हेल्थ इन्श्युरन्स ही एक सर्व्हिस आहे जी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या फायनान्सची देखरेख करते. जेव्हा तुम्ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकता, तेव्हा तुमची मनस्थिती खूपच त्रासदायक असते. यावेळी, मेडिकल बिलांची सर्व व्यवस्था पार पाडणारे कोणी असल्यास खूपच आधार मिळतो. तथापि, इन्श्युरन्स पॉलिसी आहे म्हणजे काम झाले असे नाही, यासोबत महत्त्वाचे असणार आहे, काय काय कव्हर करते तुमची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या कव्हरेज विषयी.
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीने सामान्यपणे खालील वैशिष्ट्ये आणि लाभ प्रदान करणे आवश्यक आहे:
- हॉस्पिटलायझेशन खर्च
- प्री-पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च
- डेकेअर प्रक्रिया शुल्क
- रुग्णवाहिकेचा खर्च
- प्रत्येक क्लेम-फ्री रिन्यूवल वर्षात संचयी बोनस
- आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांसाठी किमान प्रतीक्षा कालावधी
- स्पर्धात्मक प्रीमियम रेट्स
मार्केटमध्ये अनेक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स उपलब्ध आहेत. हे सर्व प्लॅन्स भिन्न कव्हरेज आणि विविध हेल्थ इन्श्युरन्स लाभ, प्रदान करतात, जे भिन्न वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांसाठी योग्य ठरतात.
वैयक्तिक हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन जर तुम्ही एकल असाल आणि फक्त तुम्हाला कव्हर करणारी पॉलिसी शोधत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वात योग्य आहे. तसेच, ही पॉलिसी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना समाविष्ट करण्यासाठी कव्हर वाढविण्याचा पर्याय देखील देते. या प्लॅनद्वारे ऑफर केलेले कव्हरेज पुढीलप्रमाणे:
- प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च
- सर्व डे केअर ट्रीटमेंट्स साठी खर्च
- मोफत आरोग्य तपासणी
- रुग्णवाहिकेचा खर्च
- अवयव दाताच्या खर्चासाठी कव्हरेज
- बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर
- आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हर
- मॅटर्निटी आणि नवजात बाळाच्या खर्चासाठी कव्हरेज
या प्लॅनचे लाभ खालीलप्रमाणे:
- संपूर्ण भारतात 6000+ पेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा
- एसआय (सम इन्श्युअर्ड) श्रेणी ₹1.5 लाखांपासून ₹50 लाखांपर्यंत
- 1, 2 आणि 3 वर्षांचे पॉलिसी मुदत पर्याय
- आजीवन रिन्यूवल पर्याय
- इन्श्युरन्स वॉलेट ॲपद्वारे क्विक क्लेम सेटलमेंट - हेल्थ सीडीसी (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) लाभ
- 3 वर्षांसाठी 8% पर्यंत दीर्घकालीन पॉलिसीसाठी सवलत
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स सेव्हिंग
कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन - हेल्थ गार्ड
हेल्थ गार्ड हा एक फॅमिली हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे जो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एकाच पॉलिसी अंतर्गत कव्हर करण्यासाठी कस्टम-मेड आहे. तुम्ही स्वत:ला, तुमचे पती / पत्नी, पालक आणि मुलांना कव्हर करण्यासाठी हा प्लॅन खरेदी करू शकता.
या प्लॅनद्वारे ऑफर केलेले कव्हरेज पुढीलप्रमाणे:
- प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन खर्च
- सर्व डे केअर ट्रीटमेंट्स साठी खर्च
- अवयव दाता खर्च
- बॅरिएट्रिक सर्जरी कव्हर
- आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक हॉस्पिटलायझेशन खर्चासाठी कव्हरेज
- किरकोळ वैद्यकीय खर्च
- मॅटर्निटी आणि नवजात बाळाच्या खर्चासाठी कव्हरेज
या प्लॅनचे लाभ खालीलप्रमाणे:
- तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना कव्हर करण्यासाठी एकच पॉलिसी
- प्रत्येक कुटुंबातील सदस्यासाठी एकाधिक प्रीमियम पेमेंटपासून स्वातंत्र्य
- एसआय (सम इन्श्युअर्ड) श्रेणी ₹1.5 लाखांपासून ₹50 लाखांपर्यंत
- 1, 2 आणि 3 वर्षांचे पॉलिसी मुदत पर्याय
- संपूर्ण भारतात 6000+ पेक्षा जास्त नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा
- आजीवन रिन्यूवल पर्याय
- इन्श्युरन्स वॉलेट ॲपद्वारे क्विक क्लेम सेटलमेंट - हेल्थ सीडीसी (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) लाभ
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80D अंतर्गत टॅक्स सेव्हिंग
- प्रति वर्ष ₹7500 पर्यंत कॉन्व्हलेसेन्स लाभ
क्रिटिकल इलनेस इन्श्युरन्स पॉलिसी
या इन्श्युरन्स पॉलिसीची रचना कर्करोग, स्ट्रोक, मूत्रपिंड निकामी होणे इत्यादींसारख्या गंभीर आजारांमध्ये तुम्हाला कव्हर करण्यासाठी केली गेली आहे. या पॉलिसीचे प्रवेशाचे वय 6 वर्षांपासून ते 59 वर्षांपर्यंत आहे.
या प्लॅन अंतर्गत कव्हरेज आणि लाभ पुढीलप्रमाणे आहेत:
- 10 गंभीर आजार कव्हर होतात:
- स्ट्रोक
- किडनी फेल्युअर
- कॅन्सर
- शरीराच्या कोणत्याही भागाचा कायमचा पक्षाघात
- कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी
- पहिला हार्ट अटॅक (मायोकार्डियल इन्फार्क्शन)
- एओर्टा ग्राफ्ट सर्जरी
- प्रायमरी पल्मनरी आर्टरियल हायपरटेंशन
- मुख्य अवयवांचे प्रत्यारोपण
- मल्टीपल स्क्लेरोसिस सातत्यपूर्ण लक्षणांसह
- इन्श्युअर्डला एकरकमी रक्कम दिली जाते
- प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमध्ये दात्याच्या खर्चासाठी कव्हरेज
- भारत आणि परदेशात कव्हरेज प्रदान केले जाते
- एसआय (सम इन्श्युअर्ड) पर्याय ₹1 लाख पासून सुरू
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80 D अंतर्गत टॅक्स सेव्हिंग
- स्पर्धात्मक प्रीमियम रेट्स
सिल्व्हर हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन
हा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेला आहे आणि तो तुम्हाला आणि तुमच्या पती/पत्नीला कव्हर करतो. या प्लॅनचे प्रवेशाचे वय 46 ते 70 वर्षे आहे.
या प्लॅनद्वारे ऑफर केलेले कव्हरेज पुढीलप्रमाणे:
- बहुतांश डे केअर प्रक्रियांसाठी कव्हरेज प्रदान केले जाते
- पॉलिसीच्या दुसऱ्या वर्षापासून आधीच अस्तित्वात असलेले आजार कव्हर केले जातात
- हॉस्पिटलायझेशन पूर्व आणि नंतरच्या खर्चांसाठी कव्हरेज
- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेच्या खर्चाला कव्हर करते
- किरकोळ वैद्यकीय खर्च
या प्लॅनचे लाभ खालीलप्रमाणे:
- 6000+ नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस क्लेम सेटलमेंट
- क्लेम रकमेचे क्विक पेआऊट
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80 D अंतर्गत इन्कम टॅक्स लाभ
- को-पेमेंट माफी उपलब्ध आहे
- व्यक्तींसाठी कस्टम-मेड प्लॅन्स उपलब्ध
एक्स्ट्रा केअर प्लस पॉलिसी
हा बजाज आलियान्झ द्वारे ऑफर केलेला टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनद्वारे ऑफर केलेली एसआय (सम इन्श्युअर्ड) संपवता तेव्हा फायदेशीर ठरते.
हा प्लॅन स्टँड-अलोन पॉलिसी तसेच इतर कोणत्याही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनवर टॉप-अप म्हणून निवडला जाऊ शकतो.
या प्लॅनद्वारे ऑफर केलेले कव्हरेज पुढीलप्रमाणे:
- पॉलिसी मिळविल्यानंतर 12 महिन्यांनंतर आधीच अस्तित्वात असलेले आजार कव्हर केले जातात
- मॅटर्निटी खर्चासाठी कव्हरेज
- अवयव दाता खर्च
- मोफत हेल्थ चेकअप
- सर्व डे केअर उपचारांच्या खर्चासाठी कव्हरेज
- प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर
- रुग्णवाहिकेचा खर्च
या प्लॅनचे लाभ खालीलप्रमाणे:
- 15 दिवसांचा फ्री लुक कालावधी
- आजीवन रिन्यूवल पर्याय
- इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 80 D अंतर्गत इन्कम टॅक्स लाभ
- 6000 + नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस क्लेम सेटलमेंट
- इन्श्युरन्स वॉलेट ॲपद्वारे क्विक क्लेम सेटलमेंट - हेल्थ सीडीसी (क्लेम बाय डायरेक्ट क्लिक) लाभ
आजच्या जगात हेल्थ इन्श्युरन्स असणे आवश्यक आहे, जिथे आरोग्य सेवेचा खर्च दररोज वाढत आहे. एक योग्य हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन तुम्हाला वैद्यकीय उपचार घेताना तुम्हाला आवश्यक असलेली आर्थिक स्थिरता प्रदान करू शकतो. तथापि, काय कव्हर केले आहे आणि काय वगळले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी पाहा हेल्थ इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर्ड नसलेल्या आजारांची यादी .
तुमच्या इन्श्युरन्सच्या गरजांसाठी सर्वोत्तम असलेला प्लॅन निवडणे हा अंतिम सल्ला असेल. आम्ही तुम्हाला पॉलिसीमधील समावेश आणि अपवाद स्पष्ट समजण्यासाठी पॉलिसी नियमावली काळजीपूर्वक वाचण्याची शिफारस करतो.
प्रत्युत्तर द्या