रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
PMFBY Scheme: Overview on Eligibility, Documents and more
फेब्रुवारी 11, 2023

पीएमएफबीवाय क्रॉप इन्श्युरन्स – पात्रता, डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन आणि क्लेम संबंधी त्वरित आढावा

कृषी हा भारतातील अनेकांसाठी आजीविकेचा प्राथमिक स्त्रोत आहे आणि अन्न हे जीवनातील सर्वात महत्त्वाच्या आवश्यकतांपैकी एक आहे. जेव्हा आपण कृषी क्षेत्राविषयी चर्चा करतो. तेव्हा सर्वाधिक अस्थिरता या क्षेत्रात असल्याचे पाहायला मिळते. हवामानाची स्थिती, पीक रोग, कीटक इ. घटक यासाठी कारणीभूत असून त्यामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. कोणतीही अनिश्चितता आणि पिकांचे नुकसान यापासून शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 18 फेब्रुवारी, 2016 रोजी हाती घेतलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना (पीएमएफबीवाय).

प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) म्हणजे काय?

पंतप्रधान पीक विमा योजना हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पीएमएफबीवाय योजनेमध्ये शेतकरी त्यांची पिके इन्श्युअर्ड करू शकता आणि वेब पोर्टलच्या मदतीने कोणत्याही शंका आणि समस्यांचे निराकरण करू शकतात. दीर्घकाळ पर्यंत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकणाऱ्या योजनेविषयी माहिती प्रसारित करण्यासाठी पोर्टल भारत सरकारच्या विविध विभागांना परवानगी देते. प्रधानमंत्री पीक विमा योजना आकस्मिक दुर्दैवी घटनेमुळे होणाऱ्या कोणत्याही आर्थिक नुकसानासाठी भारतीय शेतकऱ्यांना कव्हरेज प्रदान करते. प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्ती, पीक रोग, कीटक, अवकाळी पाऊस आणि अशा प्रकारच्या अन्य नुकसानीच्या स्थितीत झाल्यास इन्श्युरन्स कव्हरेज प्रदान करते. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात स्थिर राखण्यास मदत होईल आणि शेतीमध्ये निरंतर आणि नाविन्यपूर्ण तसेच आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब करण्याची सुनिश्चिती मिळेल. तसेच, यामुळे कृषी क्षेत्रातील वित्तीय प्रवाहाची देखील सुनिश्चित होते. तुम्हाला पीएमएफबीवाय पोर्टल सहजपणे ॲक्सेस करण्यासाठी भेट द्यावी लागेल पोर्टल लिंकला: https://pmfby.gov.in/

पीएमएफबीवाय योजनेची ठळक वैशिष्ट्ये

पीएमएफबीवाय योजनेचे मुख्य उद्दिष्ट 'एक राष्ट्र, एक पीक, एक प्रीमियम' आहे. या पंतप्रधान पीक विमा योजना द्वारे सर्व भारतीय शेतकऱ्यांना किफायतशीर प्रीमियम मध्ये क्रॉप इन्श्युरन्स प्रदान करण्याचे ध्येय आहे. पीएमएफबीवाय योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य पाहूया:
 • अधिसूचित पिकांसाठी पीएमएफबीवाय योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना क्रॉप लोन/केसीसी अकाउंट प्राप्त करणे अनिवार्य आहे.
 • शेतकऱ्याद्वारे देय जास्तीत जास्त प्रीमियम खरीप पीक आणि तेलबिया पिकांसाठी 2% असेल. रबी पीक आणि तेलबिया पिकासाठी ते 1.5% असेल आणि वार्षिक व्यावसायिक किंवा बागकाम पिकांसाठी ते 5% असेल.
 • शेतकऱ्याद्वारे देय प्रीमियम आणि इन्श्युरन्स रेट शुल्क यामधील फरक केंद्र आणि राज्य दोन्ही द्वारे समप्रमाणात सामायिक केला जातो.
 • ही योजना 'क्षेत्र दृष्टीकोन' आधारावर राबविली जाते. त्यामध्ये, इन्श्युरन्स युनिट हे प्रमुख पिकांसाठी गाव/गाव पंचायत स्तर असेल. इतर पिकांसाठी, हे गाव किंवा ग्राम पंचायती पेक्षा जास्त आकाराचे युनिट असू शकते.
 • कोणत्याही टाळता न येणाऱ्या नैसर्गिक धोक्यांमुळे पिकाच्या नुकसानीचे मूल्यांकन 'क्षेत्रीय दृष्टीकोनाच्या आधारावर केले जाईल.
 • तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात सुलभता निर्माण झाली आहे. पीक कापणी तारीख कॅप्चर/अपलोड करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांना क्लेम पेमेंटमधील विलंब कमी करण्यास हे सक्षम करेल. पीक कापणीचे प्रात्यक्षिक प्रयोग कमी करण्यासाठी रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो.
 • एनएआयएस / एमएनएआयएस साठी पीएमएफबीवाय ही रिप्लेसमेंट योजना आहे. त्यामुळे, योजनेच्या अंमलबजावणीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व सर्व्हिस साठी सर्व्हिस टॅक्स दायित्वातून सूट दिली जाते.
टीप: तपशीलवार माहितीसाठी, कृपया पीएमएफबीवाय वेब पोर्टलला भेट द्या.

पीएमएफबीवाय साठी आवश्यक महत्त्वाचे डॉक्युमेंट्स

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व डॉक्युमेंट्सची माहिती याठिकाणी दिली आहे:
 • शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 • शेतकऱ्यांसाठी ओळख पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना किंवा पासपोर्ट)
 • शेतकऱ्याच्या ॲड्रेसचा पुरावा (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना किंवा पासपोर्ट)
 • जर क्षेत्र शेतकऱ्याच्या मालकीचे असेल तर 'खसरा' पेपर आणि खाते नंबर एकत्रितपणे सोबत बाळगणे आवश्यक आहे
 • जर क्षेत्रात पेरणी केली असल्यास त्यासाठी पुरावा सादर करणे आवश्यक आहे
 • पुरावा म्हणून शेतकऱ्यांना प्रधान, सरपंच, गोवन प्रधान, पटवारी इ. सारख्या व्यक्तींकडून लिखित पत्र प्राप्त करायला हवे.

पीएमएफबीवाय पोर्टलवर स्वयं-रजिस्ट्रेशन पूर्ण करण्याच्या स्टेप्स

भारत सरकारने सर्व भारतीय शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेसाठी स्वत: रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा प्रदान केली आहे. शेतकरी पीएमएफबीवाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन सह नेमके यशस्वीरित्या कसे पुढे सुरू ठेऊ शकता ते याप्रमाणे आहे:
 1. भेट द्या पीएमएफबीवाय पोर्टलला https://pmfby.gov.in/
 2. यूजरला रजिस्टर करण्यासाठी 'रजिस्टर करा' टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे.
 3. आवश्यकतेनुसार वैयक्तिक आणि अधिकृत माहिती टाईप करा.
 4. युजरला आधार नंबर (ऑटोमॅटिकरित्या व्हेरिफाईड) आणि मोबाईल नंबर (ओटीपी व्हेरिफिकेशन) व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.
 5. एकदा रजिस्ट्रेशनला मंजुरी मिळाल्यानंतर यूजरला मंजुरी/नकार एसएमएस किंवा ईमेलद्वारे सूचित केला जातो.

पीएमएफबीवाय क्रॉप इन्श्युरन्सची क्लेम प्रोसेस

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी क्लेम प्रोसेस सोपी आणि त्रासमुक्त आहे. पीएमएफबीवाय योजनेच्या क्लेम प्रोसेसमध्ये समाविष्ट असलेल्या सर्वसाधारण स्टेप्सची थोडक्यात माहिती याठिकाणी:
 • सर्वप्रथम इन्श्युअर्ड शेतकऱ्याने आपत्तीच्या 72 तासांच्या आत नुकसानाचा तपशील इन्श्युरन्स कंपनी/संबंधित बँक/स्थानिक कृषी विभाग किंवा जिल्हा अधिकाऱ्यांना कळवावा.
 • माहितीमध्ये इन्श्युअर्ड शेतकऱ्याचे तपशील जसे की नाव, सर्व्हे नंबरनुसार इन्श्युअर्ड पीक आणि प्रभावित झालेल्या पिकाचे क्षेत्र यांचा समावेश असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचा एनसीआयपी नुसार ॲप्लिकेशन नंबर, मोबाईल नंबर, केवायसी अकाउंट नंबर (लोन घेतलेल्या शेतकऱ्याच्या बाबत), किंवा सेव्हिंग अकाउंट नंबर (क्रॉप इन्श्युरन्स वेळी घोषित केल्याप्रमाणे लोन न घेतलेले शेतकरी) यासारखे तपशील ओळख आणि व्हेरिफिकेशन उद्दिष्टासाठी आवश्यक असतील.
 • प्रीमियम पेमेंट व्हेरिफिकेशन पोर्टलवरून केले जाते. आवश्यक असल्यास ते बँकद्वारे व्हेरिफाईड केले जाऊ शकते. बँक अशी कोणतीही पावती प्राप्त झाल्यानंतर पुढील 48 तासांच्या आत पेमेंट व्हेरिफिकेशन प्रदान करते.
 • मोबाईल ॲप्लिकेशन-आधारित 'क्रॉप इन्श्युरन्स ॲप' हे कापणी नंतरच्या घटनांचा तपशील जसे की रेखांश/अक्षांश आणि फोटो रिपोर्ट करण्यासाठी केला जातो.
 • व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, इन्श्युअर्ड शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये क्लेमचे लाभ इलेक्ट्रॉनिकरित्या प्रदान केले जातात.

सारांश

कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. क्रॉप इन्श्युरन्स हे एक महत्त्वाचे साधन आहे. याद्वारे अनपेक्षित नुकसानीचे सर्व बाजूंनी कव्हर प्रदान केले जाते. लक्षात ठेवा, पीएमएफबीवाय योजना आर्थिक तणावाची स्थिती निर्माण करणाऱ्या कोणत्याही अनिश्चिततेच्या सापेक्ष तुम्हाला सक्षम करेल. *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत