ENG

Claim Assistance
Get In Touch
Understand the Types Of Health Insurance Frauds In India
जुलै 21, 2020

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉडचे प्रकार

भारतातील हेल्थ इन्श्युरन्स विषयी जागरुकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत दिवसागणिक भर पडत आहे. हे खूपच स्वागतार्ह चित्र आहे. परंतु हेल्थ इन्श्युरन्स इंडस्ट्री समोरील सर्वात महत्वाची समस्या म्हणजे हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉडच्या संख्येत होणारी मोठ्या प्रमाणातील वाढ होय.

हे निश्चितपणे समजू शकतो की अनेकवेळा फ्रॉड हे हेतूपूर्वक घडत नाहीत. परंतु त्यामुळे पॉलिसीधारक तसेच इन्श्युरन्स कंपन्यांवर परिणाम होतो. आम्हाला आशा आहे की, तुम्हाला सविस्तर वाचन करण्याद्वारे मेडिकल इन्श्युरन्स प्लॅन्स मध्ये फ्रॉड कशाला समजले जाते याविषयीची सविस्तर माहिती मिळेल आणि ते टाळण्याचे मार्ग देखील समजतील.

हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉडचे प्रकार

 • क्लेम फ्रॉड: हा भारतात सर्वसाधारण आढळून येणारा हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड आहे. पॉलिसीधारकाला अयोग्य आर्थिक लाभ मिळवण्यास कारणीभूत असलेला कोणताही बेकायदेशीर क्लेम हा इन्श्युरन्स क्लेम फ्रॉड मानला जातो. खालील स्थिती या भारतात हेल्थ इन्श्युरन्स क्लेम फ्रॉड मानल्या जातात:
  • फ्रॉड/ड्युप्लिकेट मेडिकल बिल सादर करणे
  • आरोग्य सेवेसाठी झालेल्या खर्चाची वस्तुस्थिती पेक्षा भिन्न माहिती
  • चुकीचा अपघाती इजा क्लेम
  • न घेतलेल्या उपचारांसाठी क्लेम दाखल करणे
  • बनावट मेडिकल डॉक्युमेंट्स (नाव, तारीख इ. बदलल्यास)
 • ॲप्लिकेशन फ्रॉड: एखाद्या व्यक्तीला हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची इच्छा असलेल्या इन्श्युरन्स कंपनीचा प्रपोजल फॉर्म भरावा लागतो. या प्रपोजल फॉर्ममध्ये पॉलिसीअंतर्गत कव्हर्ड करण्यात आलेल्या व्यक्तींचा वैयक्तिक तपशील, अन्य हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीबद्दल कोणतीही पूर्व-विद्यमान वैद्यकीय स्थिती आणि माहिती विषयीचा तपशील (जर असल्यास) याची विनंती केली जाऊ शकते.
  आता हा प्रपोजल फॉर्म भरताना तुम्ही कोणत्याही पूर्व-विद्यमान आजाराचा तपशील चुकवू शकता किंवा चुकीच्या पद्धतीने जन्मतारीख एन्टर करू शकता. ही त्रुटी सुरुवातीला छोटीशी वाटू शकते. परंतु तिला ॲप्लिकेशन फ्रॉड मानले जाईल. पॉलिसीअंतर्गत कव्हर केलेल्या सदस्यांविषयी पूर्व-विद्यमान आजार उघड न करणे किंवा अचूक तपशील प्रदान न करणे यांचा अंतर्भाव ॲप्लिकेशन फ्रॉड म्हणून गणला जातो.
 • एलिजिबिलिटी फ्रॉड: अनेकवेळा लोक हेल्थ इन्श्युरन्स क्लेम दाखल करताना निर्दिष्ट आजार हे पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड आहेत किंवा नाही हे जाणून घेतल्या शिवाय किंवा पॉलिसी अंतर्गत कव्हर्ड नसलेल्या व्यक्तीसाठी क्लेम सबमिट करतात. अशी सर्व प्रकरणे एलिजिबिलिटी फ्रॉड अंतर्गत येतात.

पॉलिसीधारकांनी केलेला फ्रॉड कदाचित हे हेतूपूर्वक नसू शकतो. परंतु त्यामुळे निश्चितच अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. ज्यामध्ये क्लेम नाकारणे किंवा भविष्यातील कव्हरेज नाकारणे यांसारख्या स्थितीचा समावेश असू शकतो.

हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड करण्याचे परिणाम

हेल्थ इन्श्युरन्स कंपन्या जाणूनबुजून किंवा अनावधानाने फ्रॉड करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलतात.. भारतात हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड करणाऱ्यांना खालील परिणामांना सामोरे जावे लागेल:

 • जर फ्रॉड खूपच गंभीर असेल तर तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी रद्द होऊ शकते.
 • जर तुम्ही फ्रॉड मध्ये स्थितीत दोषी आढळल्यास तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
 • तुम्हाला स्वत: ला संपूर्ण वैद्यकीय उपचारांचा खर्च अदा करावा लागेल.
 • तुम्ही नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळविण्याची संधी गमावू शकता.
 • तुमची विद्यमान पॉलिसी रिन्यू करताना तुम्हाला समस्या देखील येऊ शकते.

अनेकदा लोकांचा असा विश्वास असतो की इन्श्युरन्स कंपन्या क्लेमची पूर्ण रक्कम कधीही देत नाहीत आणि त्यामुळे अधिकचा क्लेम दाखल करतात. ज्यामुळे अनेकवेळा फ्रॉड घडून येतो.. तसेच, अनेक लोक आहेत ज्यांना त्यांच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या वैशिष्ट्ये आणि कव्हरेजबद्दल माहिती नसते आणि त्यामुळे त्याची परिणिती फ्रॉड करण्यामध्ये होते किंवा घेतलेल्या उपचारांसाठी त्यांना खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे भरावे लागतात.

तुम्ही तुमचे पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचणे आणि इन्श्युरन्स क्लेम संबंधित तुमच्या शंकांचे स्पष्टीकरण पॉलिसी कालावधी सुरू होण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक आहे. भारतातील हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये 15 दिवसांचा फ्री लूक कालावधीचा समावेश असतो. तुम्ही या15 दिवसांमध्ये हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची उपयुक्तता व समर्पकता तपासू शकता आणि पॉलिसी पुढे सुरू ठेवावी किंवा नाही याचा निर्णयही घेऊ शकता.

आजच्या अनिश्चित जगात आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे संकटाच्या काळात फायनान्शियल सिक्युरिटी असणे सर्वोत्तम ठरते.. वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे भारतातील हेल्थ इन्श्युरन्सच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ दिसून येत आहे. तथापि, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीची यशस्वीता आणि स्थायी वापराचा मार्ग अजूनही खडतर आहे.

आम्हाला आशा आहे की या लेखामुळे विविध प्रकारच्या हेल्थ इन्श्युरन्स फ्रॉड विषयी तुम्हाला माहिती मिळेल आणि तुम्ही अहेतूपूर्वक कधीही फ्रॉड करण्याच्या स्थितीला सामोरे जाणार नाहीत.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 2.7 / 5 वोट गणना: 9

आतापर्यंत कोणतेही व्होट नाही! ही पोस्ट रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत