रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
What are the Benefits of Personal Accident Insurance?
मार्च 30, 2021

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे लाभ आणि वैशिष्ट्ये

एक दिवस कुणाल त्याच्या मित्राला भेटण्यासाठी गेला. त्याठिकाणी विविध इन्श्युरन्स पॉलिसींवर त्यांनी चर्चा केली. त्याच्या मित्रांपैकी एक इन्श्युरन्स एजंट होता. एजंट मित्राला खात्री करायची होती की त्याच्या सर्व मित्रांना विविध इन्श्युरन्स पॉलिसीचे फायदे माहित आहेत का? कुणाल देखील सर्व गोष्टींविषयी जाणून घेण्यास इच्छुक होता आणि त्याने एजंट मित्राला पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे फायदे कोणते आहेत याबद्दल विचारणा केली? माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी असल्यामुळे एजंट मित्रही आनंदित झाला. आपण विश्वासही ठेऊ शकत नाही. अशा पद्धतीने आयुष्यात आश्चर्याचे धक्के बसू शकतात. कधीकधी आपल्याला दुर्देवी घटनांना जसे की अपघात यांना सामोरे जावे लागते. एखादा अपघात कधीही होऊ शकतो, ज्यामुळे जखमी व्यक्तीला कोणत्याही पूर्व कल्पनेशिवाय मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते आणि त्याचा तुमच्या आर्थिक बाबींवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स तुमच्या बचावासाठी आहे. ज्यामुळे तुमच्या कमाईच्या क्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही. यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ट्रीटमेंट खर्च जास्त असताना किंवा तुमच्या कोणत्याही अपंगत्वाच्या स्थितीत संरक्षण प्रदान करते. इन्श्युरन्स एजंट अधिक बोलताना म्हणाला 'मूलभूतपणे; ही पॉलिसी तुमच्या सर्व वैद्यकीय खर्चाची परतफेड करण्यास मदत करते आणि अपघातांमुळे व्यक्तीला अपंगत्व किंवा मृत्यू असल्यास भरपाई प्रदान करते.’ पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे अनेक फायदे आहेत. हे तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शारीरिक इजा, अपघातांमुळे मृत्यू, कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व, तात्पुरते संपूर्ण अपंगत्व किंवा कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व यासारख्या स्थितीत आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते. काही प्रकरणांमध्ये इन्श्युरन्स कंपनी अपघातामधील अपंगत्वासाठी जसे की, वाचा, अवयव आणि डोळे गमावणे स्थितीत भरपाई प्रदान करते. ॲक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी बद्दल माहिती ऐकून कुणाल व त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले. या प्रकारचा इन्श्युरन्स खरेदी करण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला त्याच्या एजंट मित्राने दिला. त्यांनी या विशिष्ट कव्हरचे महत्त्व आणि ते कसे काम करते हे समजून सांगितले. त्यानंतर त्यांनी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचे स्पष्टीकरण दिले. जे आमच्या आरोग्याच्या बाबतीत विचारात घेण्याची आवश्यकता असलेले महत्त्वाचे पैलू देखील आहे.

वैयक्तिक अपघात इन्श्युरन्स म्हणजे काय

कुणाला आता हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी विषयी त्याच्या मित्राकडे चौकशी करत आहे. त्यावेळी त्याला सांगण्यात आले होते की आपल्या आयुष्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कंपनीद्वारे रुग्णाला काही आवश्यक लाभ प्रदान केले जातात. पॉलिसीधारकाला रुग्णालयात दाखल करण्याच्या खर्चाशी संबंधित खर्च, डॉक्टरांची कन्सल्टेशन फी आणि गंभीर आजारांच्या बाबतीत औषधांचा खर्च मिळतो. "हेल्थ इन्श्युरन्स कव्हरप्रमाणेच पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स देखील महत्त्वाचा आहे", कुणाल म्हणाला.

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे लाभ

कुणालच्या मित्राने कव्हरच्या महत्वपूर्ण लाभांच्या यादीसह विस्तृत विश्लेषण दिले.

वैद्यकीय चाचणीची गरज नाही

हे या पॉलिसीचे महत्त्वाचे लाभ आहे जिथे तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय चाचणी करावी लागत नाही.

कौटुंबिक सुरक्षा

आपल्या सर्वांना कुटूंब निश्चितच प्रिय असते आणि आपण सर्व आपल्या कुटुंबाच्या आर्थिक संरक्षण बाबत चिंताग्रस्त असतो. त्यामुळे, ही पॉलिसी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भरपाईच्या स्वरूपात सुरक्षा प्रदान करते किंवा अपघातामुळे इजा झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तीला सर्व नुकसान भरपाई प्रदान करते.

मन:शांती

तुम्हाला यामुळे मनःशांती मिळेल. कारण कुटुंबातील सदस्य त्यांचे दायित्व पूर्ण करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूच्या बाबतीत संसाराचा गाडा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंपनीच्या भरपाईचा उपयोग करू शकतात.

किमान डॉक्युमेंटेशन

इन्श्युरन्स कव्हर ही किचकट प्रोसेस असल्याचा अनेकांचा समज चुकीचा आहे. म्हणून, लोक ते खरेदी करणे टाळतात. परंतु सत्य म्हणजे जेव्हा तुम्ही ही पॉलिसी खरेदी करता तेव्हा त्यामध्ये अधिक पेपरवर्क नाही. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये केवळ आवश्यक तपशील आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंटेशन प्रोसेस वर अधिक भर देण्याची आवश्यकता नाही.

रुग्णवाहिकेचा खर्च

अनेक इन्श्युरन्स कंपन्या अपघाताच्या ठिकाणावरुन हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याच्या रुग्णवाहिका खर्चाला देखील कव्हर प्रदान करतात.. तुमच्या अपघाताच्या स्थितीत तुमच्या परिवारातील सदस्यांना देखील याद्वारे कळविले जाते.

जागतिक कव्हरेज

काही इन्श्युरन्स कंपन्या भारताबाहेर घडणाऱ्या अपघाताच्या स्थितीत नुकसान भरपाई प्रदान करीत नाही. परंतु अपघात ठिकाणाचा विचार न करता पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स पॉलिसी कव्हर द्वारे खात्रीशीर लाभ प्रदान केले जातात. यामध्ये कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही आणि आपत्कालीन स्थितीत अत्यंत उपयुक्त आहे.

सुलभ क्लेम प्रोसेस

क्लेम प्रोसेस अत्यंत सोपी आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत पॉलिसीधारकाला इन्श्युरन्स क्लेम करणे शक्य ठरत नाही. त्यासाठी प्रोसेस दीर्घकालीन आहे.. येथे, तुम्ही इन्श्युअर्ड इन्श्युरन्सचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. कंपनी त्याचे व्हेरिफिकेशन करेल आणि क्लेम अदा केला जाईल.. पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी तुमचे प्रीमियम कमी करण्यासाठी को-पे सारखे अधिक लाभ देखील प्रदान करते, संचयी बोनस परिणामी जास्त सम इन्शुअर्ड क्लेम-फ्री कालावधी नंतर अन्य अधिक लाभ प्राप्त करू शकतो.

 एफएक्यू

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे प्रकार कोणते आहेत?

प्रामुख्याने महत्वाचे दोन प्रकार आहेत- वैयक्तिक पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स व ग्रूप पर्सनल पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्स.

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे फायदे कोणते आहेत?

पर्सनल ॲक्सिडेंट इन्श्युरन्सचे एकाधिक लाभ आहेत. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला संकट स्थितीत संरक्षण आणि सिक्युरिटी प्रदान करते. अपघाताच्या बाबतीत हे तुम्हाला आर्थिक नुकसान टाळण्यास मदत देखील करते. जर अपघातामुळे अपंगत्व किंवा मृत्यू अशी दुर्देवी स्थिती निर्माण झाल्यास तुमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो.. परंतु, पर्सनल ॲक्सिडेंट कव्हरच्या माध्यमातून दुर्देवी संकटाच्या स्थितीत निर्माण झालेल्या खर्चाची भरपाई केली जाते.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत