ENG

Claim Assistance
Get In Touch
Non-medical Expenses in Your Health Insurance Policy
डिसेंबर 2, 2021

तुम्ही हॉस्पिटलायझेशन शिवाय हेल्थ इन्श्युरन्स क्लेम कसा करू शकता हे येथे दिले आहे

आजमितीला हेल्थ इन्श्युरन्स हा केवळ ठराविक लोकांचा विषय राहिलेला नाही. यामध्ये गुंतवणूक करण्याकडे सर्वसाधारण कल वाढीस लागला आहे. याव्यतिरिक्त, अधिक लोक त्यांच्या फायनान्सची सुरक्षा करण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सची निवड करत आहेत. वैद्यकीय अत्यावश्यकतेमुळे वैद्यकीय बिलांचा मोठा खर्चाच्या विचारामुळे आर्थिक तणाव स्थितीमुळे कुटुंबात मानसिक तणावाचे वातावरण निर्माण होते. तथापि, हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय महागाईच्‍या वाढीशी लढा सुनिश्चित करण्याचा एक योग्य मार्ग आहे. परंतु जेव्हा तुम्ही हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सविषयी विचार करता तेव्‍हा, अनेकदा असे गृहित धरले जाते की एका दिवसाचे पूर्व हॉस्पिटलायझेशन आवश्यक आहे. वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या विकासासह दीर्घकाळ रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता असलेल्या सर्व ट्रीटमेंटसाठी आता हे आवश्यक नाही. आजकाल हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन न घेता आणि एका दिवसापेक्षा कमी कालावधी मधील अनेक ट्रीटमेंट साठी लाभ घेता येऊ शकतो. या उपचारांना डे-केअर उपचार म्हणतात.

डे-केअर प्रक्रिया म्हणजे काय?

डे-केअर प्रक्रिया ही वैद्यकीय ट्रीटमेंट आहे ज्यात रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही आणि 24 तासांपेक्षा कमी वेळात पूर्ण केली जाऊ शकते. वैद्यकीय विज्ञानाच्या विकासामुळे आता आधीच्या तुलनेत अनेक आजारांवर कमी वेळात ट्रीटमेंट करणे शक्य आहे. सामान्यपणे, डे-केअर प्रक्रियेसाठी आवश्यक वेळ किमान 2 तर कमाल 24 तासांपेक्षा कमी अपेक्षित आहे. जरी ही प्रक्रिया जलद असली तरी, त्याचा ट्रीटमेंट खर्च जास्त असतो आणि त्यामुळे तुमच्या इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये कव्हर होणे आवश्यक आहे. मोतीबिंदू प्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी, सेप्टोप्लास्टी, डायलिसिस, अँजिओप्लास्टी, टॉन्सिलेक्टॉमी, लिथोट्रिप्सी, हायड्रोसेल, पाईल्स आणि फिस्टुला, सायनसायटिस, ॲपेंडेक्टॉमी, लिव्हर ॲस्पिरेशन, कोलोनोस्कोपी ईएनटी-संबंधित आणि काही दंत आजार अशा काही ट्रीटमेंट आहेत. ज्या डे-केअर प्रक्रियेचा भाग म्हणून कव्हर केल्या जातात. तुम्ही जेव्हा सीनिअर सिटीझन्ससाठी हेल्थ इन्श्युरन्स, खरेदी करतेवेळी वाढते वय, वैद्यकीय ट्रीटमेंट वरील वाढते अवलंबित्व हे विचारात घेऊन अशा कव्हरजेचा विचार करावा. डे-केअर प्रक्रियेव्यतिरिक्त महत्वाचे हेल्थ इन्श्युरन्स वैशिष्ट्य आहे जे ट्रीटमेंट साठी आर्थिक संरक्षण प्रदान करते जिथे ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये घेतली जाऊ शकत नाही. याला डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणून ओळखले जाते. *प्रमाणित अटी व शर्ती लागू

डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय?

जेव्हा कोणतीही स्थिती तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून प्रतिबंधित करते तेव्हा हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्सच्या या वैशिष्ट्यामुळे तुम्हाला तुमच्या घरी ट्रीटमेंट घेण्याची अनुमती मिळते. जेव्हा आजार गंभीर स्थितीत असेल तेव्हा लाभ घेतला जाऊ शकतो आणि यामुळे रुग्णाच्या हालचालीवर मर्यादा येतात. पर्यायी स्वरुपात जेव्हा रुग्णालयात बेडची कमतरता असते तेव्हा डोमिसिलरी कव्हर तुमच्या कामी येऊ शकतो. कारण इन्श्युरन्स पॉलिसी तुमच्या घरी अशा ट्रीटमेंटला कव्हर करते. या वैशिष्ट्यांतर्गत 72 तासांपेक्षा जास्त कालावधीसाठी ट्रीटमेंट समाविष्ट केली जाते. तथापि, ते वेगवेगळ्या इन्श्युरन्स कंपन्यांनुसार भिन्न असू शकतात. अशी उदाहरणे असू शकतात की पॅरालिसिस किंवा फ्रॅक्चर सारख्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय सुविधेत हलवले जाऊ शकत नाही. तेव्हाच घरगुती कव्हर सुलभ होते. लक्षात ठेवण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरगुती हॉस्पिटलायझेशन विशिष्ट स्वरुपात आहे आणि त्याच्या कव्हरेजमध्ये होमिओपॅथी किंवा आयुर्वेदासारख्या पर्यायी उपचारांचा विचार केला जात नाही. डोमिसिलिअरी कव्हरसह पॉलिसी खरेदी करताना, लक्षात ठेवा की ती यासाठी सर्वोत्तम असेल कुटुंबासाठी हेल्थ इन्श्युरन्स प्लॅन्स. तथापि, लक्षात ठेवा की तुम्ही पॉलिसी डॉक्युमेंट्स काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. * स्टँडर्ड अटी लागू

अंतिम शब्द

आता हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असावीच अशा संकुचित अटींच्या कक्षेत हेल्थ इन्श्युरन्स नाही. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रकारचे ट्रीटमेंट आहेत ज्या रुग्णालयाला भेट न देता वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्यास मदत करतात. वरील डे-केअर प्रक्रिया आणि घरगुती हॉस्पिटलायझेशन व्यतिरिक्त, तुम्ही बाह्यरुग्ण विभागात आवश्यक असलेल्या ट्रीटमेंट वर आणि दातांच्या प्रक्रियेशी संबंधित इन्श्युरन्स कंपनीच्या भूमिकेची तपासणी करू शकता. इन्श्युरन्स हा आग्रहाचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स माहितीपुस्तिका/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 4 / 5 वोट गणना: 1

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत