ENG

Claim Assistance
Get In Touch
What is PUC in Bikes?
एप्रिल 1, 2021

बाईकची पीयूसी म्हणजे काय रे भाऊ?

वायू प्रदूषण ही आजच्या घडीला देशाच्या मुख्य चिंतेपैकी एक आहे. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. सरकारच्या वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांपैकी एक म्हणजे वाहनाचे प्रदूषण मर्यादित ठेवणे. भारतीय रस्त्यांवरील वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने, प्रदूषणावर लक्ष ठेवणे अत्यावश्यक ठरले आहे. याच कारणामुळे वाहन मंत्रालयाने सेंट्रल मोटर व्हेईकल ॲक्ट, 1989 नुसार चालकांसाठी पीयूसी सर्टिफिकेट अनिवार्य केले आहे. तर, बाईक किंवा कार किंवा इतर कोणत्याही वाहनाची पीयूसी म्हणजे काय?? त्याचे महत्त्व काय आहे?? अनेक प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. चला तर त्यांचा शोध घेऊयात!  

पीयूसी म्हणजे काय?

पीयूसी म्हणजे पोल्यूशन अंडर कंट्रोल, जे वाहनाच्या उत्सर्जन पातळीची चाचणी केल्यानंतर प्रत्येक वाहन मालकाला जारी केलेले सर्टिफिकेट आहे. वाहनांनी निर्माण केलेल्या उत्सर्जनांविषयी आणि जर ते निर्धारित मर्यादेच्या आत असतील तर त्यासंबंधीची माहिती सर्टिफिकेट प्रदान करते. या उत्सर्जन स्तरांची चाचणी देशभरातील अधिकांश पेट्रोल पंपवर स्थित अधिकृत सेंटरवर केली जाते. बाईक इन्श्युरन्स, रजिस्ट्रेशन इ. प्रमाणे पीयूसी सर्टिफिकेट सर्व वेळी सोबत बाळगणे आवश्यक आहे. पीयूसी सर्टिफिकेट मध्ये खालील माहिती समाविष्ट आहे:  
  • कार, बाईक किंवा इतर कोणत्याही वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर.
  • टेस्ट वैधता कालावधी
  • पीयूसीचा सीरिअल नंबर
  • ज्या दिवशी उत्सर्जन स्तराची टेस्ट झाली ती तारीख
  • वाहनाचे उत्सर्जन रीडिंग्स
 

माझ्यासाठी पीयूसी आवश्यक आहे का?

होय, पीयूसी सर्टिफिकेट हे तुमचे ड्रायव्हिंग परवाना, इन्श्युरन्स आणि रजिस्ट्रेशन प्रमाणेच सोबत बाळगणे आवश्यक आहे. त्याची आवश्यकता खालीलप्रमाणे:  
  1. कायद्यानुसार हे अनिवार्य आहे: जर तुम्ही नियमितपणे वाहन चालवत असाल तर पीयूसी सर्टिफिकेट बाळगणे आवश्यक आहे. केवळ डॉक्युमेंटेशनसाठीच नाही तर भारतीय कायद्यानुसार हे अनिवार्य आहे.
  माझा मित्र गौरवने कोणताही नियम मोडला नव्हता तरी त्याला ट्रॅफिक तिकीट देण्यात आले. का? जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा कळले की त्याच्याकडे वैध पीयूसी सर्टिफिकेट नव्हते. त्यासाठी त्याला ₹1000 दंड भरावा लागला. हा दंड टाळण्यासाठी, तुमच्याकडे पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.  
  1. हे प्रदूषण नियंत्रणास प्रोत्साहन देते: पीयूसी सर्टिफिकेट बाळगण्याचे दुसरे कारण म्हणजे ते पर्यावरण बचत करण्यास मदत करेल. तुमच्या वाहनाच्या उत्सर्जन स्तरांना परवानगी असलेल्या मर्यादेमध्ये ठेवून, तुम्ही प्रदूषण कमी करण्यास आणि अशा प्रकारे पर्यावरण वाचवण्यास मदत करू शकता.
 
  1. हे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या आरोग्याविषयी जागरूक ठेवते: पीयूसी सर्टिफिकेट असण्याची अन्य आवश्यकता म्हणजे ते तुम्हाला तुमच्या वाहनाच्या आरोग्याविषयी माहिती देते. अशा प्रकारे, भविष्यातील भारी दंड होऊ शकणार्‍या कोणत्याही नुकसानीस प्रतिबंध घालता येतो.
 
  1. हे दंड प्रतिबंधित करते: नवीन नियमांनुसार, जर तुम्ही पीयूसी सर्टिफिकेट बाळगत नसाल तर तुम्हाला ₹1000 दंडासह शुल्क आकारले जाऊ शकते. हे पुनरावृत्ती झालेल्या घटनेवर ₹2000 देखील असू शकते. हे दंड टाळण्यासाठी, पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
 

भारतातील वाहनांसाठी निर्धारित प्रदूषण नियम काय आहेत?

वाहने विविध प्रकारचे असतात जसे की कार, बाईक, ऑटो आणि आणखीन. तसेच, निर्धारित प्रदूषण नियम इंधनाच्या प्रकारावर आधारित बदलतात. स्वीकार्य प्रदूषण पातळीवर एक नजर टाकू.  

बाईक आणि 3-व्हीलर्समध्ये पीयूसी काय आहे?

बाईक आणि 3-व्हीलरसाठी निर्धारित प्रदूषण स्तर खालीलप्रमाणे:  
वाहन हायड्रोकार्बन (प्रति मिलियन भाग) कार्बन मोनो-ऑक्साईड (सीओ)
31 मार्च 2000 पूर्वी किंवा त्यावेळी निर्मित बाईक किंवा 3-व्हीलर (2 किंवा 4 स्ट्रोक) 4.5% 9000
31 मार्च 2000 नंतर निर्मित बाईक किंवा 3-व्हीलर (2 स्ट्रोक) 3.5% 6000
31 मार्च 2000 नंतर निर्मित बाईक किंवा 3-व्हीलर (4 स्ट्रोक) 3.5% 4500
 

पेट्रोल कारसाठी प्रदूषण स्तर

 
वाहन हायड्रोकार्बन (प्रति मिलियन भाग) कार्बन मोनो-ऑक्साईड (सीओ)
भारत स्टेज 2 नियमांनुसार निर्मित 4-व्हीलर्स 3% 1500
भारत स्टेज 3 नियमांनुसार निर्मित 4-व्हीलर्स 0.5% 750
 

सीएनजी/एलपीजी/पेट्रोल वाहनांसाठी परवानगी असलेले प्रदूषण स्तर (भारत स्टेज 4)

 
वाहन हायड्रोकार्बन (प्रति मिलियन भाग) कार्बन मोनो-ऑक्साईड (सीओ)
भारत स्टेज 4 नियमांनुसार निर्मित सीएनजी/एलपीजी 4-व्हीलर्स 0.3% 200
भारत स्टेज 4 नियमांनुसार निर्मित पेट्रोल 4-व्हीलर्स 0.3% 200
 

पीयूसी सर्टिफिकेटचा वैधता कालावधी किती आहे?

जेव्हा तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल तेव्हा डीलर तुम्हाला एक वर्षासाठी वैध पीयूसी सर्टिफिकेट प्रदान करतो. त्यानंतर, जेव्हा एक वर्ष पूर्ण होईल, तेव्हा तुम्हाला तुमचे वाहन तपासण्यासाठी आणि नवीन पीयूसी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी अधिकृत एमिशन टेस्टिंग सेंटरकडे जावे लागेल, या सर्टिफिकेटची वैधता सहा महिने असते. त्यामुळे, प्रत्येक सहा महिन्याला त्यास रिन्यू करणे आवश्यक आहे.  

पीयूसी सर्टिफिकेट कसे मिळवावे?

ते मिळवण्यासाठी काही सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे:  
  • सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत सेंटर शोधणे आवश्यक आहे. तुम्ही एकतर पेट्रोल पंपवर जाऊ शकता आणि त्याचे प्रदूषण तपासणी सेंटर आहे का ते तपासू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही परिवहन प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन परवानाकृत आरटीओ मान्यताप्राप्त पीयूसी सेंटर शोधू शकता.
 
  • नजीकचे पीयूसी सेंटर शोधल्यानंतर, तुमचे वाहन त्याठिकाणी घेऊन जा आणि कर्मचारी तुमच्या वाहनाच्या एक्झॉस्ट पाईपमध्ये एमिशन टेस्टिंग ट्यूब घालेल. हे तुमच्या वाहनाची उत्सर्जन पातळी प्रदान करेल.
 
  • त्यानंतर; तो तुमच्यासाठी एक सर्टिफिकेट ड्राफ्ट करेल जे इलेक्ट्रॉनिकरित्या निर्माण केले जाईल. यामध्ये तुमच्या वाहनाच्या उत्सर्जन स्तराचा समावेश असेल.
 

त्यासाठी किती खर्च होईल?

जर बाईक इन्श्युरन्स आणि अन्य डॉक्युमेंट्स सोबत तुलना केली तर पीयूसी सर्टिफिकेटची किंमत कमी आहे. एका पीयूसी सर्टिफिकेटसाठी तुम्हाला सुमारे ₹50-100 खर्च येईल.  

एफएक्यू

  1. मला पीयूसी ऑनलाईन मिळू शकेल का?
होय, जारी केल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन पीयूसी मिळू शकेल. तुम्हाला पहिल्यांदा अधिकृत सेंटरवर तुमचे वाहन तपासणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही परिवहन वेबसाईटवरून ऑनलाईन पीयूसी डाउनलोड करू शकता.  
  1. नवीन बाईकसाठी पीयूसी सर्टिफिकेट आवश्यक आहे का?
होय, बाईक इन्श्युरन्सप्रमाणेच, नवीन बाईकसाठी पीयूसी सर्टिफिकेट देखील आवश्यक आहे. तथापि, तुम्हाला त्यासाठी कोणत्याही अधिकृत पीयूसी सेंटरला भेट देण्याची गरज नाही. ते डीलरद्वारे प्रदान केले जाईल जे 1 वर्षासाठी वैध असेल.  
  1. पीयूसी सर्टिफिकेटची आवश्यकता कोणाला आहे?
दी सेंट्रल मोटर व्हेईकल रुल्स 1989 नुसार प्रत्येक वाहनाकडे पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. यामध्ये भारत स्टेज 1 अनुरूप वाहने समाविष्ट आहेत/भारत स्टेज 2/भारत स्टेज 3/भारत स्टेज 4 वाहने आणि एलपीजी/सीएनजी वर चालणारे.  
  1. मी डिजिलॉकरमध्ये पीयूसी सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो/शकते का?
होय, इतर सर्व वाहन डॉक्युमेंट्ससह, तुम्ही डिजिलॉकर ॲपमध्येही पीयूसी समाविष्ट करू शकता.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 3.8 / 5 वोट गणना: 6

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत