्नता घटक असू शकतो आणि म्हणूनच आपण बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडून कोरोना कवच खरेदी करणे आवश्यक आहे. आम्ही आपल्याला ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पर्यायांसह अगदी उत्कृष्ट असा क्लेमचा अनुभव ऑफर करतो. 

आम्ही आपल्याला कोरोनव्हायरस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या क्लेमची पुर्तता करण्यासाठीच्या काही जलद आणि सुलभ टप्यांमधून घेऊन जात असताना वाचा.

लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारच्या क्लेमच्या बाबतीत, आम्हाला, आपल्या इन्श्युरन्स कंपनीला कळवायला विसरू नका जेणेकरून आम्ही आपल्याला संपूर्ण प्रक्रियेमध्ये मार्गदर्शन करू शकू.

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनीद्वारे, आमच्याकडे संपूर्ण भारतभर जोडल्या गेलेल्या नेटवर्क रूग्णालयांची संख्या खुप मोठी आहे. आपल्यासाठी याचा अर्थ असा आहे की,कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत या रुग्णालयात उपचार घेत असताना, कॅशलेस क्लेमचा लाभ घेण्याची क्षमता. 

आपल्या कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी संबंधीत कॅशलेस क्लेमच्या बाबतीत, ते कसे कार्य करते ते येथे दिले आहे:

पायरी 1: सूचना

आपल्याला बजाज आलियान्झ नेटवर्क रुग्णालयात जाण्याची आवश्यकता आहे, जे आपला तपशील पडताळून पाहतील आणि अधिकृततेसाठी ते पुढे आमच्याकडे पाठवतील

पायरी 2: अधिकृतता

आम्हाला रुग्णालयाकडून आवश्यक माहिती मिळाल्यानंतर आम्ही तपशील जाणून घेऊ आणि आपला क्लेम ग्राह्य असल्यास एका दिवसात तो मंजूर करु. काही शंका असल्यास आम्ही पुन्हा रुग्णालयाशी संपर्क करु आणि या शंकांचे समाधानकारकपणे निराकरण झाल्यास आम्ही पुढे जाऊ आणि त्यांना 7 दिवसांच्या आत अधिकृतता पत्र पाठवू.

पायरी 3: Treatment

आपली अधिकृतता पुर्ण झाल्यानंतर, आपल्याला फक्त रुग्णालय दाखल होण्याची आवश्यकता आहे, उपचार घ्या आणि लवकर बरे व्हा. आम्ही रुग्णालयाशी समन्वय साधण्याची आणि सर्व आवश्यक वैद्यकीय बिले आणि खर्च देण्याची प्रक्रिया पूर्ण करू

सोपे आहे. बरोबर?

जर, आपण काही कारणास्तव बजाज आलियान्झ नेटवर्क रुग्णालयात प्रवेश घेऊ शकत नसाल तर, आपल्या कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा क्लेम करण्यासाठी आपल्याला रिएम्बबर्समेंट प्रक्रियेची निवड करावी लागेल. या परिस्थितींमध्ये, आपल्याला वैद्यकीय खर्चासाठी रुग्णालयाला पैसे द्यावे लागतील आणि आपला क्लेम मंजूर झाल्यानंतर आमच्याकडून आपल्याला रिएम्बबर्समेंट प्राप्त होईल.

आपली रिएम्बबर्समेंट प्रक्रिया सहजतेने होण्यासाठी येथे दिलेले काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा:

  • आपण क्लेम करु इच्छित असलेली सर्व मूळ वैद्यकीय बिले आणि पावत्या एकत्रित करा आणि सुरक्षितपणे संग्रहित केल्याचे सुनिश्चित करा
  • आपल्याला ही सर्व बिले एका योग्य तपशीलासह पूर्ण केलेल्या क्लेम फॉर्मसह आमच्याकडे पाठविणे आवश्यक आहे 
  • आपण आमच्या केअरिंगली यूअर्स अॅपचा वापर करून ही कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करू शकता किंवा आमच्या इन-हाऊस क्लेम प्रक्रिया युनिट - हॅट (हेल्थ अॅडमिनीस्ट्रेशन टीम) कडे कुरिअरद्वारे पाठवू शकता

आम्हाला आपला क्लेम मिळाल्यानंतर, आम्ही सर्व काही व्यवस्थित आहे याची खात्री करण्यासाठी त्वरित कागदपत्रे आणि तपशील जाणून घेऊ. जर काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवायची बाकी राहिल्यास काळजी करू नका. आम्ही आपल्याला तसे कळवू जेणेकरून आपण ते कागदपत्रे देऊ शकाल, तसेच आम्ही आपल्याला 30 दिवसांमध्ये तीन रिमाइंडर देखील पाठवू. यावेळेमध्ये, आपण आम्हाला राहिलेली कागदपत्रे पाठवू शकता आणि त्यानुसार आम्ही पुढील प्रक्रिया करू.

क्लेम करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

आपल्यासाठी क्लेम प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी, आम्ही आपल्याला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची एक विस्तृत यादी तयार केली आहे:

 

हॉस्पिटलायझेशनच्या क्लेमसाठी:

  • पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म
  • आपल्या पासपोर्ट / फोटो ओळख पुराव्याची एक प्रत (जर आपल्याकडे पासपोर्ट नसेल तर)
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे प्रवेशाचा सल्ला देणारे प्रिस्क्रिप्शन
  • मूळ बिले वस्तू निहाय ब्रेक-अप सह
  • पैसे भरल्याच्या पावत्या
  • इतर तपशीलांसोबत रुग्णाच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासासह डिस्चार्ज सारांश.
  • कोव्हीड साठीच्या अधिकृत निदान केंद्रामधुन आपल्या चाचणी अहवालासोबत तपासणी अहवाल
  • जेथे लागू असेल तेथे, ओटी नोट्स किंवा केलेल्या ऑपरेशनचा तपशील देणारे सर्जनचे सर्टिफिकेट
  • जेथे जेथे लागू असेल तेथे, इम्प्लांट्सचे स्टिकर / बील.
  • NEFT तपशील (क्लेम रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे सुरु करण्यासाठी) आणि रद्द केलेला धनादेश.
  • एएमएल मार्गदर्शक तत्वानुसार प्रस्तावकचा (पत्त्यासह ओळख पुरावा), जिथे क्लेमची देय रक्कम रुपये 1 लाखाहून अधिक आहे
  • जेथे लागू असेल तेथे, कायदेशीर वारस / वारसाहक्क सर्टिफिकेट
  • काही परिस्थितींमध्ये, आम्हाला काही अन्य संबंधित कागदपत्रांची देखील आवश्यकता असू शकते ज्याची आम्ही आपल्याला केस-टू-केस आधारावर माहिती देऊ.

     

    घरी उपचार घेत असणाऱ्या क्लेमसाठीः:

  • पूर्ण भरलेला आणि स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म
  • आपल्या पासपोर्ट / फोटो ओळख पुराव्याची एक प्रत (जर आपल्याकडे पासपोर्ट नसेल तर)
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे प्रवेशाचा सल्ला देणारे प्रिस्क्रिप्शन
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचे घरी उपचारांचा सल्ला देणारे सर्टिफिकेट किंवा होम केअर बेनिफिटचा लाभ घेण्यासाठीची आपली संमती
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडून घरी उपचार सुरू करण्याची आणि पूर्ण झाल्याची तारीख निर्दिष्ट असलेले डिस्चार्ज सर्टिफिकेट
  • दैनंदिन देखरेख चार्ट (उपचार करणा-या डॉक्टरांच्या स्वाक्षरीसोबत केलेल्या उपचारांच्या नोंदींसह)

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

विक्रम अनिल कुमार

माझे हेल्थ केअर सुप्रीम पॉलिसी रिन्यूवल करण्यात तुम्ही मला सहकार्य केले त्याबद्दल मला खरोखर आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद.

पृथ्वी सिंग मियान

लॉकडाउन असूनही चांगली क्लेम सेटलमेंट सर्व्हिस. त्यामुळे मी अधिकाधिक कस्टमरना बजाज आलियान्झ हेल्थ पॉलिसी उपलब्ध केली

अमागोंड विट्टप्पा अराकेरी

बजाज आलियान्झ द्वारे सर्वोत्तम सर्व्हिस, त्रासमुक्त सर्व्हिस, कस्टमर्स साठी फ्रेंडली साईट, समजण्यास व ऑपरेट करण्यास सोपी. आनंदी मनाने कस्टमर्सना सर्व्हिस दिल्याबद्दल धन्यवाद टीम...

बजाज आलियान्झ हेल्थ इन्श्युरन्स योजने अंतर्गत ऑफर करण्यात आलेले लाभ

कोविड कवच ही बजाज आलियान्झ हेल्थ इन्श्युरन्सची योजना महामारीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार होऊ इच्छिणाऱ्या कोणासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. कोविड-19 महामारी कव्हर करण्यासाठी ह्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची विशिष्ट पद्धतीने केली गेलेली रचना तिला विशेष बनवते. म्हणूनच, कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह केसशी संबंधित असू शकणाऱ्या सर्व प्रमुख वैद्यकीय आवश्यकता आणि घटना या पॉलिसी मध्ये कव्हर केल्या जातील, ज्या आपल्या नियमित हेल्थ इन्श्युरन्समध्ये कव्हर होऊ शकत नाही. 

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

मेडिकल इमर्जन्सी घराच्या दारात येईपर्यंत वाट पाहू नका!

कोरोना कवच पॉलिसी कव्हरेज

जेव्हा कोरोनाव्हायरसच्या उपचारांचा प्रश्न येतो, तेव्हा रुग्णाला रुग्णालयात दाखल करता केले जाते किंवा रुग्णाला होम क्वारंटाइन (घरातील विलग्नवास) करता येऊ शकते, जेथे घरातच त्याच्यावर उपचार होतो. कोरोना कवच पॉलिसी अंतर्गत आपल्याला कोरोनाव्हायरसच्या उपचारांच्या या दोन मुख्य कोर्ससाठी कव्हर मिळते. कोरोना कवच कव्हरमध्ये काय समाविष्ट आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा:

कोविड हॉस्पिटलायझेशनच्या क्लेमसाठी

कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत असलेले हे कव्हर आपल्याला कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास आपल्याला होणाऱ्या खर्चाची भरपाई देते. Read more

कोविड हॉस्पिटलायझेशनच्या क्लेमसाठी

कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत असलेले हे कव्हर आपल्याला कोरोनाव्हायरसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागल्यास आपल्याला होणाऱ्या खर्चाची भरपाई देते. या विभागात ज्या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत त्या येथे देत आहोत:

  • खोलीचे भाडे, बोर्डिंग, नर्सिंगचा खर्च (रुग्णालयाने पुरविल्याप्रमाणे)
  • आयसीयू / आयसीसीयू (इन्टेन्सिव्ह केअर युनिट / इंटेंसिव्ह कार्डिआक केअर युनिट) खर्च, जर तुम्हाला तेथे दाखल होणे आवश्यक असेल तर
  • शल्यविशारद, भूलतज्ञ, वैद्यकीय व्यावसायिक, सल्लागार किंवा तज्ञांच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी थेट डॉक्टर किंवा रुग्णालयाला भरली जाणारी फी
  • भूल देण्यासाठीचा खर्च, रक्त / ऑक्सिजन / ऑपरेशन थिएटर चे शुल्क, शल्यक्रिया उपकरणांचे शुल्क, व्हेंटिलेटर शुल्क, औषधांसाठी लागणारा खर्च, रोगनिदान इमेजिंग पद्धतीसाठीचा खर्च, पीपीई किट / हातमोजे / मास्क आणि अशाच प्रकारच्या इतर खर्चांसाठी
  • कोविड संदर्भात रुग्णालयात भरती होण्यासाठी वाहतुकीचे रुग्णवाहिका शुल्क रुपये 2000 पर्यंत आकारले जाते

कव्हर किक-इन करण्यासाठी, आपल्याला कमीतकमी 24 तास अखंड रुग्णालयात दाखल केले जाणे आवश्यक आहे.

होम केअर उपचारांच्या खर्चासाठीचे कव्हर

जर एखाद्या शासकीय अधिकृत निदान केंद्राकडून आपली चाचणी पॉझिटिव्ह आली आणि आपल्याला रुग्णालयाऐवजी आपल्या घरीच उपचार घेणे शक्य असेल तर कोरोना कवच पॉलिसी हे देखील कव्हर करते. Read more

होम केअर उपचारांच्या खर्चासाठीचे कव्हर

जर एखाद्या शासकीय अधिकृत निदान केंद्राकडून आपली चाचणी पॉझिटिव्ह आली आणि आपल्याला रुग्णालयाऐवजी आपल्या घरीच उपचार घेणे शक्य असेल तर कोरोना कवच पॉलिसी हे देखील कव्हर करते. हे कव्हर अंमलात आणण्यासाठी काही अटी आहेतः:

  • घरामध्ये उपचार घेत असाल तर ते एखाद्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार घेणे आवश्यक आहे
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीद्वारे आरोग्याच्या स्थितीच्या दररोजच्या देखरेखीसह ज्याचा लाभ होईल असे उपयुक्त उपचार देणे आवश्यक आहे

आपण या दोन अटी पूर्ण केल्यास, सुचवलेल्या उपचारांच्या नोंदीसह एक दैनंदिन चार्ट केला असेल आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या स्वाक्षरीसह तो पाठवला असेल, तर कोरोना कवच कव्हर आपल्यासाठी लागू होईल.

या कोरोना व्हायरस हेल्थ इन्श्युरन्सच्या होम केअर ट्रीटमेंट खर्चाच्या कव्हरच्या अंतर्गत काय कव्हर केले गेले आहे त्याची यादी येथे दिली आहे:

  • झालेल्या निदान चाचण्यांचा खर्च
  • लेखी लिहून दिलेल्या औषधांच्या किंमती
  • वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला सल्ला शुल्काचे दिलेले पैसे
  • नर्सिंग शुल्क, संबंधित वैद्यकीय कर्मचार्‍यांना दिलेले पैसे
  • वैद्यकीय प्रक्रियेसाठीचे शुल्क औषधांच्या पॅरेंटरल प्रशासनापुरते मर्यादित आहे
  • पल्स ऑक्सिमीटर, ऑक्सिजन सिलेंडर आणि नेब्युलायझरची किंमत
Individual ayurvedic homeopathic

आयुष ट्रीटमेंट कव्हर

जर नियमित रूग्णालये आपल्यासाठी सोयीस्कर नसतील आणि आपण आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध किंवा होमपॅथीच्या स्वरुपात कोविड -19 साठी काळजी घेणे निवडले असेल तर कोरोना कवच कव्हर आपल्यासाठी खूप मोठा आधार आहे. Read more

आयुष ट्रीटमेंट कव्हर

जर नियमित रूग्णालये आपल्यासाठी सोयीस्कर नसतील आणि आपण आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध किंवा होमपॅथीच्या स्वरुपात कोविड -19 साठी काळजी घेणे निवडले असेल तर कोरोना कवच कव्हर आपल्यासाठी खूप मोठा आधार आहे. कोणत्याही आयुष रुग्णालयात आपण कोरोनाव्हायरसच्या चाचणीसाठी स्वत: ला दाखल करणे निवडल्यास आपण कोरोना कवच पॉलिसीच्या या भागाचा लाभ घेऊ शकता.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

कोरोना कवच पॉलिसीसह, आम्ही केवळ आजारा दरम्यानच नाही तर रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरही आपल्यासोबत आहोत. कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या 15 दिवस आधीच्या वैद्यकीय खर्चासाठी आणि रुग्णालयातून घरी आल्यानंतरच्या 30 दिवसांपर्यंतचा उपचारांचा खर्च कव्हर करते.

कोरोना कवच पॉलिसी अंतर्गत कॉमोरबिड स्थितीसाठी कव्हरेज

जेव्हा कोरोनाव्हायरसचा प्रश्न येतो तेव्हा आपण त्याच्याशी संबंधीत ‘कॉमोरबिडिटी’ हा शब्द बर्‍याच वेळा ऐकला असेल. खरं तर, कॉमोरबिडिटीमुळे हा आजार वयस्कर लोकांसाठी सर्वात घातक ठरतो, तर कॉमोरबिडिटी म्हणजे काय? 

कॉमोरबिडीटी म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात, कॉमोरबिडिटी म्हणजे एकाच रूग्णामध्ये एकापेक्षा अधिक रोगांचे अस्तित्व असणे. उदाहरणार्थ, जर एखाद्यास मधुमेह असेल आणि हृदयाचे आजार असतील तर ते म्हणजे कॉमोरबिडिटी असते. त्याचप्रमाणे, कोरोनाव्हायरसच्या बाबतीत, कॉमोरबिडिटी म्हणजे अशा परिस्थितीला सूचित करते जिथे रुग्णाला SARS-COV-2 ची बाधा झाली असेल आणि त्याला श्वसनाचे आजार किंवा हृदयाचे आजार देखील आहेत.

आपल्या अपेक्षेपेक्षा कोमोरबिडीटीज अधिक सामान्य आहेत आणि कोरोनाव्हायरस बरोबरच यावर देखील उपचार करणे आवश्यक आहे. म्हणूनच कोरोनाव्हायरससाठीचा हा हेल्थ इन्श्युरन्स कॉमॉर्बिडिटीज देखील कव्हर करतो.

पर्यायी अ‍ॅड-ऑन कव्हर

पॉलिसीच्या बेस कव्हरेजशिवाय, कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आपल्याला हॉस्पिटल कॅशसाठी अ‍ॅड-ऑन कव्हर निवडण्याचा पर्याय देखील देते. हे अ‍ॅड-ऑन कव्हर म्हणजे एक बेनिफिट कव्हर आहे जे आपल्याला रूग्णालयात दाखल केलेल्या प्रत्येक दिवसासाठी विमा उतरवलेल्या रकमेच्या 0.5% रक्कम प्रदान करते.

हे बेनिफिट अ‍ॅड-ऑन कव्हर असल्याने त्यासाठी कोणत्याही बिले किंवा पावतीची आवश्यकता नाही. आपला बेस क्लेम मान्य असेल तर आपल्याला या कव्हरअंतर्गत आपली देय रक्कम मिळेल.

कोरोना कवच पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे

  • समावेश

  • अपवाद

पीपीई किट्स, ग्लोव्हज आणि ऑक्सिजनचा खर्च

जेव्हा कोविड हॉस्पिटलायझेशन खर्चा अंतर्गत आपला क्लेम मान्य केला जातो तेव्हा कोरोना कवच पॉलिसी पीपीई किट्स, ग्लोव्हज आणि ऑक्सिजनचा खर्च समाविष्ट करते.

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स आपल्याला रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच्या 15 दिवस आधीच्या वैद्यकीय खर्चासाठी आणि रुग्णालयातून घरी आल्यानंतरच्या 30 दिवसांपर्यंतचा उपचारांचा खर्च कव्हर करते

आयुष ट्रीटमेंट कव्हर

या पॉलिसीमध्ये कोविड -19 पॉझिटिव्ह केसच्या उपचारांसाठी आयुष रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणाऱ्या खर्चाचा समावेश आहे

1 चे 1

या कोरोना कावच पॉलिसीमध्ये कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्सशी संबंधित जवळजवळ प्रत्येक गोष्ट स्वीकार्य आहे, तर काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत.

अधिक जाणून घ्या

 या कोरोना कावच पॉलिसीमध्ये कोरोनाव्हायरस हेल्थ इन्श्युरन्सशी संबंधित जवळजवळ प्रत्येक गोष्ट स्वीकार्य आहे, तर काही गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. जेव्हा आपल्याला क्लेम दाखल करायचा असेल तेव्हा निराशा किंवा अप्रिय परिणाम टाळण्यासाठी एकदा ते वाचून घ्या.

कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत असलेल्या अपवादांची यादी येथे आहे:

कोविडशी संबंधित कोणताही असा क्लेम की ज्याचे निदान पॉलिसी प्रारंभ तारखेच्या आधी झाले आहे.

डे केअर ट्रीटमेंट आणि ओपीडी ट्रीटमेंटवर झालेला कोणताही खर्च

भारताच्या भौगोलिक क्षेत्राबाहेरचे निदान / उपचार

शासनाद्वारे अधिकृत नसलेल्या निदान केंद्रावरील चाचणी या पॉलिसीअंतर्गत मान्य केली जाणार नाही

जर भारत सरकारद्वारे प्रवासी निर्बंधाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही देशात प्रवास केल्यास या पॉलिसी अंतर्गत असलेले सर्व कव्हर्स थांबविले जातील

शासनाद्वारे अधिकृत केलेले नसलेल्या डायग्नोस्टिक केंद्रात चाचणी केली असल्यास

भारत सरकारच्या प्रवासी निर्बंधाच्या अंतर्गत असलेल्या कोणत्याही देशात केलेला प्रवास आपणाला क्लेमसाठी अपात्र ठरवेल

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

 

कोरोना कवच पॉलिसी विरुद्ध मानक हेल्थ इन्श्युरन्स

 

आपली आवश्यकता कोरोना कवच मानक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी
काय कव्हर होते केवळ कोविड -19 उपचार कोविड -19 यासह सर्व आजारांना कव्हर करते
सम इन्शुअर्ड रुपये 50,000 ते 5,00,000 रुपये 50,000 ते 50,00,000
आपल्या कुटुंबास कव्हर करा होय होय
कमाल प्रवेश वय मर्यादा 65 वर्षे 70 वर्षे (सिनियर सिटीझन प्लॅनसाठी)
कोविड विरूद्ध कव्हरेज केवळ कोविडसाठी इतर आजारांसह कोविड कव्हर करते
आजीवन रिन्यूवल लागू नाही उपलब्ध
पॉलिसी टर्म 3.5/6.5/9.5 महिने किमान 1 वर्ष ते जास्तीत जास्त 3 वर्षे
पीपीई किट खर्च कव्हर्ड कव्हर्ड नसलेले
प्रतीक्षा कालावधी 15 दिवस किमान 30 दिवस
पूर्वी पासून असलेले रोग कव्हर्ड नसलेले ठराविक प्रतीक्षा कालावधीनंतर कव्हर्ड
प्री-पॉलिसी मेडिकल लागू नाही लागू
प्रीमियम पेमेंट टर्म एकल हप्ते पर्याय उपलब्ध

चला कोरोना कवच पॉलिसी समजून घेवूया

कोरोना कवच पॉलिसी अंतर्गत प्रतीक्षा कालावधी किती आहे?

कोरोना कवच पॉलिसी अंतर्गत प्रतिक्षा कालावधी पॉलिसीच्या स्थापनेपासून 15 दिवसांचा आहे.

कोरोना कवच कव्हर अंतर्गत पीपीई किट्स, ग्लोव्हज, ऑक्सिजनसाठीचा खर्च आहे काय?

होय, जर आपला क्लेम मान्य असेल तर निश्चितपणे हे खर्च कोरोना कवच पॉलिसीखाली आलेले आहेत.

कोरोना कवच कव्हर खरेदी करण्यास कोण पात्र आहे?

आपण 18 ते 65 वयोगटातील असल्यास, कोरोना कवच कव्हर आपण खरेदी करू शकता!

एक कॉमोरबिडीटी म्हणजे काय?

एकाच रूग्णामध्ये जेव्हा एकाच वेळी एकापेक्षा अधिक रोग आढळून येतात तेव्हा याची वैद्यकीय संज्ञा म्हणजे कॉमोरबिडीटी. उदाहरणार्थ, जर एखाद्यास मधुमेह आणि हृदयरोग दोन्ही असेल तर ते एक प्रकारचे कॉमोरबिडीटी असेल.

कोरोना कवच कव्हर अंतर्गत पूर्वीपासून अस्तित्त्वात असलेल्या कॉमोरबिड अटी समाविष्ट आहेत का?

कोणत्याही हेल्थ घोषणेसह असे प्रस्ताव यूडब्ल्यूच्या निर्णयासाठी संदर्भित केले जातील.

कोविड -19 साठी घरी करण्यात येणाऱ्या उपचारांच्या खर्चासाठी मला कव्हर मिळेल का?

होय. जर आपल्या डॉक्टरांनी आपल्या घरी कोविड -19 वर उपचार घेण्याचा सल्ला दिला असेल आणि आपण आपल्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या स्वाक्षरीने प्रदान केलेल्या उपचारांचा दररोजचा मॉनिटरिंग चार्ट तयार करू शकत असाल तर आपण कोरोना कवच कव्हर अंतर्गत कोविड -19 वरील घरगुती उपचार खर्चासाठी निश्चितच क्लेम करू शकता.

मी या पॉलिसी अंतर्गत माझ्या कुटुंबातील सदस्यांना समाविष्ट करू शकतो का?

होय. कोरोना कवच पॉलिसीमध्ये फॅमिली फ्लोटर पर्याय देखील आहेत, ज्या अंतर्गत आपण एकाच पॉलिसीमध्ये आपल्या जोडीदारास, पालकांना, सासु-सासऱ्यांना आणि अवलंबून मुलांना (25 वर्षापर्यंतचे) कव्हर करू शकता.

कोरोना कवच कव्हर अंतर्गत उप-मर्यादा काय आहेत?

कोरोना कवच हेल्थ इन्श्युरन्सच्या बेस कव्हरसाठी कालावधीशिवाय इतर महत्त्वाच्या उप-मर्यादा नाहीत. हॉस्पिटल कॅश अॅड-ऑन कव्हरसाठी, उप-मर्यादा विम्याच्या रकमेच्या 0.5% आहे.

आरोग्य सेवा कामगार कोरोना कवच पॉलिसी अंतर्गत सवलतीस पात्र आहेत काय?

होय! आरोग्य सेवा कामगारांना 5% सूट मिळते

मी हप्त्यांमध्ये प्रीमियम भरू शकतो/ते का?

दुर्दैवाने, आपण कोरोना कवच पॉलिसीचे प्रीमियम हप्त्यांमध्ये भरू शकत नाही.

मला कोरोनाव्हायरस इन्श्युरन्स कव्हर का आवश्यक आहे?

कोरोनाव्हायरसचा प्रसार महा भयंकर झाला आहे आणि सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घेवूनही, आपण रोगाचे शिकार होवू शकता, कारण लॉकडाउन अधिकाधिक उघडत आहे. जर आपणाला रुग्णालयात दाखल करावे लागेल तर आपण कुठे उपचार घेण्याचे निवडले आहे आणि रोगाची तीव्रता किती आहे यानुसार, या रोगाच्या उपचारासाठी कित्येक लाखो रुपये खर्च येवू शकतो. म्हणूनच, आपण स्वतःसाठी कोरोनाव्हायरस इन्श्युरन्स कव्हर घेणे आवश्यक आहे, कारण अशा आपत्कालीन परिस्थितीत हे अमूल्य ठरू शकते.

मी कोरोना कवच पॉलिसी का खरेदी करावी?

कोरोना कवच पॉलिसी कोरोनाव्हायरससाठी एक मानक हेल्थ इन्श्युरन्स आहे. याचा अर्थ असा आहे की ही एक कोरोनाव्हायरस विमा पॉलिसी आहे जी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये देखील समान कव्हरेज देते. 

हे कोविड -19 हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कोरोनाव्हायरसच्या हॉस्पिटलायझेशनमुळे उद्भवणार्‍या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केली गेली आहे. आणि प्रतिबंध हा उपचारापेक्षा नक्कीच चांगला आहे, भविष्यात एखाद्या दुर्दैवी आजाराचे निदान झाल्यास, खबरदारीचा उपाय म्हणून आपण स्वतःसाठी ही अनोखी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घ्यायला हवी.

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

द्वारे लिखित: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 10th  जानेवारी 2024

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा