रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
All About Mobile Phone Insurance
ऑगस्ट 5, 2022

भारतातील मोबाईल फोन इन्श्युरन्स विषयी तुम्हाला माहीत असावे असे सर्वकाही

मोबाईल आपल्या आयुष्याचा आवश्यक भाग बनला आहे. खरं तर, एकप्रकारे आपलं अविभाज्य अंगच ठरत आहे. मोबाईल केवळ प्रभावी संवादासाठीच वापरला जात नाहीत तर उत्पादकतेच्‍या हेतूसाठीही वापरला जाऊ शकतो. संवाद हेतूसाठी विकसित केलेले मोबाईल तंत्रज्ञान, आता त्यापेक्षा अधिक काम करत आहे. काही वर्षांपूर्वी, संगीत, कॅमेरा आणि रेडिओ यासारख्या वैशिष्ट्यांसह आलेल्या फीचर-फोन्समध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता संगणन, मशीन लर्निंग क्षमता यासारख्या अधिक प्रगत वैशिष्ट्ये असतात आणि त्यामुळेच त्याला स्मार्टफोन्स म्हटलं जातं. तुमच्या बोटांवर उपलब्ध फीचर्सच्‍या वाढत्या संख्येसह या फोन्सच्या किंमती देखील स्थिरपणे वाढत आहेत. तुमचे संपूर्ण वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन स्मार्टफोनमधून तुमच्या बोटांवर व्यवस्थापित केले जाऊ शकते. आजच्या काळात ही चैनीची गोष्ट राहिलेली नाही, तर ती एक गरज आहे आणि हे लक्षात येते की, त्यांच्या वाढत्या किंमतीचे टॅग असूनही अधिकाधिक लोक या स्मार्टफोन्सची निवड करत आहेत. इतर कोणत्याही वस्‍तूंप्रमाणेच, हे स्मार्टफोन्स देखील चोरीला जाऊ शकतात. परंतु मोबाईल इन्श्युरन्स कव्हर असल्यास त्याबद्दल अधिक चिंता करण्याची गरज नाही. चोरी व्यतिरिक्त, मोबाइल इन्श्युरन्स प्‍लॅनमध्‍ये सॉफ्टवेअर नुकसान किंवा या महागड्या गॅझेट्समधील हार्डवेअरच्या इतर समस्यांच्या घटनांचा समावेश आहे. त्याशिवाय अपघाती खाली पडणे, लिक्विड नुकसान, स्क्रीनचे नुकसान आणि आपल्याला येऊ शकतात अशा इतर अनेक परिस्थितींचा समावेश आहे. या विविध जोखमीना जाणून घेण्यामुळे तुमच्या महागड्या स्मार्टफोनसाठी फायनान्शियल नुकसान होऊ शकते. फोन इन्श्युरन्स पॉलिसी डिव्हाईसला अंतर्गत तसेच बाह्य नुकसानीपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. तुम्ही खालील मुद्द्यांच्या आधारावर सर्वसमावेशक पद्धतीने जाणून घेऊ शकता फोन इन्श्युरन्स पॉलिसी:

मोबाईल फोन इन्श्युरन्स खरेदीचे फायदे कोणते?

तुमच्या तळहातावरील स्मार्टफोन ही संगणकाप्रमाणेच महत्वपूर्ण बाब आहे. आधुनिक पिढीचा त्यांच्या तांत्रिक क्षमतांवर अधिक भर आहे. मोबाईल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे:
 • मोबाईल फोनसाठी इन्श्युरन्स तुमच्या फोनला चोरी किंवा नुकसानीच्या स्थितीत आर्थिक नुकसानीपासून संरक्षण.
 • जर तुमचा तंत्रज्ञानामुळे गोंधळ उडत असल्यास किंवा मागील काळात तुमचा फोन गहाळ झाल्याची पार्श्वभूमी असल्यास ही स्मार्ट इन्व्हेस्टमेंट ठरेल.
 • तुम्ही निवडलेल्या इन्श्युरन्स कव्हरच्या प्रकारानुसार, चोरी किंवा नुकसान झाल्यास तुम्ही फोनच्या रिप्लेसमेंटचा लाभ घेऊ शकता.
 • मोबाईल इन्श्युरन्स कव्हर तुमच्या पॉलिसीच्या अटींनुसार विशिष्ट इव्हेंटसाठी त्वरित रिप्लेसमेंट प्रदान करण्यास मदत करते.
* प्रमाणित अटी लागू

मोबाईल इन्श्युरन्स कव्हर अंतर्गत काय कव्हर केले जाते?

मोबाईल फोनसाठी इन्श्युरन्स खालील बाबींना कव्हर करतो:
 1. नवीन तसेच वापरलेल्या फोनसाठी कव्हर

मोबाईल फोन इन्श्युरन्स पॉलिसी केवळ नवीन फोनसाठीच उपलब्ध नाही तर मागील एक वर्षातील तुमच्या मालकीच्या मॉडेलसाठीही उपलब्ध आहे. उत्पादकाची वॉरंटी सामान्यपणे सहा महिन्यांपासून एक वर्षापर्यंत मर्यादित असले तरी, अशा वॉरंटी कालावधी समाप्त झाल्यानंतर त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इन्श्युरन्स कव्हरेज निवडले जाऊ शकते. जाणून घ्या आमचा एक्स्टेंडेड वॉरंटी इन्श्युरन्स प्लॅन. *
 1. आकस्मिक स्क्रीनचे नुकसान

मोबाईल इन्श्युरन्स पॉलिसीमध्ये स्क्रीनचे नुकसान कव्हर होते, जे आपल्या स्मार्टफोनचा वापर करण्याचा महत्त्वाचा भाग आहे. सामान्यपणे, स्क्रीनच्‍या दुरुस्तीचा अंदाजे खर्च फोनच्‍या मूळ किंमतीच्‍या अर्धी असते आणि त्यामुळे, स्क्रीनच्या नुकसानीसाठी भरपाई देणारे इन्श्युरन्स कव्हर खरेदी करणे ही एक विवेकपूर्ण निवड आहे. *
 1. आयएमईआय-लिंक्ड इन्श्युरन्स कव्हर

स्मार्टफोनसाठी कव्हरेज एखाद्या व्यक्तीशी लिंक केलेले नाही, परंतु खरतर, तुमच्या मोबाईल फोनच्या आयएमईआय नंबरशी लिंक केलेले असते. हा एक युनिक नंबर आहे जो आपल्या विशिष्ट फोनचे प्रतिनिधित्व करतो. तर, फोन खराब झाल्यामुळे आपली चूक नसली तरी इन्श्युरन्स पॉलिसी अजूनही त्याला कव्‍हर करते. * * स्टँडर्ड अटी व शर्ती लागू

मोबाईल इन्श्युरन्स पॉलिसीसाठी क्लेम प्रक्रिया काय आहे?

प्रत्येक जनरल इन्श्युरन्स पॉलिसीच्या वैशिष्ट्यांचा विचार करता, कंपनीची एक वेगळी क्लेम प्रक्रिया आहे. तथापि, एकूण प्रक्रियेची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
 • फोनचे कोणतेही नुकसान झाल्यास त्वरित इन्श्युरन्स कंपनीला रिपोर्ट केले पाहिजे. हे एकतर इन्श्युरन्स कंपनीचा कस्टमर सपोर्ट नंबर, ईमेल किंवा इतर कोणत्याही चॅनेलचा वापर करून हे केले जाऊ शकते.
 • नुकसानाची तक्रार करताना क्लेम फॉर्म सादर करणे आवश्यक आहे. हे इंटरनेटद्वारे ऑनलाईन मोबाईल इन्श्युरन्स प्लॅन्ससाठी किंवा इन्श्युरन्स कंपनीच्या ऑफिसला भेट देऊन केले जाऊ शकते.
 • चोरीच्या केस मध्‍ये, क्लेम ॲप्लिकेशन फॉर्मसह एफआयआर सबमिट करणे आवश्यक आहे.
 • तुमच्या इन्श्युरन्स कंपनीच्या अटी, फोटो किंवा व्हिडिओच्या आधारावर नुकसानाचे पुरावे देखील आवश्यक असू शकतात.
 • जर क्लेम मूल्यांकनकार वरील सादरीकरणाबाबत समाधानी असेल तर पॉलिसीच्या अटी व शर्तींनुसार दुरुस्तीच्या खर्चाच्या बदली किंवा रिएम्बर्समेंट द्वारे क्लेम सेटल केला जातो.
 • काही इन्श्युरन्स कंपन्या त्यांच्या संलग्नतेच्या आधारे अधिकृत सर्व्हिस दुकानांना थेट पेमेंट्स देतात.
 • जारी केलेल्या युनिक ट्रॅकिंग नंबरसह प्रक्रिया ट्रॅक केली जाऊ शकते जेव्हा इन्श्युरन्स क्लेम स्वीकारले जाते.
* प्रीमियमच्या नाममात्र पेमेंटसाठी प्रमाणित अटी व शर्ती लागू आहे, तुमच्या फोनचे नुकसान इन्श्युरन्स कंपनीद्वारे कव्हर केले जातात याची तुम्ही खात्री करू शकता. अशाप्रकारे, तुम्हाला तुमच्या फोन किंवा त्याच्या रिप्लेसमेंटच्या नुकसानीबद्दल काळजी करण्याची गरज नाही. इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींबद्दल अधिक तपशिलांसाठी, कृपया खरेदी करण्यापूर्वी सेल्स माहितीपुस्तिका/ पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 3.8 / 5 वोट गणना: 4

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत