कोविड-19 महामारीने आपल्या सर्वांना खर्चाच्या बाबत जागरुक केले आहे. यामुळे प्रत्येक जीवनाच्या पैलू वर प्रभाव पडतो.. आपल्याला त्वरित आवश्यक नसलेल्या गोष्टी भविष्यासाठी पुढे ढकलल्या जातात.. तसेच, खर्चाच्या सवयी केवळ चैनीच्या वस्तू कडून आवश्यक वस्तू खर्चाकडे बदलल्या आहेत.. त्यामुळे
मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अनिवार्य आहे आणि त्यामुळे नाकारले जाऊ शकत नाही. बाहेर पडण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे मोटर इन्श्युरन्स पॉलिसी हा अतिरिक्त खर्च असल्याचे भासू शकते. मात्र, वाहन स्थिर असताना चोरी किंवा आगीच्या घटना घडू शकतात. अशा अनिश्चित घटनांपासून संरक्षण करण्यासाठी, इन्श्युरन्स पॉलिसी आवश्यक आहे.
वापर-आधारित इन्श्युरन्स म्हणजे काय?
वापर-आधारित इन्श्युरन्स किंवा यूबीआय हा एक प्रकारचा शॉर्ट टर्म कार इन्श्युरन्स आहे. ज्यामध्ये पॉलिसीसाठी देय प्रीमियम थेट इन्श्युअर्ड वाहन/प्रॉडक्टच्या वापरासह लिंक केले जाते. याला टेलिमॅटिक्स इन्श्युरन्स म्हणूनही संबोधले जाते आणि रेग्युलेटरी सँडबॉक्स रुट द्वारे सादर करण्यात आले आहे.
टेलिमॅटिक्स म्हणजे काय?
टेलिमॅटिक्स हा टेलिकम्युनिकेशन व इन्फॉमॅटिक्स संयोग आहे - याचा वापर ड्रायव्हिंगशी संबंधित डाटाचा ट्रॅक ठेवण्यासाठी केला जातो, ज्यामध्ये त्या माहितीचे स्टोरेज आणि ट्रान्सफर समाविष्ट आहे. ऑटो इन्श्युरन्स इंडस्ट्री मध्ये हा डाटा ड्रायव्हिंगच्या वर्तनाचा अंदाज घेण्यासाठी आणि योग्य व्हेईकल इन्श्युरन्स रेटचे मापन करण्यासाठी आवश्यक ठरतो. विकसित राष्ट्रात वापर-आधारित इन्श्युरन्सचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परंतु आता भारतातही त्याचे अस्तित्व दिसून येत आहे. अहवालांनुसार, Insurance Regulatory and Development Authority of India (IRDAI) वापर-आधारित मोटर इन्श्युरन्स पॉलिसीच्या कल्पनेस सहाय्य करते. बजाज आलियान्झ
जनरल इन्श्युरन्स युजरच्या गरजा विचारात घेऊन असे प्लॅन्स सादर केले आहेत.
वापर-आधारित कार इन्श्युरन्स पॉलिसी कशी काम करते?
जेव्हा तुम्ही या प्रकारची पॉलिसी खरेदी करता तेव्हा तुम्हाला पूर्व-निर्दिष्ट किलोमीटरसाठी मोटर इन्श्युरन्स प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही हे पूर्वनिर्धारित अंतर ओलांडले असल्यास तर तुम्ही त्यास अतिरिक्त किलो मीटरसह रिन्यू करू शकता. तुम्ही लक्षात घेणे आवश्यक आहे, वापर-आधारित प्लॅनचा लाभ घेण्यासाठी जर तुमच्या वाहनाच्या वापरात वाढ झाली तर वारंवार टॉप-अप करणे आवश्यक आहे.
वापर-आधारित कार इन्श्युरन्सचे फायदे काय आहेत?
शॉर्ट टर्म असल्याने
कार इन्श्युरन्सया प्लॅन्सचे लाभ खालीलप्रमाणे आहेत-
कमी प्रीमियम: पॉलिसी विशिष्ट संख्येच्या किलोमीटरसाठी वैध असल्याने प्रीमियम स्वत:च्या नुकसानीच्या कव्हरसह स्टँडर्ड प्लॅनपेक्षा कमी असेल. सतर्क चालक या प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीचा वापर करून बरेच बचत करू शकतील. तसेच, जे लोक त्यांचे वाहन वारंवार वापरतात ते नियामक नियमांचे अनुपालन करताना अशा कमी प्रीमियमचा लाभ घेऊ शकतील.
सर्वोत्तम रस्त्याची सुरक्षा: टेलिमॅटिक्स हे डिव्हाईस असून त्याद्वारे चालकाच्या सवयींचा ट्रॅक ठेवला जातो.. डिव्हाईसचे इंस्टॉलेशन तुमच्या पॉलिसीअंतर्गत समाविष्ट केले आहे आणि ड्रायव्हिंगच्या सवयीवर देखरेख ठेवण्यासाठी इन्श्युअर्ड तसेच इन्श्युरन्स कंपनीला मदत करू शकते. या देखरेख साधनांचा वापर करून, हे तुमच्यासाठी तसेच इतर कारसाठी रस्त्यावरील सुरक्षा वाढविण्यास मदत करू शकते. तसेच, या डाटाचा वापर करून, इन्श्युरन्स कंपनी चांगल्या प्लॅन्सची शिफारस करू शकते जे वापरानुसार सर्वसमावेशक कव्हर प्रदान करतात.
अतिरिक्त फीचर्स: वापर-आधारित मोटर इन्श्युरन्स पॉलिसी आवश्यक ॲड-ऑन्ससह विस्तारीत केल्या जाऊ शकतात. अतिरिक्त कव्हरेज पर्यायांचा वापर करून, पॉलिसीधारक त्यांच्या वाहनासाठी संपूर्ण संरक्षण सुनिश्चित करू शकतो. शेवटी, वापर-आधारित मोटर इन्श्युरन्स पॉलिसी ही इन्श्युरन्स इंडस्ट्रीमधील पुढील मोठी गोष्ट आहे. हे तुमच्या मोटर वाहनाच्या वापरावर आधारित सर्वसमावेशक इन्श्युरन्स कव्हर राखताना खरेदीदारांना परवडणारे पर्याय प्रदान करते.
प्रत्युत्तर द्या