1
Claim Assistance
 • क्लेम असिस्टंट नंबर्स

 • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

 • 24x7 रोडसाईड असिस्टंट 1800-103-5858

 • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

 • एक्स्टेंडेड वारंटी 1800-209-1021

 • एग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

सेल्स :1800-209-0144 सर्विस चॅट :+91 75072 45858

कार विमा पॉलिसीची ऑनलाइन तुलना

कार विम्याची तुलना कशी करायची

तुम्ही कार विमा खरेदी करण्यापूर्वी कार विमा तुलना करणे आवश्यक आहे. एक कार विमा खरेदीदार म्हणून सर्वोत्तम कार विमा कोट शोधणे कठीण होऊ शकते. तथापि, तुम्ही कार विम्याची सखोल तुलना न केल्यास तुमचे आर्थिक नुकसान तर होईलच आणि/ किंवा तुम्हाला पुरेसे विमा कव्हरही मिळणार नाही. कार विम्याची तुलना करत असताना तुम्ही विविध कव्हरेज पर्याय आणि विमा दर पाहणे आवश्यक आहेच पण त्याचबरोबर बारीक प्रिंट आणि अपवाद काळजीपूर्वक पाहणेही गरजेचे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला मुद्द्यानुसार तपशील देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजांनुसार उत्तम कार विमा पॉलिसी तुलना करण्यास मदत मिळेल.

कार विमा तुलना ऑनलाइन स्वरूपात सहजपणे करता येते. कार विमा तुलना ऑनलाइन करणे अत्यंत सोपे आहे कारण तुम्हाला सर्वांत कमी प्रीमियम असलेला विमा मिळू शकतो. मात्र सर्वोत्तम कव्हरेज हवे असल्यास पैशाचे पुरेपूर मूल्य देणारी विमा कंपनी निवडणे महत्त्वाचे आहे.

कार विमा तुलनेच्या पद्धती

तुम्ही कार विमा बोलीसाठी विमा एजंटकडे कधीही संपर्क साधू शकता. पण त्याचवेळी कम्पॅरिझन वेबसाइटवर सर्च करा , कारण कार विमा वेबसाइट्सनी तुमचे काम जास्त सोपे आणि कमी वेळखाऊ केले आहे. या साइट्स तुमचे तपशील घेतात, विमा पुरवठादारांच्या वेबसाइटवर चालवतात आणि दराच्या क्रमानुसार कोट्सची मालिका समोर आणतात. तुम्ही वेबसाइटवरही ऑनलाइन कोट अर्ज पूर्ण करू शकता. तुम्हाला त्यातून कोट्सची एक मोठी यादी मिळेल आणि निवड करता येईल.

 • सर्वांत स्वस्त सर्वोत्तम असेलच असे नाही.

  कार विमा तुलना योग्य पद्धतीने केली जावी. विम्याची तुलना करताना भरण्याच्या प्रीमियमची अंतिम रक्कम सर्वप्रथम तपासावी. परंतु, सर्वांत स्वस्त कार विमा तुम्हाला एखाद्या अपघाताच्या प्रसंगी सर्वांत कमी रकमेचे कव्हरेजही देऊ शकतो. त्याचमुळे तुम्ही सर्वांत स्वस्त पॉलिसीचा विचार न करता तुम्ही अशी पॉलिसी शोधली पाहिजे जी तुम्हाला सहजपणे परवडेल आणि तुम्हाला आवश्यक असलेले कव्हरेजही देऊ शकेल.

 • कव्हरेजच्या पर्यायांची तुलना

  कार विमा तुलना करत असताना कव्हरेज पर्यायांचा विचार करा. कार विमा कारचे आग, वादळ, पूर इत्यादी नैसर्गिक दुर्घटनांपासून संरक्षण करणारा असावा. तो कारचे रक्षण चोरी, दंगल किंवा प्रवासातील नुकसान अशा प्रकारच्या मनुष्यनिर्मित दुर्घटनांपासून रक्षण करतो. कार विमा तृतीय पक्ष उत्तरदायित्वापासूनही रक्षण करतो. याशिवाय, पर्यायी कव्हरेजही उपलब्ध आहेत का ते पाहा जसे, रोडसाइड असिस्टंस, एनसीबी सवलती आणि प्रवासी तसेच चालकांसाठी पीए कव्हर.  पॉलिसी निवडण्यापूर्वी, तुमची आर्थिक धक्का सहनशक्ती, तुमचे बजेट आणि गाडी चालवण्याच्या सवयींचा विचार करा. याद्वारे तुम्ही एक पॉलिसी आणि तुमच्या गरजांनुरूप एड-ऑन कव्हरही निवडू शकाल.

 • प्रीमियम आणि वजावटी यांची तुलना

  कार विमा तुलना म्हणजे प्रीमियम आणि वजा होणाऱ्या रकमांची योग्य तुलनाही होय. कार विमा प्रीमियम खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही वजावट होणाऱ्या रकमांबाबतही निर्णय घेणे गरजेचे आहे. कार विमा वजावट रक्कम म्हणजे तुमचा विमा कव्हर लागू होण्यापूर्वी दुरूस्तीसाठी करावा लागणारा खर्च होय. समजा तुम्हाला अपघातानंतर दुरूस्तीसाठी २०,००० रूपये खर्च करावे लागणार असतील आणि तुम्ही वजावटीची रक्कम ५००० रूपये निवडलेली असल्यास, विम्यातून दुरूस्तीसाठी १५००० रूपये खर्च केले जातील. वजावटीची रक्कम वाढवल्यास तुमचा प्रीमियम कमी होतो. 

  तुम्ही कव्हरेज आणि वजावट समान केल्यावर कार विमा खरेदी करत असताना काही सवलती आहेत का ते पाहा. उदाहरणार्थ, चांगल्या ड्रायव्हरसाठी नो क्लेम बोनस आणि विमा प्रीमियममध्ये घट.

 • कंपन्यांची तुलना

  तुम्ही विश्वासार्ह कंपन्यांमध्ये तुलना करता तेव्हा कार विमा तुलना यशस्वी होते. किमान किमतीत संपूर्ण कव्हरेज देणारी पॉलिसीही तुम्हाला मिळू शकते. हे खरे वाटत नाही ना? धोकादायक, अविश्वासू कंपन्यांपासून सावध राहा. चांगला क्लेम सेटलमेंट रेशो असलेल्या उत्तम, प्रतिष्ठित विमा कंपनीची निवड करा. तसेच कंपनीच्या ग्राहक सेवांचा अभ्यास करा आणि कंपनीचे ग्राहक अभिप्राय तपासा.

परंतु मी कार विम्याची तुलना का करावी?

आमची कार विमा पॉलिसी खालील महत्त्वाचे फायदे देतेः

 • शून्य क्लेम कालावधी

  कोणत्याही विमा पुरवठादाराकडून तुमचा ५०% पर्यंतचा विद्यमान नो क्लेम बोनस हस्तांतरित.

 • कॅशलेस क्लेम सुविधा

  १५०० पेक्षा अधिक प्राधान्याच्या गॅरेजेसमध्ये कॅशलेस क्लेम्स. कॅशलेस सुविधा उपलब्ध नसताना ७५% रक्कम खात्यात मिळेल.

 • २४X७ स्पॉट असिस्टंस

  आमचे वचन तुमची आणि तुमच्या कारची काळजी घेते आणि कार्यालय सुरू आणि बंद होण्याचे तास बांधील नाहीत. रस्त्यावर असताना मदतीची गरज असलेल्या कार विमा पॉलिसी धारकांसाठी पूर्ण भारतभरात कव्हरचे पर्याय देतो. तुम्हाला आमच्याकडून हवी असलेली प्रत्येक मदत- पंक्चर झालेले टायर बदलणे, कार बॅटरीला धक्का देऊन सुरू करणे, ऑन-रोड टोइंगची मदत किंवा अपघाताच्या प्रसंगी कायदेशीर सल्ला- तुम्ही कधीही फोन करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. 

 • मोटर ऑन- दि- स्पॉट

  काही क्लिक्सद्वारे गोष्टी शक्य होत असतील तर स्वतः जाऊन वेळ का वाया घालवायचा? मोटर ऑन- दि- स्पॉटमुळे तुम्हाला अपघाताप्रसंगी तुमच्या वाहनाची स्वतः तपासणी करणे शक्य होते. कोणत्याही अडथळ्याविना क्लेम ऑन- दि- स्पॉट सेटल करा.

 • 4000 पेक्षा अधिक नेटवर्क गॅरेजेस

  तुमची सोय आमचे प्राधान्य आहे, त्याचमुळे आम्ही 4000 पेक्षा अधिक गॅरेजेससोबत करार केला आहे. देशभरातील तुमच्या कोणत्याही प्राधान्याच्या नेटवर्क गॅरेजमध्ये कॅशलेस क्लेम सेटलमेंट आणि उच्च दर्जाच्या सेवा मिळवा. कॅशलेस गॅरेज सर्व्हिसमुळे तुम्हाला कोणत्याही अडथळ्याविना त्वरित सेवा मिळेल. 

तुम्हाला तुमच्या कार विमा पॉलिसीबाबत खालील गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

कार विमा खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे

 • समावेश
 • अपवाद

नैसर्गिक दुर्घटनांपासून तुमची कार आणि दुचाकीला होणारे नुकसान किंवा नादुरूस्ती

आग, स्फोट, स्वतःहून पेट घेणे किंवा वीज पडणे...

Read more

आग, स्फोट, स्वतःहून पेट घेणे किंवा वीज पडणे, भूकंप, पूर, टायफून, हरिकेन, वादळ, तूफान, जलप्रलय, चक्रीवादळ, गारपीट, बर्फ पडणे, दरड कोसळणे आणि रॉकस्लाइड.

मनुष्यनिर्मित दुर्घटनांपासून तुमचे कार आणि दुचाकीचे होणारे नुकसान किंवा बिघाड

दरोडा, चोरी, दंगल, बंद, समाजविघातक कृत्य...

Read more

दरोडा, चोरी, दंगल,बंद, समाजविघातक कृत्य, बाह्य घटकांपासून अपघात, दहशतवादी हल्ला, रस्त्याने प्रवास करताना झालेले कोणतेही नुकसान, रेल्वे, अंतर्गत जलमार्ग, लिफ्ट, एलिव्हेटर किंवा हवाईमार्ग.

वैयक्तिक अपघात कव्हर

रूपये १ लाखांपर्यंत कव्हर वैयक्तिक मालक/ चालकाला...

Read more

वैयक्तिक मालक/ चालकाला दुचाकी चालवत असताना किंवा प्रवास करत असताना किंवा दुचाकीवर बसताना किंवा उतरताना. सहप्रवाशांसाठी पर्यायी वैयक्तिक अपघात कव्हर उपलब्ध. 

तृतीय पक्ष कायदेशीर उत्तरदायित्व

अपघाती नुकसानामुळे कायदेशीर उत्तरदायित्वाविरोधात संरक्षण...

Read more

अपघाती नुकसानामुळे एखाद्या व्यक्तीला कायमस्वरूपी इजा किंवा मृत्यूप्रकरणी आणि आसपासच्या मालमत्तेच्या झालेल्या नुकसानासाठी कायदेशीर उत्तरदायित्वाबाबत संरक्षण.

1 of 1

1 of 1

ग्राहकांचे अनुभव

अजय तळेकर

अजय तळेकर मुंबई

काही क्लिक्सवर संपूर्ण माहिती उपलब्ध असल्यामुळे हे चांगले पोर्टल आहे.

निलेश कुंटे

निलेश कुंटे

वेबसाइट समजण्यास अत्यंत सोपी असून ती छान आहे. वेबसाइट मोटर वाहन विमा खरेदी करताना कोणतेही अडथळे न आणता योग्य पद्धतीने काम करते आणि व्यवहाराची प्रक्रिया पूर्ण करते.

भूषण कवठकर

भूषण कवठकर

मला बजाज अलियांझकडून एक उत्तम डील आणि मार्गदर्शन मिळाले आहे आणि मी कार विमा ऑनलाइन खरेदी केला आहे. धन्यवाद.

Disclaimer

I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.

Please enter valid quote reference ID

 • Select
  Please select
 • Please write your comment

Getting In Touch With Us Is Easy

 • Customer Login

  Go
 • Partner Login

  Go
 • Employee Login

  Go