कल्पना करा की तुम्ही इंटरनॅशनल ट्रिप साठी उत्साहित आहात आणि प्रवासाच्या काही दिवसांपूर्वीच तुमचा अपघात होतो आणि अपघातात पाय मोडतो. यामुळे तुमच्या उत्साहावर विरजण पडते. परंतु अधिक महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला फ्लाईट बुकिंगवर केलेला खर्चही गमवावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुमच्याकडे
ट्रॅव्हल इन्श्युरन्स असल्यास तुम्हाला निश्चितच मोलाची मदत ठरेल. तथापि, तुमचे फ्लाईट कॅन्सलेशनचे कारण प्रमाणित असणे आवश्यक आहे आणि तुमच्या तिकीटांची प्रतिपूर्ती मिळवण्यासाठी धोरणाच्या नियमांनुसार असणे आवश्यक आहे. त्यामुळे ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी मिळविण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या इन्श्युररला विचारले पाहिजे, ट्रॅव्हल इन्श्युरन्स फ्लाईट कॅन्सलेशनला कव्हर करते का? चला सविस्तरपणे जाणून घेऊया आणि फ्लाईट कॅन्सलेशनच्या बाबतीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स कसा काम करतो हे समजून घेऊया.
ट्रॅव्हल फ्लाईट कॅन्सलेशन कव्हर म्हणजे काय?
फ्लाईट कॅन्सलेशन कव्हरला
फ्लाईट ट्रॅव्हल इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाते. तुमच्या नियंत्रणाबाहेरील अनपेक्षित कारणांमुळे तुमची ट्रिप कॅन्सल झाल्यास बुक केलेल्या फ्लाईट तिकीटांचा खर्च कव्हर करण्यास तुम्हाला मदत मिळते. अशा प्रकरणात इन्श्युरर तुम्हाला पूर्व-निर्दिष्ट कॅन्सलेशन शुल्क आकारू शकतो. कॅन्सलेशन फी इन्श्युरर सापेक्ष बदलू शकते. तसेच, तुमच्या फ्लाईटच्या निर्गमन तारखेमध्ये कमी अंतर असल्यास कॅन्सलेशन शुल्क सर्वसाधारण जास्त असते. काही प्रकरणांमध्ये, जर काही तासांपूर्वी कॅन्सलेशन केले गेले असेल किंवा तुमच्याकडे कोणतेही सबळ कारण नसल्यास तुम्हाला 100% कॅन्सलेशन खर्च होऊ शकतो.
माझ्या फ्लाईट कॅन्सलेशन कव्हरमध्ये काय कव्हर्ड केले जाते?
यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे फ्लाईट कॅन्सलेशन पॉलिसी विविध इन्श्युरन्स कंपन्यांसाठी भिन्न असू शकतात. तरीही, काही बेसिक कव्हरेज असतात जे बहुतांश इन्श्युरर ऑफर करतात. मी फ्लाईट कॅन्सल करू शकतो का आणि रिफंड मिळू शकतो का? या तुमच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी, तुमच्या फ्लाईट कॅन्सलेशन पॉलिसी मध्ये
ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे काय कव्हर्ड केले जाते हे पहिल्यांदा जाणून घेऊया:
- तुम्ही किंवा तुमचा सोबतचा सह प्रवासी आजार, दुखापत किंवा अनपेक्षित मृत्यू या कारणामुळे परवानाधारक डॉक्टरांच्या ऑर्डर द्वारे प्रवास करण्यास अयोग्य असल्यास.
- तुमच्या घरी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी प्रवास करीत आहात त्या ठिकाणी कोणतीही नैसर्गिक आपत्ती.
- जर कुटुंबातील सदस्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले किंवा मृत्यू झाल्यास (जरी ते तुमच्यासोबत प्रवास करत नसेल तरीही).
- जर तुम्हाला प्रवासाच्या नियोजित तारखेला कायदेशीर प्राधिकरणाने साक्षीदार म्हणून उपस्थित राहण्याचा आदेश दिल्यास.
वर नमूद केलेले कारण तुम्ही निवडलेल्या इन्श्युरन्स कंपनी आणि पॉलिसीनुसार बदलू शकतात. जर तुमचे प्रकरण वैध असेल तर तुम्हाला तुमच्या इन्श्युररकडून डॉक्युमेंटेशनसह तुमच्या प्री-पेड रकमेच्या शंभर टक्के रिटर्न केले जाईल.
ट्रॅव्हल फ्लाईट कॅन्सलेशन पॉलिसी आहे का जिथे मी कोणत्याही कारणास्तव फ्लाईट कॅन्सल करू शकतो का?
काही इन्श्युरर त्यांच्या पॉलिसीधारकांना कॅन्सल करण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचा पर्याय प्रदान करतात हे जाणून घेण्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. सामान्यपणे, ते जास्त खर्चात ऑफर केले जाते. या क्लॉज अंतर्गत, तुम्ही कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय फ्लाईट बुकिंग कॅन्सल करू शकता आणि एकूण रकमेच्या किमान 50% - 75% रिफंड मिळवण्यास पात्र होऊ शकता. मूलभूत फ्लाईट कॅन्सलेशन कव्हरेज प्रमाणेच, हे लाभ काही पात्रता निकष सह येतात जसे की:
- तुम्हाला तुमच्या प्री-पेड ट्रिप खर्चापैकी शंभर टक्के इन्श्युअर करावे लागेल.
- फ्लाईट बुकिंगच्या प्रारंभिक पेमेंट नंतर पॉलिसी 10-21 दिवसांच्या आत घेणे आवश्यक आहे.
- विमान निर्गमनाच्या 48 ते 72 तासांपूर्वी तुम्ही फ्लाईट कॅन्सल करणे आवश्यक आहे (पॉलिसी प्लॅननुसार).
- पॉलिसीनुसार, कव्हरेज रक्कम 50-75% दरम्यान असेल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू)
- मी फ्लाईट कॅन्सल करू शकतो का आणि जर मी प्रवास करीत असलेल्या दिवशी तिकीट कॅन्सल केल्यास तर रिफंड मिळवू शकतो का?
हे तुम्ही निवडलेली इन्श्युरन्स कंपनी किंवा इन्श्युरन्स पॉलिसीवर अवलंबून असते. बहुतांश प्रकरणांमध्ये, तुमच्या फ्लाईटच्या उड्डाण पूर्वी तिकीट कॅन्सल केल्यास 100% कॅन्सलेशन शुल्क लागेल.
- परदेशात प्रवास करताना मला सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स किंवा मूलभूत ट्रॅव्हल फ्लाईट कॅन्सलेशन कव्हर मिळेल का?
देशाबाहेर जाताना सर्वसमावेशक ट्रॅव्हल इन्श्युरन्स मिळविण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो कारण त्यात समाविष्ट असलेली रिस्क अधिक आहेत आणि पूर्णपणे कव्हर्ड प्राप्त करणे हा अधिक सुरक्षित मार्ग आहे.
- फ्लाईट कॅन्सलेशन इन्श्युरन्ससाठी क्लेम कसा करावा?
तुमची ट्रिप कॅन्सल करण्याचे कारण नमूद करणाऱ्या तुमच्या इन्श्युररकडे आवश्यक डॉक्युमेंटेशन सबमिट करावे लागेल. सर्वाधिक लाभ मिळविण्यासाठी शक्य तितक्या लवकर इन्श्युररला सूचित करण्याची खात्री करा.
- ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करण्यासाठी कोणत्या चांगल्या आणि प्रामाणिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्या आहेत?
अनेक चांगल्या ट्रॅव्हल इन्श्युरन्स कंपन्या आहेत जिथून तुम्ही स्वत:ला ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर मिळवू शकता जसे की बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स, इ.
निष्कर्ष
ट्रॅव्हल इन्श्युरन्स फ्लाईट कॅन्सलेशनला कव्हर करते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी उपरोक्त माहिती पुरेशी आहे, त्यामुळे जर तुम्ही देखील आगामी दिवसांमध्ये ट्रिपचे प्लॅनिंग करीत असाल तर इन्श्युरर द्वारे तुमचे फ्लाईट तिकीट कव्हर करण्याची खात्री करा जेणेकरून अनपेक्षित परिस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला त्यासाठी रिटर्न मिळू शकेल.
प्रत्युत्तर द्या