तुमच्या नवीन बाईकसाठी टोकन रक्कम भरल्याबद्दल अभिनंदन! आता पुढील स्टेप म्हणजे टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीची निवड करणे. ज्याप्रमाणे तुमची मनपसंत बाईक निवडण्यात गोंधळ होतो. त्याचप्रमाणे समान प्रकारचा अनुभव येईल निवड करताना
बाईक इन्श्युरन्स पॉलिसी. एकाधिक पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असताना तुमच्या आवश्यकतेवर निवड अवलंबून असणार आहे. या निवडी दरम्यान, तुम्हाला फर्स्ट-पार्टी कव्हरेज आणि थर्ड पार्टी कव्हरेज यामध्ये उपलब्ध असणाऱ्या कव्हरेज पर्यायातून योग्य निवड करायची आहे. टू-व्हीलरसाठी थर्ड पार्टी पॉलिसीपेक्षा फर्स्ट पार्टी इन्श्युरन्स नेमका कसा वेगळा आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. चला ते पाहूया.
टू-व्हीलर्ससाठी फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स
टू-व्हीलरसाठी फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स हा एक प्रकारचा इन्श्युरन्स प्लॅन आहे जो तुमच्या बाईकला संपूर्ण संरक्षण प्रदान करतो. या कारणास्तव, याला सर्वसमावेशक पॉलिसी संदर्भित केले जाते. नावानुसार पॉलिसीद्वारे फर्स्ट पार्टीच्या दायित्वासाठी म्हणजेच तुम्हाला (पॉलिसीधारक) कव्हरेज प्रदान करते. टू-व्हीलरसाठी या फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स अंतर्गत तुमच्या बाईकचे कोणतेही नुकसान इन्श्युअर्ड केले जाते. या कव्हरेज अंतर्गत दिलेली भरपाई थेट इन्श्युररद्वारे तुम्हाला दिली जाते. टू-व्हीलरसाठी फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स अंतर्गत कव्हर केलेल्या प्रकरणांची काही उदाहरण येथे दिले आहेत:
- आगीमुळे नुकसान
- नैसर्गिक आपत्ती
- चोरी
- मानव-निर्मित जोखीम
तथापि, फर्स्ट पार्टी कव्हरेज मधून काही बाबी वगळण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये वाहन चालकाकडे वैध वाहन परवाना नसताना किंवा मद्य किंवा अन्य मादक पदार्थांच्या अंमलाखाली असताना नियमित घर्षण, तुमच्या बाईकचे डेप्रिसिएशन, कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल ब्रेकडाउन, टायर, ट्यूब यांचे होणारे नुकसान समाविष्ट असेल.
टू-व्हीलर्ससाठी थर्ड पार्टी इन्श्युरन्स
फर्स्ट-पार्टी कव्हरच्या तुलनेत
थर्ड पार्टी बाईक इन्श्युरन्स कव्हरेज मर्यादित स्वरुपाचे असते. हे केवळ तुम्हाला पॉलिसीधारक म्हणून अपघातामुळे उद्भवणाऱ्या व्यक्तिगत हानीपासून, दायित्वांपासून किंवा मालमत्तेचे नुकसानापासून संरक्षित करते. इन्श्युरन्स करारा बाहेरील कोणत्याही थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीचे कव्हर संरक्षित करतो म्हणून, त्याला थर्ड पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स कव्हर संबोधले जाते. आता तुम्हाला माहित आहे की फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स थर्ड पार्टी कव्हरपासून कसा भिन्न आहे. फर्स्ट-पार्टी टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन खरेदी करणे का आवश्यक आहे हे जाणून घ्या.
टू-व्हीलरसाठी फर्स्ट पार्टी इन्श्युरन्स अनिवार्य आहे का?
मोटर व्हेईकल्स ॲक्ट 1988 नुसार सर्व बाईक मालकांकडे किमान थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर असणे अनिवार्य आहे. फर्स्ट-पार्टी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणे अनिवार्य नसले तरी याद्वारे तुम्हाला ऑल-राउंड कव्हरेज प्रदान होत असल्यामुळे फायदेशीर ठरते. अपघात ही दुर्दैवी घटना असते ज्यामुळे केवळ इतरांना दुखापत किंवा नुकसान होत नाही तर तुम्हाला आणि तुमच्या वाहनालाही नुकसान होते. फर्स्ट-पार्टी बाईक इन्श्युरन्स पॉलिसी म्हणजे मालक तसेच थर्ड पार्टी दोन्हीसाठी कव्हरेज देऊ करते. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे आयुष्याचे देखील नुकसान होते आणि वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात हानी होते. फर्स्ट-पार्टी इन्श्युरन्स कव्हर तुम्हाला तुमचे वाहन सुरक्षित ठेवण्यास आणि फायनान्शियल नुकसान टाळण्यास मदत करते. शेवटी, फर्स्ट-पार्टी
ऑनलाईन वाहन इन्श्युरन्सखरेदी करणे सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. खरेदी करताना डेप्रिसिएशन, ऑफर रोडसाईड असिस्टन्स, इंजिन ब्रेकडाउन कव्हर आणि अन्य काही अतिरिक्त कव्हरेज पर्यायांचा समावेश करण्यासाठी त्याला कस्टमाईज्ड देखील केले जाऊ शकते. अन्यथा हे लाभ थर्ड पार्टी इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी उपलब्ध नाहीत. शेवटी, फर्स्ट-पार्टी कव्हर निवडणे ही एक स्मार्ट निवड आहे. कारण हे थर्ड पार्टी दायित्व टाळण्यासाठी तसेच तुमच्या वाहनाच्या नुकसानीपासून फायनान्शियल नुकसान कमी करण्यास मदत करते. तथापि, जेव्हा तुम्ही एकाची निवड करता. तेव्हा तुमच्या आवश्यकतांचे काळजीपूर्वक विश्लेषण करा आणि उपलब्ध पर्यायांची तुलना केल्यानंतर निवडा जेणेकरून ते दीर्घकाळ पर्यंत उपलब्ध असलेले लाभ प्रदान करू शकतील.
प्रत्युत्तर द्या