रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
20 simple fitness tips for the COVID-19 lockdown
ऑगस्ट 27, 2020

कोरोनाव्हायरस लॉकडाउन दरम्यान तुम्हाला फिट आणि ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी 20 टिप्स

कोविड-19 लॉकडाऊनमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत झाली असून शरीराच्या हालचालीवरही परिणाम झाला आहे. मर्यादित सामाजिक जीवनामुळे, लोक त्यांच्या घरात बसून मिठाई, आईस्क्रीम, तेलकट स्नॅक्स, इत्यादीसारख्या आरामदायी पदार्थांकडे आकर्षित होतात. आणि त्यामुळे वजन वाढणे ही अनेकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. हे तणावपूर्ण असताना, या लॉकडाऊनने लोकांसाठी त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली आहे. तुमचे लक्ष कुटुंबाकडे वळवण्याची आणि तंदुरुस्त राहण्यापासून ते पुरेशी खरेदी करण्यापर्यंत सर्व आवश्यक गोष्टींबाबत त्यांचे संरक्षण करण्याची हीच योग्य वेळ आहे प्राप्त करण्याची हेल्थ इन्श्युरन्स कव्हर. आकडेवारीनुसार, आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित ॲप्सचा वापर वाढला आहे. सामाजिक फिटनेस केंद्रे पासून म्हणजेच जिम आणि उद्याने बंद आहेत, त्यामुळे लोक पर्यायी मार्गांवर वळले आहेत.

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान फिटनेस का आवश्यक आहे?

या अभूतपूर्व काळात शारीरिक हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याची अनेक कारणे आहेत. कसरत न करता, तुम्ही गमावत असलेले शीर्ष फायदे शोधा!

1. मानसिक आरोग्य:

व्यायाम आणि निरोगी आहाराचा कमी महत्त्वाचा समजला जाणारा मुख्य फायदा म्हणजे मानसिक आरोग्य. घाम गाळणे, तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी प्रभावी सिद्ध झाले आहेत. लॉकडाऊन दरम्यान हे महत्त्वाचे आहे की, लोक अडकून पडल्याच्या आणि निराशेच्या भावनांना सामोरे जात आहेत.

2. महामारी दरम्यान प्रतिबंधात्मक:

फिटनेसची सवय राखणे हा नविन संसर्गाविरोधात उपचार नाही, तथापि, काही संशोधनातून असे दिसून आले आहे की फिटनेसची सवय असणाऱ्यांच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. निरोगी जीवनशैलीचे अनुसरण करण्याच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे, विशेषतः या लॉकडाऊन दरम्यान, शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करणे आहे. बरेच लोक निवडत आहेत हेल्थ इन्श्युरन्स फॉर कोरोना व्हायरस for the same.

3. शारीरिक लाभ:

व्यायामामुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात, कॉर्टिसोलचे नियमन होते, रक्त परिसंचरण सुधारते, शरीराची लवचिकता राखते आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. हे जागतिक सार्वजनिक आरोग्य संकट स्वतःच प्रगत झाले आहे आणि बाहेरील क्षण प्रतिबंधित असल्याने, आळशी दिनचर्येमुळे तुमच्या शारीरिक शक्तीवर परिणाम करू होत आहे.

दररोज किती शारीरिक हालचाली आवश्यक आहे?

तुम्हाला मदत करण्यासाठी, एकाधिक फिटनेस प्रशिक्षक आणि अगदी व्यावसायिक ॲप्सने लॉकडाऊन दरम्यान योग्य व्यायामाची दिनचर्या शेअर करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या सर्वांची फिटनेसची उद्दिष्टे आणि इंटरेस्ट असलेली क्षेत्रे वेगवेगळी असल्याने, तुम्हाला सर्वात योग्य वाटणारा प्रकार तुम्ही ठरवू शकता. कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान अनुसरण करता येण्याजोग्या व्यायामाच्या प्रकारांमध्ये एरोबिक व्यायाम, झुंबा, योग, ब्रिस्क वॉकिंग, कार्डिओ, पिलाटेज आणि ताई ची यांचा समावेश आहे. तुमची निवड करा! तुम्ही दररोज बेसिक 28-मिनिट वर्कआऊट करून सुरुवात करू शकता आणि तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार नंतर वर्कआऊटची वेळ वाढवू शकता.

शरीराची हालचाल करवून घेण्याचे 20 सोपे मार्ग:

1. वर्कआउटसाठी वेळ निश्चित करा:

तुमच्या कॅलेंडरमध्ये नोंद करा आणि तुमची वर्कआउटची दिनचर्या सुरू करण्याचा प्रयत्न करताना वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करा.

2. पाच सेकंदाचा नियम स्वीकारा:

आपण नवीन दिनचर्यामध्ये पाऊल ठेवत असताना, आपले मन बहाणा करून यातून सुटकेचे अनेक पर्याय तयार करत. कोणतीही गोष्टीला तुम्हाला मागे खेचू देऊ नका आणि ठरल्याप्रमाणे उठून वर्कआउट सुरू करण्याचा झटपट निर्णय घ्या. तो तुमच्या मेंदूला रीप्रोग्राम करेल आणि कंडिशन करेल तुमच्या दैनंदिन टाइमलाइनमध्ये नवीन गोष्ट जुळवून घेण्यासाठी.

3. कौटुंबिक सदस्य/मित्रांचा समावेश करा:

तुमचे फिटनेस ध्येय शेअर करणारे व्यक्ती तुमचे उत्कृष्ट पार्टनर बनू शकते. आपण सर्वजण आपल्या प्रियजनांना जवळ ठेवण्याचा एक नवीन पद्धती अनुभवत आहोत, जसे की व्हिडिओ कॉलिंग, अगदी वर्कआउट पार्टनरही त्यासारखे नविन पद्धती सुरू करू शकतात.

4. छोटे ध्येय ठरवा:

वर्कआउट सुरू करतेवेळी खुप लोकांना माहिती नसलेली गोष्ट म्हणजे, एकदम जोरात वर्कआउट सुरू करू नका, हळू हळू पुढे जा! फिटनेससाठी उत्साही लोक एक किंवा दोन दिवसातच स्वत: ची सर्व क्षमता वापरू पाहातात, नंतर मात्र हा ट्रेंड कमी होऊ लागतो.

5. तुमचे कारण जाणून घ्या:

तुमच्या वर्कआउटसाठी 'का' समजून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला वर्कआउट का सुरू करायचे आहे? हे पहिल्यांदा जाणून घेऊयात? ती तुमची भूमिका म्हणून प्रेरक घटक असेल.

6. 3x10 नियमाचा अभ्यास करा:

ज्या लोकांकडे वेळ कमी आहे त्यांच्यासाठी हे योग्य आहे. साधारण वर्कआऊट करण्यासाठी दिवसातून तीन वेळा 10 मिनिटे घ्या.

7. तुमचे आवडते संगीत लावून वातावरण निर्माण करा:

व्यायामासाठी प्रेरणा म्हणून तुम्ही संगीताची मदत घेऊ शकता, हा प्रभावी उपाय आहे. आजकाल ऑडिओबुक ट्रेंड करत असल्याने, तुम्ही अगणित संगीताचा आनंद घेऊ शकता.

8. बघा आणि व्यायाम करा:

आपण आपले विविध दैनंदिन काम करत असताना सतत काहीतरी नित्याने करत असतो. या सर्वांमध्ये व्यायामाचा समावेश का करू नये?

9. एक आव्हान स्वीकारा:

स्पर्धा आणि आव्हाने लोकांना अगदी कठीण काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. चालू असलेले फिटनेस आव्हान स्वीकारा किंवा एखाद्याशी स्पर्धा करा.

10. फिटनेस ॲप वापरा:

या ब्लॉगमध्ये आधी चर्चा केल्याप्रमाणे, लोक फिटनेस ॲॅप्स नेहमीपेक्षा अधिक वापरत आहेत. हे परिपूर्ण व्यायामाची दिनचर्या ऑफर करते , जे सहजपणे फॉलो करता येईल आणि त्याची प्रगती देखील तपासता येते.

11. तुमची प्रगती ट्रॅक करा:

स्वत:ला अपेक्षित असलेले वजन गाठण्याची किंवा हवा असलेला स्टॅमिना मिळवण्याच्या प्रेरणेव्यतिरिक्त कुठलीच प्रेरणा मोठी नाही. तुम्ही ट्रॅक ठेवा, यामुळे या दिनचर्येचे तुम्ही शोधत असलेल्या प्रेरणेचे ऑटोमॅटीकच रूपांतर होईल.

12. तुमचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर ठेवा:

तुमचा फोन तुमचे लक्ष विचलित करू शकतो. तुम्हाला व्यसनाधीन असल्यास, तुम्ही तुमची फिटनेस दिनचर्या सुरू करताच स्वतःला विश्रांती द्या.

13. नित्यक्रमात बदला:

एकाच दिनचर्येचे अनुसरण केल्याने ती दिनचर्या नीरस वाटू लागते. तुम्ही दोन दिनचर्या एकत्र करू शकता आणि तुमचे स्वत:ची एक वेगळी दिनचर्या बनवू शकता!

14. तुमच्या आवडीच्या दिनचर्येचे पालन करा:

फिटनेस व्यायामाच्या प्रकाराची चांगल्या प्रकारे विभागणी केली आहे, यापैकी तुम्हाला सर्वात जास्त आवडत असलेल्या प्रकाराची तुम्ही निवड करू शकता.

15. एका वेळी एक पैलू पूर्ण करूयात:

बिट्समध्ये पातळी वाढवा! साप्ताहिक आधारावर आपल्या दिनचर्येमध्ये नवीन व्यायाम जोडा.

16. तुमच्या वर्कआउटचे कपडे घाला:

फक्त, एकट्यानेच सुरू करायचे म्हणून केवळ रनिंग शूजही एक परिपूर्ण प्रेरणा म्हणून काम करते. तो ॲथलेटिक कपडे, आरामदायी शूज आणि तुमची वर्कआऊट ॲक्सेसरी सुरू करण्यासाठी ठेवा!

17. एंडोर्फिन रश सेल्फी पोस्ट करा:

काहींना विश्वास ठेवणे कठीण जाईल परंतु ते वर्कआउटचा फोटो पोस्ट करण्यात एक वेगळाच आनंद आहे.

18. प्रेरणादायी शब्दांनी स्वत: ला वेढून घ्या:

येथे काही प्रेरणादायी मेसेजेस, तेथे काही जणांना प्रत्येक वेळी पाहण्यासाठी उत्तम प्रकारे ठेवलेले आहेत. हे एक उत्तम रिमाइंडर म्हणून काम करेल.

19. तुम्ही यशस्वी झाल्यानंतर स्वत:ला ट्रीट द्या:

स्वतःवर खूप कठोर होऊ नका आणि तुमची उद्दिष्टे साध्य करताना तुमच्या आवडत्या पदार्थ किंवा भेटवस्तूसह स्वतःला ट्रीट देण्यास कधीही विसरू नका.

20. तुमच्या प्रियजनांसाठी तुमचे कल्याण मौल्यवान आहे हे जाणून घ्या:

चिंताजनक वेळा स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काही अतिरिक्त प्रतिबंधात्मक उपायांची आवश्यकता असते. केवळ तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुमच्याकडे पाहणाऱ्या लोकांसाठी.

निष्कर्ष

या जागतिक पातळीवरील गंभीर काळात स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करणे हे नेहमीपेक्षा अधिक चिंतेचे आहे. एकापेक्षा जास्त प्रतिबंधात्मक उपाय केले जाऊ शकत असले, तरिही प्रसाराचा अंदाज लावता येत नाही. आपत्कालीन परिस्थितीत, तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी सर्वोत्तम आरोग्यसेवा सुविधा प्राप्त करणे हे प्राथमिक लक्ष असेल, तथापि, यामुळे तुमच्या खिशावर भार पडू शकतो. COVID-19 विशिष्ट इन्श्युरन्स प्लॅन्स जसे की कोरोना कवच पॉलिसी  हॉस्पिटलायझेशन दरम्यानचा खर्च आणि अधिक परवडणाऱ्या प्रीमियम किमतींमध्ये कव्हर करेल. संकटाच्या वेळी स्वतःला आर्थिक धक्क्यापासून वाचवण्यासाठी हा पूर्णपणे प्रतिबंधात्मक उपाय आहे. रुग्णसंख्येतील झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता, घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. काळजी घ्या, सर्वात उच्च पातळीवरची सावधगिरीचा बाळगा, सरकारी मार्गदर्शक सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित रहा!

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत