भारतातील आरोग्य सेवा सुविधा दिवसागणिक खर्चिक होत आहेत. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत हेल्थ इन्श्युरन्स हे फायनान्शियल बॅक-अप म्हणून वैद्यकीय संकटावेळी आवश्यक बाब ठरत आहे. हेल्थ इन्श्युरन्सचे विविध फायदे आहेत आणि त्यांपैकी महत्वपूर्ण म्हणजे इन्कम टॅक्स लाभ होय. हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रीमियमसाठी केलेले पेमेंट भारतीय प्राप्तिकर कायदा, 1961 च्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स कपातीसाठी पात्र ठरते. श्री. अहलुवालिया यांनी
हेल्थ इन्श्युरन्स स्वत:साठी (वय 35), त्यांची पत्नी (वय 35), मुल (वय 5) आणि त्यांचे पालक (वय 65 आणि 67, अनुक्रमे) यांच्यासाठी खरेदी केला. फायनान्शियल वर्षाच्या वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांच्याकडे महत्वपूर्ण आयटीआर फॉर्म भरण्याविषयी विचारणा केली. त्यामुळे वैद्यकीय किंवा हेल्थ इन्श्युरन्स साठी केलेले पेमेंट टॅक्स कपातीसाठी पात्र ठरेल असे सांगितले. अहुवालियांचा गोंधळ उडाला; सेक्शन 80D म्हणजे काय? आरोग्य किंवा वैद्यकीय इन्श्युरन्स प्रीमियमसाठी टॅक्स कपातीसाठी एखाद्याला क्लेम करण्याची आवश्यकता का आहे? श्री. अहलुवालिया यांच्याप्रमाणेच, आरोग्य किंवा वैद्यकीय इन्श्युरन्स खरेदी करताना सेक्शन 80D चे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. अजून खूप सारे प्रश्न आहेत आणि फायनान्शियल वर्षासाठी टॅक्स भरताना 80D साठी पुरावा आवश्यक आहे का? किंवा, आपत्कालीन परिस्थितीत, वैद्यकीय खर्चासाठी 80D अंतर्गत क्लेम केला जाऊ शकतो का? चला खालील लेखामध्ये हे सविस्तर समजून घेऊया.
सेक्शन 80D म्हणजे काय?
स्वत:साठी किंवा कुटुंबासाठी हेल्थ पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तिगत स्वरुपातील किंवा एचयूएफ (हिंदू अविभक्त कुटूंब) मधील पॉलिसीधारकांना क्लेम करता येईल
सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹25,000 पर्यंत उपलब्ध असेल. भारतीय आयकर कायद्यानुसार कपातीची मर्यादा 50,000 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. जर मुख्य पॉलिसीधारकाचे पालक 60 वर्ष आणि त्याहून वयाचे सिनिअर सिटिझन असल्यास त्यांना कमाल 1 लाख रुपयांपर्यंतचा कपातीचा लाभ प्राप्त होईल व 60 वर्षाहून कमी वयाच्या सिनिअर सिटिझन साठी कपातीची कमाल मर्यादा 40,000 रुपये असेल.
80D साठी पुरावा आवश्यक आहे का?
80D कपातीचा लाभ घेण्यासाठी कोणताही पुरावा किंवा डॉक्युमेंटेशन आवश्यक नाही.
सेक्शन 80D अंतर्गत कोणत्या कपात प्राप्त होऊ शकतात?
- स्वतःसाठी भरलेले प्रीमियम - ₹ 25,000 आणि पालक (60 वर्षांपेक्षा कमी) — ₹25,000, सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹ 50,000 असेल.
- स्वतःसाठी भरलेले प्रीमियम - ₹25,000 आणि पालक (60 वर्षांपेक्षा अधिक) — ₹50,000, सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹75,000 असेल.
- स्वतःसाठी, कुटुंबासाठी (60 वर्षांवरील) भरलेले प्रीमियम - ₹50,000 आणि पालक (60 वर्षांपेक्षा अधिक) - ₹50,000, सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹1,00,000 असेल.
- हिंदू अविभक्त कुटुंबासाठी (एचयूएफ)- स्वत:साठी भरलेले प्रीमियम — ₹ 25,000, आणि पालक- ₹25,000, सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹ 25,000 असेल.
- अनिवासी व्यक्तीसाठी - स्वत:साठी भरलेले प्रीमियम — ₹ 25,000, आणि पालक - ₹25,000, सेक्शन 80D अंतर्गत कपात ₹25,000 असेल.
वैद्यकीय खर्च 80D अंतर्गत क्लेम केला जाऊ शकतो का?
होय. सेक्शन 80D अंतर्गत, हे पॉलिसीधारकाला टॅक्स भरण्यापूर्वी उत्पन्नातून कपात म्हणून स्वतः, पती/पत्नी, अवलंबून असलेल्या पालकांना क्लेम करण्याद्वारे टॅक्स बचत करण्याची परवानगी देते. वैद्यकीय खर्चासाठी क्लेम करण्यास पात्र होण्यासाठी व्यक्तीचे वय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. तसेच, व्यक्तीकडे कोणतीही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नसावी. एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ₹ 50,000 कपातीसाठी क्लेम केला जाऊ शकतो. कपातीसाठी क्लेम करण्यासाठी, सर्व वैद्यकीय खर्च कोणत्याही वैध पेमेंट पद्धतीमध्ये जसे की नेट बँकिंग, डिजिटल चॅनेल्स इ. मध्ये कॅश वगळता भरावा लागेल.
सेक्शन 80D विषयी पॉलिसीधारकांद्वारे नेहमी विचारले जाणारे प्रश्न खालीलप्रमाणे:
1. सेक्शन 80D अंतर्गत काही अपवाद आहेत का?
होय. सेक्शन 80D अंतर्गत तीन महत्त्वाचे अपवाद आहेत
- जर व्यक्तीने आपले भाऊ-बहीण, कार्यरत मुले किंवा आजी-आजोबा यांसाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी केली असल्यास त्यांना टॅक्स लाभ मिळू शकत नाही.
- जर पॉलिसीधारक कॅश द्वारे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करीत असेल तर तो/ती टॅक्स लाभांसाठी पात्र ठरणार नाही.
- जर पॉलिसीधारकाकडे त्याच्या नियोक्त्याद्वारे प्रदान केलेला ग्रुप हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम असल्यास तो टॅक्स लाभांसाठी पात्र नसेल. तथापि, जर पॉलिसीधारकाने एक्स्ट्रा कव्हर किंवा टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन खरेदी केला तर तो/ती भरलेल्या एक्स्ट्रा रकमेवर टॅक्स लाभ क्लेम करू शकतो.
2. प्राप्तिकर कायद्याच्या सेक्शन 80C आणि सेक्शन 80D मध्ये नेमका काय फरक आहे?
लाईफ इन्श्युरन्स प्रीमियम,पीपीएफ, ईपीएफ मधील गुंतवणूक, इक्विटी-लिंक्ड सेव्हिंग स्कीम आणि एसएसवाय, एससीएसएस, एनसीएस, होम लोन इ. च्या प्रिन्सिपल रकमेसाठी केलेले पेमेंट सेक्शन 80C अंतर्गत इन्कम टॅक्स कपातीसाठी पात्र ठरते. तर, स्वतः आणि अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी हेल्थ किंवा मेडिकल साठी डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, चेक, ड्राफ्ट किंवा ऑनलाईन बँकिंग साठीचे पेमेंट सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स कपातीसाठी पात्र असेल. जे अदा केलेल्या
इन्श्युरन्स प्रीमियम साठी प्राप्त होते.
अंतिम विचार
आरोग्य आणि वैद्यकीय इन्श्युरन्स वैद्यकीय संकटाच्या वेळी आर्थिक बॅक-अप म्हणून काम करतो. परंतु आर्थिक वर्षादरम्यान कलम 80D अंतर्गत त्यामध्ये इन्व्हेस्टमेंटचा लाभ घेऊ शकतो. हे व्यक्तीला भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करतात.
प्रत्युत्तर द्या