रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
What is IRDA?
मे 19, 2021

आयआरडीएआय म्हणजे काय? आयआरडीएचे कार्य

इन्श्युरन्सची संकल्पना 6,000 वर्षांपूर्वीची आहे. ज्यावेळी व्यक्ती स्वत:च्या बचावासाठी सुरक्षा जाळ्यांचा वापर करत असे. या गरजेची जाणीव झाली आणि इन्श्युरन्स संकल्पनेला जन्म मिळाला. इन्श्युरन्स शब्दाचा डिक्शनरी मधील अर्थ पुढीलप्रमाणे “एक व्यवस्था ज्याद्वारे एखादी संस्था विशिष्ट पेमेंट प्रीमियम भरण्याच्या बदल्यात निर्दिष्ट नुकसान, हानी, आजार किंवा मृत्यूसाठी भरपाईची हमी प्रदान करते.”. सिक्युरिटी संकल्पनेच्या वाढत्या आवश्यकतेमुळे जनरल इन्श्युरन्स नंतर लाईफ इन्श्युरन्स मध्ये अधिक वाढ दिसून येत आहे. भारतात इन्श्युरन्सचा प्रवेश सरकारच्या नियमन अंतर्गतच झाला. तथापि, विस्तारित इन्श्युरन्स इंडस्ट्रीच्या कार्यावर संनियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र नियामक संस्था म्हणून इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा आयआरडीएची स्थापना करण्यात आली.

आयआरडीए म्हणजे काय?

आयआरडीए किंवा इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया ही भारतातील इन्श्युरन्स क्षेत्रातील कार्याचे नियमन करणारी शीर्ष संस्था आहे. आयआरडीएचा प्राथमिक उद्देश पॉलिसीधारकांचे स्वारस्य सुरक्षित ठेवणे आणि देशात इन्श्युरन्सची वाढ सुनिश्चित करणे हे आहे. जेव्हा इन्श्युरन्स इंडस्ट्रीचे नियमन करण्याची वेळ येते. तेव्हा आयआरडीए लाईफ इन्श्युरन्स सोबतच जनरल इन्श्युरन्स क्षेत्रात कार्यरत कंपन्यांचाही विचार करते.

आयआरडीएचे कार्य कोणते आहेत?

वरील माहितीप्रमाणे, इन्श्युरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाचे प्राथमिक उद्दिष्ट इन्श्युरन्स कायद्यात नमूद केलेल्या तरतूदींची अंमलबजावणी करणे हे आहे. हे त्यांच्या मिशन स्टेटमेंटद्वारे पुढे समजू शकते जे खालीलप्रमाणे आहे-
  • सुयोग्य आणि न्याय ट्रीटमेंटच्या सुनिश्चितीसोबत पॉलिसीधारकाचे स्वारस्य सुरक्षित ठेवणे.
  • लागू कायदे आणि नियमांची आर्थिक सुदृढता सुनिश्चित करताना इन्श्युरन्स इंडस्ट्रीचे निष्पक्ष नियमन करणे.
  • इन्श्युरन्स इंडस्ट्रीमधील कोणतीही अस्पष्टता टाळण्यासाठी नियमित अंतराने नियमनाची निर्मिती करणे.

इन्श्युरन्स सेक्टरमध्ये आयआरडीएची भूमिका आणि महत्त्व काय आहे?

भारताने 1800 मध्ये औपचारिक चॅनेलद्वारे इन्श्युरन्स संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास आरंभ केला आणि तेव्हापासून सकारात्मक सुधारणा दिसून येत आहे. त्यानंतर नियमन संस्थेद्वारे द्वारे विविध कायद्यांद्वारे नियमन केले जात आहे आणि पॉलिसीधारकाच्या स्वारस्याचा विचार करून त्यामध्ये महत्वाचे बदलही करण्यात आले. खाली आयआरडीएच्या महत्वाच्या भूमिका विशद केल्या आहेत -
  • पहिले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पॉलिसीधारकाचे स्वारस्य सुरक्षित ठेवणे.
  • सर्वसामान्य माणसाला फायदा होण्याच्या हेतूने व्यवस्थितपणे इन्श्युरन्स इंडस्ट्रीचा विकास करणे.
  • इन्श्युरन्स कंपनीची सक्षमता लक्षात घेऊन आर्थिक सुदृढतेसह व्यवहार निष्पक्ष, स्पर्धात्मक रीतीने सुरू असल्याचे सुनिश्चित करणे.
  • योग्य इन्श्युरन्स क्लेमची जलद आणि त्रासमुक्त सेटलमेंट सुनिश्चित करणे.
  • योग्य प्रणालीद्वारे पॉलिसीधारकाच्या तक्रारींचे निवारण करणे.
  • फसवणूक टाळणे आणि गैरप्रवृत्तींना आळा घालणे.
  • फायनान्शियल मार्केट मध्ये इन्श्युरन्स कंपन्यांची निष्पक्षता, पारदर्शकता आणि संनियंत्रण करणे.
  • फायनान्शियल स्थिरतेच्या उच्च दर्जासह विश्वसनीय मॅनेजमेंट प्रणालीची निर्मिती.

आयआरडीए द्वारे कोणत्या प्रकारच्या इन्श्युरन्स पॉलिसीचे रेग्युलेशन केले जाते?

इन्श्युरन्स सेक्टरचे वर्गीकरण विस्तृत दोन भागांमध्ये आहे - लाईफ आणि नॉन-लाईफ जे सर्वसाधारणपणे जनरल इन्श्युरन्स म्हणूनही ओळखले जाते. लाईफ इन्श्युरन्स साठी नावाप्रमाणेच आपल्या आयुष्याची सुरक्षा सुनिश्चित करणाऱ्या पॉलिसीचे नियमन केले जाते. परंतु जनरल इन्श्युरन्स म्हणजे काय? जनरल इन्श्युरन्स मध्ये लाईफ व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टी कव्हर केल्या जातात ज्यामध्ये समाविष्ट आहे हेल्थ इन्श्युरन्स, कार इन्श्युरन्स, टू-व्हीलर इन्श्युरन्स, होम इन्श्युरन्स, कमर्शियल इन्श्युरन्स, ट्रॅव्हल इन्श्युरन्स आणि बरेच काही. या आयआरडीएच्या नियमन अंतर्गत असलेल्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. परंतू केवळ वर उल्लेख केलेल्या जबाबदाऱ्यांपर्यंतच मर्यादित नाही. त्यामध्ये भारतात इन्श्युरन्स कंपन्यांना बिझनेस करण्यासाठी रजिस्ट्रेशनला मान्यता देण्याचा देखील समावेश आहे. तसेच इन्श्युरर आणि पॉलिसीधारक यादरम्यानच्या वादाचे देखील निराकरण केले जाते आणि अशाप्रकारचे अनेक कार्ये पार पाडली जातात.   *प्रमाणित अटी लागू इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत