रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
What Is Sum Insured In Health Insurance?
मार्च 30, 2021

हेल्थ इन्श्युरन्स मध्ये सम इन्शुअर्ड म्हणजे काय?

इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये अशा काही अटी असू शकतात ज्या दिसायला साध्‍या परंतु त्यांचा अर्थ जटिल असू शकतात आणि नंतर कोणतीही भ्रम टाळण्यासाठी या अटींचे योग्य सार समजून घेणे आवश्यक आहे. संभाव्य पॉलिसीधारकाला उत्तर देणे आवश्यक असलेल्या प्रारंभिक प्रश्नांपैकी एक म्हणजे त्याला किती कव्हरेज किंवा सम इन्शुअर्ड आवश्यक आहे? परंतु त्यासाठी, पॉलिसी घेणाऱ्याच्या मनात प्रश्न उद्भवतो की, हेल्थ इन्श्युरन्स मध्ये सम इन्शुअर्ड म्हणजे काय? तसेच, आम्हाला कोणत्याही तपशिलामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सम इन्श्युअर्ड समजून घेणे आवश्यक आहे. सम इन्शुअर्डचा अर्थ कोणतीही नुकसान किंवा हानी झाल्यास इन्श्युरन्स कंपनी पॉलिसीधारकाला देऊ शकते अशी कमाल रक्कमेला सम इन्शुअर्ड म्‍हणतात. कधीकधी, लोक हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कमाल कव्हरेज असे देखील म्हणतात. त्यामुळे आम्ही सांगू शकतो की जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तर हेल्थ इन्श्युरन्स प्रोव्हायडर कंपनी तुम्हाला सम इन्शुअर्ड पर्यंत संपूर्ण रक्कम देईल, मात्र ती लाभामधून स्पष्टपणे वगळली नसेल. जर वास्तविक खर्च सम इन्‍शुअर्डपेक्षा जास्त असेल तर पॉलिसीधारकालाच अतिरिक्त रक्कम भरावी लागेल. उदाहरण: समजा श्री. राहुल यांच्याकडे ₹ 5 लाखांची सम इन्‍शुअर्ड हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहे. आता, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि ₹3.8 लाखांचे बिल क्लेम केले जाते. क्लेम मंजूर होतो. आता पुन्हा, काही इतर कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि यावेळी बिलची रक्कम ₹ 2 लाख आहे. आता इन्श्युरन्स कंपनी केवळ ₹ 1.2 लाख देईल आणि बॅलन्स रक्‍कम श्री. राहुल स्वत: भरतील. प्रीमियम रकमेवर सम इन्‍शुअर्डचा काय परिणाम होतो? कोणताही अनपेक्षित घटना घडल्यास सम इन्शुअर्ड एका वर्षात कव्हर केलेल्या कमाल नुकसानीवर मर्यादा प्रदान करते. सम इन्शुअर्ड जितका अधिक असेल, तितक्या प्रमाणात क्लेम केल्यावर इन्श्युरन्स कंपनीला अधिक पैसे देय करावे लागतात. म्हणून, यामुळे इन्श्युरन्स प्रीमियम अधिक देय करावा लागतो जेव्हा अधिक सम इन्श्युअर्डची निवड केली जाते. सम अशुअर्ड आणि सम इन्‍शुअर्ड यातील फरक. पॉलिसीचा अतिशय तांत्रिक भाग हा सम अशुअर्ड आणि सम इन्‍शुअर्ड यांच्यातील फरक आहे. आता, हे एकसारखे दिसू आणि वाटू शकतात परंतु वास्तवात ते पूर्णपणे वेगळे आहेत. सम अशुअर्ड ही निश्चित रक्कम आहे जी विशिष्ट कार्यक्रमाच्या घटनेच्‍या घडण्‍यावर किंवा न घडण्‍यावर दिली जाते. तर दुसरीकडे, विशिष्ट घटनेच्या बाबतीत सम इन्‍शुअर्ड ही कमाल रक्कम आहे जी अदा केली जाईल. सम अशुअर्ड ही लाईफ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये सामान्यपणे आढळणारी तरतूद आहे, तर सम इन्‍शुअर्ड मुख्यतः लाईफ इन्श्युरन्स व्यतिरिक्त इतर पॉलिसीमध्ये दिसून येते. योग्य सम इन्‍शुअर्डचे महत्त्व जरी आज आपल्‍यासोबत काहीतरी घडले तरीही हे आपल्‍याला सुरक्षेची भावना प्रदान करते की, आपली आयुष्यभराची बचत उपचारांवर खर्च होणार नाही आणि आपल्‍या आयुष्याच्या पुढील टप्प्यांमधून जाण्यासाठी तुमच्याकडे पैसे राखून असतील. फायनान्शियल सिक्युरिटीची भावना आपल्‍याला मनाची शांती देते आणि तणाव कमी करते. ज्या काळात लोक विविध बाबींच्या सतत दडपणाखाली वावरतात, त्या काळात यापेक्षा चांगले काय. ज्या प्रकरणांमध्ये आपण कौटुंबिक फ्लोटर पॉलिसीची निवड केली आहे अशा प्रकरणांमध्ये पुरेशी सम इन्‍शुअर्ड सर्वात महत्वाची आहे. जर एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांसोबत काहीतरी घडले, तर काही वेळा कुटुंबातील वित्ताच्या बाबतीत महत्त्वपूर्ण सिद्ध होऊ शकते. योग्य सम इन्‍शुअर्ड कसे निवडावे? वय घटक सम इन्‍शुअर्ड निर्धारित करण्यात वय महत्त्वाची भूमिका बजावते. वाढत्या वयासह आजार होण्‍याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे उच्च सम इन्‍शुअर्डची आवश्‍यकता वाढते. म्हणून, आपण असे म्हणू शकतो की जितक्या लवकर सुरू तितके अधिक चांगले. वर्तमान आरोग्य स्थिती तुम्हाला तुमची तसेच तुमच्या निकटच्या कुटुंबातील सदस्‍यांच्या वैद्यकीय नोंदी तपासाव्या लागतील आणि त्यानुसार सम इन्‍शुअर्ड निर्धारित करावी लागेल कारण तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांत आधीच अस्तिवात असलेले आजार असल्यास तुम्हाला लवकरच किंवा काही काळानंतर त्यांची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. लाईफस्टाईल आपण सर्वांना आता परिचित आहोत की तणाव अशा गोष्‍ट आहे जी अन्य गोष्टींपेक्षा अधिक हानीकारक ठरते. त्याशिवाय, अनेक नोकऱ्यांमध्ये उच्च-तणाव समाविष्ट असतात तर इतरांनी तुम्हाला विशिष्ट आजार होण्‍याची जोखीम वाढू शकते. सम इन्‍शुअर्ड निश्चित करतांना या सर्व बाबींचा विचार केला जातो. एफएक्यू:
  1. जर सम इन्‍शुअर्डच्‍या आत असेल तर इन्श्युरन्स कंपनी नुकसानीपेक्षा जास्त पैसे देईल का? हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी क्षतिपूर्तीच्या तत्त्वावर काम करते. याचा अर्थ असा की इन्श्युरन्स कंपनी पॉलिसीधारकाला झालेले नुकसान किंवा हानी भरपाई करण्‍यास जबाबदार आहे. तरीही, पॉलिसीधारक या पॉलिसीचा कोणताही लाभ घेण्यास पात्र नाही. या पॉलिसीचा उद्देश पॉलिसीधारकावरील वैद्यकीय खर्च आणि हॉस्पिटलायझेशनचा खर्च कमी करणे आहे.
  2. जर एखादी व्यक्ती प्रत्यक्ष पॉलिसी ऐवजी ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स निवडत असेल तर त्यात काही फरक आहेत का? कसेही ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स किंवा ऑफलाईन असो, पॉलिसीच्या सम इन्शुअर्ड किंवा इतर ऑपरेटिंग आणि तांत्रिक प्रक्रियेवर त्याची कोणताही परिणाम होत नाही.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत