प्रॉडक्ट्स
रिन्यू
क्लेम
सपोर्ट
एजंट बना
Suggested
Travel Blog
16 जून 2021
530 Viewed
वर्ष 1950 पासून, दरवर्षी 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1950 मध्ये भारतीय संविधान अस्तित्वात आले. नोंद घेण्यासारखा महत्वाचा मुद्दा म्हणजे 15 ऑगस्ट, 1947 रोजी भारत ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झाला. तो दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तथापि, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला. परंतु विशाल राष्ट्राचे एकीकरण आणि विविध प्रकारच्या सांस्कृतिक विविधता यांचा समन्वय करणे हे जानेवारी 26, 1950 पर्यंत झाले नाही. म्हणजेच, जेव्हा भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंंमलबजावणी सुरू झाली.
भारत सरकार आणि भारतीय नागरिकांसाठी प्रक्रिया, कार्य, जबाबदाऱ्या, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे यांचा समावेश असलेले भारतीय संविधान हे लिखित स्वरुपाचा भव्य दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाचे मूलभूत तत्व “लोकांचे, लोकांसाठी आणि लोकांद्वारे",यातून प्रतीत होते की, देशाचे सामर्थ्य हे भारतीय नागरिकांच्या हाती एकवटलेले आहे. प्रजासत्ताक दिन हा भारतीय नागरिकांचे स्वतःचे सरकार निवडण्यासाठी सक्षमीकरणाचा उत्सव म्हणून चिन्हांकित केला जातो. भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी दिनाचे स्मरण करण्यासाठी या दिवशी राष्ट्रीय सुट्टी असते.
प्रजासत्ताक दिनाचे संचलन हे जगातील लक्षवेधी संचलनापैकी मानले जाते. दिल्लीमधील प्रजासत्ताक दिन उत्सवांची भव्यता पाहण्यासाठी या काळात जगभरातील व्यक्ती भारताला भेट देतात. तुम्ही उत्सवाचे भव्य स्वरुप पाहण्यासाठी तुमचे तिकीट बुक केले आहेत का? त्यामुळे तुमच्याकडे असावा ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन जेव्हा तुम्ही तुमची फ्लाईट तिकीटे बुक करता जेणेकरून तुम्ही हे स्मरणीयरित्या घेताना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असाल तुमच्या कुटुंबासह प्रवास करा आणि मित्रांसह प्रवास करा.
53 Viewed
5 mins read
27 नोव्हेंबर 2024
32 Viewed
5 mins read
11 मार्च 2024
36 Viewed
5 mins read
11 मार्च 2024
36 Viewed
5 mins read
28 सप्टेंबर 2020
What makes our insurance unique
With Motor On-The-Spot, Health Direct Click, etc we provide fast claim process , Our sales toll free number:1800-209-0144