रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)
सेल्स: 1800-209-0144
सर्व्हिस चॅट: +91 75072 45858
आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
कोणत्याही असिस्टन्ससाठी कृपया 1800-209-0144 वर कॉल करा
ईमेल स्पूफिंग म्हणजे जेव्हा एखादा ईमेल वैध सोर्स द्वारे पाठवलेला दिसतो, जसे की बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनी, वास्तविकपणे भिन्न सोर्स कडून आलेला असतो. सोप्या भाषेत, ईमेल स्पूफिंग म्हणजे बनावट प्रेषक ॲड्रेस सह ईमेल तयार करणे.
आज जगाला भेडसावणाऱ्या इंटरनेट धोक्यांपैकी हा एक मोठा धोका आहे. व्हेरिझॉनच्या अहवालानुसार, डाटा उल्लंघनाच्या जवळपास 90% साठी ईमेल फसवणूक जबाबदार आहे.
ईमेल स्पूफिंग कसे शक्य आहे?
हे शक्य आहे कारण प्रेषकाचा ॲड्रेस प्रमाणित करण्यासाठी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल (SMTP) कडे कोणतेही साधन नाही. ईमेल स्पूफिंग धोक्यांचा सामना करण्यासाठी काही ईमेल ॲड्रेस प्रमाणीकरण प्रक्रिया आणि साधने विकसित करण्यात आली आहेत. तथापि, ही साधने धोका सोडविण्यासाठी पुरेसी प्रगत नाहीत.
ईमेल स्पूफिंग का घडते याची कारणे-
पाठविणार्याचा ॲड्रेस स्पूफिंग करण्याचे अनेक कारणे आहेत, काही पुढीलप्रमाणे-
पाठविणाऱ्याची खरी ओळख लपवणे- हे फसवणूक करण्यासाठी केले जाऊ शकते जेणेकरून प्राप्तकर्त्याला ईमेलचे मूळ ट्रॅक करता येणार नाही.
स्पॅम ब्लॅकलिस्ट टाळण्यासाठी- अनेक स्पॅमर्स सहजपणे ब्लॅकलिस्ट केले जातात. म्हणून, ते ब्लॅकलिस्ट होणे टाळण्यासाठी त्यांचा ईमेल ॲड्रेस स्विच करत राहतात.
इतर कोणीतरी असल्याचे भासवणे- प्रेषक गोपनीय डाटा मिळविण्यासाठी किंवा वैयक्तिक मालमत्तेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्राप्तकर्त्याला माहीत असलेली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो.
ईमेल स्पूफिंगपासून कसे सुरक्षित राहावे?
जर तुम्हाला फिशी दिसणारा ईमेल प्राप्त झाला असेल तर तुम्ही तो डिलिट करावा.
जर ईमेल तुमच्या बँक/संस्थेकडून असेल आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड किंवा इतर वैयक्तिक माहिती बदलण्यास सांगितले गेले असेल तर तुम्ही तुमच्या बँक/संस्थेशी संपर्क साधावा आणि त्याची पुष्टी करावी. ईमेल खोटे असण्याची शक्यता जास्त आहे.
तुम्ही तुमच्या ईमेलवर प्राप्त झालेल्या कोणत्याही हायपरलिंकवर क्लिक करू नये. तुम्ही त्यांना तुमच्या वेब ब्राउजरमध्ये मॅन्युअली टाईप करू शकता.
खरेदी करा सायबर इन्श्युरन्स पॉलिसी सर्व प्रकारच्या डिजिटल धोक्यांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी.
अधिक जाणून घ्या सायबर इन्श्युरन्स वैशिष्ट्ये.
अस्वीकरण
मी याद्वारे बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडला सोयीस्कर वेळी कॉलबॅक करण्याच्या विशिष्ट विनंतीसह वेबसाईटवर माझ्याद्वारे उपलब्ध केलेल्या काँटॅक्ट नंबरवर कॉल करण्याची परवानगी देत आहे.. मी पुढे घोषित करीत आहे की, पूर्णपणे किंवा आंशिकरित्या ब्लॉक केलेल्या श्रेणीअंतर्गत राष्ट्रीय ग्राहक प्राधान्य नोंदणी (NCPR) वर नोंदणीकृत असल्याशिवाय, माझ्या विनंतीच्या प्रतिसादात पाठवलेला कोणताही कॉल किंवा एसएमएस अनपेक्षित व्यावसायिक संवाद असणार नाही, जरी कॉलचा कंटेंट विविध विमा उत्पादने आणि सेवा किंवा इन्श्युरन्स व्यवसायाचा आग्रह आणि खरेदीच्या उद्देशाने असेल तरीही.. तसेच, मला हे माहिती आहे की गुणवत्ता आणि प्रशिक्षण हेतूंसाठी हे कॉल्स रेकॉर्ड आणि देखरेख केले जातील आणि आवश्यक असल्यास मला उपलब्ध केले जातील.
कृपया वैध कोट संदर्भ आयडी नमूद करा