एक अपघात 60 सेकंदांपेक्षा कमी वेळात आपल्या आयुष्यात अपरिवर्तनीय असा बदल घडवू शकतो.
हे आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते; कोठेही आणि कधीही आणि त्यासाठी आपण तयार असणे आवश्यक आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे, हे आपल्याला माहित नसते परंतु आपण त्याचा सामना करण्यासाठी सदैव तयार राहू शकतो.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स येथे आम्ही हे जाणतो आणि आमची पर्सनल गार्ड इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला कोणत्याही आकस्मिक अपघाताच्या परिणामांविरुद्ध कव्हर पुरविण्यासाठी तयार केली गेली आहे. वैद्यकीय बिले भरून, मुलांच्या शिक्षणासाठी लाभ पुरवून आणि अन्य अनेक प्रकारे हि पॉलिसी अपघातानंतर आपले आयुष्य पुन्हा सामान्य करण्यासाठी आपली मदत करते.
आमच्या पर्सनल गार्ड पॉलिसीद्वारे आपली आर्थिक सुरक्षा योग्य हातात आहे, जी आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला कोणत्याही दुर्घटनेमुळे झालेल्या शारीरिक इजा, अपंगत्व किंवा मृत्यूपासून संरक्षण देते.
या पॉलिसी अंतर्गत उपलब्ध असलेले विविध प्रकारचे कव्हर्स जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा.
सम इन्शुअर्ड / वय |
बेसिक |
वाईडर |
कॉम्प्रिहेन्सिव्ह |
मृत्यू |
|||
कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व |
|||
कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व |
|||
तात्पुरते पूर्ण अपंगत्व |
|||
मुलांचे शिक्षण बोनस |
|||
सम इन्शुअर्ड |
|||
वैद्यकीय खर्च + रुग्णालयात भर्तीसाठीचा खर्च |
अशी पॉलिसी जी खाली दिलेल्या वैशिष्ट्यांसह आपल्याला अपघातांपासून संरक्षण प्रदान करते:
विस्तृत कव्हर
हि पॉलिसी इन्शुअर करते:
लाभांच्या प्रमाणाचे वर्णन |
% 'सम इन्शुअर्ड' म्हणून लाभ |
खांद्यांच्या सांध्यापासून एक हात |
70 |
कोपराच्या सांध्यापासून वरच्या भागचा एक हात |
65 |
कोपराच्या सांध्यापासून खालच्या भागचा एक हात |
60 |
मनगटापासूनचा एक हात |
55 |
एक अंगठा |
20 |
एक तर्जनी |
10 |
हाताचे इतर कोणतेही बोट |
5 |
मध्य मांडीच्या वरचा एक पाय |
70 |
मध्य मांडी पर्यंतचा एक पाय |
60 |
गुडघाच्या खालील एक पाय |
50 |
मध्य-पोटरीपर्यंतचा एक पाय |
45 |
घोट्यापासूनचे एक पाऊल |
40 |
पायाचा एक अंगठा |
5 |
पायाचे इतर कोणतेही बोट |
2 |
एक डोळा |
50 |
एका कानाने ऐकू न येणे |
30 |
दोन्ही कानाने ऐकू न येणे |
75 |
गंध संवेदना |
10 |
चव संवेदना |
5 |
मुलांना शिक्षण लाभ
मृत्यू किंवा कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व असल्यास, अपघाताच्या तारखेला 19 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या प्रत्येक आश्रित मुलाच्या, 2 मुलांपर्यंत, शिक्षणावरील खर्चासाठी रुपये 5,000 एकवेळ देय असेल.
रुग्णालयात दाखल झाल्याचा भत्ता
जर मृत्यू, कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व किंवा तात्पुरते अपंगत्व या अंतर्गत क्लेम स्वीकारला गेला असेल तर आम्ही आपल्याला रूग्णालयात दाखल करण्यासाठी पॉलिसीच्या कालावधीत जास्तीत जास्त 30 दिवस, दररोज रु. 1000/- देऊ.
अपघाती इजेमुळे होणारे वैद्यकीय खर्च कव्हर करते
जर मृत्यू, कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व किंवा तात्पुरते पूर्ण अपंगत्व या अंतर्गत क्लेम स्वीकारला गेला असेल तर आम्ही अपघाती इजेमुळे झालेल्या वैद्यकीय खर्चापोटी वैध दाव्याच्या रकमेच्या 40% किंवा वास्तविक वैद्यकीय बिलांच्या रकमेची परतफेड करू, जे कमी असेल ते.
कोणतीही अपघाती शारीरिक इजा / मृत्यू झाल्यामुळे केलेल्या क्लेमसाठी कृपया खाली नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण कराः
मृत्यू
पीटीडी (कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्व), पीपीडी (कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व) आणि टीटीडी (तात्पुरते पूर्ण अपंगत्व)
मुलांचे शिक्षण बोनस
रुग्णालयात दाखल झाल्याचा भत्ता / वैद्यकीय खर्चाची भरपाई
वैयक्तिक अपघात पॉलिसी एखाद्या अपघाताच्या परिणामी मृत्यू / इजा / अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य पुरविते. अनपेक्षित वैद्यकीय खर्च हा आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का ठरू शकतो. एखाद्या अकल्पित घटनेपश्चातही एक व्यापक वैयक्तिक अपघात इन्शुरन्स आपणास आर्थिक सुरक्षा प्रदान करतो.
जर अपघातामुळे आपल्या शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत झाली आणि त्याबद्दल आपल्याला क्लेम करावयाचा असेल, तर आपण किंवा आपल्या जवळील व्यक्ती जी आपल्या वतीने दावा करीत आहे, त्याने आम्हाला ताबडतोब किंवा 14 दिवसांच्या आत लेखी कळवावे.
एखाद्या अपघातामुळे मृत्यू झाल्यास, त्वरित आम्हाला लेखी कळविले पाहिजे आणि पोस्टमार्टम अहवालाची एक प्रत 14 दिवसांच्या आत आम्हाला पाठविली पाहिजे.
बजाज अलियांझ जनरल इन्शुरन्स क्लेम सेटलमेंटच्या त्वरित प्रक्रियेवर विश्वास ठेवते. सर्व आवश्यकता पूर्ण केल्यास, क्लेम प्रस्तुत केल्या तारखेपासून सात कामकाजी दिवसांच्या आत क्लेमवर प्रक्रिया केली जाते.
नाही, वैयक्तिक संरक्षण पॉलिसीत केवळ अपघात किंवा अपघाती इजेमुळे होणार्या मृत्यूचाच समावेश होतो.
पर्सनल गार्ड पॉलिसीची निवड करण्याची पात्रता खालीलप्रमाणे आहेः
प्रपोजर आणि जोडीदारासाठी प्रवेशाचे वय 18 ते 65 वर्षांदरम्यान आहे.
अवलंबून मुलांचे प्रवेश वय 5 ते 21 वर्षांदरम्यान आहे.
आपल्या वेबसाइटवरील ऑनलाइन आरोग्य विमा पॉलिसीचे नूतनीकरण उत्कृष्ट, वापरकर्ता-अनुकूल (युजर फ्रेंडली) आणि सोयीस्कर आहे.
बजाज अलायन्झच्या कर्मचाऱ्याने खूप चांगल्याप्रकारे सपोर्ट केले आहे आणि त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला आवडेल. कुडोस.
बजाज अलायन्झच्या कर्मचाऱ्याने खूप चांगल्याप्रकारे पॉलिसीचे फायदे सांगितले. त्यांचे संवाद कौशल्ये खूप चांगली आहेत आणि त्यांनी खूप चांगली माहिती दिली.
वैयक्तिक अपघाताशी संबंधित सर्व परिस्थिती कव्हर करण्यासाठी तयार केलेले अनुरूप प्लॅन.
वैयक्तिक अपघाताशी संबंधित सर्व परिस्थिती कव्हर करण्यासाठी टेलर मेड प्लॅन
कौटुंबिक सवलत
आपल्या कुटुंबाचा इन्शुरन्स उतरवा आणि 10% सवलत मिळवा.
विनासायास क्लेम सेटलमेंट
आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम अखंड आणि जलद क्लेम सेटलमेंट प्रदान करते. Read more
विनासायास क्लेम सेटलमेंट
आमची इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम अखंड आणि जलद क्लेम सेटलमेंट प्रदान करते. आम्ही भारतभरातील 6,500+ हून अधिक नेटवर्क रुग्णालयात कॅशलेस सुविधा देखील देऊ करतो.रुग्णालयात दाखल व्हायचे असल्यास किंवा उपचार घ्यायचे असल्यास हे उपयोगी ठरते, ज्यात आम्ही नेटवर्कमधील रुग्णालयांची बिले थेट भरतो. त्यामुळे आपण आपले लक्ष बरे होण्यावर आणि पुन्हा एकदा आपल्या पायावर उभे राहण्यावर केंद्रित करू शकता.
लवचिक प्रीमियम गणना
आपल्या व्यवसायानुसार ठरविलेल्या विभिन्न जोखीम पातळीच्या बाबतीत प्रीमियम भिन्न असते आणखी वाचा Read more
लवचिक प्रीमियम गणना
आपल्या व्यवसायानुसार ठरविलेल्या विभिन्न जोखीम पातळीच्या बाबतीत प्रीमियम भिन्न असते
जोखीम स्तर I: प्रशासकीय / व्यवस्थापकीय कार्य करणारे, लेखापाल, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, शिक्षक.
जोखीम स्तर II: मॅन्युअल लेबर, गॅरेज मेकॅनिक, मशीन ऑपरेटर, पेड ड्रायव्हर (कार / ट्रक / अवजड वाहने), रोख वाहून नेणारा कर्मचारी, बिल्डर, कंत्राटदार, पशुवैद्यकीय डॉक्टर.
जोखीम स्तर III: भूगर्भातील खाणींचे कामगार, हाई टेन्शन विद्युत पुरवठा उपकरणे चालवणारे कामगार, जॉकी, सर्कस परफॉर्मर्स, मोठ्या श्वापदांची शिकार करणारे शिकारी, गिर्यारोहक, व्यावसायिक रिव्हर राफ्टर्स आणि तत्सम व्यवसाय
टीप: वर निर्दिष्ट न केलेल्या व्यवसायांसाठी कृपया आमच्याकडे चौकशी करा.
वार्षिक प्रीमियम दर
आपल्या आवश्यकतेनुसार आपण प्रीमियम पर्यायांच्या श्रेणीमधून निवड करू शकता:
प्रिमीयम दर खाली दिले आहेत (%) - रुपये प्रति 1,000/- |
|||
कव्हर |
जोखीम सत्र |
||
|
I |
II |
III |
बेसिक |
0.45 |
0.6 |
0.9 |
वाईडर |
1.0 |
1.25 |
1.75 |
कॉम्प्रिहेन्सिव्ह |
1.5 |
2.0 |
लागू नाही |
वैद्यकीय खर्च |
प्रिमीयम पेक्षा 25% अधिक |
प्रिमीयम पेक्षा 25% अधिक |
प्रिमीयम पेक्षा 25% अधिक |
रुग्णालयातील रहवास |
Rs 300 प्रति व्यक्ती |
Rs 300 प्रति व्यक्ती |
Rs 300 प्रति व्यक्ती |
संचयी बोनस
प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी 10% एकत्रित बोनसचा लाभ घ्या, जास्तीत जास्त 50% पर्यंत. जर क्लेम नोंदविला गेला तर 10% ने कमी होईल.
कमी प्रीमियमवर अधिकतम कव्हरेज.
वैयक्तिक अपघात कव्हर
एखाद्या अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यासाठी कव्हर प्रदान करते
मुलांना शिक्षण लाभ
अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, जास्तीत जास्त 2 अवलंबून मुलांसाठी ‘अपत्य शिक्षण लाभ’ घेण्यास पात्र आहेत.
रुग्णालयात दाखल झाल्याचा भत्ता
अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रत्येक दिवसासाठी रोख लाभ लागू राहील.
अपघातामुळे होणारा वैद्यकीय खर्च.
मृत्यू किंवा अपंगत्वासाठी क्लेम स्वीकारला गेल्यास, वैद्यकीय खर्चाच्या किंमतीची भरपाई, वैध क्लेम रकमेच्या 40% किंवा वास्तविक वैद्यकीय बिले, ह्यामधील जे कमी असेल त्यानुसार केली जाईल.
आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न किंवा आत्म-दुखापत किंवा आजारपणामुळे झालेली अपघाती शारीरिक इजा.
दारू किंवा ड्रग्सच्या अमलाखाली झालेली अपघाती इजा / मृत्यू.
कोणत्याही गुन्हेगारी हेतूने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे झालेली अपघाती इजा / मृत्यू.
विमान उड्डाण किंवा बलून उड्डाण संदर्भात, त्यात प्रवेश करताना, त्यातून बाहेर पडताना झालेली अपघाती इजा / मृत्यू...
Read moreविमान उड्डाण किंवा बलून उड्डाण संदर्भात, त्यात प्रवेश करताना, त्यातून बाहेर पडताना किंवा बलूनमधून वा लायसन्स प्राप्त स्टॅंडर्ड अशा विमानातून अप्रवासी म्हणून जगभरात कोठेही प्रवास करताना (भाडे भरून वा खेरीज) झालेली अपघाती इजा / मृत्यू.
मोटर रेसिंग किंवा चाचणी चालू असताना चालक, सह-चालक किंवा मोटार वाहनाचा प्रवासी म्हणून भाग घेतल्यामुळे झालेली अपघाती इजा / मृत्यू.
आपण आपल्या शरीरावर केलेले वा करत असलेले कोणते रोगनिवारक उपचार किंवा हस्तक्षेप.
कोणत्याही नौदल, सैन्य किंवा हवाई दलाच्या ऑपरेशनमध्ये भाग घेतला असता, मग तो सैन्य सरावाच्या स्वरूपात असो, युद्ध खेळ असो अथवा परदेशी किंवा देशांतर्गत शत्रूशी प्रत्यक्ष लढाई असो
आपले कोणत्याही प्रकारचे नुकसान किंवा आपली वास्तविक किंवा आरोपित कायदेशीर जबाबदारी.
लैंगिक रोग किंवा लैंगिक संबंधातून पसरणारे रोग.
एचआयव्ही आणि / किंवा एचआयव्ही संबंधित आजारपण ज्यामध्ये कोणत्याही प्रकारे झालेला एड्स आणि / किंवा त्याचे उत्परिवर्तित डेरिव्हेटिव्ह्ज किंवा त्यातील बदल.
गर्भधारणा, परिणामी बाळंतपण, अकाली गर्भपात, गर्भपात किंवा यामुळे उद्भवणारी कोणत्याही प्रकारची गुंतागुंत.
युद्ध (घोषित असो वा नसो), गृहयुद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूंची कृत्य यामुळे आवश्यक ठरणारे वैद्यकीय उपचार
Read moreयुद्ध (घोषित असो वा नसो), गृहयुद्ध, आक्रमण, परदेशी शत्रूंची कृत्य, बंडखोरी, क्रांती, उठाव, विद्रोह, लष्करी अंमल वा बालकावलेली सत्ता, जप्ती, पकडणे, अटक करणे, प्रतिरोध किंवा नजरकैद, जप्ती किंवा राष्ट्रीयकरण यामुळे आवश्यक ठरणारे वैद्यकीय उपचार किंवा कोणत्याही शासकीय किंवा सार्वजनिक अथवा स्थानिक प्राधिकरणाच्या आदेशाद्वारे वा आदेशामुळे झालेले नुकसान.
अणुऊर्जा, किरणोत्सर्गामुळे आवश्यक असलेले उपचार.
Set Renewal Reminder
Thank you for your interest. We will send you a reminder when your policy is due for renewal.
सतीशचंद कटोच
पॉलिसी घेताना आम्ही पुनरावलोकन करू शकतो अशा सर्व पर्यायांसह वेबद्वारे विनासायास.
आशिष मुखर्जी
प्रत्येकासाठी सोपे, कोणतीही त्रास, गोंधळ नाही. छान काम शुभेच्छा.
जयकुमार राव
खूप युजर फ्रेंडली मला 10 मिनिटांपेक्षा कमी वेळात पॉलिसी मिळाली.
Thank You for Your Interest in Bajaj Allianz Insurance Policy, A Customer Support Excecutive will call you back shortly to assist you through the Process.
Request Call Back
Disclaimer
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
I hereby authorize Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. to call me on the contact number made available by me on the website with a specific request to call back at a convenient time. I further declare that, irrespective of my contact number being registered on National Customer Preference Register (NCPR) under either Fully or Partially Blocked category, any call made or SMS sent in response to my request shall not be construed as an Unsolicited Commercial Communication even though the content of the call may be for the purposes of explaining various insurance products and services or solicitation and procurement of insurance business. Furthermore, I understand that these calls will be recorded & monitored for quality & training purposes, and may be made available to me if required.
Please enter valid quote reference ID