ENG

Claim Assistance
Get In Touch
Documents Required for Passport
मे 30, 2021

भारतातील पासपोर्टसाठी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत?

रोमन तत्वज्ज्ञ, राजकारणी आणि नाटककार सेनेका एकदा म्हणाले होते,, “प्रवास आणि स्थानातील बदल यामुळे मनाला नवीन शक्ती मिळते." पासपोर्ट हे देशातील सरकारने त्यांच्या नागरिकांसाठी जारी केलेले अधिकृत डॉक्युमेंट आहे. ज्यामुळे तुम्हाला परदेशात प्रवास करण्यास मुभा मिळते. हे एक महत्त्वाच्या ओळखीचा पुरावा आहे जो तुमच्या नागरिकत्वाला प्रमाणित करतो. तुम्ही समृद्ध आठवणींसाठी ट्रॅव्हल करतात. तुमच्या स्वत:च्या देशात किंवा अन्यत्र परदेशात कुटूंब/मित्रांसोबत गुणवत्तापूर्ण वेळ खर्च करतात. बिझनेस ट्रिपवर जातात किंवा कुणाची भेट घेतात.. जर तुम्ही परदेशात प्रवास करत असाल तर तुम्ही तुमचा पासपोर्ट तुमच्यासोबत नेणे आवश्यक आहे, तथापि जर तुम्ही स्वत:च्या देशात प्रवास करत असाल तर तुम्हाला तुमचा पासपोर्ट सोबत बाळगण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला परदेशात प्रवास करायचा असल्यास तुम्ही ॲडव्हान्स मध्ये पासपोर्टसाठी अप्लाय करावे. एकदा जारी केलेला पासपोर्ट सामान्यपणे 10 वर्षांसाठी वैध आहे, त्यानंतर तुम्हाला त्यासाठी पुन्हा अप्लाय करावे लागेल. पासपोर्ट जारी करण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस आणि वयाचा पुरावा म्हणून सबमिट करण्यासाठी विशिष्ट डॉक्युमेंट्स आहेत. आवश्यक डॉक्युमेंट्स तुम्ही खालील वैध डॉक्युमेंट्सच्या यादीमधून कोणतेही अधिकृत रेकॉर्ड सबमिट करू शकता:
  • सध्याच्या ॲड्रेसचा पुरावा
    • आधार कार्ड
    • भाडे करार
    • वीज बिल
    • टेलिफोन (लँडलाईन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल)
    • निवडणूक आयोग फोटो ID कार्ड
    • प्रतिष्ठित कंपन्यांच्या नियोक्त्याकडून लेटरहेडवर सर्टिफिकेट
    • इन्कम टॅक्स मूल्यांकन ऑर्डर
    • चालू बँक अकाउंटच्या पासबुकचा फोटो (अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँक, अनुसूचित खासगी क्षेत्रातील भारतीय बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँक)
    • गॅस कनेक्शनचा पुरावा
    • पती/पत्नीच्या पासपोर्टची कॉपी (पासपोर्ट धारकाचे पती/पत्नी म्हणून अर्जदाराचे नाव नमूद असणाऱ्या कुटुंबाच्या तपशिलासह पहिले आणि शेवटचे पान), (जर अर्जदाराचा वर्तमान ॲड्रेस पती/पत्नीच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेला ॲड्रेसशी जुळत असेल)
    • अल्पवयीन बाबतीत पालकांची पासपोर्ट कॉपी (पहिले आणि शेवटचे पान)
    • पाणी बिल
  • जन्मतारखेचा पुरावा
    • जन्म आणि मृत्यू किंवा महानगरपालिका किंवा इतर कोणत्याही विहित प्राधिकरणाने जारी केलेले जन्म सर्टिफिकेट , जे भारतात जन्मलेल्या मुलांचे जन्म नोंदविण्यासाठी जन्म व मृत्यू अधिनियम, 1969 अंतर्गत सक्षम केले आहेत
    • आधार कार्ड/ई-आधार
    • इन्कम टॅक्स डिपार्टमेंट द्वारे जारी केलेले पॅन कार्ड
    • संबंधित राज्य सरकारच्या वाहतूक विभागाद्वारे जारी केलेला वाहन परवाना
    • अखेरचे प्रविष्ट/मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाचे शाळेद्वारे जारी केलेले ट्रान्सफर/शाळा सोडल्याचा दाखला/मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट
    • इन्श्युरन्स पॉलिसी धारकाची जन्मतारीख नमूद असलेला सार्वजनिक जीवन विमा महामंडळे/कंपन्यांद्वारे जारी केलेला पॉलिसी बाँड
    • अर्जदाराच्या सर्व्हिस रेकॉर्डच्या सारांशाची (केवळ सरकारी सेवकांच्या संदर्भात) किंवा पे पेन्शन ऑर्डर (निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात), संबंधित मंत्रालय/विभागाच्या प्रशासनाच्या अधिकारी/इन-चार्जद्वारे योग्यरित्या साक्षांकित/प्रमाणित प्रत
    • भारतीय निवडणूक आयोगाद्वारे जारी केलेले मतदार ओळखपत्र (ईपीआयसी)
    • अनाथालय/चाईल्ड केअर होम प्रमुखाने अर्जदाराची जन्मतारीख कन्फर्म केल्याचे अधिकृत लेटरहेड द्वारे प्रदान केलेले घोषणापत्र
हे डॉक्युमेंट्स प्रौढ, सीनिअर सिटीझन्स तसेच अल्पवयीनांसाठी (18 वर्षांपेक्षा कमी वय) समान आहेत. अल्पवयीनाच्या बाबतीत फक्त अपवाद म्हणजे, तुम्हाला परिशिष्ट D नुसार अल्पवयीन वयाच्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेल्या विवरणाची पुष्टी करणारे घोषणापत्र सबमिट करावे लागेल. तसेच प्रौढांना (18 वर्षापेक्षा अधिक व 65 वर्षांपेक्षा कमी) नॉन-ईसीआर (इमिग्रेशन चेक आवश्यक) कॅटेगरीशी संबंधित आहेत का हे घोषित करावे लागेल. ज्यासाठी आणखी काही डॉक्युमेंट्स त्यांना सबमिट करावे लागतील. तुम्ही पासपोर्ट सेवा पोर्टलवर पासपोर्टसाठी आवश्यक डॉक्युमेंट्सची संपूर्ण यादी मिळवू शकता. वर नमूद केलेल्या रेकॉर्डच्या सेट व्यतिरिक्त, तुम्हाला विशेष प्रकरणांमध्ये काही अतिरिक्त डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे जसे की:
  • जर तुम्ही अल्पवयीन असाल आणि तुमचा जन्म सरोगसी द्वारे झाला असल्यास तर यापूर्वी नमूद डॉक्युमेंट्स व्यतिरिक्त तुम्हाला परिशिष्ट I नुसार अल्पवयीन विषयी ॲप्लिकेशन मध्ये दिलेल्या तपशिलाची पुष्टी करणारे घोषणापत्र सबमिट करावे लागेल.
  • जर तुम्ही सरकारी/पीएसयू/वैधानिक संस्थेचे प्रौढ आणि कर्मचारी असाल, तर तुम्हाला परिशिष्ट A नुसार ओळख स्पष्ट करणारे सर्टिफिकेट प्रदान करावे लागेल.
  • जर तुम्ही सीनिअर सिटीझन आणि निवृत्त सरकारी अधिकारी असाल तर तुम्हाला ॲड्रेसच्या प्रूफ सह पेन्शन पेमेंट ऑर्डर आणि वयाचा पुरावा सबमिट करणे आवश्यक आहे.
पासपोर्ट ॲप्लिकेशन साठी आवश्यक सर्व डॉक्युमेंट्सचे संपूर्ण तपशील प्राप्त करण्यासाठी भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्थापित केलेले पासपोर्ट सेवा या ऑनलाईन पोर्टल तपासण्याची आम्ही आपणांस विनंती करतो. हे मुद्दे लक्षात ठेवत असतानाच तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन बनवत असताना ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याची शिफारस केली जाते. जेणेकरुन तुमच्या फायनान्शियल गरजांची काळजी घेतली जाऊ शकते आणि एखाद्या अपरिचित देशात तुमचा पासपोर्ट गहाळ/नुकसानग्रस्त झाल्यास तुम्हाला कव्हर मिळू शकते. चेक-आऊट सीनिअर सिटीझन्ससाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्ससह.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 4.4 / 5 वोट गणना: 11

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

  • इमरान कर्दामे - जुलै 30, 2019 वेळ 10:54 am

    धन्यवाद, समजून घेण्यास अत्यंत सोपे आहे

  • संजय मुखर्जी - जुलै 30, 2019 वेळ 7:53 am

    तुमच्या परिपूर्ण माहितीसाठी धन्यवाद

  • पी पी दास - जुलै 29, 2019 वेळ 9:52 am

    चांगली माहिती

  • मनोरंजन असीर्वथम - जुलै 27, 2019 वेळ 6:17 am

    धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिली आहे.

    पासपोर्टसाठी अप्लाय करणाऱ्या प्रत्येकासाठी हे उपयुक्त ठरेल.

  • पलानीप्पन - जुलै 27, 2019 वेळ 6:00 am

    धन्यवाद, समजून घेण्यास अत्यंत सोपे आहे

  • एम फ्रान्सिस झेविअर - जुलै 25, 2019 वेळ 12:57 pm

    विशेषत: सीनिअर सिटीझन्स साठी असलेल्या या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद.

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत