हेल्थ केअर शुल्क, वैद्यकीय खर्च आणि जीवनशैलीतील बदलांमुळे दिवसागणिक आजारांच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे अधिक इन्श्युअर्ड रकमेचा पर्याय निवडण्याकडे अनेकांचा कल वाढीस लागलेला आहे. त्यामुळे अधिक लोक वेगवेगळ्या इन्श्युरन्स पॉलिसी कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करीत आहेत. या सर्व हेल्थ आणि वैद्यकीय इन्श्युरन्स पॉलिसी मध्ये व्यक्तिगत स्वरुपात खरेदी केलेला
ऑनलाईन हेल्थ इन्श्युरन्सआणि दुसरा असतो नियोक्त्याकडून खरेदी करण्यात आलेला: आम्ही दोन कंपन्यांकडून हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो का? आणि तसेच, आम्ही दोन कंपन्यांकडून मेडिकल इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो का? तर या प्रश्नांचे उत्तर हे 'होय' असेल. कुणीही दोन किंवा अधिक कंपन्यांकडून हेल्थ इन्श्युरन्स आणि मेडिकल इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो. काही अटी आणि प्रक्रिया वगळता, क्लेम करताना पॉलिसीधारकाला काही बाबी समजावून घेणे आवश्यक आहे. श्री. भल्ला यांच्याकडे अनुक्रमे ₹2 लाख आणि ₹ 1 लाखाच्या दोन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी आहेत. त्यांना हर्नियाच्या ट्रीटमेंट साठी दहा दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलचा खर्च ₹ 2.5 लाखांपर्यंत पोहोचला आहे. हॉस्पिटलचे बिल सेटल करतेवेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून ₹2 लाखांचे बिल क्लेम केले आणि त्यांच्या दुसऱ्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडून ₹50,000 क्लेम केले. परंतु त्यांचा दुसरा क्लेम नाकारला गेला आणि त्यांना स्वत:च्या खिशातून पैसे भरावे लागले. ते निराश झाले आणि त्यांनी इन्श्युरर कडे स्पष्टीकरणासाठी विचारणा केली. श्री. भल्ला यांना माहित नव्हते की दोन्ही हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कंपन्यांना अन्य पॉलिसीबद्दल माहिती देणे आवश्यक होते. त्यामुळे अशा स्वरुपाची माहिती न कळविल्यास; क्लेम नाकारला जाऊ शकतो. श्री. भल्ला यांच्या प्रमाणेच अनेकांना या गोष्टीची माहिती नसते. पॉलिसी घेतलेल्या प्रत्येक कंपनीला हेल्थ किंवा इन्श्युरन्स पॉलिसी विषयी माहिती स्पष्ट करणे आवश्यक असते. पॉलिसीधारकाला प्रपोजल फॉर्म भरणे आवश्यक आहे. ज्यामध्ये हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कंपनी द्वारे अन्य विद्यमान पॉलिसी मान्य करण्यास सांगितले जाते. खालील लेख हेल्थ क्लेम करण्याबाबत आणि आम्ही दोन कंपन्यांकडून वैद्यकीय इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा याविषयी सर्वकाही स्पष्ट करेल. कोणताही क्लेमला सुरुवात करण्यापूर्वी शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती वाचल्याची खात्री करा.
आम्ही दोन कंपन्यांकडून हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम कसा करू शकतो?
दोन किंवा अनेक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीचा ॲक्सेस असल्याने पॉलिसीधारकाकडे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत क्लेमच्या संख्येच्या बाबतीत लवचिकता असते. बहुतांश व्यक्तींना हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम कसा करावा हे माहित असताना कधीकधी दोन पॉलिसीवर क्लेम करणे किचकट स्वरुपाचे ठरते. जर पॉलिसीधारकाचा हेल्थ इन्श्युरन्स क्लेम सम इन्श्युर्ड पेक्षा कमी असेल तर ते केवळ एकाच पॉलिसी अंतर्गत क्लेम करू शकतात. जर क्लेम एकाच पॉलिसीच्या सम इन्श्युर्ड पेक्षा जास्त असेल तर पॉलिसीधारक दोन पद्धतीद्वारे क्लेम करू शकतो - कॅशलेस क्लेम आणि रिएम्बर्समेंट.
1. कॅशलेस क्लेम
जेव्हा
कॅशलेस हेल्थ इन्श्युरन्ससाठी क्लेम केला जातो. तेव्हा पॉलिसीधारकाला नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशन मिळते. या प्रकरणात, पॉलिसीधारकाला त्याच्या पहिल्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीकडे क्लेम करावा लागेल आणि क्लेम सेटलमेंटचा सारांश मिळवावा लागेल. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर पॉलिसीधारकाला हॉस्पिटलायझेशन बिल प्रमाणित करणे आवश्यक आहे आणि बॅलन्स रकमेची विनंती करण्यासाठी दुसऱ्या हेल्थ इन्श्युरन्स कंपनीशी संपर्क साधावा लागेल.
2. रिएम्बर्समेंट क्लेम
कॅशलेस पद्धती सध्या मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. परंतु आपत्कालीन स्थितीत हेल्थ इन्श्युरन्स कंपनी प्रोव्हायडरच्या नेटवर्क हॉस्पिटल मध्ये नसलेल्या हॉस्पिटल मध्ये पॉलिसीधारक ट्रीटमेंट घेत असल्यास काय करायचे?. अशा स्थितीत, पॉलिसीधारकाला प्रथम हॉस्पिटलचे बिल भरावे लागेल आणि नंतर इन्श्युररची रिएम्बर्समेंट रक्कम क्लेम करावी लागेल. हॉस्पिटलचे बिल क्लिअर केल्यानंतर, पॉलिसीधारकाने क्लेम फॉर्म भरणे आवश्यक आहे आणि लॅब रिपोर्ट, डिस्चार्ज पेपर, एक्स-रे, प्रीस्क्रिप्शन इ. सारखे सर्व डॉक्युमेंट्स आणि स्टेटमेंट साक्षांकित करणे आवश्यक आहे आणि त्यास हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कंपनीकडे सबमिट करणे आवश्यक आहे. इन्श्युरर डॉक्युमेंट्स रिव्ह्यू करेल आणि त्यानुसार रकमेची रिएम्बर्समेंट करेल. पॉलिसीधारक एकाधिक इन्श्युररकडून क्लेम करत असल्यास, त्यांना क्लेम सेटलमेंटचा सारांश देखील सबमिट करणे आवश्यक आहे.
हेल्थ इन्श्युरन्स क्लेम विषयी पॉलिसीधारकाद्वारे विचारलेले जाणारे नेहमीचे प्रश्न खालीलप्रमाणे:
1. पॉलिसीधारक किती दिवसांनंतर हेल्थ इन्श्युरन्सचा क्लेम करू शकतो?
हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्रोव्हायडरवर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे पॉलिसी निवडल्यानंतर 30 ते 45 दिवसांनंतर केले जाऊ शकते. काही कंपन्यांचा गंभीर आजारासाठी अधिक विस्तारित प्रतीक्षा कालावधी असतो.
2. एका वर्षात, पॉलिसीधारक त्याचा हेल्थ इन्श्युरन्सचा किती वेळा क्लेम करू शकतो?
अनेकवेळा जेव्हा
सम इन्शुअर्ड संपत नाही. तोपर्यंत काही इन्श्युरन्स कंपन्यांनी क्लेमची संख्या मर्यादित केली आहे. हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी इन्श्युररकडे तपासणे आवश्यक आहे.
अंतिम विचार
आकस्मिक आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत सर्वोत्तम हेल्थ केअर सुविधांचा लाभ घेण्यासाठी हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्लॅनमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्हाला वैद्यकीय उपचारांच्या खर्चासाठी कव्हरेज प्राप्त होईल. पॉलिसी धारकाकडे एकाधिक हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी प्लॅन्समध्ये गुंतवणूक करण्याचे आणि आवश्यक वेळी कोणती पॉलिसी वापरली जाणे आवश्यक आहे ते निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. पॉलिसीधारकाला दोन कंपन्यांकडे क्लेम करण्याचा अधिकार आहे परंतु ट्रीटमेंटचा खर्च दोन हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी कंपन्यांकडून क्लेम केलेल्या रकमेपेक्षा जास्त असू शकत नाही याची खात्री मात्र करणे आवश्यक आहे.
*प्रमाणित अटी लागू
इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.
प्रत्युत्तर द्या