Loader
Loader

रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 Whatsapp Logo सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

Claim Assistance
  • क्लेम असिस्टंट नंबर्स

  • हेल्थ टोल फ्री नंबर 1800-103-2529

  • 24x7 रोडसाईड असिस्टन्स 1800-103-5858

  • मोटर क्लेम रजिस्ट्रेशन 1800-209-5858

  • मोटर ऑन द स्पॉट 1800-266-6416

  • ग्लोबल ट्रॅव्हल हेल्पलाईन +91-124-6174720

  • एक्स्टेंडेड वॉरंटी 1800-209-1021

  • ॲग्री क्लेम्स 1800-209-5959

Get In Touch

आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन: एक्स्ट्रा केअर पॉलिसी

अधिक संरक्षणासाठी टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स

Extra care top up health insurance policy

आरोग्य विम्यातून पुरेसे कव्हर मिळण्यासाठी एक सोपा व परवडणारा उपाय

तुमचे लाभ अनलॉक करा

प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

इन-हाऊस क्लेम संदर्भात विनासायास क्लेम सेटलमेंट

रुग्णवाहिका कव्हर

बजाज आलियान्झ एक्स्ट्रा केअर पॉलिसी का निवडावी?

वैद्यकीय उपचाराच्या वाढत्या खर्चामुळे, आजारपण अथवा अपघातातून उद्‍भवणाऱ्या सर्व खर्चांसाठी तुमची सध्या चालू असलेली हेल्थ इन्श्युरन्स योजना पुरेशी न पडण्याची शक्यता आहे.. जसा वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत जाईल, तुम्हाला दिसून येईल की तुमचा प्राथमिक हेल्थ इन्श्युरन्स तुमच्या गरजांसाठी अपुरा पडत आहे. तुमच्या आरोग्य हेल्थ इन्श्युरन्स कव्हरची सर्व रक्कम एकाच गुंतागुंतीच्या आजारामध्ये संपण्याची शक्यता आहे. म्हणून, वैद्यकीय आपत्तीमध्ये उपयोगी पडेल असा टॉप-अप प्लॅन घेणे योग्य ठरते व त्यातून अधिक देखभाल व संरक्षण मिळते.

आमचे एक्स्ट्रा केअर टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स हॉस्पिटलायझेशन आणि वैद्यकीय उपचारांमुळे झालेल्या खर्चाची पॉलिसी काळजी घेते. ही पॉलिसी तुमचे हेल्थ इन्श्युरन्स कव्हर वाढवते आणि तुमची मूलभूत मेडिकल इन्श्युरन्स पॉलिसी संपल्यावरही तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवते.

एक्स्ट्रा केअर पॉलिसीमधून आम्ही पुष्कळ सुविधा पुरवितो

महत्त्वाची वैशिष्ट्ये

आमची एक्स्ट्रा केअर पॉलिसी ही पुढील वैशिष्ट्यांसह अधिक संरक्षण पुरविते:

  • टॉप-अप कव्हर

    तुमच्या नियमित हेल्थ इन्श्युरन्स कव्हर वाढविणारा हा अतिरिक्त प्लॅन आहे.

  • फ्लोटर पर्याय

    एकच प्रिमियम भरा व तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी विम्याचे संरक्षण.फॅमिली फ्लोटर ऑप्शन मध्ये तुम्ही स्वत:, जोडीदार, जास्तीत जास्त 3 मुले व पालक यांना कव्हर करु शकता.

  • मोठ्या वयोगटाचा समावेश

    या पॉलिसीमध्ये 3 महिने ते 70 वर्षापर्यंतच्या व्यक्तींना कव्हर मिळू शकते.

  • वैद्यकीय चाचणीची गरज नाही

    या पॉलिसीखाली, सुयोग्य प्रस्ताव अर्ज असल्यास, 55 वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना पूर्व-वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नाही.

  • रुग्णवाहिका कव्हर

    या पॉलिसीमध्ये आणीबाणीच्या प्रसंगात अ‍ॅंब्युलन्सच्या रु 3,000 पर्यंतच्या खर्चाचे कव्हर.

  • प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन कव्हर

    या पॉलिसीमध्ये हॉस्पिटल पूर्व 30 दिवसांपर्यंतच्या खर्चाचे व हॉस्पिटल पश्चात 60 दिवसांपर्यंतच्या खर्चाचे कव्हर.

बजाज आलियान्झ टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन संबंधी अधिक माहिती घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

Video

सुलभ, त्रासमुक्त आणि त्वरित क्लेम सेटलमेंट

कॅशलेस क्लेम प्रोसेस (केवळ नेटवर्क हॉस्पिटलमधील उपचारांसाठीच उपलब्ध):

नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा संपूर्ण वर्षभर सेवेतील कोणत्याही अडथळ्यांशिवाय 24x7 उपलब्ध आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी हॉस्पिटलची यादी तपासणे गरजेचे आहे. कॅशलेस सेटलमेंट देणारी हॉस्पिटल्स कोणत्याही सूचनेशिवाय त्यांची पॉलिसी बदलू शकतात.. अद्ययावत लिस्ट आमच्या वेबसाइटवर आणि कॉलसेंटरमध्ये उपलब्ध आहे.. कॅशलेस सुविधा मिळवत असताना बजाज आलियान्झ हेल्थ कार्ड आणि सरकारी आयडी प्रूफ सक्तीचे आहे.

जेव्हा आपल्याला कॅशलेस क्लेम सुविधेचा पर्याय निवडायचा असेल, तेव्हा खालील पायऱ्यांनुसार कार्यवाही करावी:

  • उपचार करणाऱ्या डॉक्टरांची/रुग्णालयाची स्वाक्षरी आणि तुमची स्वाक्षरी असलेला प्री-ऑथोरायझेशन विनंती अर्ज रुग्णालयाच्या इन्श्युरन्स डेस्कवरून भरून घ्या.
  • Tनेटवर्क हॉस्पिटल विनंती हॅटला फॅक्स करेल.
  • हॅट डॉक्टर्स प्री-ऑथोरायझेशन रिक्वेस्ट फॉर्म तपासतील आणि पॉलिसीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार कॅशलेस उपलब्धतेचा निर्णय घेतील.
  • ऑथोरायझेशन लेटर / नकाराचे पत्र / अतिरिक्त आवश्यकतेचे पत्र, प्लॅन आणि बेनिफिट प्रमाणे 3 तासांत जारी केले जाते.
  • डिस्चार्जच्या वेळी हॉस्पिटल अंतिम बिल आणि डिस्चार्ज तपशील हॅटला कळवतील आणि त्यांच्या तपासणीवर आधारित राहून अंतिम सेटलमेंट केली जाईल.

महत्त्वाचे मुद्दे

  • नियोजित हॉस्पिटलायझेशनच्या प्रकरणी तुमचा प्रवेश आगाऊ प्रवेशासाठीच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या प्रोसिजरनुसार नोंदवून/ आरक्षित करून ठेवा.
  • खाटेच्या उपलब्धतेनुसार प्रवेश दिला जाईल.
  • कॅशलेस सुविधा ही आपल्या पॉलिसीच्या नियम व अटींच्या अधीन असेल.
  • या पॉलिसीमध्ये पुढील गोष्टींचा समावेश नाही:: टेलिफोनचा खर्च नातेवाईकांसाठीचा जेवणखाण्याचा खर्च प्रसाधने या गोष्टींचा खर्च तुम्हाला करावा लागेल व घरी परतायच्या आधी हॉस्पिटलमधे त्याची रक्कम भरावी लागेल.
  • खोलीचे भाडे व नर्सिंगचा खर्च समाविष्ट आहे. जर आपण अधिक किमतीची खोली निवडली असेल, तर अतिरिक्त खर्च आपल्याला करावा लागेल.
  • पॉलिसी मधील अटी व शर्तींनुसार उपचार दिले गेले नाहीत तर तुमचा कॅशलेस अथवा रिइंबर्समेईटचा क्लेम फेटाळण्यात येईल.
  • अपूर्ण वैद्यकीय माहितीच्या केसमध्ये, कॅशलेस क्लेमसाठी प्री-ऑथोरायझेशन नाकारले जाऊ शकते.
  • कॅशलेस सुविधेला नकार म्हणजे उपचारांना नकार असा होत नाही. त्यामुळे तुम्हाला आवश्यक वैद्यकीय लक्ष आणि हॉस्पिटलायझेशन मिळवण्यापासून प्रतिबंध होत नाही.

हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या/ नंतरच्या रिएम्बर्समेंट परतावा:

पॉलिसी अनुसार रुग्णालयात भर्तीपूर्वी अथवा डिस्चार्जनंतर करण्यात आलेल्या संबंधित वैद्यकीय खर्चाची परतफेड केली जाईल. यासाठी सही केलेल्या क्लेम फॉर्मसहित प्रिस्क्रिप्शन तसेच बिल अथवा पावती बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सकडे सुपूर्त करणे अनिवार्य आहे.

रिएम्बर्समेंट क्लेम प्रोसेस

  • हॉस्पिटलायझेशन संदर्भात बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्सच्या HAT ला माहिती द्यावी. तुमचा क्लेम ऑनलाईन रजिस्टर करण्यासाठी येथे क्लिक करा आपला क्लेम ऑफलाइन नोंदविण्यासाठी, आमच्या टोल-फ्री क्रमांकावर आम्हाला कॉल करा: 1800-209-5858.
  • डिस्चार्ज मिळाल्यानंतर, तुम्हाला 30 दिवसांच्या आत HAT कडे खालील डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे: मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी नमूद असलेला रीतसर भरलेला व साईन केलेला क्लेम फॉर्म. मूळ हॉस्पिटल बिल आणि पेमेंट पावती. तपासणी रिपोर्ट डिस्चार्ज कार्ड प्रीस्क्रिप्शन्स औषधे व सर्जिकल वस्तूंचे बिल प्री-हॉस्पिटलायझेशन खर्चाचे तपशील (जर असल्यास) इन-पेशंट डिपार्टमेंट पेपर्स, जर आवश्यकता असल्यास.
  • सर्व कागदपत्रे पुढील प्रक्रियेसाठी हॅटला पाठवण्यात यावी आणि तपासणीवर आधारित राहून अंतिम सेटलमेंट 10 कार्यालयीन दिवसांत केली जाईल.
  • हॉस्पिटलायझेशननंतरचे क्लेम्स डिस्चार्जच्या तारखेपासून 90 दिवसांत पाठवले गेले पाहिजे.

रिएम्बर्समेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधीच नंबर टाकलेली हॉस्पिटलची ओरिजिनल पेमेंट रिसीट सही आणि शिक्क्यासह.
  • ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन आणि औषधाची बिले.
  • ओरिजिनल कन्सल्टेशन पेपर्स (असल्यास).
  • हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलबाहेर केलेल्या तपासण्यांसाठी ओरिजिनल तपासणी आणि निदान अहवाल, तपासणीसाठीच्या ओरिजिनल बिल आणि पावतीसह.
  • तुम्हाला कॅशलेस क्लेम मिळाला आहे परंतु तुम्ही त्याचा वापर केला नसेल तर त्याची माहिती देणारे हॉस्पिटलचे पत्र.
  • घटनेचे तपशील स्पष्ट करणारे उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे पत्र (अपघाताच्या प्रसंगी).
  • लेटरहेडवर हॉस्पिटल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि हॉस्पिटलमधील साधनसुविधांची माहिती.
  • आयएफएससी कोड आणि विमेदाराचे नाव असलेला कॅन्सल केलेला धनादेश.
  • हॉस्पिटलकडून प्रवेशाच्या तारखेपासून डिस्चार्जच्या तारखेपर्यंत इनडोअर केस पेपर प्रत हॉस्पिटलने सत्यांकित केलेली. त्यात पूर्ण वैद्यकीय इतिहास आणि तापमान, पल्स आणि श्वसनाचे तक्ते यांचा समावेश असेल.
  • एक्स-रे फिल्म (फ्रॅक्चर झाल्यास).
  • डॉक्टरांचा उपचार घेण्यापासून प्रसूतिपूर्व इतिहास (प्रसूति प्रकरणांमध्ये).
  • एफआयआर अहवाल (अपघाताच्या संदर्भात असेल तर).
  • काही विशेष बाबींमध्ये अधिक कागदपत्रांची गरज :मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेमध्ये, लेन्सवरील किंमतीचे स्टिकर व त्याच्या बिलाची प्रत. शस्त्रक्रियेमध्ये, इंम्प्लांटवरील किंमतीचे स्टिकर व त्याच्या बिलाची प्रत. . हृदयरोगांच्या उपचारांमध्ये, स्टेन्टवरील किंमतीचे स्टिकर व त्याच्या बिलाची प्रत

सर्व मूळ क्लेम डॉक्युमेंट्स खालील ॲड्रेसवर सबमिट करणे आवश्यक आहे:

हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन टीम

बजाज आलियान्झ हाऊस, एअरपोर्ट रोड, येरवडा, पुणे - 411006

लखोट्यावर तुमचा पोलिसी नंबर, हेल्थकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर स्पष्टपणे नमूद करा.

टीप: पुढील संदर्भासाठी आपणाकडे सर्व कागदपत्रांची प्रत आणि कुरिअरचा संदर्भ क्रमांक बाळगा.

हेल्थ इन्श्युरन्स सोपा करूया

टॉप-अप हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन म्हणजे काय?

टॉप-अप इन्श्युरन्स ही पॉलिसी ज्यांच्याकडे हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन किंवा मेडिक्लेम पॉलिसी आधीपासूनच आहे, अश्या व्यक्तींना अधिक कव्हर देते. पण जरी तुम्ही कुठलीही हेल्थ इन्श्युरन्स योजना घेतली नसेल तरीही तुम्ही हा प्लॅन एक स्वतंत्र कव्हर म्हणून सुद्धा विकत घेऊ शकता.

एक्स्ट्रा कव्हर पॉलिसीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत?

एक्स्ट्रा कव्हर पॉलिसीसाठीचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे आहेत:

विकत घेताना प्रस्तावकाचे वय 18 वर्ष ते 70 वर्षांच्या मधे असावे. पूर्ण हयातीसाठी पॉलिसी रिन्यू करता येते.

जर दोन्ही पालकांनी आमच्याकडून विमा घेतला असेल तर त्यांच्या 3 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सुद्धा कव्हरेज घेऊ शकतात.

जर दोन्ही पालकांनी आमच्याकडून विमा घेतला असेल तर त्यांच्या 6 वर्ष ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलना सुद्धा कव्हरेज मिळू शकते.

18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंतची मुले स्वत: प्रस्तावक म्हणून अथवा अवलंबीत म्हणून कव्हर करु शकता.

माझ्याकडे जरी आधीची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नसली तरीही मी ही पॉलिसी घेऊ शकतो का?

हो, तुमच्याकडे आधीची हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी नसली तरीही तुम्ही एक्स्ट्रा केअर पॉलिसी घेऊ शकता. परंतु, प्रत्येक वेळी हॉस्पिटलमधे उपचार घेताना, डिडक्टिबल मर्यादेपर्यंतचा खर्च तुम्हाला उचलावा लागतो.

या पॉलिसीमुळे कर वाचवण्यात कशी मदत होते?

कलम 80 D नुसार, बजाज आलियान्झ एक्स्ट्रा केअर पॉलिसीच्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रिमियमच्या रकमेवर तुम्ही कर वाचवू शकता. तुम्ही कसा कर वाचवू शकता हे पाहू:

तुम्ही स्वतःसाठी, तुमचा जोडीदार, मुले आणि पालकांसाठी भरलेल्या प्रीमियमवर तुम्हाला तुमच्या करांसाठीच्या वजावटीच्या स्वरूपात वार्षिक पातळीवर 25,000 रूपये मिळू शकतात. (तुम्ही 60 वर्षे वयावरील नसल्यास.) तुमचे ज्येष्ठ नागरिक असलेल्या पालकांसाठी (वय वर्षे 60 किंवा जास्त) तुम्ही प्रीमियम भरल्यास करांसाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स बेनिफिट 50,000 रूपयांपर्यंत आहे.एक टॅक्सपेयर म्हणून तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असल्यास आणि तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असल्यास कलम 80D अंतर्गत तुम्हाला कमाल टॅक्स फायदा 75,000, रूपये मिळू शकतो.तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि तुमच्या पालकांसाठी मेडिकल इन्श्युरन्स प्रीमियम भरत असल्यास कलम 80D अंतर्गत तुमचा कमाल टॅक्स फायदा 1 लाख रूपये आहे.

वजावट म्हणजे काय?

डिडक्टिबल म्हणजे तुमच्या पॉलिसीमधे लिहिली असलेली अशी रक्कम ज्या रकमेएवढा खर्च तुम्हाला, प्रत्येक वेळेस जेव्हा हॉस्पिटलच्या खर्चाचा क्लेम करता, तेव्हा स्वतः करावा लागतो.. या पॉलिसीअंतर्गत प्रत्येक क्लेममध्ये आमची भरपाईची जबाबदारी ही फक्त डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त खर्च झालेल्या रकमेएवढीच असते. प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचा क्लेम हा स्वतंत्र क्लेम समजला जातो (अपवाद फक्त जेव्हा आजार 45 दिवसांच्या आत पुन्हा बळावतो, तेव्हा तो एकच क्लेम मानला जातो).

डिडक्टिबलचा तक्ता

इन्श्युरन्सची रक्कम (रुपयांमध्ये)

डिडक्टिबल रक्कम (रु मध्ये)

10 लाख

3 लाख

12 लाख

4 लाख

15 लाख

5 लाख

जर क्लेमची रक्कम ही डिडक्टिबल रकमेपेक्षा जास्त असेल, तर डिडक्टिबल रकमेपेक्षा अधिकच्या रकमेची पण तुमच्या इंनश्युअर केलेल्या रकमेपर्यंतचीच भरपाई तुम्हाला मिळते.

आमच्या सेवांद्वारे स्मितहास्य पसरविणे

आशिष झुंझुनवाला

माझ्या क्लेमच्या पुर्ततेबाबत जो 2 दिवसांच्या आत मंजूर झाला, मला झालेला आनंद आणि समाधान...

सुनिता एम आहूजा

लॉकडाउनच्या काळात इन्श्युरन्स कॉपी वेगाने वितरीत केली गेली. बजाज आलियान्झच्या टीमला सलाम

रेनी जॉर्ज

बजाज आलियान्झ वडोदरा टीमचे, विशेषतः श्री हार्दिक मकवाना आणि श्री आशिष यांचे आभार...

एक्स्ट्रा केअर पॉलिसीचे संरक्षण घ्या व वैद्यकीय खर्चाबाबत पुन्हा कधीही काळजी करु नका.

individual-one-roof

55 वर्षांपर्यंतची वैद्यकीय चाचणी माफ करा.

एवढेच नाही, तर एक्स्ट्रा केअर पॉलिसीचे अजूनही काही लाभ पुढीलप्रमाणे आहेत

तुमच्या सध्याच्या हेल्थ इन्श्युरन्स योजनेच्या व्यतिरिक्त आम्ही पुढील लाभांसहित व्यापक कव्हर देतो:

कमी प्रीमियम

या पॉलिसीत परवडतील असे प्रिमियमचे दर रु 2,500 पासून सुरु होतात.

रिन्यूअ‍ॅबिलिटी

तुमची एक्स्ट्रा केअर पॉलिसीचे तुम्ही तुमच्या पूर्ण हयातीसाठी रिन्यू करु शकता.

Consumable expenses

विनासायास क्लेम सेटलमेंट

आमच्याकडे एक इन-हाऊस क्लेम सेटलमेंट टीम आहे जी वेगवान, सुलभ आणि सोपी क्लेम सेटलमेंटची हमी देते.

आमच्या स्वत:च्या क्लेम सेटलमेंट विभागातील कर्मचारी ही काळजी घेतात की क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया ही जलद, सहजतेने व सोप्या पद्धतीने होईल. तसेच, आम्ही भारतातील 6,500 हून अधिक हॉस्पिटल्समधून कॅशलेस क्लेम सेटलमेंटाची सुविधा देतो.. याचा फायदा, जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते अथवा उपचार घ्यावे लागतात व आम्ही तुमच्या बिलांचे पैसे थेट नेटवर्क हॉस्पिटलला भरतो, तेव्हा होतो व तुम्ही केवळ तब्येत सुधारून बरे होण्यावर लक्ष केंद्रित करु शकता. 

Engine Protector

कर बचत

आयकर अधिनियमच्या कलम 80D अंतर्गत लाभ मिळवा*. अधिक वाचा

कर बचत

आयकर कायदा कलम 80 डी अंतर्गत लाभ घेता येईल. *

*तुमच्यासाठी, तुमचे पती/पत्नी, मुले आणि पालकांसाठी एक्स्ट्रा केअर पॉलिसी निवडल्यावर, तुम्ही तुमच्या टॅक्स सापेक्ष कपातीनुसार वार्षिक ₹25,000 प्राप्त करू शकता (तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त नसल्यास). जर तुम्ही वरिष्ठ नागरिक (वय 60 किंवा त्यापेक्षा जास्त) असलेल्या तुमच्या पालकांसाठी प्रीमियम भराल तर करासाठी कमाल हेल्थ इन्श्युरन्स लाभ ₹50,000 मर्यादित आहे. करदाता म्हणून, जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि तुमचे पालक सीनिअर सिटीझन्स असतील तर तुम्ही कलम 80D अंतर्गत एकूण ₹75,000 पर्यंत टॅक्स लाभ मिळवू शकता. जर तुमचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असेल आणि तुमच्या पालकांसाठी वैद्यकीय इन्श्युरन्स प्रीमियम भरत असाल तर कलम 80D अंतर्गत कमाल टॅक्स लाभ ₹1 लाख आहे.

एक्स्ट्रा केअर पॉलिसी विकत घेण्याआधी हे महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या

  • समावेश

  • अपवाद

एक्सटेन्सिव्ह कव्हरेज

विमा घेतलेल्या रकमेइतका वैद्यकीय खर्चाचे कव्हर.

रुग्णवाहिका कव्हर

₹ 3000 पर्यंतच्या अँब्युलन्सच्या खर्चाला कव्हर.

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा समावेश

हॉस्पिटलायजेशनच्या आधीचे आणि नंतरचे खर्च कव्हर करते.

1 चे 1

पॉलिसी घेताना असलेले व 4 वर्ष आधीपर्यंतचे सर्व व्याधी/आजार.

पॉलिसी आरंभ झाल्यापासून पहिल्या 30 दिवसात झालेल्या व्याधी.

जन्मापासूनचे रोग अथवा व्याधी

नॉन - अ‍ॅलोपॅथिक औषधे.

अपघात सोडून इतर कारणाने होणाऱ्या सांधे बदलाच्या शस्त्रक्रियांसाठी पहिली 4 वर्ष थांबावे लागेल.

एड्स अथवा तत्सम आजारांतून उदभवणारे खर्च.

सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले इलाज.

अमली पदार्थ अथवा दारूच्या सेवनामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय समस्या.

मूल न होणे अथवा उशीरा होणे, वंध्यत्व, कृत्रिम गर्भधारणा, संतती नियमन या सर्वांवरील उपचार.

1 चे 1

हेल्थ इन्श्युरन्स डॉक्युमेंट्स डाउनलोड करा

तुमची मागील पॉलिसी अद्याप कालबाह्य झाली नाही?

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

रिन्यूवल रिमाइंडर सेट करा

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया पॉलिसी नंबर एन्टर करा
कृपया तारीख निवडा

तुम्ही स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद. जेव्हा तुमची पॉलिसी रिन्यूवल साठी देय असेल तेव्हा आम्ही तुम्हाला रिमाइंडर पाठवू.

कस्टमर रिव्ह्यू आणि रेटिंग

सरासरी रेटिंग:

4.75

(3,912 रिव्ह्यूज व रेटिंगवर आधारित)

Satish Chand Katoch

सतीश चंद कटोच

वेबद्वारे पॉलिसी घेताना कोणत्याही अडचणीशिवाय सर्व पर्यायांचा रिव्ह्यू करता येऊ शकतो.

Ashish Mukherjee

आशिष मुखर्जी

प्रत्येकासाठी खूप सोपी, विनासायास, विना गुंतागुंत. छान काम. शुभेच्छा.

Prashanth Rajendran

प्रशांत राजेंद्रन

बजाज आलियान्झची ऑनलाईन पॉलिसी सुविधा खूप आवडली

बजाज आलियान्झ इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्वारस्य दाखवल्याबद्दल धन्यवाद, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह तुम्हाला प्रोसेसमध्ये सहाय्य करण्यासाठी लवकरच संपर्कच साधतील.

कॉलबॅकची विनंती

कृपया नाव एन्टर करा
+91
वैध मोबाईल नंबर एन्टर करा
कृपया वैध पर्याय निवडा
कृपया निवडा
कृपया चेकबॉक्स निवडा

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

लेखक: बजाज आलियान्झ - अपडेटेड: 1st मार्च 2022

अस्वीकरण

मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.

कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा

  • निवडा
    कृपया निवडा
  • कृपया तुमची कमेंट लिहा

आमच्याशी संपर्क साधणे सोपे आहे

आमच्यासह चॅट करा