रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Documents for Motor Insurance Claim
जुलै 23, 2020

मोटर इन्श्युरन्स क्लेम दाखल करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

भारतीय रस्त्यांवरील वर्दळ वाढत आहे आणि ती आतापर्यंतच्या उच्चांकावर आहे. ट्रॅफिक जॅम आणि जॅम उघडल्यानंतर लोक जी घाई दाखवतात, त्‍यामुळे अपघात होतो, परिणामी वाहनांचे नुकसान आणि लोकांना दुखापती होतात. ट्रॅफिक जॅम हटविण्‍याव्यतिरिक्त, लोक, विशेषत: तरुण आपल्या वाहनांची गती वाढवतात आणि राजमार्गावर रेस करतात, ज्यामुळे जीवघेण्या दुखापती आणि वाहनाचे गंभीर नुकसान होते. थर्ड पार्टी (लोक/प्रॉपर्टी) आणि तुमच्या स्वत:च्या वाहनाला झालेले नुकसान तुम्हाला मोठ्या आर्थिक बोजाखाली आणू शकते. म्‍हणून आम्ही आपणाला वाहन चालवताना काळजी घेण्‍याची विनंती करतो. आम्ही तुम्हाला सर्वसमावेशक खरेदी करण्याचा सल्ला देतो ऑनलाईन मोटर इन्श्युरन्स  खरेदी करण्याचा सल्ला देतो. ज्याद्वारे आकस्मिक दुर्देवी घटनांमध्ये तुम्हाला आर्थिक संरक्षण प्रदान केले जाऊ शकेल. आपण योग्य ॲड-ऑन कव्हरसह मोटर इन्‍शुरन्‍स पॉलिसी खरेदी केल्यावर तुम्ही मोटर इन्शुरन्‍स क्लेम सेटलमेंट प्रक्रिया पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच, आपल्‍याला मोटर इन्श्युरन्स क्लेम दाखल करण्याची गरज असेल अशा केसमध्‍ये आपल्‍याला आवश्यक असलेल्या सर्व डॉक्युमेंट्सची तपासणी करावी. वैकल्पिकरित्या, तुम्ही फक्त येथे शेअर करीत असलेली यादी रेफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला क्लेम करताना हरवल्यासारखे वाटणार नाही. मोटर इन्‍शुरन्‍स क्लेम दाखल करतेवेळी आपल्‍याकडे तयार असावेत असे डॉक्युमेंट्स आणि तपशील खालीलप्रमाणे आहेत:
  • तुमचा पॉलिसी नंबर (पॉलिसी डॉक्युमेंट किंवा कव्हर नोट) नमूद असलेला इन्श्युरन्सचा पुरावा
  • इंजिन क्रमांक आणि चेसिस नंबर
  • अपघाताचा स्थान, तारीख आणि वेळ यासारखे अपघात तपशील
  • कारचे रीडिंग (किलोमीटर मध्ये)
  • पूर्ण भरलेला क्लेम फॉर्म
  • एफआयआरची प्रत (थर्ड पार्टी मालमत्तेचे नुकसान / मृत्यू / शारीरिक इजा झाल्यास)
  • वाहनाची आरसी कॉपी
  • वाहन परवाना प्रत
आपल्‍याला घटनेच्या स्वरुपानुसार गॅरेज/डीलरकडे खालील डॉक्युमेंट्स सबमिट करणे आवश्यक आहे. अपघाताचे क्लेम्स
  • पोलीस पंचनामा/एफआयआर
  • टॅक्स पावती
  • वाहन जिथून दुरूस्ती होणार आहे त्या दुरूस्ती कारागिरीकडून दुरूस्तीच्या खर्चाचा अंदाज
  • मूळ दुरुस्ती बिल, पेमेंट पावती (कॅशलेस क्लेम सेटलमेंटसाठी - केवळ दुरुस्ती बिल)
  • रेव्हेन्यू स्टँपवर सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज सह सॅटिसफॅक्शन व्हाऊचर
  • जर तुम्ही वाहन नजीकच्या गॅरेजमध्ये नेलेले नसल्यास वाहन इन्स्पेक्शन ॲड्रेस
चोरीची क्लेम
  • टॅक्स पेमेंट पावती
  • मागील इन्श्युरन्स तपशील - पॉलिसी नंबर, इन्श्युरिंग ऑफिस/कंपनी, इन्श्युरन्सचा कालावधी
  • चावीचा सेट/सर्व्हिस बुकलेट/वॉरंटी कार्ड
  • फॉर्म 28, 29 आणि 30
  • कायदेशीर हक्क सर्टिफिकेट
  • रेव्हेन्यू स्टँपवर सही केलेले क्लेम्स डिस्चार्ज व्हाऊचर
थर्ड पार्टी क्लेम
  • योग्यरित्या स्वाक्षरी केलेला क्लेम फॉर्म
  • पोलीस एफआयआर कॉपी
  • वाहन परवाना प्रत
  • पॉलिसीची प्रत
  • वाहनाची आरसी कॉपी
  • कंपनी रजिस्टर्ड वाहनाच्या मूळ डॉक्युमेंट्सच्या बाबतीत आवश्यक स्टॅम्प
तुम्ही तुमच्या कार इन्श्युरन्स किंवा टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी क्लेम त्वरित सबमिट व सेटल करण्यासाठी आमच्या इन्श्युरन्सचे वॉलेट अ‍ॅपचे मोटर ओटीएस फीचर वापरु शकता. ज्याद्वारे तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलचा वापर करून तुमच्या वाहनाला झालेल्या नुकसानीचे फोटो क्लिक आणि अपलोड करायचे आहेत.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत