रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Penalty for Driving Without Insurance
जानेवारी 7, 2022

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड

आमच्या देशात रस्त्याची सुरक्षा ही एक महत्त्वपूर्ण समस्या आहे. 2019 मध्ये रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्रालयाने सामायिक केलेल्या अहवालानुसार, अपघाताशी संबंधित मृत्यू 1,51,113 होते. हा आकडा खरोखरच चिंताजनक आहे. भारत सरकार अशा प्रकारच्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. 2019 हे वर्ष महत्त्वपूर्ण आहे कारण त्यात रस्ते सुरक्षेच्या संदर्भात झालेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा दिसून आली. मोटर व्हेईकल्स ॲक्ट 2019 ची अंमलबजावणी. शिस्त आणण्यासाठी आणि नागरिकांना अधिक जबाबदार करण्यासाठी रहदारीचे उल्लंघन केल्याबद्दल दंडात कडक वाढ. मोटर इन्श्युरन्स तुम्हाला, तुमचे वाहन किंवा थर्ड-पार्टीला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी भरपाई देण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते. भारतातील वाहन इन्श्युरन्स महत्त्वाचा आहे. आमच्या देशात होणाऱ्या मोटर वाहनाच्या अपघातांचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते.

मोटर व्हेईकल्स ॲक्ट काय आहे?

मोटर व्हेईकल्स ॲक्ट नुसार, भारतीय रस्त्यांवर चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहन इन्श्युरन्स असणे अनिवार्य आहे. पॉलिसीधारकाकडे न चूकता मूलभूत थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर असणे आवश्यक आहे. प्राणघातक रस्ते अपघात आणि बेदरकारपणे वाहन चालविणे कमी करण्यासाठी, भारत सरकारने 2019 मध्ये मोटर व्हेईकल्स ॲक्ट मध्ये काही सुधारणा केल्या. वाहनाची मालकी असलेल्या कोणीही मोटर इन्श्युरन्स पॉलिसी डॉक्युमेंट सोबत बाळगणे आवश्यक आहे. पॉलिसी डॉक्युमेंटशिवाय व्यक्ती आढळल्यास रु. 2,000 पर्यंत दंड भरावा लागेल.

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे बेकायदेशीर आहे का?

मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1998 नुसार कार इन्श्युरन्स पॉलिसी शिवाय वाहन चालविणे कायद्याच्या विरोधात आहे. भारतात, थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स हा मँडेट असल्याची आम्हाला माहिती आहे. एमव्ही अधिनियम, 2019 मधील सुधारणा नंतर, मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक दंड टाळण्यासाठी त्याविषयी जाणून घेणे विवेकपूर्ण झाले आहे.

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड

2019 चा सुधारित मोटर व्हेईकल्स ॲक्ट म्हणून, पहिल्या अपराधासाठी इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड ₹2,000 आणि त्यानंतरच्या अपराधासाठी ₹4,000 आहे. यामुळे कायद्याच्या विवेकबुद्धीनुसार 3 महिन्यांसाठी कारावासही होऊ शकतो. "इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे" या अपराधासाठी कलम 196 नुसार वरील दंड लागू आहे. भारतीय रस्त्यांवर चालविण्यासाठी वाहन इन्श्युरन्स अनिवार्य आहे. कायद्याचे पालन न करणार्‍या कोणालाही इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड भरावा लागेल आणि त्यानंतर इतर परिणाम भोगावे लागतील.

इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्याचे इतर परिणाम

ड्रायव्हिंग इन्श्युरन्स शिवाय वाहन चालविण्यासाठी इतर परिणाम / दंड विचारात घेणे. तसेच, प्रत्येक देशाकडे भिन्न दंडात्मक रचना आहे. खाली काही सामान्य दंड दिलेले आहेत:
  • इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंडामुळे वाहन परवाना निलंबित होऊ शकतो.
  • अशा प्रकरणांमध्ये वाहन रजिस्ट्रेशन निलंबित केले जाऊ शकते.

सर्व वाहनांसाठी समान दंड लागू आहे का?

तुमच्याकडे टू/फोर-व्हीलर किंवा इतर कोणतेही कमर्शियल वाहन असले तरीही. योग्य इन्श्युरन्स असणे महत्त्वाचे आहे. दंड टाळण्यासाठी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी असल्याची खात्री करा. आज व्हेईकल इन्श्युरन्स खरेदी करणे सोपे आणि त्रासमुक्त आहे. इन्श्युरन्सशिवाय दंड भरणे हे निश्चितच तुम्हाला आवडणारे नाही.

जर पोलिसांनी तुम्हाला इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवत असतांना पकडले तर काय होते?

  • वाहन नियुक्त बूथवर थांबविले जाऊ शकते
  • वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि वाहन परवाना देखील दाखवणे आवश्यक आहे. हे डॉक्युमेंट्स सादर करण्यात अयशस्वी झाल्यास अतिरिक्त दंड जारी होऊ शकतात
  • इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंडामध्‍ये त्वरित चलन जारी करणे समाविष्ट आहे. चलन रक्कम ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे भरू शकता

दंड कसे भरावे?

वर चर्चा केल्याप्रमाणे, चलन रक्कम भरणे सोपे आहे आणि खालील दोन मार्गांनी भरले जाऊ शकते.

ऑनलाईन

  1. राज्य वाहतूक संस्थेच्या वेबसाईटला भेट द्या.
  2. ई-चलन पेमेंट किंवा ट्रॅफिक उल्लंघनासाठी पेमेंट विभागात वाहनाचे सर्व तपशील एन्टर करा.
  3. कॅप्चा कोड एन्टर करा. सोयीस्कर पेमेंट पर्याय निवडा आणि दंड भरून मोकळे व्‍हा.
  4. देयक पुष्टीकरण पावती तुमच्यासोबत शेअर केली जाईल.

ऑफलाईन

  1. नजीकच्या ट्रॅफिक पोलीस स्टेशनला भेट द्या.
  2. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधा जे आपल्याला दंडाची रक्कम सांगेल जी आपल्‍याला भरण्याची आवश्यकता आहे.
  3. दंड काढुन टाकण्‍यासाठी रक्कम भरा.
जो कोणी चलन पेमेंट देण्यास अपयशी ठरतो त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की यामुळे पुढच्या वेळी पकडले जाताना आकारला जाणारा दंड वाढेल.

दंड टाळण्यासाठी टिप्स

तुम्हाला निश्चितच इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड भरायचा नाही. सामान्यपणे दंड टाळण्यासाठी काही सोप्या तरीही उपयुक्त टिप्स येथे दिली आहेत:
  • वाहनाच्या संदर्भात सर्व महत्त्वाची डॉक्युमेंट्स जवळ तयार ठेवा. महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सध्ये प्रदूषण सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इ. समाविष्ट आहे.
  • वाहन इन्श्युरन्स पेपर वेळेवर रिन्यू केल्याची खात्री करा. वाहन रस्त्यावर घेण्यापूर्वी नेहमीच इन्श्युरन्स पेपर्स तपासा. सर्वात महत्त्वाचे, थर्ड-पार्टी लायबिलिटी कव्हर कोणत्याही वेळी चुकवू नये.

थोडक्यात

सावधगिरी बाळगल्याने अपघात दुर्मिळ होऊ शकतात. आणि नाही तर काही वेळा त्याचे खरोखरच गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्व डॉक्युमेंट्स तयार, अद्ययावत आणि सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे. इन्श्युरन्सशिवाय दंड भरणे ही अशी गोष्‍ट नाही ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात. ट्रॅफिक आणि रस्त्यावरील सुरक्षा नियमांचे पालन आमच्या सुरक्षेसाठी केले जाते. गती कदाचित रोमांचक असू शकते परंतु जबाबदार वाहन चालवणे महत्त्वाचे आहे. तसेच, एक वैध कार / टू-व्हीलर इन्श्युरन्स कोणत्याही अनपेक्षित फायनान्शियल सेटबॅकपासून तुम्हाला प्रतिबंधित करण्यासाठी वरदान असू शकते. सुरक्षितपणे आणि जबाबदारीने वाहन चालवा. सर्वोत्तम ड्रायव्हर्सना ज्ञात आहे की त्यांना सावध राहावे लागेल. इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स माहितीपुस्तिका/ पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत