रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Travelling in COVID-19 Times
डिसेंबर 14, 2021

कोविड-19 च्या काळात प्रवास करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

तो काळ आठवा, जेव्हा प्रवास करणे सोपे होते. आपण सुट्टीसाठी प्लॅन करायचो, कुटुंब आणि मित्रांसह सुट्टीवर जायचो. ते पण काय दिवस होते! प्रवास हळूहळू सुरू होत आहे. अद्याप, प्रवास हा महामारी पूर्वी सारखा राहिलेला नाही. कोविड-19 च्या काळात, प्रवास धोकादायक आहे आणि जगाच्या अनेक भागांमध्ये गुंतागुंतीचा आहे. त्रासमुक्त ट्रिप ही अशी गोष्ट आहे ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. तथापि, काही गोष्टी चुकीच्या होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, सामान गहाळ होणे, डीले ज्यामुळे ट्रान्झिट फ्लाईट चुकणे. अशा कोणत्याही घटना शारीरिक, भावनात्मक आणि आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतात. तर, प्रवास का सुरू करू नये सोबत ट्रॅव्हल इन्श्युरन्स.

ट्रॅव्हल इन्श्युरन्स का?

तुम्ही देशांतर्गत प्रवास करत असाल किंवा परदेशात. ट्रॅव्हल इन्श्युरन्स वाटेत येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास मदत करते. प्रत्येक व्यक्तीच्या प्रवासाच्या गरजा भिन्न असतात. आणि चालू असलेल्या जागतिक संकटासह सुरक्षितपणे प्रवास करणे हे प्राधान्य आहे. योग्य ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हरेज निवडल्यास कोणत्याही चिंतेशिवाय प्रवासाचा आनंद घेण्यास मदत होईल.

कोविड-19 च्या काळात प्रवास करणे सुरक्षित आहे का?

सोप्या भाषेत सांगायचे तर, कोविड-19 च्या काळात प्रवास करणे योग्य प्रमाणात जोखमीचे आहे. तथापि, आपल्याला मार्ग शोधणे देखील आवश्यक आहे. तुम्ही जाऊ इच्छिता त्या गंतव्यामध्ये कोविड-19 चा प्रसार तपासण्याची खात्री करा. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी लसीकरण केले नसेल तर प्रवास करू नका. विशेषत:, जर तुमच्या कुटुंबात वृद्ध लोक असतील ज्यांचे लसीकरण झालेले नाही तर ते आजारी पडण्याची जोखीम जास्त असते. सद्य स्थितीला, एक योग्य गोष्ट म्हणजे कोणत्याही लसीकरण न केलेल्या व्यक्तीने कुठेही प्रवास करू नये. तथापि, जबाबदार सिटीझन म्हणून, तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी कोविड शॉट घेणे चांगले आहे. लक्षात ठेवा, आपण यामध्ये एकत्र आहोत.

मी पूर्णपणे लसीकरण केले आहे. तर प्रवास करणे सुरक्षित आहे का?

प्रवासामध्ये समाजातील विविध लोकांशी संपर्कात येणे समाविष्ट असते. पूर्णपणे-लसीकरण केलेल्या व्यक्तीला अद्याप काळजी घेणे आवश्यक असते. पूर्णपणे लसीकरण गंभीरपणे आजारी होण्याची आणि इतरांमध्ये व्हायरस पसरवण्याची जोखीम लक्षणीयरित्या कमी करते. तुम्ही प्रवास करण्यापूर्वी, कोविड-19 चे गंतव्य आणि प्रसारणाबाबत ट्रॅव्हल ॲडव्हायजरी सह तपासा. येथे, आम्ही काही खबरदाऱ्या दर्शविल्या आहेत ज्या सुरक्षितपणे प्रवास करण्यास आणि आनंदी क्षणांसोबत परत येण्यास मदत करतील.

तुम्ही कुटुंबासह प्रवास करत असाल तर घ्यावयाची खबरदारी

कुटुंबासोबत प्रवास करताना तुम्ही कसे तयार राहावे याचा सारांश येथे दिलेला आहे:
  • ट्रॅव्हल ॲडव्हायजरी मार्गदर्शक तत्त्वे तपासा. ते राज्यनिहाय बदलते. किंवा परदेशात प्रवास करताना बदलते.
  • तुम्ही प्रवास करण्यापूर्वी कुटुंबातील सर्व सदस्यांची कोविड-19 चाचणी करा.
  • पाहा ट्रॅव्हल इन्श्युरन्स ऑनलाईन. जर तुमच्याकडे पॉलिसी असेल तर पॉलिसी रिव्ह्यू करणे, कव्हरेज आणि मर्यादा समजून घेणे चांगले आहे.
  • खाद्यपदार्थ, निवास आणि वाहतुकीसाठी लोकेशन/गंतव्यावर उपलब्ध पर्याय तपासा. सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे, प्रभावित भागात सर्व्हिसेस आणि बिझनेस मध्ये एकतर अंशतः किंवा पूर्णपणे व्यत्यय असू शकतात. त्यामुळे प्रक्रिया आणि सर्व्हिसेस मधील बदलांविषयी माहिती तपासण्याचा सल्ला दिला जातो.
  • गरजेनुसार औषधे बाळगा.
  • वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या स्थितीत गंतव्याला जाणे चांगले नाही.
  • जर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असाल तर मास्क घालणे, अल्कोहोल आधारित सॅनिटायझर वेळोवेळी वापरणे, हात धुणे इ. सारख्या अनिवार्य खबरदारी घ्या.
  • सद्य स्थितीला, कोणत्याही कॉन्सर्टमध्ये जाणे टाळणे आणि व्हेंटिलेटेड बंदिस्त जागेपासून दूर राहणे चांगले आहे.
  • खबरदारीचे पालन केले जाईल तेथे निवास बुक करण्याची खात्री करा. कर्मचारी मास्क घालत आहेत. तुम्ही राहत असलेल्या रूम मध्ये जास्त स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाला निर्जंतुक करण्याची खात्री करा, ज्यामध्ये कीज, रिमोट कंट्रोल, दरवाज्याचे नॉब इ. समाविष्ट आहे.
  • ट्रॅव्हल सेफ्टी किट बनवा. हँड सॅनिटायझर, अतिरिक्त मास्क, जंतुनाशक बॅग्स आणि इतर अन्य गोष्टींचा समावेश करा.
टीप: कृपया सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवासासाठी गंतव्य प्रवास मार्गदर्शक तत्त्वांना रेफर करा.

थोडक्यात

एकदा का तुम्ही परतलात की, तुम्ही आणि तुमच्यासोबत प्रवास केलेले कोणीही स्थानिक प्राधिकरण/सरकारने सूचित केलेल्या दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असल्याची खात्री करा. कोणत्याही लक्षणांच्या बाबतीत, कोविड-19 चाचणी करा. चला जबाबदारीने वागूया. आपण नाकारू शकत नाही की सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे प्रवासावर निर्बंध आले आहेत. खबरदारीचे उपाय आणि लसीकरण मोहिमेमुळे स्थिरपणे प्रवास करण्याचे पुनरागमन होत आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर याठिकाणी आहेत कस्टमाईज्ड सीनिअर सिटीझन्ससाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स. योग्य स्टेप्स उचला आणि चिंता मागे सोडून प्रवासाला सुरुवात करा. स्मार्ट आणि सुरक्षितपणे प्रवास करा!  

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत