मराठी
कोविड- 19 च्या जागतिक साथीमुळे एक खूप मोठा बदल घडवून आणला आहे आणि तो म्हणजे सोशल डिस्टंसिंग सक्तीचे केले आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अंतर राखणे ही सर्वाधिक परिणामकारक पद्धत दिसून आली आहे. या साथीमुळे बाहेरील जगाशी संपर्क साधणे लोकांसाठी आणखी काळजीचे ठरले आहे कारण तुम्ही ग्लोव्ह्स घातले आणि स्वच्छता राखल्यावरही विषाणूच्या संपर्कात येण्याची काळजी तुम्हाला लागून राहते. अशी परिस्थिती असताना काँटॅक्टलेस राहणे हे काळजीमुक्त होण्याची सर्वांत मोठी पद्धत आहे.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही तुम्हाला मनःशांती देण्याची जबाबदारी घेतो. आणि हे एक इन्शुरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने देण्याशिवाय करण्याची वेगळी चांगली पद्धत नाही. आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सबाबत नेमके तेच करत आहोत. अगदी तुलना करण्यापासून ते खरेदीपर्यंत आणि क्लेम दाखल करेपर्यंत आम्ही सर्व काही काँटॅक्टलेस शक्य केले आहे.
कोविड-१९ च्या साथीमुळे मोठ्या प्रमाणावर आरोग्याचे धोके उद्भवलेले असताना आम्हाला तुम्हाला नक्कीच हे सांगायची गरज नाही की, आत्ता स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला चांगल्या हेल्थ इन्शुरन्स कव्हरने सुरक्षित करण्याची उत्तम वेळ असेल. आणि हे विनासंपर्क कसे साध्य करायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असल्यास आमच्याकडे त्यावरचा उपाय काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या माध्यमातून आहे.
तुम्ही तुमचा इन्शुरन्स काँटॅक्टमुक्त पद्धतीने खरेदी करण्याच्या विविध पद्धती आहेत-
✓ केअरिंगली युवर्स अॅप : आमच्या केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी उपयुक्त पॉलिसी निवडू शकता आणि स्वतःला सुरक्षित करण्यासाठी काँटॅक्टलेस व्यवहार पूर्ण करू शकता.
✓ वेबसाइट: तुम्ही तुमच्या घरातून आरामात आमची वेबसाइट ब्राऊझ करू शकता आणि तुमची ऑनलाइन पॉलिसी प्रत मिळवण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट करू शकता.
✓ बोइंग: तुम्हाला खरेदीच्या प्रक्रियेत मदत करण्यासाठी आमच्या चॅटबोटचा वापर करायचा असल्यास तुम्हाला इन्शुरन्सच्या गरजांसाठी मदत करणारा बोइंग आहे.
इन्शुरन्सचे पेमेंट चेकने करावे लागायचे दिवस गेले, जिथे कुणीतरी प्रीमियम घेण्यासाठी तुम्हाला भेटायला येत असे. आता तुम्ही तुमच्या प्रीमियमसाठी पेमेंट करण्यासाठी संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहारांची निवड करू शकता.
तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीसाठी काँटॅक्टलेस पेमेंट आमची वेबसाइट किंवा आमच्या अॅप द्वारे करता येईल. तुम्ही आमच्या प्रतिनिधींशी कॉलवर बोलून आणि आम्ही पाठवत असलेल्या लिंकवर जाऊन जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता. आता हे सोपे आणि सुरक्षित वाटते, नाही का ?आम्ही आमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सबाबत नेमके तेच करायचे होते.
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही कोणत्या प्रकारचे काँटॅक्टलेस इन्शुरन्स प्लॅन ऑनलाइन खरेदी करू शकता ? आमच्याकडे तुमच्यासाठी असलेले विविध प्लॅन्स जाणून घेण्यासाठी वाचत राहा.
आमच्याकडे विविध प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स प्लॅन्स आहेत, अगदी तुमच्या सर्वांगीण वैयक्तिक पॉलिसींपासून, फॅमिली फ्लोटर पर्याय, क्रिटिकल इलनेस प्लॅन्स, पर्सनल अॅक्सिडेंट प्लॅन्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉलिसी आणि तुम्हाला कर वाचवण्यासाठी मदत करू शकणारे प्लॅन्स.
तुम्ही हाती घेत असलेल्या सर्व डिजिटल कार्यांमुळे तुमचे ऑनलाइन अस्तित्वही सुरक्षित करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आमच्या इंडिव्हिज्युअल सायबर सेफ इन्शुरन्ससोबत आम्ही तुम्हाला कव्हर करतो.
या साथीच्या काळात तुमचे घर तुमच्यासाठी एक बालेकिल्ला बनला आहे. आमच्या इन्शुरन्स पॉलिसीसोबत तुमचे घर आणि आतील साहित्यासाठी संपूर्ण इन्शुरन्ससोबत सुरक्षित राहील याची काळजी तुम्ही घेऊ शकता.
प्रवास करण्याचा विचार तुम्ही सध्या तरी करत नसलात तरी तुम्ही प्रवास कराल तेव्हा आमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स तुमच्या अज्ञात (आणि ज्ञात) प्रदेशांमध्ये पाठीराखा ठरेल.
एक विमा कंपनी म्हणून क्लेमची वेळ ही आमची खरी तपासणी आहे. आणि त्याचमुळे आम्ही आमच्या ग्राहकांसठी काँटॅक्टलेस इन्शुरन्स क्लेमचे फायदे आमच्या ग्राहकांसाठी विस्तारित केले आहेत. तुम्ही तुमचा क्लेम आमच्यासोबत नोंदणीकृत करण्यासाठी आमचा केअरिंगली युवर्स अॅप, आमची वेबसाइट आणि आमच्या व्हॉट्सअॅपवरील सेवा वापरू शकता. तुम्ही आमच्या कोणत्याही शाखेला भेट न देता- पूर्णपणे काँटॅक्टलेस पद्धतीने तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता, क्लेम फॉर्म्स भरू शकता आणि क्लेम प्रोसेस पुढे चालवू शकता.
केअरिंगली युवर्स अॅप हा तुमच्या सर्व ऑनलाइन जनरल इन्शुरन्स गरजांसाठीचे केंद्रस्थान असून ते काँटॅक्टलेस व्यवहारांसाठी आहे. त्यात अनेक वैशिष्टे आहेत जी आमच्या अॅपवरील काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या केंद्रस्थानी आहेत.
बाय
तुम्ही जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंट पूर्ण करण्यासाठी केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करू शकता.
रिन्यू
ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल अत्यंत सुलभ आहे जिथे आमचा अॅप तम्हाला संपूर्ण काँटॅक्टलेस व्यवहार करण्याची परवानगी देतो आणि त्याचवेळी तुम्हाला रिन्यूअल रिमाइंडरही देतो.
क्लेम
काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या बाबतीत क्लेम प्रोसेस खऱ्या अर्थाने हिरो ठरते. आमच्या केअरिंगली युवर्स अॅपवर तुम्ही आमच्याकडे ऑनलाइन क्लेम दाखल करू शकता, तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता आणि तुमचे क्लेम्स ट्रॅक करू शकता. या अॅपवर आमची क्रांतीकारक मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी क्लेम प्रोसेस आहे जी तुम्हाला तुमचा मोटर आणि हेल्थ इन्शुरन्स क्लेम * काही तासांत सेटल करायला मदत करते.
संपर्काच्या तपशीलात बदल
आमच्या केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करून तुमचे संपर्काचे तपशील तुम्ही काही क्लिक्सद्वारे सहजपणे बदलू शकता.
पॉलिसीचे व्यवस्थापन
तुम्ही काँटॅक्टलेस इन्शुरन्सचे फायदे काँटॅक्टलेस व्यवहारांद्वारे खरेदी करून मिळवल्यावर तुम्ही आमच्या अॅपचा वापर करून एकाच ठिकाणी तुमच्या पॉलिसीचे व्यवस्थापन करण्यसाठी करू शकता.
इन्स्टा सेल्फ चेक
या वैशिष्ट्यामुळे तुम्ही कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्याच्या धोक्याची तपासणी काही साध्या प्रश्नांची उत्तरे देऊन करू शकता.
तुम्हाला आमच्यासोबत तुमची इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करायची असेल तर आमच्याकडे त्यासाठी पूर्णपणे काँटॅक्टलेस उपाययोजना आहे. आमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल पर्याय तुम्हाला तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी रिन्यू करण्यासाठी पूर्णपणे डिजिटल माध्यम देतात.
तुमच्या ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअलसाठी आमच्या वेबसाइटवर लॉग इन करा किंवा केअरिंगली युवर्स अॅपचा वापर करा.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आम्ही आमच्या ग्राहकांना काँटॅक्टलेस इन्शुरन्सची सोय आणि सुरक्षितता देऊ इच्छितो. आणि याच बाबतीत आमचे डिजिटल उपक्रम आमच्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. आमच्याकडे तुमच्यासाठी विविध प्रकारचे पर्याय आहेत जिथे तुम्ही विनासंपर्क पद्धतीने तुमच्या ऑनलाइन जनरल इन्शुरन्सच्या गरजा पूर्ण करू शकता. त्यातील काही खालीलप्रमाणे आहेतः
आमच्या ऑल इन वन अॅपमुळे तुम्हाला एकाच अॅपद्वारे तुमची पॉलिसी खरेदी करणे, रिन्यू करणे आणि व्यवस्थापन करणे शक्य होते.
आमची वेबसाइट ही आमच्या पॉलिसीबद्दल शिकण्याचे सर्वोत्तम माध्यम आहे, तुमच्या गरजेसाठी अनुरूप पॉलिसी खरेदी करा. तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे कोणताही जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता आणि तुमची पॉलिसी जारी करण्यासाठी काँटॅक्टलेस पेमेंटही करू शकता. तुम्ही तुमचे ऑनलाइन पॉलिसी रिन्यूअल करू शकता आणि तुमचे क्लेम्स ऑनलाइन सूचित करू शकता.
आमचा चॅटबोट बोइंग, हा आमच्या डिजिटल उत्पादनांमधील आणखी एक आहे जो तुम्हाला तुमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्स गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.
व्हॉट्सएप हे तुमचे संवादाचे प्राधान्याचे माध्यम असल्यास आम्ही तुम्हाला तेथेही मदत करू शकतो. सुरूवात करण्यासाठी आम्हाला 75072 45858 येथे हाय पाठवा.
तुम्हाला असलेल्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही आम्हाला 80809 45060 येथे मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही लगेच फोन करू.
तुम्हाला आमच्यापर्यंत एसएमएसद्वारे पोहोचायचे असल्यास वरी असे लिहून 575758 वर पाठवा. तुम्हाला आमची काँटॅक्टलेस केअर देण्याची ही आणखी एक पद्धत आहे.
श्री नवेन वर्मा
खूप वापरकर्त्यांसाठी अनुकूल आणि ग्राहक केंद्रित ऑनलाइन प्रक्रिया
सतीश चांद कॅटोच
धोरण घेताना आम्ही पुनरावलोकन करू शकतो अशा सर्व पर्यायांसह वेबद्वारे त्रास मुक्त.
शांथाराम एस.
वेबसाइटवरील कार विमा हवामान आहे; इतके सोपे आणि सोयीस्कर केले.
काँटॅक्टलेस इन्शुरन्स नेहमीच्या इन्शुरन्सप्रमाणेच काम करतो, फक्त त्यामुळे तुम्हाला पॉलिसी खेदी करणे, नूतनीकरण करणे, क्लेम दाखल करणे किंवा तुमच्या इतर कोणत्याही पॉलिसीशी संबंधित गरजा असल्यास त्या काँटॅक्टलेस पद्धतीने करण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे तर काँटॅक्टलेस इन्शुरन्स म्हणजे तुमच्या इन्शुरन्सच्या सर्व गरजा कोणत्याही शारीरिक संपर्काशिवाय, डिजिटल किंवा व्हर्च्युअल माध्यमाद्वारे, काँटॅक्टलेस व्यवहारासह पूर्ण केल्या जातात.
तुमच्या मोटर, हेल्थ, सायबर, ट्रॅव्हल आणि होम इन्शुरन्स पॉलिसी नक्कीच ऑनलाइन खरेदी करता येतील.
फक्त काही अपवादात्मक स्थितींमध्ये तुम्हाला ऑफलाइन प्रक्रिया दिली जाईल जिथे कंपनी प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधून तुमच्या गरजा किंवा प्रपोजल्सबाबत चर्चा करेल.
तुमचे वय एका विशिष्ट वयोगटाखाली असल्यास आणि तुमचा वैद्यकीय इतिहास स्वच्छ असल्यास वैद्यकीय तपासणीची गरज नाही. तुमचे वय एका विशिष्ट वयोगटापेक्षा जास्त असल्यास तुम्हाला वैद्यकीय तपासणीची गरज भासू शकते. त्याची तपासणी तुमच्या विमा कंपनीसोबत करणे सर्वोत्तम ठरेल.
तथापि, काँटॅक्टलेस इन्शुरन्सची गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्या ऑनलाइन मेडिकल तपासणीचे मार्गही तपासत आहेत.
तुमचा आधीचा इन्शुरन्स संपलेला असल्यास तुमच्या वाहनाची विमा जारी करण्यापूर्वी तपासणी केली जाऊ शकते. परंतु विमा कंपन्या एपद्वारे वाहनांच्या सेल्फ तपासणीसाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत जसे, आमची इ-पिन, ज्यातून विमा प्रक्रिया खरोखर विनासंपर्क होते.
काँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे ही कोणत्याही इतर माध्यमातून विमा खरेदीसाठी लागणारी कागदपत्रेच आहेत. तुम्ही ज्या प्रकारचा इन्शुरन्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहात त्यानुसार तुम्हाला सादर करावी लागणारी कागदपत्रे वेगळी असू शकतात. उदा, तुमच्या वाहनासाठी तुम्हाला आरसीची प्रत द्यावी लागेल. कागदपत्रे तुमच्या विशिष्ट केसवरही अवलंबून असू शकतात.
मात्र बऱ्याच वेळी तुम्हाला तुमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी काही ठराविक कागदपत्रे हाताशी ठेवावी लागतील. क्लेम प्रोसेसदरम्यान विविध प्रकारची कागदपत्रे लागतील.
काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या बाबतीत तुमची पॉलिसी तुम्हाला डिजिटल स्वरूपात पाठवली जाईल. तुम्ही तुमचा काँटॅक्टलेस इन्शुरन्स खरेदीसाठी वापरणार असलेला प्लॅटफॉर्म लक्षात घेऊन (उदा. एप, वेबसाइट इत्यादी) तुमच्या पॉलिसीची सॉफ्ट प्रत तुम्हाला डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल, तुम्हाला इमेलद्वारे पाठवली जाईल किंवा एपवर उपलब्ध असेल किंवा इ-कार्डच्या स्वरूपातही पाठवली जाईल. तुम्हाला आमच्या व्हॉट्सअॅप सेवा वापरून व्हॉट्सअॅपवरही पीडीएफ प्रत मिळू शकेल.
हो, नक्कीच केला जाईल. काँटॅक्टलेस व्यवहारांसोबत आमची क्लेम प्रोसेस तुम्हाला क्लेम रजिस्टर आणि ट्रॅक करण्याच्या प्रक्रियेतून नेईल आणि क्लेमची रक्कम तुमच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. कॅशलेस क्लेमच्या बाबतीत तुम्हाला तुमच्या खिशातून खर्च करायची गरज नाही. आम्ही नेटवर्क हॉस्पिटलसोबत थेट व्यवहार करून तुमचा क्लेम सेटल करण्याची काळजी घेऊ.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्समध्ये आमच्याकडे तुमच्या क्लेमसाठी विविध प्रकारचे काँटॅक्टलेस व्यवहार आहेत जसे मोटर ओटीएस आणि हेल्थ सीडीसी. या ऑनलाइन प्रक्रियांमुळे तुम्हाला आमच्या एपद्वारे तुमचे हेल्थ आणि मोटर क्लेम्स सेटल करता येतील आणि क्लेमची रक्कम तुम्ही त्याला मान्यता दिली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. काँटॅक्टलेस इन्शुरन्स यापेक्षा जास्त काँटॅक्टमुक्त होऊ शकतो का ?
ऑनलाइन जनरल इन्शुरन्स तुमच्या मोबाइलवरून सहजपणे खरेदी करता येईल. तुमच्या काँटॅक्टलेस इन्शुरन्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्याकडे विविध पर्याय आहेत. तुम्ही आमची वेबसाइट, आमचा केअरिंगली युवर्स अॅप, आमच्या व्हॉट्सअॅपच्या सेवा, आमचा चॅटबोट बोइंग यांचा वापर करून तुमच्या मोबाइल फोनद्वारे सहजपणे जनरल इन्शुरन्स ऑनलाइन खरेदी करू शकता.
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
Please enter valid quote reference ID