Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

 • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

 • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

 • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

हेल्थ इन्श्युरन्स : टॅक्स गेन प्लॅन

Health Insurance: Tax Gain Policy

कर आणि वैद्यकिय बिले यांच्यामध्ये बचत करा

तुमचे लाभ अनलॉक करा

ओपीडी आणि रूग्णालयात भरती करणे यांसाठी येणारा खर्च समाविष्ट

एकूण 6,500+ हून अधिक दवाखान्यांमध्ये कॅशलेस ची सुविधा उपलब्ध

रूग्णवाहिकेच्या खर्चाचा समावेश

बजाज आलियान्झचाच ‘टॅक्स गेन प्लॅन’ का निवडावा?

सद्यपरिस्थिती पाहाता आणि पसरत जाणारी रोगराई् आणि जीवनमानाविषयीचा धोका लक्षात घेता हेल्थ इन्श्युरन्स ही प्रत्येक व्यक्तिची प्राथमिक गरज झालेली आहे. आपण भविष्यातील आजार आणि अपघात यांपासून स्वत:ला लांब ठेवू शकत नाही, याउलट आपण सतत अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असणे गरजेचे आहे. नियमित हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये आजार, रूग्णालयात भरती करण्याचा खर्च, अपघाती मॄत्यू, जखमा आणि अजून बरेच काही या खर्चासंदर्भात कव्हर दिलेले असते.

आम्ही बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्समध्ये जेव्हा हेल्थ इन्श्युरन्सचा विषय असतो तेव्हा काहीतरी जास्तीच देण्याचा प्रयत्न करीत असतो. आमचा ‘टॅक्स गेन प्लॅन’ हा देखील याचाच एक भाग असून त्यामध्ये वैद्यकीय बिलांचा समावेश तर आहेच परंतु सदर पॉलिसीद्वारे आपण आपला पैसे वाचवून करामध्ये देखील लाभ घेवू शकता.

सदर ‘टॅक्स गेन प्लॅन’ आपला कर वाचवतो तसेच यामध्ये ओपीडी, रूग्णालयात भरती करावयास येणारा खर्च आणि आणखी बऱ्याच खर्चाचा समावेश केलेला आहे. सदरची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी ही पुर्ण कुटूंबासाठी हितकारक असून सदर पॉलिसीमध्ये सर्व वैद्यकीय खर्च आणि रूग्णालयात भरती करावयास येणाया खर्चाचा समावेश आहे. हया पॉलिसी अंतर्गत आपण आपला आणि आपल्या कुटूंबाचा देखील वैद्यकीय बिलांपासून बचाव करू शकता तसेच आपल्या कराचे नियोजन देखील करू शकता.

जेव्हा टॅक्स गेन प्लॅन सारखा महत्वाचा विषय असतो तेव्हा आम्ही बरेच काही देतो

महत्त्वाची वैशिष्ट्ये

टॅक्स गेन प्लॅनमध्ये आरोग्यविषयक काळजी आणि कर बचत फायदा यांबाबत खालील मुद्दयांचा समावेश केलेला आहे:

 • व्यापक कव्हर

  सदरच्या पॉलिसीमध्ये रूग्णालयात दाखल करावयास येणारा खर्च आणि ओपीडी खर्च यांचा समावेश आहे.

 • प्रवेश वय

  सदर टॅक्स गेन प्लॅनचा वयाच्या 75 व्या वर्षापर्यंतची कोणतीही व्यक्ती लाभ घेऊ शकते.

 • वयोवॄद्ध नागरीकांसाठी वैयक्तिकृत

  आपण वयोवॄद्ध व्यक्तिसाठी वेगळया पॉलिसीचा देखील लाभ घेऊ शकता ज्यात ओपीडी आणि रूग्णालयात दाखल करावयास येणाऱ्या खर्चाचा समावेश आहे.

 • हेल्थ चेकअप

  आपण जर सातत्याने 4 वर्ष कोणताही क्लेम केला नाही तर 4 वर्षांच्या समाप्तीनंतर हेल्थ चेकअपचा लाभ घेता येईल.

 • प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

  रूग्णालयात दाखल करावयाच्या आधीचा आणि नंतरचा खर्च - रूग्णालयात अनुक्रमे 30 दिवस आणि 60 दिवस दाखल करावयास येणारा आधीचा आणि नंतरचा खर्च सदर पॉलिसीमध्ये समाविष्ट आहे.

 • कॅशलेस सुविधा

  सदर कॅशलेस सुविधा ही जवळजवळ 18,400+ रूग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

 • को-पेमेंट वेव्हर

  आपण सदर को-पेमेंट वेव्हर चा लाभ घेऊ शकता. को-पेमेंट ही एक स्वयंस्फूर्तपणे भरावयाची रक्कम (%) असून आपण एकदंरीत पुर्ण मेडिक्लेम रकमेतून भरण्याची निवड करू शकता, आणि इतर सर्व बाबींची पूरेपूर काळजी आमच्याकडून घेतली जार्इल.

 • रुग्णवाहिका कव्हर

  सदर पॉलिसीमध्ये आपत्कालीन स्थितीमध्ये जर रूग्णवाहिकेची गरज भासलीच तर तो खर्च देखील समाविष्ट केलेला आहे.

 • वेटिंग कालावधीसाठी कोणतीही मर्यादा नाही

  सदर पॉलिसीमध्ये आपल्याला रूग्णालयात दाखल करावयास येणारा खर्च आणि ओपीडी खर्च यांसाठी कव्हर दिलेले आहे.

 • उपभोगासाठीचा खर्च

  सदर पॉलिसीमध्ये चष्मा, दातांची कार्यवाही, डेंचर्स आणि क्रचेस यांसंबंधीच्या खर्चांचा समावेश आहे.

सदर टॅक्स गेन प्लॅनचा हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीसोबत लाभ कसा घ्यावा यांबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ पाहा.

Video

जेव्हा टॅक्स गेन प्लॅनचा विषय असतो तेव्हा आम्ही बरेच काही देतो

डायरेक्ट क्लिकव्दारे क्लेम (सीडीसी)

बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स घेवून आली आहे एक अ‍ॅप आधारित क्लेम करण्याची प्रक्रिया म्हणजेच डायरेक्ट क्लिकव्दारे हेल्थ क्लेम.

सदर पॉलिसीमध्ये आपण रक्कम रूपये 20,000 पर्यंतच्या पॉलिसीसाठी अ‍ॅपव्दारे नोंदणी करून क्लेम कागदपत्रे प्रस्तुत करू शकता.

आपल्याला काय करावे लागेल:

 • हेल्थ वॉलेट अ‍ॅपमध्ये आपली पॉलिसी आणि कार्ड क्रमांक नोंदणी करा.
 • अ‍ॅपमध्ये आपली पॉलिसी आणि हेल्थ कार्ड क्रमांक नोंदणी करा.
 • क्लेम नोंदवा.
 • क्लेम अर्ज भरा आणि रूग्णालयासंदर्भातील कागदपत्रांची व्यवस्था करा.
 • अ‍ॅप मेनू वापरून सदर कागदपत्रे अपलोड करा.
 • पुढील कारवाईसाठी क्लेम प्रस्तुत करा.
 • काही तासांत पुष्टी मिळवा.

कॅशलेस क्लेम प्रोसेस (केवळ नेटवर्क हॉस्पिटलमधील उपचारांसाठीच उपलब्ध):

कोणत्याही प्रकारची कसलीही बाधा न येता सदर कॅशलेस सुविधा ही जेथे सुविधा उपलब्ध आहे अशा सर्व रूग्णालयामध्ये 24x7उपलब्ध आहे. जेथे कशलेस सेटलमेंटचा लाभ घेता येईल अशा रूग्णालयांची यादी ही डायनामिक यादी असून सदर यादी कोणतीही आगाऊ सूचना न देता बदलास पात्र आहे. रूग्णालयामध्ये भरती होणेअगोदरच आपण रूग्णालयांची यादी तपासूनच भरती होणे गरजेचे आहे. सदर अद्ययावत यादी आमच्या वेबसार्इटवर तसेच आमच्या कॉल सेंटर्सवर उ्पलब्ध आहे. बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड आणि सरकारी ओळखपत्र ही कागदपत्रे कॅशलेस सुविधेचा लाभ घेतेवेळी बंधनकारक आहेत.

जेव्हा आपल्याला कॅशलेस सुविधा घ्यावयाची असेल तेव्हा करावयाची आवश्यक ती कार्यवाही खालीलप्रमाणे:

 • भरलेला पुर्व अधिकॄत विनंती अर्ज त्यावर इलाज करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची / रूग्णालयाची स्वाक्षरी आणि आपली स्वाक्षरी करून रूग्णालयाच्या इन्श्युरन्स डेस्क वर जमा करावा.
 • तदनंतर सदर रूग्णालयाकडून तशी विनंती आरोग्य प्रशासकीय कार्यसंघाकडे (एचएटी) पुढे पाठविली जाईल.
 • पॉलिसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एचएटी डॉक्टर प्री-ऑथरायझेशन विनंती फॉर्मची तपासणी करतील आणि कॅशलेस उपलब्धतेवर निर्णय घेतील.
 • पॉलिसी आणि तिचे फायदे यानुसार प्राधिकरण पत्र (एएल)/ नकार पत्र/ अतिरिक्त आवश्यकता पत्र अशा आशयाचे पत्र पुढील 3 तासात दिले जाईल.
 • डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटल अंतिम बिल आणि डिस्चार्ज तपशील हॅटला कळवतील आणि त्यांच्या तपासणीवर आधारित राहून अंतिम सेटलमेंट केली जाईल.

महत्त्वाचे मुद्दे:

 • नियोजित हॉस्पिटलायझेशनच्या प्रकरणी तुमचा प्रवेश आगाऊ प्रवेशासाठीच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या प्रोसिजरनुसार नोंदवून/ आरक्षित करून ठेवा.
 • खाटेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जाईल.
 • कॅशलेस सुविधा ही आपल्या पॉलिसीच्या नियम व अटींच्या अधीन असेल.
 • पॉलिसी पुढील बाबी कव्हर करत नाही : टेलीफोन नातेवाईकांसाठी मागवलेले खाद्यपदार्थ व पेये टॉयलेट्रीज उपरोक्त बाबींचा खर्च आपणच करावयाचा आहे व तो डिस्चार्जपूर्वी संबंधित रुग्णालयास द्यावयाचा आहे.

उपरोक्त बाबींचा खर्च आपणच करावयाचा आहे व तो डिस्चार्जपूर्वी संबंधित रुग्णालयास द्यावयाचा आहे.

 • रूमचे भाडे, नर्सिंग शुल्क समाविष्ट आहे.तथापि, वरच्या दर्जाची रूम वापरली गेल्यास वाढीव शुल्क तुम्हाला सोसावे लागेल.
 • पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार उपचार कव्हर केलेले नसतील तर तुमचा कॅशलेस किंवा परताव्याचा क्लेम नाकारला जाईल.
 • जर अपुरी वैद्यकीय माहिती पुरविली गेली तर पुर्वनियोजीत कॅशलेससाठीचा क्लेम फेटाळला जाईल.
 • कॅशलेस सुविधेला नकार म्हणजे उपचारांना नकार असा होत नाही. त्यामुळे तुम्हाला आवश्यक वैद्यकीय लक्ष आणि हॉस्पिटलायझेशन मिळवण्यापासून प्रतिबंध होत नाही.

हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या/ नंतरच्या रिएम्बर्समेंट परतावा:

पॉलिसीच्या अटी व शर्थींनुसार रूग्णालयात दाखल होण्यापुर्वीच्या आणि डिस्चार्जनंतरच्या संबंधीत वैद्यकीय खर्चाची भरपाई केली जाईल. अशा सेवांबद्दल प्रिस्क्रिप्शन्स, संबंधीत बिले / पावत्या, हया स्वाक्षरी केलेल्या क्लेम अर्जासोबत बजाज आलियान्झ कडे दाखल कराव्या लागतील.

रिएम्बर्समेंट क्लेम प्रोसेस

 • बजाज अलायन्झ जनरल इन्श्युरन्सच्या एचएटीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याबद्दल माहिती द्या.तुमचा क्लेम ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा आपला क्लेम ऑफलाइन नोंदविण्यासाठी, आमच्या टोल-फ्री क्रमांकावर आम्हाला कॉल करा: 1800-209-5858.
 • डिस्चार्जनंतर तुम्ही खालील कागदपत्रे हॅटला 30 दिवसांत सादर करणे आवश्यक आहे: मोबाइल नंबर आणि इमेल आयडीसोबत पूर्णपणे भरलेला सही केलेला क्लेम अर्ज. ओरिजिनल हॉस्पिटल बिल आणि पेमेंट पावती तपासणी अहवाल डिस्चार्ज कार्ड औषधांचे प्रिस्क्रिप्शन बिल आणि सर्जिकल वस्तू हॉस्पिटलायझेशनपूर्वीचा खर्च (असल्यास) इन पेशंट डिपार्टमेंट (आयपीडी पेपर्स) आवश्यकता असल्यास.
 • सर्व कागदपत्रे ही पुढील कार्यवाहीसाठी एचएटी यांचेकडे पाठविली जातील. त्यानंतर कागदपत्रांवर निर्भरीत राहून पुढील 10 कामकाजांच्या दिवसांमध्ये अंतिम भरपाईची कार्यवाही केली जाई्ल.
 • हॉस्पिटलायझेशननंतरचे क्लेम्स डिस्चार्जच्या तारखेपासून 90 दिवसांत पाठवले गेले पाहिजे.

रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधीच नंबर टाकलेली हॉस्पिटलची ओरिजिनल पेमेंट रिसीट सही आणि शिक्क्यासह.
 • ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन आणि औषधाची बिले.
 • ओरिजिनल कन्सल्टेशन पेपर्स (असल्यास).
 • हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलबाहेर केलेल्या तपासण्यांसाठी ओरिजिनल तपासणी आणि निदान अहवाल, तपासणीसाठीच्या ओरिजिनल बिल आणि पावतीसह.
 • तपास अहवाल आणि निदान अहवाल मुळ प्रतीमध्ये तसेच रूग्णालयामध्ये किंवा रूग्णालयाबाहेर तपास करण्यासाठी भरणा केलेल्या बिलांच्या मुळ प्रती.
 • घटनेचे तपशील स्पष्ट करणारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे पत्र (अपघाताच्या प्रसंगी).
 • लेटरहेडवर हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमधील साधनसुविधांची माहिती.
 • आयएफएससी कोड आणि विमेदाराचे नाव असलेला कॅन्सल केलेला धनादेश.
 • रूग्णालयात दाखल झालेल्या तारखेपासून ते रूग्णालयातून डिस्चार्ज मिळेपर्यंतचे सर्व रूग्णालयाकडून साक्षांकीत करवून घेतलेले रूग्णालयातील केस पेपर. सदर कागदपत्रांमध्ये रूग्णाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल तपशीलवार माहितीसोबतच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नोट्स सोबत टीपीआर (तापमान, पल्स आणि रेस्पिरेशन) तक्ता.
 • एक्स-रे फिल्म्स (फ्रॅक्चर झालेले असल्यास.).
 • उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून ऑब्स्टेट्रिक इतिहास (गर्भावस्थेच्या प्रसंगी).
 • एफआयआर अहवाल (अपघाताच्या संदर्भात असेल तर).
 • काही विशेष प्रकरणांसाठी अतिरिक्त आवश्यकताः. मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या बाबतीत, बिलाची कॉपी असलेल्या लेन्सचे स्टिकर. ऑपरेशनच्या बाबतीत बिलाची कॉपी असलेले स्टिकर लावा. हृदयाशी संबंधित उपचारांच्या बाबतीत, बिलाच्या कॉपीसह स्टेंट स्टिकर लावा.

रूग्णालयात दाखल न होणाऱ्या उपचार घेतलेल्या रूग्णांनी सबमिट करण्याची कागदपत्रे

 • उपचार करीत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कन्सल्टेशनच्या पावत्या, बिलांसहीत निदान अहवालाचे पत्र.
 • खरेदी केलेल्या सर्व औषधांच्या मुळ पावत्या/ बिलांसह प्रिस्क्रिप्शन.
 • आजाराचे निदान होणेसंदर्भातील चाचण्यांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा संदर्भ.
 • निदान चाचणी अहवाल, बिले आणि पावत्या.

सर्व मूळ क्लेम डॉक्युमेंट्स खालील ॲड्रेसवर सबमिट करणे आवश्यक आहे:

हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन टीम

बजाज आलियान्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411006.

लखोट्यावर तुमचा पोलिसी नंबर, हेल्थकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर स्पष्टपणे नमूद करा.

टीप: पुढील संदर्भासाठी आपणाकडे सर्व कागदपत्रांची प्रत आणि कुरिअरचा संदर्भ क्रमांक बाळगा.

हेल्थ इन्श्युरन्स सोपा करूया

‘टॅक्स गेन प्लॅन’ म्हणजे काय?

बजाज आलियान्झ टॅक्स गेन प्लॅन म्हणजे एक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी असून यामध्ये आपले वैद्यकीय खर्च भरपाईइ सोबत कर बचत लाभ देखील घेता येतो. सदर पॉलिसी ही वैयक्तिक, कौटुंबिक आणि ज्येष्ठ नागरीक यांच्या आरोग्यसेवेबाबत दक्षता घेते.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

आशिष झुंझुनवाला

माझ्या क्लेमच्या पुर्ततेबाबत जो 2 दिवसांच्या आत मंजूर झाला, मला झालेला आनंद आणि समाधान...

सुनिता एम आहूजा

लॉकडाउनच्या काळात इन्श्युरन्स कॉपी वेगाने वितरीत केली गेली. बजाज आलियान्झच्या टीमला सलाम

रेनी जॉर्ज

बजाज आलियान्झ वडोदरा टीमचे, विशेषतः श्री हार्दिक मकवाना आणि श्री आशिष यांचे आभार...

स्वत:चे आरोग्य आणि संपत्ती अनुकूल करवून घ्या

वेटिंग कालावधी शिवाय ओपीडी उपचारांसाठी स्वतंत्र कव्हर.

एव्हडेच नाही तर टॅक्स गेन प्लॅन सोबतच आम्ही देत आहोत अतिरिक्त फायदे

सदरच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये हेल्थ इन्श्युरन्स सोबतच वैद्यकीय खर्चापासून देखील मुक्तता मिळेल तसेच करामध्ये देखील बचत होईल. आणखी काही अतिरिक्त लाभ खाली दिलेले आहेत:

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम एक द्रुत, सोयीस्कर आणि सोपी क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुनिश्चित करते Read more

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम एक द्रुत, सोयीस्कर आणि सोपी क्लेम सेटलमेंट प्रक्रिया सुनिश्चित करते. तसेच, आम्ही भारतभरातील 18,400+ पेक्षा जास्त नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस क्लेम सेटलमेंट प्रदान करतो. हे रुग्णालयात दाखल किंवा उपचाराच्या बाबतीत उपयोगी ठरते ज्यात आम्ही थेट बिले भरण्यासाठी नेटवर्क रुग्णालयात लक्ष ठेवतो आणि आपण बरे होण्यासाठी आणि आपल्या पायावर परत जाण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. 

Multiple sum insured options

एकाधिक सम इन्श्युअर्ड पर्याय

सदर पॉलिसी स्वत:साठी, कुटूंबासाठी आणि ज्येष्ठ नागरीकांसाठी इन्श्युरन्सच्या रक्कमेचे अनेक पर्याय प्रदान करते.

कमी प्रीमियम

आमचे टॅक्स गेन प्लॅन आपल्याला परवडतील असे प्रिमियम प्रदान करतात. खाली दिलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडा: अधिक जाणून घ्या

कमी प्रीमियम

आमचे टॅक्स गेन प्लॅन आपल्याला परवडतील असे प्रिमियम प्रदान करतात. खाली दिलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडा:

पॉलिसी आणि प्रिमीयमचा तक्ता

सरसकट प्रिमीयम रू. 4,999/ *

18-25 वर्षे

26-40 वर्षे

41-45 वर्षे

46-55 वर्षे

हॉस्पिटलायझेशन कव्हर - सरसकट सम इन्श्युअर्ड ₹1 लाख

 

 

 

 

स्वत:साठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

3,100

2,900

2,500

1,600

प्लॅन - बी टॅक्स गेन 9,999

 

 

 

 

सरसकट प्रिमीयम रू. 9,999/ *

18-25 वर्षे

26-40 वर्षे

41-45 वर्षे

46-55 वर्षे

हॉस्पिटलायझेशन कव्हर - सरसकट सम इन्श्युअर्ड ₹2 लाख

 

 

 

 

स्वत:साठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

6,500

6,000

5,000

3,000

स्वत:साठी + जोडीदारासाठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

5,200

4,800

3,500

1,000

प्लॅन - सी टॅक्स गेन रू 14,999 1)सी-1

 

 

 

 

सरसकट प्रिमीयम रू. 14,999/ *

18-25 वर्षे

26-40 वर्षे

41-45 वर्षे

46-55 वर्षे

हॉस्पिटलायझेशन कव्हर - सरसकट सम इन्श्युअर्ड ₹2 लाख

 

 

 

 

स्वत:साठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

9,500

9,000

8,500

7,500

स्वत:साठी + जोडीदारासाठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

9,000

8,500

7,000

4,500

2 ) सी-2

 

 

 

 

सरसकट प्रिमीयम रू. 14,999/ *

18-25 वर्षे

26-40 वर्षे

41-45 वर्षे

46-55 वर्षे

रूग्णालय खर्च समाविष्ट - सरसकट रू. 3 लाखाचा विमा

 

 

 

 

स्वत:साठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

9,000

8,500

7,500

6,000

स्वत:साठी + जोडीदारासाठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

8,000

7,500

5,500

2,500

प्लॅन - डी ज्येष्ठ नागरिकांसाठी टॅक्स गेन 19,999

 

 

 

 

सरसकट प्रिमीयम रू. 19,999/*

56-60 वर्षे

61-65 वर्षे

65-70 वर्षे

71-75 वर्षे

हॉस्पिटलायझेशन कव्हर - सरसकट सम इन्श्युअर्ड ₹ 1 लाख

 

 

 

 

स्वत:साठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

13,000

12,500

12,000

11,000

स्वत:साठी + जोडीदारासाठी ओपीडी लाभ(रू. मध्ये)

11,000

10000

9,500

8,000

कर बचत

आयकर अधिनियमच्या कलम 80D अंतर्गत लाभ मिळवा*. अधिक वाचा

कर बचत

आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल.*

*आपल्यासाठी, जोडीदारासाठी, मुलांसाठी, पालकांसाठी टॅक्स गेन प्लॅनची निवड केल्यास, तुमच्या करामधून वजावट रक्कम म्हणून आपण वर्षाला रुपये 25,000 चा लाभ घेऊ शकता. (तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक नसावे). आपण ज्येष्ठ नागरिक (वय 60वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक) असलेल्या आपल्या पालकांसाठी प्रीमियम भरत असल्यास, कर बचतीच्या उद्देशाने जास्तीत जास्त रुपये 50,000 चा हेल्थ इन्श्युरन्स लाभ मिळू शकतो. आपले वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि आपले पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास करदाता म्हणून, कदाचित आपणाला, या कारणामुळे, कलम 80डी अंतर्गत जास्तीत जास्त एकूण रुपये 75,000 पर्यंत कर लाभ मिळू शकतो. जर आपले वय 60वर्षांपेक्षा जास्त असल्यास आणि आपण आपल्या पालकांसाठी प्रीमियम भरत असल्यास,कलम 80डी अंतर्गत जास्तीत जास्त एकूण रुपये 1लाख पर्यंत कर लाभ मिळू शकतो.

टॅक्स गेन प्लॅन घेण्याअगोदर काही महत्वाचे मुद्दे

 • समावेश

 • अपवाद

रुग्णवाहिका कव्हर

यामध्ये आपत्कालिन स्थितीमध्ये रूग्णवाहिका खर्चाचा समावेश आहे.

आधी आणि नंतरचा रूग्णालयाचा खर्च

यामध्ये आधीचा आणि नंतरचा रूग्णालयाचा खर्च समाविष्ट आहे.

डेकेअर प्रक्रिया

यामध्ये डेकेअर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व खर्चांचा समावेश आहे.

उपभोगासाठीचा खर्च

यामध्ये सर्व उपभोग्य खर्चाचा जसे की चष्मा, दातांची प्रक्रिया, डेंचर्स आणि क्रचेस यांसंबंधीच्या खर्चाचा समावेश आहे.

1 चे 1

युद्धामुळे उद्भवणारे उपचार (घोषित किंवा अघोषित), गृहयुद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूंचा हल्ला 

अधिक जाणून घ्या

युद्धामुळे (घोषित किंवा अघोषित), गृहयुद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूंचा हल्ला, बंडखोरी, क्रांती, विद्रोह, उठाव, लष्करी किंवा हद्दपार केलेली शक्ती, जप्ती, पकडणे, अटक करणे, बहिष्कार किंवा नजरकैद, जप्ती किंवा राष्ट्रीयकरण किंवा यामुळे होणारे उपचार कोणत्याही शासकीय किंवा सार्वजनिक किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या आदेशानुसार किंवा अण्वस्त्रे आणि / किंवा सामग्रीमुळे नुकसान भरपाई करणे किंवा नुकसान करणे क्लेम करणे.

सुंता, कॉस्मेटिक किंवा सौंदर्यासंबंधीचे उपचार, जीवन/ अथवा लिंग बदलासाठीची शस्त्रक्रिया.
कॅन्सर, जळणे किंवा अपघातातील शारीरिक दुखापत यांमध्ये अत्यावश्यक असणारी प्लास्टीक सर्जरी.
कोवालेसेन्स, सामान्य दुर्बलता, विश्रांती उपचार, जन्मजात बाहय रोग किंवा विसंगती, अनुवांशिक विकार, स्टेम सेल इम्प्लांटेशन किंवा शस्त्रक्रिया किंवा ग्रोथ हार्मोन थेरपी.
ह्युमन इम्युनोडिफीशियन्सी व्हायरस किंवा प्रकार / म्युटंट व्हायरस आणि एड्स, लैंगिक आजार किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे आजार.
रूग्णालयात दाखल करणे हे प्राथमिकत: आणि विशेषत: निदान, एक्स¹रे किंवा प्रयोगशाळा परीक्षण आणि तपासणी यांसंदर्भात असते.
पोस्ट बाईट उपचाराव्यतिरिक्त लसीकरण किंवा रोगप्रतिबंधक लस देणे.
उपचाराचा भाग नसूनदेखील जीवनसत्वे, टॉनिक, पौष्टिक पूरक आहार.
विचलित नेसल सेपटम आणि हायपरट्रफाईड टर्बिनेट यांच्या सुधारणेसाठी केलेली शस्त्रक्रिया.
मानसिक आजर किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडील उपचार. आधीच्या कोणत्याही स्थितीसाठी, आजार किंवा दुखापत यांसाठी कर लाभ पॉलिसीच्या पहिल्या तारखेपासून 48 महिन्यांचा कालावधी पुर्ण होईपर्यंत उपलब्ध नसेल.

पॉलिसीच्या प्रथम वर्षामधील चष्म्याचा खर्च. पुढील वर्षी जर पॉलिसीचे नूतनीकरण केले, तर सदरचा खर्च दुसऱ्या वर्षी देण्यात येईल परंतु त्यासाठी ओपीडी मर्यादा 25% टक्के इतकी असेल.

पॉलिसीच्या पहिले दोन वर्षे डेंचरचा खर्च. सलग पॉलिसीचे नूतनीकरण केले, तर सदरचा खर्च तिसऱ्या वर्षी देण्यात येईल परंतु त्यासाठी ओपीडी मर्यादा 25% टक्के इतकी असेल.

पॉलिसीच्या पहिले दोन वर्षात श्रवणयंत्राचा खर्च. सलग पॉलिसीचे नूतनीकरण केले, तर सदरचा खर्च तिसऱ्या वर्षी देण्यात येईल परंतु त्यासाठी ओपीडी मर्यादा 25% टक्के इतकी असेल.

जर कोणतेही उपचार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याशिवाय आणि योग्य सल्लामसलतीशिवाय घेतले तर.
उपचार करीत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणताही निदान चाचण्यांकरिता आलेला खर्च.
वार्षिक आरोग्य तपासणीचा खर्च.
बाह्यरुग्ण वैद्यकीय खर्चाच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक देय खर्च.

गरोदरपणातील आणि प्रसुतीसंदर्भातील खर्च.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Satish Chand Katoch

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

Ashish Mukherjee

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी खूप सोपी, विनासायास, विना गुंतागुंत. छान काम. शुभेच्छा.

Mrinalini Menon

मृणालिनी मेनन

 

खूपच छान डिझाईन केलेली व कस्टमर फ्रेंडली

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 16 मे 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

 • निवडा
  कृपया निवडा
 • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा