नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली? खूपच छान! परंतु प्रतीक्षा करा! तुम्ही टू-व्हीलर साठी इन्श्युरन्स घेतला का? जर नसल्यास तुम्ही तत्काळ तो मिळवू शकता. केवळ आवश्यकच नाही तर तुमच्या नवीन बाईक किंवा स्कूटरसाठी इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे देखील अनिवार्य आहे. इन्श्युरन्स खरेदी करताना गोंधळ देखील उडण्याची शक्यता असते. निवडण्यासाठी दोन मूलभूत इन्श्युरन्स प्लॅन्स आहेत, म्हणजेच:
- 1st पार्टी इन्श्युरन्स
- थर्ड-पार्टी इन्श्युरन्स
खरंतर वापरकर्त्यांना नेहमी प्रश्न पडतो बाईक साठी 1st पार्टी इन्श्युरन्स किंवा थर्ड-पार्टी इन्श्युरन्स म्हणजे काय. जर तुमच्या मनात देखील अशीच शंका असल्यास निश्चितपणे हा लेख तुमच्यासाठी आहे. अधिक जाणून घेण्यासाठी वाचत राहा!
बाईकसाठी 1st पार्टी इन्श्युरन्स म्हणजे काय?
फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स ही एक पॉलिसी आहे जी व्यक्ती थेट इन्श्युरर किंवा फर्म कडून खरेदी करतो. सर्वसमावेशक
टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी म्हणून देखील ओळखली जाते. फर्स्ट पार्टी पॉलिसी बद्दल महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्हाला याद्वारे जवळपास सर्वबाबींसाठी कव्हर प्रदान केले जाते. तुमच्या बाईकचा अपघात झाल्यास किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास तुमच्याकडील फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्सचा नक्कीच फायदा होईल. फर्स्ट-पार्टी पॉलिसीचे काही महत्त्वपूर्ण घटक येथे दिले आहेत:
- स्वत:च्या नुकसानीचे कव्हर: तुम्हाला किंवा तुमच्या वाहनाला झालेले कोणतेही नुकसान या अंतर्गत कव्हर केले जाईल.
- थर्ड-पार्टी दायित्व: जर अपघातामध्ये, तुमच्यामुळे थर्ड पार्टीला झालेले कोणतेही नुकसान झाल्यास, ते सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये देखील कव्हर केले जाईल.
- पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर: पहिल्या पार्टी इन्श्युरन्स प्रदात्यांकडे पीए (वैयक्तिक अपघात) पॉलिसीमधील कव्हर वैशिष्ट्य. इन्श्युअर्डला अपघातात जर त्याला किंवा तिला गंभीर दुखापत झाली तर रु15 लाख पर्यंत मिळते.
याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या पॉलिसीमध्ये ॲड-ऑन्स देखील समाविष्ट करू शकता जसे की पिलियनसाठी कव्हर, झिरो डेप्रीसिएशन, रोडसाईड असिस्टन्स आणि रिटर्न टू इनव्हॉईस यांचा समावेश होतो. फर्स्ट पार्टी पॉलिसीबद्दल किंवा सर्वसमावेशक पॉलिसीबद्दल तुमच्या मनात येणारी एकमेव गोष्ट म्हणजे प्रीमियम. या प्रकारच्या पॉलिसीचा प्रीमियम अधिक असतो आणि त्यामुळे तुम्हाला मिळणारी भरपाई देखील जास्त आहे. सर्वसमावेशक कव्हर अंतर्गत कव्हर केलेले काही इतर पैलू:
- आगीपासून नुकसान
- पुरामुळे झालेले नुकसान
- तोडफोड
- चोरी
थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर हे फर्स्ट पार्टी कव्हरपेक्षा चांगले आहे का?
या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्यापूर्वी, चला अभ्यास करू या
टू-व्हीलर इन्श्युरन्स थर्ड पार्टी कव्हर. थर्ड-पार्टी इन्श्युरन्स हे एक कव्हर आहे जे अपघातात थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीसाठी तुम्हाला भरपाई देते. जर तुमच्या बाईकला अपघातात नुकसान झाले तर इतर पार्टी त्यांच्याकडे टीपी (थर्ड पार्टी) कव्हर असल्यास त्यासाठी देय करेल. थर्ड-पार्टी इन्श्युरन्स तुमच्या बाईकच्या कोणत्याही नुकसानीसाठी पैसे देत नाही. तथापि, जर तुम्ही तुमच्या टीपी कव्हरसह पीए कव्हर समाविष्ट केले असेल तर तुम्हाला कोणतीही दुखापत झाल्यास तुम्हाला भरपाई मिळू शकते. मुख्य प्रश्न निश्चितपणे निर्माण होतो की, फर्स्ट पार्टी कव्हरपेक्षा थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर चांगले आहे का?हे केवळ
इन्श्युरन्समध्ये आयडीव्ही. कमी असलेल्या जुन्या वाहनांसाठी फायदेशीर आहे. जर तुमच्याकडे अनेकवेळा चालविलेली जुनी बाईक असल्यास तुम्ही त्यासाठी टीपी कव्हर मिळवू शकता. प्रीमियम कमी असेल. तथापि, जर तुमची बाईक नवीन असेल आणि अधिक आयडीव्ही असेल तर फर्स्ट-पार्टी कव्हर निवडणे सर्वोत्तम आहे.
माझा फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो का?
होय, तुमचा फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स क्लेम काही परिस्थितीत नाकारला जाऊ शकतो जसे की:
- जर ड्रायव्हर ड्रग्सच्या अंमलाखाली गाडी चालवत असेल.
- जर तुमचा ड्रायव्हर हा ड्रायव्हर लायसन्स शिवाय वाहन चालवत असेल तर तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
- जर तुम्ही व्यावसायिक उद्देशांसाठी किंवा रेसिंग आणि स्टंट यासारख्या उद्देशांसाठी तुमचे खासगी वाहन वापरत असाल.
- पॉलिसी कालबाह्य झाल्यानंतर तुम्ही कव्हरचा क्लेम केला असल्यास.
- जर तुम्ही तुमच्या पॉलिसीवर नसलेल्या घटनेसाठी क्लेम करीत असाल.
तुम्ही फर्स्ट पार्टी इन्श्युरन्सचा क्लेम कसा करू शकता?
बाईकसाठी 1st पार्टी इन्श्युरन्स म्हणजे काय याविषयी तुम्हाला चांगले माहिती आहे, काही दुर्घटना घडल्यास 1st पार्टी कव्हरचा क्लेम कसा करावा हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. स्टेप्स येथे आहेत:
- जर तुमची बाईक अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त झाली असेल तर प्रथम त्याविषयी इन्श्युररला सूचित करा आणि एफआयआर देखील दाखल करा.
- एकदा इन्श्युररला सूचित केल्यानंतर, सर्वेक्षक बाईकला झालेल्या नुकसानीची तपासणी करेल.
- इन्स्पेक्शन नंतर; इन्श्युरर बाईकच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करेल. जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुरुस्तीचे काम पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या खिशातून शुल्क भरावे लागेल. ज्याची इन्श्युरर द्वारे निश्चित मर्यादेपर्यंत प्रतिपूर्ती केली जाईल. जर तुम्ही इन्श्युररने निवडलेले दुरुस्ती दुकान निवडले तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. इन्श्युरर त्याची काळजी घेईल.
एफएक्यू
- फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स अनिवार्य आहे का?
नुसार
मोटर वाहन अधिनियम, व्यक्तीकडे त्यांच्या वाहनासाठी किमान थर्ड-पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे. तथापि, फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स मिळवणे आवश्यक नाही. तरीही तुमच्याकडे नवीन बाईक असल्यास, एक मिळवणे सर्वोत्तम आहे.
- माझ्या बाईक साठी इन्श्युरन्स प्रीमियम किती असेल?
जरी एकाधिक घटक प्रीमियम रक्कम निर्धारित करतात, तरीही आम्हाला विशिष्ट श्रेणीवर पोहोचणे आवश्यक असल्यास, ते बाईकच्या इंजिन क्षमतेवर आधारित असेल. थर्ड-पार्टी इन्श्युरन्स प्रीमियम इंजिनच्या सीसी वर आधारित ₹ 450 - ₹ 2400 दरम्यान बदलू शकते.
प्रत्युत्तर द्या