ENG

Claim Assistance
Get In Touch
Two Wheeler Insurance Online Renewal After Expiry
जुलै 23, 2020

कालबाह्य टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करण्याच्या स्टेप्स

तुमच्या टू-व्हीलर इन्श्युरन्स पॉलिसीचे रिन्यूवल महत्त्वाचे आहे. कारण ही पॉलिसी तुम्हाला तुमच्या बाईकसह अपघात, चोरी, बर्गलरी, नैसर्गिक आपत्ती आणि थर्ड-पार्टी दायित्व यासारख्या घटनांपासून संरक्षित करते. टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवलचे अनेक फायदे आहेत जसे की एनसीबी (नो क्लेम बोनस) आणि तुम्हाला मिळणारी मनःशांती. याव्यतिरिक्त कालबाह्य पॉलिसी व कोणतीही बाईक इन्श्युरन्स पॉलिसी शिवाय वाहन चालविणे भारतात कायद्याने अवैध आहे. तुमच्या विद्यमान इन्श्युरन्स पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवल करणे आवश्यक आहे. खरं तर, इन्श्युरन्स कंपन्या त्यांच्या कस्टमरला सातत्यपूर्ण रिमाइंडर पाठवतात ज्यांची पॉलिसी कालबाह्य होत आहे. तथापि, जर तुम्ही वेळेवर ते करण्यास असमर्थ असाल तर तुम्ही कालबाह्यतेनंतर कधीही टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यूवल करू शकता.

जर तुम्ही कालबाह्य तारखेपूर्वी तुमचा टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यू केला नाही. तर ती ब्रेक-इन केस मानली जाते. जर तुमची पॉलिसी लॅप्स झाली असल्यास तुम्ही खालील बाबी करू शकतात:

  • जर तुम्ही ऑनलाईन तुमचा बाईक इन्श्युरन्स रिन्यू करा पर्याय निवडल्यास तुमच्या वाहनाचे इन्स्पेक्शन अनिवार्य नसेल. परंतु इन्श्युरन्स कंपनीकडून पेमेंट प्राप्त झाल्यानंतर पॉलिसीचा कालावधी 3 दिवसांनंतर सुरू होईल.
  • जर तुम्ही तुमचा कालबाह्य टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑफलाईन रिन्यू करण्याचा पर्याय निवडल्यास तर इन्स्पेक्शन अनिवार्य असेल आणि तुम्हाला आवश्यक डॉक्युमेंट्ससह इन्स्पेक्शन साठी तुमच्या इन्श्युररच्या नजीकच्या ऑफिसमध्ये तुमची बाईक घेऊन जाणे आवश्यक असेल.
  • सामान्यपणे तुम्हाला टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवल साठी खालील डॉक्युमेंट्सची आवश्यकता असेल:
    • तुमच्या मागील इन्श्युररने पाठवलेली मागील पॉलिसीची कॉपी किंवा रिन्यूवल नोटीस
    • आरसी (रजिस्ट्रेशन कार्ड)
    • फोटो
    • वाहन परवाना
  • जर तुमच्या वाहनाचे इन्स्पेक्शन समाधानकारक असेल तर इन्श्युरन्स कंपनी 2 कामकाजाच्या दिवसांमध्ये कव्हर नोट जारी करेल.
  • जर तुम्ही तुमची कालबाह्य पॉलिसी 90 दिवसांनंतर रिन्यू केली तर तुम्ही एनसीबी लाभ गमावू शकता.
  • जर तुम्ही तुमचा इन्श्युरन्स 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर रिन्यू केला तर तुमच्या ब्रेक-इन केसचा अंडररायटरला संदर्भ दिला जाईल.

येथे लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे तुम्ही कालबाह्य टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यू करत असताना इन्श्युरन्स कंपन्या कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारत नाहीत.

कालबाह्य टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन कसे रिन्यू करावे?
कालबाह्यतेनंतर टू-व्हीलर इन्श्युरन्स ऑनलाईन रिन्यूवल ही एक अतिशय सोपी आणि सरळ प्रोसेस आहे. तुम्हाला फक्त खाली नमूद तीन सोप्या स्टेप्सचे अनुसरण करायचे आहे:

  • तुमची इन्श्युरन्स कंपनी निवडा - जर तुम्ही तुमच्या विद्यमान इन्श्युरन्स कंपनीद्वारे प्रदान केलेल्या सर्व्हिस किंवा प्रीमियम रेट बाबत समाधानी नसाल, तर तुमच्याकडे तुमच्या टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवलच्या वेळी तुमचा इन्श्युरर बदलण्याचा पर्याय आहे. तुम्ही टू-व्हीलर इन्श्युरन्सची ऑनलाईन तुलना करू शकता आणि तुमच्या आवश्यकतेनुसार सर्वोत्तम डील मिळवू शकता.
  • तुमचे वाहन तपशील एन्टर करा - तुम्ही निवडलेल्या इन्श्युरन्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि तुमच्या बाईक/टू-व्हीलरचा तपशील द्या. इन्श्युरन्स पॉलिसीचा प्रकार, आयडीव्ही आणि तुम्हाला तुमच्या पॉलिसीसह मिळणारे ॲड-ऑन्स निवडा.
  • पॉलिसी खरेदी करा - पेमेंट करा आणि पॉलिसी खरेदी करा. तुम्हाला लवकरच तुमच्या रजिस्टर्ड मेल आयडीवर तुमच्या पॉलिसीची सॉफ्ट कॉपी प्राप्त होईल.

आशा आहे की या सोप्या स्टेप्स मुळे तुमचे काम सोपे होईल. तुमच्या कालबाह्य झालेल्या किंवा कालबाह्य होणाऱ्या पॉलिसीपूर्वी सुरक्षित राईड साठी आमची ऑनलाईन बाईक इन्श्युरन्स पाहा.. टू-व्हीलर इन्श्युरन्स असल्याने तुम्हाला तुमच्या खिशातून किंवा तुमच्या वाहनाचे नुकसान झाल्यास तुम्हाला भराव्या लागणाऱ्या मोठ्या खर्चापासून बचत होते. अशा प्रकारे, आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमच्या इन्श्युररकडून रिमाइंडर प्राप्त करा आणि तुमची पॉलिसी वेळेत रिन्यू करा. तुमच्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, टू-व्हीलर इन्श्युरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वापरून तुमचे टू-व्हीलर प्रीमियम कॅल्क्युलेट करा.

हा लेख उपयुक्त होता का? त्यास रेटिंग द्या

सरासरी रेटिंग 4 / 5 वोट गणना: 6

सध्या कोणाचेही वोट नाही! या पोस्टला रेटिंग देणारी पहिली व्यक्ती बना.

हा लेख आवडला का?? तुमच्या मित्रांसोबत शेअर करा!

व्यक्त व्हा. खाली कमेंट नमूद करा!

प्रत्युत्तर द्या

तुमचा ईमेल ॲड्रेस सार्वजनिक केला जाणार नाही. सर्व क्षेत्र आवश्यक आहेत