रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
List of Diseases Not Covered Under Health Insurance
मार्च 30, 2021

हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर्ड नसलेल्या आजारांची यादी

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये आकस्मिक वैद्यकीय आपत्कालीन खर्च कव्हर केले जातात. परंतु काही मर्यादाही आहेत. पॉलिसीमध्ये काही आजारांना कव्हर केले जाते तर काही आजारांसाठी कव्हर मिळत नाही. म्हणूनच, जेव्हा सामान्य लोकांना अटी व शर्ती माहित नसतात. तेव्हा हेल्थ इन्श्युरन्स त्यांच्यासाठी अधिक किचकट ठरतो. श्रेया ही पंचवीस वर्षीय युवती आहे. मित्रांसोबत तिला पार्टी करायला आवडते आणि तिच्या जीवनशैलीमध्ये मद्यपान आणि धुम्रपान यांचा समावेश असतो. अशाच एका पार्टीनंतरच्या रात्री श्रेयाची शुद्ध हरपली आणि तिला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तिच्या अहवालातून अत्यंत मद्यपान करण्यामुळे शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीत अडचणी येत आहे ज्यामुळे तिचे प्लेटलेट्स, व्हाईट आणि लाल रक्त कक्षांमध्ये बदल होत असल्याचे समोर आले. हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर करण्यासाठी श्रेया तिच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा विचार करत आहे. मात्र, ज्यावेळी तिच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कंपनीने तिचा क्लेम नाकारला. त्यावेळी ती निराश झाली. कारण ड्रग्स, अल्कोहोल आणि धुम्रपान यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या तिच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर होत नाही. अशाप्रकारे श्रेयाला भरपाई मिळाली नव्हती आणि तिच्या खिशातून खर्च भरावा लागला. भविष्यात असे गैरसमज टाळण्यासाठी, पॉलिसीधारकाने कोणत्या आजारांना हेल्थ इन्श्युरन्स मध्ये कव्हर्ड केले जात नाही याबद्दल अधिक माहिती घेणे आवश्यक आहे हेल्थ इन्श्युरन्स कव्हरेज व हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर्ड नसलेल्या आजारांची यादी जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

हेल्थ इन्श्युरन्समध्ये कव्हर न केलेल्या आजारांची यादी

The IRDAI (Insurance Development Authority of India) has standardized some omissions in a health insurance policy to ensure rigid adherence to rules.

जन्मजात आजार/आनुवंशिक विकार

जन्मजात आजार किंवा आनुवंशिक विकार म्हणजे जन्मजात व्यक्तीच्या शरीरात असलेली स्थिती. हे बाह्य जन्मजात म्हणजे जसे की अतिरिक्त त्वचा निर्मिती इ. आणि अंतर्गत जन्मजात म्हणजे जसे की जन्मापासून कमकुवत हृदय याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.. हेल्थ इन्श्युरन्स कंपनी यापैकी कोणतेही आजार कव्हर करत नाही.

सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया

बोटॉक्स, फेसलिफ्ट, ब्रेस्ट किंवा लिप ऑगमेंटेशन, रायनोप्लास्टी इ. सारख्या कॉस्मेटिक शस्त्रक्रिया हे एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य आणि शरीर वैशिष्ट्य खुलविण्याचे मार्ग आहेत आणि जीवनाची गुणवत्ता राखण्यासाठी किंवा शरीर कार्य सुनिश्चित करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अनिवार्य असतेच असे नाही.. त्यामुळे हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमधून वगळण्यात आले आहे.

औषधे, मद्यपान आणि धुम्रपान यामुळे आरोग्य समस्या

ड्रग्सचे व्यसन किंवा धुम्रपान करणारे व्यक्ती किंवा नियमित मद्यपान करणाऱ्यांना अन्य व्यक्तींच्या तुलनेत जीवनशैलीच्या विकारांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते हे नाकारता येत नाही.. स्ट्रोक, माऊथ कॅन्सर, लिव्हर इजा, ब्राँकायटिस इ. सारखे काही गंभीर आजार ड्रग्स, धुम्रपान किंवा मद्यपानाच्या उच्च सेवनाचे परिणाम आहेत. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीने अशा परिस्थितीत सर्व क्लेम वगळले आहेत.

आयव्हीएफ आणि वंध्यत्व उपचार

आयव्हीएफ आणि अन्य वंध्यत्वावरील ट्रीटमेंट या पूर्वनियोजित असतात आणि त्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते.. त्यामुळे, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी केवळ अनपेक्षित परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला कव्हर करतात. त्यामुळे कोणत्याही वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटच्या संबंधित खर्च पॉलिसीमध्ये कव्हर केले जात नाहीत.

स्वैच्छिक गर्भपात

भारतात गर्भपात सेवा कायद्याने प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत; त्यामुळे स्वैच्छिक गर्भपात खर्च हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीद्वारे कव्हर्ड केले जात नाहीत.

पूर्व-विद्यमान आजार

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अशाप्रकारच्या आजार यांच्या शस्त्रक्रिया किंवा निदान यांना कव्हर करीत नाही. ज्यांची लक्षणे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी 30 दिवसांपूर्वी दिसतात किंवा आधीच अस्तित्वात असतात. त्यांच्यासाठी लागू असेल प्रतीक्षा कालावधी.

स्वतः केलेली इजा

हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी स्वत:चा प्रयत्नातून किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे झालेल्या कोणत्याही दुखापतीला कव्हर करत नाही.. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वत:च्या प्रयत्नामुळे किंवा आत्महत्येमुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीला कव्हर केले जात नाही.

कायमस्वरूपी वगळून

युद्ध, दंगे, आण्विक हल्ला, बंद यामुळे झालेल्या जखमांसाठी रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये समाविष्ट होत नाही आणि कायमस्वरुपी अपवाद मानला जातो.

एफएक्यू

सामान्यपणे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्समध्ये अन्य कोणते इतर उपचार समाविष्ट केले जातात?

होमिओपॅथी, आयुर्वेद, ॲक्युप्रेशर इ. सारख्या पर्यायी उपचारांना केवळ आयुष ट्रीटमेंट ऑफरिंग करणाऱ्या प्लॅन्स अंतर्गत कव्हर्ड केले जाते.

अंतिम विचार

समावेशक/अपवाद सेक्शन मधील नियम विविध हेल्थ पॉलिसी इन्श्युरन्स प्रोव्हायडरच्या सापेक्ष भिन्न असू शकतात.. तरीही, हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर न केलेल्या प्रत्येक इन्श्युरर कडील यादीकडे समान पद्धतीने काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला कलम आणि अटी व शर्तींची पूर्णपणे माहिती असल्याची खात्री करा, जेणेकरून तुम्ही त्याचा सर्वोत्तम वापर करू शकता.   *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत