ENG

Claim Assistance
Get In Touch
What is General Insurance: Types of General Insurance in India
मार्च 1, 2022

जनरल इन्श्युरन्सचे पॉलिसीचे

तुम्ही बहुप्रतीक्षित सुट्टीची कल्पना करत असताना तुम्हाला घरी असलेली कार आणि इतर वस्तूंची निरंतर चिंता तुमच्या प्रवासादरम्यान भेडसावत असते. हे निश्चितपणे तुमच्या सुट्टीच्या आनंदासाठी अपेक्षित नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला भेडसावणाऱ्या सातत्यपूर्ण चिंतेमुळे प्रवासादरम्यान तुमचे मन सातत्याने तुमच्या घराकडे ओढावलेले असेल. याठिकाणी जनरल इन्श्युरन्स प्लॅन प्रत्यक्षात येतो. इन्श्युरन्स प्रामुख्याने दोन कॅटेगरी मध्ये विभाजित केला जातो - लाईफ व नॉन-लाईफ. नॉन-लाईफ इन्श्युरन्सला जनरल इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाते. ही कॅटेगरी लाईफ इन्श्युरन्स व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या इन्श्युरन्सला कव्हर करते. वरील नमूद उदाहरणात, तुमचे सर्व वस्तू जनरल इन्श्युरन्स पॉलिसी वापरून कव्हर केल्या जाऊ शकतात. जरी जनरल इन्श्युरन्स प्लॅन्स विभिन्न प्रकारचे असले तरीही विशिष्ट प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीचा वापर करून प्रत्येक मालमत्तेचा समावेश केला जाऊ शकतो. तुमच्या नुकसानीसाठी भरपाई या प्राथमिक तत्वावर इन्श्युरन्स पॉलिसी काम करते. म्हणून लक्षात ठेवा, इन्श्युरन्स हे अशाप्रकारचे संरक्षणात्मक कव्हर नाही. ज्यामुळे तुमचे होणारे नुकसान टाळू शकेल. परंतु यामुळे तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीपासून निश्चितच संरक्षण प्रदान केले जाईल.  

जनरल इन्श्युरन्स कसे काम करते?

लाईफ इन्श्युरन्स व्यतिरिक्त जनरल इन्श्युरन्स देखील एकाधिक व्यक्तींना असणाऱ्या रिस्क तत्त्वावर काम करते. रिस्कला सामोरे जाणाऱ्या प्रत्येकाचे नुकसान होत नाही. या आधारावर जनरल इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे तुमच्या क्लेमची पूर्तता केली जाते. रिस्क कव्हर करण्यासाठी इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रीमियम आकारले जाते. समान प्रकारच्या रिस्क साठी इन्श्युअर करण्यास इच्छुक असलेल्या इतरांना सारखेच कव्हरेज प्रदान केले जाते. क्लेम केल्यानंतर इन्श्युरन्स कंपन्यांद्वारे अशा प्रकारच्या फंडमधून पे-आऊट ऑफर केले जातात. लाईफ इन्श्युरन्स प्रमाणे तुमच्या अनुपस्थितीत तुमच्या कुटूंबाला आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. जनरल इन्श्युरन्स मध्ये पॉलिसीच्या अटीनुसार तुम्हाला विहित वेळेनुसार पैसे प्राप्त होतात.  

तुम्ही कोणत्या प्रकारची जनरल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करू शकता?

आजच्या काळात जर तुम्ही विशिष्ट किंमत भरण्यास तयार असल्यास तुम्ही कोणत्याही बाबीसाठी इन्श्युअर्ड होऊ शकता. तुम्ही खरेदी करू शकणारे काही मुख्य प्रकारचे जनरल इन्श्युरन्स येथे दिले आहेत -  

#1 Health Insurance

ज्याप्रमाणे तुमचं आयुष्य महत्वाचं त्याचप्रमाणे तुमचं आरोग्यही महत्वाचं आहे. 'आरोग्य हीच संपत्ती' हे वचन हेल्थ कव्हर खरेदी करण्यास संयुक्तिक ठरते. भारतातील अनेक जनरल इन्श्युरन्स कंपन्यांसह तुमच्यासाठी योग्य प्लॅनची निवड हा तुमच्या पसंतीचा विषय ठरतो. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी इन्श्युरन्स रकमेच्या विशिष्ट रकमेपर्यंत कोणत्याही अनपेक्षित हॉस्पिटलायझेशनसाठी कव्हर करतात. विविध प्रकारचे हेल्थ इन्श्युरन्स ज्यामधून तुमच्या गरजेनुसार निवड करू शकता. स्टँडअलोन हेल्थ इन्श्युरन्स प्लॅनला तुमचे प्राधान्य असावे. तर तुम्ही तुमच्यावर अवलंबून असणारे मुले आणि पती/पत्नी यांचा समावेश करण्यासाठी फॅमिली फ्लोटर प्लॅन्सही खरेदी करू शकता. जर तुमच्या कुटुंबात कोणताही आजार असेल तर तुम्ही क्रिटिकल इलनेस प्लॅन द्वारे इन्श्युअर्ड होऊ शकता. तुम्ही लक्षात घ्यावे की सर्व हेल्थ पॉलिसीसाठी तुम्हाला त्यांचे कव्हर वाढविण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही निवडलेल्या प्लॅननुसार हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता नसलेल्या उपचारांना हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत देखील कव्हर केले जाते.  

#2 Motor Insurance

मोटर वाहन खरेदी करणे निश्चितच कठीण काम आहे आणि त्याचे नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्नशील असतात. तोडफोड, नुकसान, चोरी किंवा अपघाताचे कोणतेही प्रकरण मोटर इन्श्युरन्स पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाते. योग्य मोटर इन्श्युरन्स पॉलिसी निवडल्यास तुमच्या कारसाठी संपूर्ण संरक्षण असल्याची खात्री मिळू शकते. तुमचे कार इन्श्युरन्स संपूर्ण कव्हरेज प्राप्त करण्यासाठी निवडक ॲड-ऑन्स वापरून कस्टमाईज केले जाऊ शकते. कार इन्श्युरन्स पॉलिसी केवळ तुमच्या स्वत:च्या नुकसानीसाठी संरक्षण सुनिश्चित करत नाही तर थर्ड-पार्टी खर्चही सुनिश्चित करते. तसेच, मोटर व्हेईकल्स ॲक्ट, 2019 नुसार प्रत्येक वाहनाला किमान थर्ड पार्टी इन्श्युरन्स कव्हर असणे अनिवार्य केले आहे.  

#3 Home Insurance

आणखी एक प्रकारचा जनरल इन्श्युरन्स जो तुमच्या घराचे तसेच त्यामधील वस्तूंचे संरक्षण करतो. तुम्ही घरमालक असाल किंवा भाड्याने राहत असाल तुमच्यासाठी होम इन्श्युरन्स कव्हर आहे. होम कव्हर तुमच्या घराचे नैसर्गिक तसेच मानवी धोक्यांपासून संरक्षण करते आणि तुम्हाला आर्थिक सिक्युरिटी प्रदान करते.  

#4 Travel Insurance

तुम्ही प्रवासादरम्यान घरापासून दूर असताना तुमचे सामान आजवर हरवले आहे का?? अशा दुर्दैवी घटना घडतात आणि विशेषत: इंटरनॅशनल प्रवासासाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स खरेदी करणे महत्त्वाचे आहे. ट्रॅव्हल इन्श्युरन्स कव्हर तुम्ही घरापासून दूर असताना हरवलेले सामान किंवा हॉस्पिटलायझेशनच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे होणारे कोणतेही आर्थिक नुकसान कव्हर करते. तसेच, डोमेस्टिक ट्रॅव्हल इन्श्युरन्स देखील समान कव्हरेज प्रदान करते.  

#5 Commercial Insurance

वरील इन्श्युरन्स तुमच्या आयुष्यातील सर्व वैयक्तिक बाबींना कव्हर करत असताना तुमच्या बिझनेसची देखील काळजी घेणे आवश्यक ठरते. कोणत्याही आकस्मिक बिझनेस नुकसानीमुळे मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तुमच्यावर कर्जाचा भार पडू शकतो. अशा अनपेक्षित नुकसान टाळण्यासाठी भारतातील विविध जनरल इन्श्युरन्स कंपन्यांकडून कमर्शियल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करणे हा मार्ग आहे. तुम्ही खरेदी करू शकणाऱ्या काही प्रमुख प्रकारच्या जनरल इन्श्युरन्स पॉलिसी असताना तुम्ही तुमच्या आवडीच्या इन्श्युररकडून कस्टमाईज्ड इन्श्युरन्स कव्हरची देखील चौकशी करू शकता. मतितार्थ असा दक्ष राहा आणि इन्श्युअर्ड व्हा!  

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 4.4 / 5 वोट गणना: 5

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत