रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Immunity Booster Foods for kids
सप्टेंबर 14, 2020

कोरोनाव्हायरसच्या संकटामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 3 सोप्या प्रभावी रेसिपी

कोविड - 19 किंवा कोरोनाव्हायरस रोगाने जगभरातील लोकांना प्रभावित केले आहे आणि अजूनही वेगाने पसरत आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सोशल डिस्टंसिंगचे पालन करत असाल, घरातच राहात असाल आणि रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व प्रकारची खबरदारी घेत असाल. कोरोनाव्हायरसची प्रकरणे वाढत असताना, तुम्ही तुमचा क्वारंटाईनमधील वेळ स्वयंपाकघरात अशा रेसिपी करून पाहण्यात वापरू शकता, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. जीवन जगताना निरोगी जीवनशैली तुमची रोगप्रतिकारक प्रणाली मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, तुम्ही निरोगी आणि ताजे जेवण खाऊन देखील रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकता. तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करू शकणारे खाद्यपदार्थ खाऊन तुमच्या वेळेचा प्रभावी वापर करू शकता. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामुळे क्वारंटाईनमध्ये तुम्ही तयार करू शकता अशा सोप्या आणि जलद रेसिपी पाहा:
  1. काकडी पुदिना ताक – कडक उन्हाळ्यात थंड पेय जर सुरवातीपासून आणि आरोग्यदायी घटकांसह बनवले असेल तर ते अधिक ताजेतवाने करणारे बनते.
    • ताक आणि काकडी हे रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे खाद्यपदार्थ आहेत.
    • पुदिन्यात व्हिटॅमिन सी असते आणि रोगप्रतिकारक प्रणालीला पांढऱ्या रक्त पेशी निर्माण करण्यास मदत करते, ज्या कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी आवश्यक असतात.
काकडी पुदिना ताक बनवण्यासाठी तुम्हाला खालील घटकांची आवश्यकता असेल:
  • काकडी: 1
  • दही: ½ कप
  • पाणी:1.5 कप
  • पुदिन्याची पाने
  • कोथिंबिरीची पाने (पर्यायी)
  • मीठ
  • शुगर
  • आले: 1 इंच (पर्यायी)
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड (पर्यायी)
रेसिपी:
  • ब्लेंडरमध्ये काकडी आणि पुदिन्याची पाने घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. जर तुम्ही पर्यायी घटक वापरत असाल, तर तुम्ही काकडी आणि पुदिन्याची पाने फेटताना ते घालू शकता.
  • या गुळगुळीत मिश्रणात दही आणि मीठ घालून पुन्हा फेटून घ्या.
  • या स्मूदीमध्ये पाणी घाला आणि तुमचे ताक तयार आहे.
  • तुम्ही त्यावर कोथिंबीर आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून सजवू शकता.
  1. आल्याचा चहा: लिंबू आणि मध घालून केलेला आल्याचा चहा हा घशाची खवखव थांबवण्याचा आणि तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. हा तुमच्या शरीराला संसर्गांशी लढण्यास आणि रोगप्रतिकार प्रणाली बळकट करण्यास देखील मदत करतो.
    • आले दाह कमी करण्यास मदत करते.
    • लिंबू हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे, जे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती बळकट करते.
तुम्हाला आल्याचा चहा बनवण्यासाठी खालील घटकांची आवश्यकता असेल:
  • आले: 1 इंच
  • लिंबाचा रस: 1 चमचा
  • मध: 1 चमचा
  • पाणी: 1.5 कप
रेसिपी:
  • एका भांड्यामध्ये पाणी उकळेपर्यंत तापवा.
  • या उकळत्या पाण्यात किसलेले आले घाला.
  • आले 2-3 मिनिटांसाठी पाण्यात राहू द्या.
  • एका वेगळ्या भांड्यात लिंबाचा रस आणि मध घाला.
  • या भांड्यात आल्याचे पाणी गाळून घाला.
  • मिश्रण नीट ढवळून घ्या आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा आल्याचा चहा घ्या.
  1. पालक लसूण सूप: पालक आणि लसूण यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची क्षमता असते. याशिवाय, पालकामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि त्यात भरपूर अँटी-ऑक्सिडंट असतात. लसूण रक्तदाब कमी करण्यास आणि संसर्गांशी लढण्यास मदत करते.
पालक लसूण सूप बनविण्यासाठी तुम्हाला खालील घटकांची आवश्यकता असेल:
  • पालक: 2 कप चिरलेला
  • कांदा: ½ कप चिरलेला
  • लसूण: 3 – 4 पाकळ्या
  • बेसन: 1 चमचा
  • पाणी: 2 कप
  • काळी मिरी
  • मीठ
  • बटर
  • भाजलेल्या जिऱ्याची पूड
रेसिपी:
  • भांड्यामध्ये बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या बटरमध्ये परतून घ्या.
  • चिरलेला कांदा घाला आणि परतणे सुरू ठेवा.
  • यामध्ये धुतलेली आणि चिरलेली पालकाची पाने घाला.
  • यामध्ये काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घाला.
  • सर्वकाही व्यवस्थित मिसळा आणि नंतर बेसन घाला.
  • भांड्यामध्ये सर्व साहित्य शिजवण्यासाठी पाणी घाला.
  • शेवटी जिऱ्याची पूड घाला.
  • गॅस बंद करा आणि शिजवलेले मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
  • शिजवलेले मिश्रण गुळगुळीत करण्यासाठी ब्लेंडर वापरा.
  • हे सूप घेण्यापूर्वी गरम करा.
आम्ही समजतो की हा महामारीचा परिस्थिती आहे आणि तणाव आणि भय टाळण्यासाठी चांगली तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाय घेणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. आम्हाला आशा आहे की या सोप्या रेसिपींसह, तुम्ही तुमची काही चिंता विसराल आणि रोगप्रतिकार प्रणाली कशी बळकट करावी या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवाल. या नाजूक काळात तुम्ही संरक्षित राहावे आणि तुम्हाला सुरक्षित वाटावे अशी आमची इच्छा आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या असंख्य हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स, द्वारे तुमची काळजी घेतो जे तुम्हाला कोविड – 19 (कोरोनाव्हायरस आजार) विरुद्ध कव्हर करू शकतात. आम्ही आशा करतो की तुम्ही आणि तुमचे प्रियजन सुरक्षित आणि निरोगी राहाल आणि या आपत्कालीन परिस्थितीत कोविड - 19 विरुद्ध लढण्यासाठी सामर्थ्य मिळवाल.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत