रिस्पेक्ट सीनिअर केअर रायडर: 9152007550 (मिस्ड कॉल)

सेल्स: 1800-209-0144| सर्व्हिस: 1800-209-5858 सर्व्हिस चॅट: +91 75072 45858

ENG

Claim Assistance
Get In Touch
Transfer Bike Insurance Policy for Second Hand Bike
फेब्रुवारी 17, 2023

बाईक इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करा: स्टेप्स, सेकंड-हँड वाहनासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

भारतात मोठ्या प्रमाणात टू-व्हीलरने वाहतूक केली जाते, विशेषत: जेव्हा ट्रॅफिकमधून लवकरात लवकर बाहेर पडायचे असेल तेव्हा टू-व्हीलर कामी येते. टू-व्हीलरमध्ये स्कूटर, मोपेड आणि मोटरसायकलचा समावेश होतो. भारतात ही वाहने रस्त्यावर मोठ्या संख्येने दिसून येतात. भारतातील लोक त्यांच्या बदलत्या गरजा आणि टू-व्हीलर इंडस्ट्री मधील बदलत्या ट्रेंडवर आधारित बाईक खरेदी आणि विक्री करतात. अनेकजण नवीन टू-व्हीलर खरेदी करतात, तर खूप लोक सेकंड-हँड वाहन देखील खरेदी करतात. जेव्हा नवीन बाईक खरेदी कराल तेव्हा तुम्ही खरेदी करा बाईक इन्श्युरन्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन. पण जेव्हा सेकंड-हँड बाईक खरेदी कराल किंवा तुमच्या वापरलेल्या बाईकची विक्री कराल तेव्हा तुम्ही वाहनाची विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसी नवीन मालकाच्या नावे ट्रान्सफर करणे आवश्यक आहे.

विक्रेत्यांसाठी बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर का लाभदायक आहे?

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर विक्रेत्यांसाठी लाभदायक आहे कारण ते त्यांना त्यांच्या बाईकसाठी उर्वरित इन्श्युरन्स कव्हरेज नवीन मालकाकडे ट्रान्सफर करण्याची अनुमती देते. हे विशेषत: अशा विक्रेत्यांसाठी उपयुक्त असू शकते ज्यांच्याकडे त्यांच्या पॉलिसीवर लक्षणीय कव्हरेज रक्कम शिल्लक असते, कारण त्यामुळे नवीन मालकाची नवीन पॉलिसी खरेदी करण्यापासून किंवा अतिरिक्त कव्हरेजसाठी पैसे भरण्यापासून बचत होऊ शकते. याव्यतिरिक्त, इन्श्युरन्स कव्हरेज ट्रान्सफर करून, विक्रेता अपघात किंवा चोरीच्या बाबतीत नवीन मालक संरक्षित असल्याची खात्री करू शकतो. विक्रेत्यांसाठी बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफरचा मुख्य फायदा म्हणजे ते त्यांच्या बाईकचे मूल्य वाढवू शकतात. जर एखाद्या संभाव्य खरेदीदाराला माहित असेल की बाईकमध्ये उर्वरित इन्श्युरन्स कव्हरेज आहे, तर ते बाईक खरेदी करण्याची शक्यता अधिक असू शकते, कारण त्यांना नवीन पॉलिसी खरेदी करण्याची किंवा अतिरिक्त कव्हरेजसाठी देय करण्याची चिंता करण्याची गरज नाही. यामुळे बाईक खरेदीदारांना आकर्षक डील मिळू शकते आणि विक्रेता बाईकची किंमत आणखीन वाढवू शकतो. अंतिमतः, विक्रेत्यांना नवीन मालकास सुरक्षा आणि मनःशांती प्रदान करून त्यांच्या मनातील किंतु परंतु दूर करता येईल.

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स

टू-व्हीलर इन्श्युरन्स ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स:
  1. आरसी (रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट)
  2. वाहनाचा तपशील
  3. मूळ इन्श्युरन्स पॉलिसी
  4. मालकी ट्रान्सफरची तारीख
  5. मागील मालकाचे नाव
  6. मूळ पॉलिसीसाठी भरलेल्या प्रीमियमचा तपशील
  7. मागील पॉलिसीधारकाकडून एनओसी (ना हरकत सर्टिफिकेट)
  8. खरेदीदार आणि विक्रेत्याची वैयक्तिक माहिती:
  9. पॅन किंवा आधार कार्ड
  10. वाहन परवाना
  11. संपर्क तपशील
ट्रान्सफर प्रोसेस तुम्हाला बाईक इन्श्युरन्स प्लॅन नवीन मालकाकडे ट्रान्सफर करताना तुम्ही गमावू शकणारा अर्जित नो-क्लेम बोनस राखण्याची परवानगी देते. त्यानंतर, तुम्ही खरेदी केलेल्या नवीन पॉलिसीमध्ये बोनस ट्रान्सफर करू शकता.

टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करण्याच्या स्टेप्स

टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करण्यासाठी, खरेदीदाराने खाली नमूद स्टेप्सचे अनुसरण करणे आवश्यक आहे:
  1. तुम्ही टू-व्हीलर खरेदी केल्यानंतर 14 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या टू-व्हीलरच्या इन्श्युरन्स ट्रान्सफरसाठी अप्लाय करा.
  2. तुमची सर्व आवश्यकता पूर्ण करू शकणारा टू-व्हीलर इन्श्युरन्स प्लॅन निवडा.
  3. प्रपोजल फॉर्म भरा आणि मालकीच्या ट्रान्सफर विषयीचे तपशील स्पष्टपणे नमूद करा.
  4. वर नमूद केलेली सर्व डॉक्युमेंट्स इन्श्युरन्स प्रोव्हायडरकडे सबमिट करा.
  5. आवश्यक डॉक्युमेंट्स सह फॉर्म 29/30/Sale करार सबमिट करा.
  6. इन्श्युरन्स कंपनी एक इन्व्हेस्टिगेटर पाठवेल, जो इन्स्पेक्शन रिपोर्ट तयार करेल.
  7. टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसी ट्रान्सफर करण्यासाठी नाममात्र ट्रान्सफर शुल्क देखील भरणे आवश्यक आहे.
  8. इन्श्युरन्स प्रोव्हायडरद्वारे सर्वकाही व्हेरिफाय केल्यानंतर, टू-व्हीलर पॉलिसी तुमच्या नावावर ट्रान्सफर केली जाईल.

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर विषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1. बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर म्हणजे काय?

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर ही विक्रेत्याकडून नवीन मालकाकडे बाईकवर उर्वरित इन्श्युरन्स कव्हरेज ट्रान्सफर करण्याची प्रोसेस आहे.

2. बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर कसे काम करते?

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये सामान्यपणे विक्रेता त्यांच्या इन्श्युरन्स कंपनीला विक्रीची माहिती आणि नवीन मालकाची माहिती प्रदान करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधतो. नंतर इन्श्युरन्स कंपनी नवीन मालकाला कव्हरेज ट्रान्सफर करेल.

3. बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफरसाठी शुल्क आहे का?

काही इन्श्युरन्स कंपन्या बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफरसाठी कमी शुल्क आकारू शकतात, तर काही विनामूल्य ही सर्व्हिस प्रदान करतात. तुमच्या इन्श्युरन्स कंपनीची विशिष्ट पॉलिसी निर्धारित करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधणे योग्य ठरते.

4. बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफरसाठी किती वेळ लागतो?

बाईक इन्श्युरन्स ट्रान्सफर पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ इन्श्युरन्स कंपनीनुसार बदलू शकतो, परंतु सामान्यपणे त्यास काही दिवसांचा कालावधी लागतो.

5. जर मी माझी बाईक विकत असेल तर मला माझ्या इन्श्युरन्स कंपनीला सूचित करणे आवश्यक आहे का?

होय, जर तुम्ही तुमची बाईक विकत असाल तर तुम्हाला तुमच्या इन्श्युरन्स कंपनीला सूचित करणे गरजेचे आहे कारण त्यानंतरच इन्श्युरन्स कव्हरेज नवीन मालकाला ट्रान्सफर केला जाईल.   इन्श्युरन्स हा विनंतीचा विषय आहे. लाभ, अपवाद, मर्यादा, अटी व शर्तींविषयी अधिक तपशीलासाठी, कृपया सेल्स पूर्ण करण्यापूर्वी सेल्स ब्रोशर/पॉलिसी मजकूर काळजीपूर्वक वाचा.  

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 5 / 5 वोट गणना: 18

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत