ENG

Claim Assistance
Get In Touch
The Importance of Wearing a Helmet
जानेवारी 10, 2019

तुम्ही टू-व्हीलर चालवताना हेल्मेट का घालावे?

अलीकडेच, टू-व्हीलर चालवताना हेल्मेट घालणे पुण्यामध्ये अनिवार्य करण्यात आले आहे. पुणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. रस्त्यावरील अपघातांची संख्या कमी करणे हा पुण्यामध्ये हेल्मेट अनिवार्य करण्यामागील दृष्टीकोन असल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. पोलीस याबाबत गांभीर्याने विचार करत असताना नागरिक मात्र विविध कारणे पुढे करून हेल्मेट घालण्यास (क्षुल्लक शंका) नकार देत आहेत:
 • हेल्मेटमुळे अस्वस्थ वाटते
 • ज्यावेळी बाईक चालवत नसतो तेव्हा हेल्मेट सोबत ठेवणे कठीण ठरते
 • हेल्मेट मुळे केसांची घडी विस्कटते
परंतु तुमच्या मौल्यवान आयुष्याच्या तुलनेत ही कारणे नगण्य आहेत. आपल्याला मध्ययुगापासून हेल्मेट अस्तित्वात असल्याचे दिसते. तथापि, यापूर्वीच्या काळात केवळ सैन्य वापरासाठी हेल्मेटचा वापर मर्यादित होता. काळानुसार डिझाईन आणि हेल्मेटचा वापरात बदल होत गेला. खेळ खेळताना आणि कॅरेज रायडर्सची सुरक्षा करताना खेळाडूंचे संरक्षण करण्यासाठी हेडगिअरचा वापर केला जातो. आज, हेल्मेटचे महत्त्व अधिक प्रासंगिक आहे कारण रस्त्यांवर वेगवान वाहनांचा प्रवाह अधिक असतो आणि अपघातात होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. तसेच, रस्त्यांची डागडुजी आणि सातत्यपूर्ण होत असलेल्या रस्ते विकास कामामुळे अपघातांची शक्यता वाढते आहे.

टू-व्हीलर वर स्वार असताना हेल्मेट वापरण्याचे महत्व:

 • हेल्मेट मुळे डोक्याच्या इजेपासून संरक्षण -- हेल्मेट घातल्यामुळे तुमच्या डोक्यावर होणारा अपघाताचा परिणाम कमी होण्यास मदत होते. समजा, तुम्ही टू-व्हीलर चालवत असताना तुम्ही हेल्मेट घातले नसल्यास दुर्देवाने अपघात घडल्यास तुमच्या डोक्याला गंभीर स्वरुपाची इजा होऊ शकते. जर हेल्मेट नसताना झालेल्या धडकीमुळे मेंदूला जीवघेणी दुखापत होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभरासाठी फटका बसू शकतो. त्यामुळे तुमच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट परिधान करायलाच हवे.
 
 • हेल्मेट मुळे डोळ्यांचे संरक्षण – संपूर्ण चेहऱ्याला कव्हर करणारे हेल्मेट मुळे अपघाताच्या स्थितीत संपूर्ण संरक्षण प्राप्त होते. अशाप्रकारच्या हेल्मेट मुळे टू-व्हीलर चालवताना धूळ तसेच उच्च क्षमतेच्या प्रकाशापासून डोळ्यांचे संरक्षण होते. तसेच हेल्मेटच्या डिझाईनमुळे बाईक चालवताना पुरेश्या प्रमाणात आजूबाजूचा वेध घेता येतो.
 
 • हेल्मेट वाहनाचे सर्वोत्तम नियंत्रण सुनिश्चित करते – हेल्मेट घालण्यामुळे तुम्ही बाईक राईड करताना तुमचे लक्ष केंद्रित होते. तुम्ही टू-व्हीलर चालवताना हेल्मेट घातल्यामुळे अलर्ट राहतात आणि तुमचा स्पीड नियंत्रित करू शकता. यामुळे अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.
 
 • हेल्मेट मुळे थंड वाऱ्यापासून संरक्षण – हेल्मेट केवळ तुमच्या डोक्याला कव्हर करत नाही तर तुमच्या कानांचे थंड लहरींपासून संरक्षण होते. थंडीच्या दिवसात हेल्मेटच्या संरक्षण आच्छादनामुळे तुमच्या कानांचा थंड वातावरणापासून बचाव होतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात हेल्मेटच्या आतील बाजूस असलेल्या कुशन मुळे तापमानाची तीव्रता कमी होते.
 
 • हेल्मेट मुळे दंडापासून संरक्षण – हेल्मेट अनिवार्य केल्यामुळे हेल्मेट न घालणारे बाईकस्वार वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग करताना हेल्मेट घालणे आवश्यक ठरते. यामुळे तुम्हाला अनावश्यक स्वरुपाचा दंड भरावा लागणार नाही आणि तुमचे ड्रायव्हिंग रेकॉर्डही खराब होणार नाही.

 

हेल्मेट खरेदीसाठी टिप्स

 • बाईक वर स्वार असणाऱ्या सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी चालक तसेच सह-चालकाने हेल्मेट खरेदी करायला हवे.
 • हेल्मेट खरेदी करताना तुमच्या संपूर्ण चेहऱ्याला कव्हर करणारे घ्यावे आणि त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षा मिळेल.
 • हेल्मेटला देखील समाप्ती तारीख असते.. त्यामुळे, तुम्ही प्रत्येक 3-5 वर्षांनी नवीन हेल्मेटची खरेदी करायला हवी.
 • तुमची बाईक चालवताना समोरील स्पष्टपणे दिसण्यासाठी नियमितपणे तुमच्या हेल्मेटची काच स्वच्छ करा.
 • तुमच्या हेल्मेटचे नुकसान झाले असल्यास तत्काळ बदला.
  या नवीन वर्षात, आम्ही तुम्हाला टू-व्हीलर चालवताना हेल्मेट परिधान करण्याची विनंती करतो. हा मेसेज पसरविण्यासाठी तुमच्या सोशल मीडिया हँडल्सचा वापर करा. तुम्ही स्वीकारू शकता अशा आणखी एक सुरक्षा उपाय म्हणजे इन्श्युरन्स पॉलिसी बाईकसाठी, जर तुम्हाला आणि/किंवा वाहनाला कोणत्याही अपघातात किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर तुमच्या फायनान्सची काळजी घेऊ शकते. अधिक जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 4.1 / 5 वोट गणना: 13

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

 • अरविंद हरित - फेब्रुवारी 24, 2021 2:40 pm

  प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात लोक सुरक्षा उपायांसाठी खालील नियमांचे पालन करत नाहीत. हजारो जीवन वाचविण्यासाठी या माहितीला हायलाईट केल्याबद्दल धन्यवाद.

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत